Mandodari - 11 - Last part in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | मंदोदरी - भाग 11 (अंतिम भाग )

Featured Books
Categories
Share

मंदोदरी - भाग 11 (अंतिम भाग )

********११********************

          रामानं सुलोचनेला जायची आज्ञा देताच ती निघाली. तशी ती लंकेत पोहोचली व रितीरिवाजानुसार तिनं आपल्या पतीचं मस्तक कवेत घेतलं व ती त्या पतीच्या मस्तकासह सती गेली होती. त्यातच सती जातांना तिला भयंकर वेदना होत होत्या. परंतु त्या सगळ्या सहन करुन ती राक्षस जातीतून मुक्त होत होती. पुन्हा राक्षसजातीत कधीच जन्म न घेण्यासाठी.
            मंदोदरीला आठवत होता सुलोचनेचा सती जाण्याचा प्रसंग. ती सती गेली होती या जगतातील रितीरिवाजाच्या दूर. जो समाज विधवेला दुःख देत होता. त्या दुःखापासून कितीतरी दूर. तशी लंकेतील प्रजा मंदोदरीला डोक्यावर घेवून होती तर काही शहाणे लोकं तिला दुषणेही देत होते. परंतु ती लोकांच्या म्हटल्यानं दुषण्यानं वा टोमण्यानं दुःखी नव्हती तर ती दुसरी होती त्या वेदनादायी आठवणीनं. अशीच ती आलेली आठवण. ज्या दिवशी रावण रणांगणांवर जात होता. अन् ज्या दिवशी तिनं आपल्या पतीला टिळा लावला होता. रावणाला तिनं टिळा लावतांना विजयी भवं म्हटलं होतं. त्यावर रावण म्हणाला होता,
          "मंदोदरी, मला विजयी भवं म्हणू नकोस. या रावणाला मृत्यूचंच वरदान दे. परंतु असं वरदान दे की मला मृत्यू हा विघातक पद्धतीनं यायला नको. विधायक पद्धतीनं यावा. तसंही माझ्यासारख्या माणसानं का जगावं जास्त दिवस. ज्याची त्रैलोक्यात आज बदनामी झाली आहे. या रावणानं आपल्या बहिणीचा बदला घेतला. अन् तो घेण्यासाठी सीतेला आणलं. परंतु माझी त्रैलोक्यात सीतेला पळवून आणल्याची बदनामी झाली. आता मी कसं जगावं."
          ते रावणाचे शब्द. तसं मंदोदरीचं रावणावर अतिशय प्रेम होतं. तो जरी दुराचारी असेल तरी. कारण त्यानं बाहेर दुराचार केला होता. परंतु आपल्या पत्नीला त्यानं सुखातच ठेवलं होतं. त्यानं एक हजार पत्नी केल्या होत्या. परंतु लंकेतील मंदोदरीला त्यानं पट्टराणीचा दर्जा दिला होता. त्यामुळंच ती प्रेम करीत होती त्याचेवर आणि तोही तिच्यावर निरतिशय प्रेमच करायचा.     
          मंदोदरी विचार करीत होती, तिच्या पतीच्या मृत्यूवर. म्हणतात की माझ्या पतीनं सीतेला पळवून आणलं. त्यानं दुसऱ्याच्या पत्नीला पळवून आणलं. परंतु सीता निमित्त मात्र होती. कारण मृत्यू हा कधीच स्वतः कारणीभूत ठरत नाही. तो कोणाला ना कोणाला कारणीभूत ठरवतो. तसंच झालं माझ्या पतीच्याही बाबतीत. त्यांनी घेतलेले निरपराध प्राण्यांचे बळी. हे पापच होतं. घोर पाप. जे रक्त मी प्राशन केल्यानं सीता जन्माला आली. जी बदला घेण्यासाठी जन्मास आली. जी त्या निरपराध प्राण्यांचं वा साधुसंतांचं रक्तबीजच होती. त्यातच तेच साधूसंतांचं रक्तबीज बदला घेण्यासाठी माध्यम पाहू लागली. अन् तिला मी एक माध्यम सापडली की मी जन्म दिला. दुसरं माध्यम म्हणजे राम. राम नावाचं माध्यमही सापडलं. मग काय रामाने माझ्या पतीला मारले. त्याची पत्नी माझ्या पतीनं आणली म्हणून. 
          माझ्या पतीचा मृत्यू हा काळानंच लिहिलेला. ज्याप्रमाणे सुलोचनेनं एका दैत्य जातीत विवाह केल्यानं तिचे ते कृत्य शेष जातीला पसंत न पडल्यानं तिच्या कृत्याचा बदला घेण्यासाठी शेषनागानं प्रत्यक्ष लक्ष्मणाच्या रुपानं या काळात जन्म घेवून माझा पुत्र मेघनाद व सुलोचनेलाही सती स्वरुपात मारलं. तेच घडलं माझ्याही पतीबाबतीत. माझे पती दोषी नव्हते. वेद विद्येचे ज्ञाते होते. त्यांना उपनिषद व वेद ज्ञात होते. ते ज्योतीषीही होते. तशीच त्यांना माणसं ओळखायची अनुभूती होती. 
          काळानंच योजला होता माझ्या पतीचा मृत्यू आणि प्रत्येक जीव मरतोच. जो जन्म घेतो तो. त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला त्याला त्या त्या प्रकारे मृत्यू येत असतो. शिवाय सुरपंखाही निमित्तच ठरली, तिचं नाक कापलं जाणंही निमित्तच होतं. ज्याचा बदला घेण्यासाठी माझ्या पतीनं सीतेला लंकेत आणलं. तेही निमित्तच होतं. प्रत्यक्ष सीता ही यम होती तर राम यमाचा दूत. ज्यानं उचलून नेलं माझ्या पतीला.
          मंदोदरीचं विचार करणं बरोबरच होतं. कारण सीता ही तमाम ऋषीमुनींचं रक्त होतं की ते जन्माला आलं. मग ते रक्त कुणाचंही का असेना. ते बदला घेणारच. म्हणतात ना की एक जीव मारला तर त्यातून हजार जीवं तयार होतात. तेच घडलं सीतेच्या बाबतीत. सीता अन् तिही माझ्याच पोटातून. ही गोष्ट म्हणजे जणू मुलानंच एका पित्याचा बदला घेतला. 
         मंदोदरीला आठवत होता तो विभीषणाशी विवाह करतानाचा क्षण. ज्यावेळेस तिचा विभीषणाशी विवाह झाला नव्हता. तेव्हा विभीषणानं म्हटलं होतं की राज्यात अराजकता पसरली आहे. तेव्हा त्याच प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी ती प्रत्यक्ष एक दिवस प्रजेची भेट घेण्यासाठी गेली असता लोकं विभीषणाला देशद्रोही म्हणत होते. म्हणत होते की त्याचं राजा बनणं आम्हाला न्यायीक वाटत नाही. अन् आम्ही त्याला राजा म्हणून स्विकारु शकत नाही. तेव्हा तिनं प्रत्यक्ष जनतेलाच म्हटलं की तीच त्यांची राणी बनणार. त्यासाठी तिला विभीषणाशी विवाह करावा लागणार. असा विवाह केला तर चालेल काय? त्यावर प्रजेनंच होकार दिला होता.
         केवळ प्रजेच्या हितासाठी न्यायीक राज्य करीत करीत मंदोदरी झीज झीज झिजली. तिनं आपला स्वार्थ कधीच पाहिला नाही. तिनं आपली होणारी बदनामी पाहिली नाही. तर तिनं प्रजेच्याच हिताचा विचार केला. तिलाही वाटत होतं की हा समाज रावणाच्या मृत्यूनंतर तिला दुषणं देईल. परंतु असं घडलं नाही.
           मंदोदरीला वाटत होतं की तिचा पती मरुच नये. म्हणूनच तिनं त्याला विजयी भवं म्हटलं होतं. तिला रावणही तेवढाच प्रिय होता. जेवढी सीता होती. जर सीतेचे पती मरण पावले असते तर तिच्याच मुलीचा संसार उघड्यावर पडला असता. तसे पाहिल्यास तिच्यासमोर प्रश्न होता निर्वाणीचा. एकीकडे मुलगीरुपानं विहिर होती तर दुसरीकडे पती रुपानं आड होता. ज्यातून ती बुचकळ्यात पडली होती. 
          आज मंदोदरी त्याच त्या वेदनेत जगत जगत दिवस काढत होती. ती आजही लंकेची पट्टराणी जरी असली तरी ती सुखी नव्हती. तिला आयुष्यभर कधीच सुख मिळालं नव्हतं. ना रावणाच्या घरी राहून, ना विभीषणाशी विवाह करुन. आयुष्याच्या शेवटच्याही क्षणी ती आपल्या प्रारब्धावरच कोसत होती. जे प्रारब्ध तिला आजही छळत होतं. 
          मंदोदरीची लेकरं, तिचा पती, तिची लडिवाळ सून एकापाठोपाठ एक एक त्या युद्धाच्या रुपानं मरण पावले. ज्यात तिचा दोषच नव्हता. प्रसंगी तिच्या पतीनं पाप केलं असल्यानं ते मरण पावले होते. तिच्या मुलांनीही पापाला मदत केल्यानं तेही मरणच पावले होते. परंतु ना मंदोदरीनं पाप केलं होतं, ना तिनं रावणाच्या कृत्याचं समर्थन केलं होतं. तरीही तिच्या वाट्याला भोग आले होते भोगण्याचे. ज्यातून ती अनंत यातना भोगत होती.
          मंदोदरी पट्टराणी बनली होती व अशी पट्टराणी बनल्यानंतर तिला आठवलं आपल्या पतीला दिलेलं वचन. ज्या वचनासाठी ती आजही जीवंत होती. ते वचन होतं, तिच्या पतीनं तिला सांगीतलेले अनमोल विचार. ते कार्य, कोणत्याही गोष्टीचा उहापोह होवू देवू नये वा अतिरेक होवू देवू नये की ज्यातून अहंकार निर्माण होतो. त्याच गोष्टी तिनं जगाला सांगितल्या होत्या. लंकेचा कारभार जरी विभीषणानं पाहिला असला तरी ती विभीषणाची पट्टराणी असल्यानं तिनं जी सशक्त स्वरुपाची राज्यकारभार करतांना विभीषणाला मदत केली. त्यातून विभीषणाचं नाव लवकरच त्रैलोक्यात पोहोचलं व रावणाच्या मृत्यूनं जी लंकेत पोकळी निर्माण झाली होती. ती भरुन काढली. त्यामुळंच एका काळाची समाप्ती होवून लंकेत विभीषणाच्या रुपानं दुसरा काळ सुरु झाला होता.
           मंदोदरीला माहीत होता तो रावणाचा अंतिम काळ. ज्यावेळेस ती रावणाकडे आली होती. त्यावेळेस त्यानं तिला उपदेश केला होता. म्हटलं होतं की कोणत्याही शुभ प्रसंगाची व चांगल्या कार्याची सुरुवात करायला वेळ लावू नये. जेवढं लवकर ते काम आटोपता येईल. तेवढ्या लवकर ते काम आटोपवून घ्यावं. त्याचप्रमाणे जे काम अशुभ असते. त्या कामाला शक्य तेवढं टाळावं. त्याचप्रमाणे आपल्या शत्रूलाही कधीही कमजोर समजू नये. तसंच आहे आजाराचं. कोणत्याही आजाराला शुल्लक समजू नये. गुरुबाबत सांगतांना रावण म्हणाला की गुरुच्या पायाजवळच बसून ज्ञान अर्जीत करावं. गुरुच्या डोक्याजवळ बसून ज्ञान ग्रहण करु नये. असे केल्याने आपल्यात विनम्रता हा भाव राहतो व तो टिकतो. त्यातच त्यातून कुणाचा सन्मान कसा करावा. ही भावना वृद्धींगत होते.
            रावण पुढं म्हणाला की कोणत्याही पर स्रीवर वाईट नजर टाकू नये. तसंच कोणत्याही स्रिला कधीही कमजोर समजू नये. एक साधारण स्री देखील, तिनं विचार केल्यास पुरुषाला नेस्तनाबूत करु शकते. शिवाय पर स्रीवर दृष्ट नजर टाकल्यास त्या स्रीमुळे तिच्यावर वाईट नजर टाकणाराच व्यक्तीच नष्ट होवू शकतो. रावणानं पुढं सांगीतलं की आपलं गुपीत हे व्यक्तीनं कोणालाही सांगू नये. पिता, पुत्र, भार्या आणि बंधू यापैकी कोणी कितीही जवळचा असला तरीही. ते गुपीत आपल्याजवळच ठेवावं. कारण त्याच गुपीतानं आपल्या स्वतःचा विध्वंश होवू शकतो. त्यातच शेवटी रावण म्हणाला की आपल्याला प्राप्त असलेलं अतिरिक्त ज्ञान हे आपल्यातील अहंकार वाढवतो. त्यामुळंच असं ज्ञान बरं नाही. 
          मंदोदरीला ते ज्ञान सांगताच तो म्हणाला होता की हे ज्ञान तू जगाला द्यावं. ज्यातून लोकांचा फायदा व्हावा. त्याला माहीतच होतं की मंदोदरीपेक्षा दुसरा कोणीच ते ज्ञान लोकांना देवू शकणार नाही. एवढा अगाढ विश्वास होता रावणाचा मंदोदरीवर. तेच ज्ञान पुढं त्यानं लक्ष्मणालाही दिलं होतं.
          काही लोकं म्हणतात की मंदोदरी ही पतीव्रता स्री होती. ती पतीच्या शरणावर सती गेली. तर काही तिला पतीव्रता मानत नाहीत. त्यांच्या मते ती पतीव्रता स्री नव्हती. कारण तिनं रावण मरण पावल्यानंतर दुसरा विवाह केला होता. तोही विभीषणाशी. तसं पाहिल्यास पतीव्रता म्हणजे पती निष्ठा बाळगणे व पतीच्या शरणावर सती जाणे व ती सती जाणारच होती पतीच्या शरणावर. परंतु तिनं आपल्या पतीची आज्ञा पाळली व ती जीवंत राहिली. त्यातच तिनं पतीधर्म पाळला. म्हणूनच ती पतीव्रता ठरली. 
          मंदोदरी एक पतीव्रता स्री होती. पाच पतिव्रतामध्ये मंदोदरीचा समावेश होत असून तिचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिली अहिल्या, दुसरी तारा, तिसरी मंदोदरी, चौथी सीता व पाचवी द्रौपदी. या पाच पतिव्रता स्रियांचा उल्लेख पुराणात आहे. रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरी सती गेली असा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच वालीच्या मृत्यूनंतर तारा सती गेली. असाही उल्लेख काही ग्रंथात आहे. बाकी तीन पतिव्रता स्रिया सती गेल्या नाहीत. असेही उल्लेख आहेत. जशी अहिल्या शिळा झाली. पुढे रामाने तिचा उद्धार केला. द्रौपदी पाच पांडवा बरोबर स्वर्गात गेली तर सीता भूमीमध्ये गेली. तसंच काही ग्रंथात मंदोदरीनं विभीषणाशी विवाह केला होता असे म्हटले जाते. तशीच ताराही सुग्रीवशी विवाहबद्ध झाली होती. जरी त्याला रोमा नावाची त्याची पत्नी असली तरी. असेही उल्लेख आहेत. 
          काही लोकं म्हणतात की पतीव्रता म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरणावर सती जाणे. जो पती आहे, त्याच्याप्रती आदराची भावना ठेवणे.
           मंदोदरी पतीव्रता म्हणजे पतीप्रती निष्ठावान, कर्तव्यदक्ष आणि विश्वासू असलेली स्री, जी आदर्श मानल्या गेली. तसंच अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी, या पाच स्त्रियांना 'पंचपतिव्रता' म्हणून ओळखलं जातं. या स्त्रिया केवळ आपल्या पतीनिष्ठेमुळेच नव्हे, तर आपल्या कार्यामुळेही आदर्श मानल्या जातात. 
         पतीव्रतेच्या लक्षणात एक स्री पत्नी बनून ती पतीलाच देव मानत असे. ती स्री त्यालाच सर्वोच्च स्थान देऊन, त्याच्याप्रती पूर्णपणे समर्पित राहात असे. त्यातच ती दु:ख-कष्टातही प्रसन्न राहून, कोणत्याही परिस्थितीत सुख शोधण्याचा प्रयत्न करीत असे. ती पती, कुटूंब आणि समाजाच्या रक्षणासाठी प्रयत्न करीत असे आणि स्त्री जीवनाला उंची प्राप्त करून देत असे. ती पतीशी विश्वासू राहात असे आणि आपल्या कर्तव्याचे पालन करीत असे. उदाहरणार्थ अहिल्या.
          अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी असून पतीनिंदेमुळे शापग्रस्त झाल्यानंतर गौतम ऋषींनी तिला तारेपर्यंत तिनं पतीव्रता धर्म पाळला. तशीच द्रौपदी ही पांडवांची पत्नी असून पांडवांच्या सांगण्याप्रमाणे तिनं पतीनिष्ठेचा धर्म पाळला. सीता ही रामाची पत्नी असून पतीच्या सांगण्याप्रमाणे तिने वनवासात पतीसोबत राहून पतीनिष्ठा दाखवली. तारा ही सुग्रीवाची पत्नी असून पतीच्या मृत्यूनंतर तिनं पतीचे कार्य पूर्ण केले. त्यातच मंदोदरी ही रावणाची पत्नी. तिनं पतीनिष्ठा व बुद्धीने पतीनिष्ठा आणि पतीनिष्ठेचा धर्म पाळला. त्यानंतर आणखी दोन पतीव्रता स्रिया होवून गेल्या. त्यात सावित्रीचा उल्लेख येतो. सावित्रीही पतीप्रती पतीनिष्ठेचे उदाहरण मानली जाते. तिने आपल्या पतीला यमराजाकडून परत आणले होते. त्यातच अनुसया पतीप्रती पतीनिष्ठेचे एक मोठे उदाहरण मानले जाते. तिनं पतीनिष्ठा दाखवून पतीनिष्ठेचा धर्म पाळला. 
          पतीव्रता तत्वात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पतीनिष्ठा म्हणजे स्वतःला संपवून टाकणे नव्हे, तर पतीप्रती असलेली निष्ठा, प्रेम आणि विश्वास या भावनांचा संगम आहे. तो संगम पती निधनानंतरही दिसायला हवा. जो मंदोदरीच्या रुपानं दिसला. कोणी म्हणतात की पत्नीनं आपला पती मरण पावताच दुसऱ्या कुणाशी विवाह केल्यास ती पतीव्रता ठरत नाही. ज्यातून मंदोदरीवर शंका उठतात. परंतु पतीव्रता लक्षणाचा विचार केल्यास मंदोदरी ही तिचा पहिला पती रावणासोबतही पतीनिष्ठेनं राहिली. त्यातच रावण जरी व्याभिचारी असला तरी तिनं व्याभिचार केला नाही वा तिनं दुसऱ्या कोणत्याही परपुरुषावर नजर टाकली नाही. शिवाय रावण व्याभिचारी असूनही त्यावर शंका कुशंका केल्या नाहीत. ती समाधानी राहिली व तेवढीच विश्वासूही. मंदोदरीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तिच्या पतीनं म्हणजेच रावणानं तिला विभीषणाशी विवाह करशील म्हटलं म्हणून तिनं विवाह केला होता. त्यात त्याचा उद्देश होता. तो उद्देश होता, त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम. त्यानं तिच्याकडून जीवंत राहण्याचं वचन घेतलं होतं. शिवाय तिला जीवंत ठेवायचे असेल तर तिला लंकेत सन्मान मिळणं आवश्यक होतं. ते तिला मिळावं यासाठी तिला विभीषणाशी विवाह करायला लावला होता रावणानं. तरीही मंदोदरी विभीषणाशी विवाह करण्यास इच्छुक नव्हती. परंतु जी राज्यात अराजकता पसरली होती. त्या अराजकतेलाच उत्तर देण्यासाठी आणि प्रजेला सुखी करण्यासाठी तिनं विवाह केला होता विभीषणाशी. अन् विभीषणाशीही विवाह केल्यानंतर ती विभीषणाशीही पतीनिष्ठच राहिली. यावरुन मंदोदरी एक पतीव्रता स्री ठरते. 
           मंदोदरीनं विभीषणाशी विवाह केल्यानंतर ती पतीनिष्ठ राहिली. हळूहळू राज्यकारभार सांभाळता सांभाळता तिचं वय वाढत राहिलं. तसं पाहिल्यास तिच्या मनात रावण हा शेवटपर्यंत होताच.
             रावणाला एक हजार भार्या होत्या. त्यात धन्यमलिनी व चिरंगी या विशेष होत्या. धन्यमलिनी ही मंदोदरीचीच लहान बहिण व मयासूर व हेमाची मुलगी होती तर चिरंगी ही गंधर्वराज चित्रसेनची मुलगी होती. परंतु रावण हा मंदोदरीवरच जास्त प्रेम करायचा. तसं पाहिल्यास मंदोदरी ही पतीव्रता स्री होती व ती रावणाशी पत्नीनिष्ठच राहिली. रावण वाईट प्रवृत्तीचा असूनही तिनं रावणाला दोष दिला नाही. तसंच स्वतःच्या मृत्युपर्यंत त्याला अंतर दिलं नाही. रावणाला तसे अनेक पुत्र होते. परंतु मुख्यरुपात तीन पुत्रांचा उल्लेख आहे. एक इंद्रजीत, जो मंदोदरीपासून झाला व दुसरा अधिकाय, जो धन्यमलिनीपासून झाला. तिसरा अक्षय. बाकी इतर बरीच मुलं असतील. 
            मंदोदरीनं विभीषणासोबत विवाह केल्यानंतर बरेच दिवस संसार केला. त्याचबरोबर लंकेचं राज्यही सुखसमाधानानं सांभाळलं. तशी ती पतीव्रताच स्री होती. परंतु तिनं केलेला विभीषणाशी विवाह लंकेतील काही लोकांना बरा वाटत नव्हता. तो खपत नव्हता काही लोकांना. त्यातच काही लोकांनी तिच्यावर ताशेरे ओढणे सुरु केले. काही प्रजाजण तिला म्हणत होते की ती आणि विभीषण या दोघांनी मिळून रावणाची हत्या केलेली आहे. म्हणूनच तिनं विभीषणाशी विवाह केला. ज्यातून तशा स्वरुपाच्या वार्ता तिच्या कानावर पडताच ती निराश होत असे. तिला फार वाईट वाटत असे ते ऐकून. कारण रावणाच्या मृत्यूत तिचा दोष नव्हताच. शेवटी ती हताश व निराश व्हायची. त्यातच एक दिवस अशीच नगराभ्रमण करीत असतांना तिनं प्रजेकडून ऐकलं की तिनं एक तेजस्वी बाण हनुमानाला दिला आणि त्याचं रहस्य सांगीतलं. जे रहस्य फक्त रावणानंच तिला सांगीतलं होतं, तिच्यावर विश्वास करुन. ते रहस्य होतं, त्या बाणानं रावणाचा जीव जाणं. ते विशेष बाण होतं की ज्यानं रावण मरणार होता.
        मंदोदरीनं ते ऐकलं. मदोदरीनं ते ऐकलं की रावणाजवळ एक तेजस्वी बाण होता. ज्या दिव्य बाणानंच रावण मरणार होता. तो बाण रावण आपल्या पत्नीकडेच ठेवत असे. कारण त्याचं त्याच्या पत्नीवर अतिशय प्रेम होतं व तसाच त्याचा तिच्यावर विश्वास होता. त्यातच ती कधीच आपल्याला मारु शकणार नाही. असंही रावणाला वाटत होतं. परंतु घात झाला. हनुमान जेव्हा लंकेत आला व त्यानं परीचय दिला की तो रामाचा दूत आहे. तेव्हा मंदोदरीनंच तो दिव्य बाण हनूमानाच्या सुपूर्द केला व सांगीतलं की हा असा दिव्य बाण आहे. ज्या बाणानं रावण मरु शकतो. अशातच तो युद्धाचा दिवस उजळला. 
           तो युद्धाचा दिवस. तसं रावणानं मंदोदरीला म्हटलं होतं की जर राम एखादा साधारण नर असेल, तर मी कधीच त्याचेकडून परास्त होणार नाही आणि जर तो कोणी अलौकिक पुरुष असेल तर माझा अंत नक्कीच होणार. 
           युद्धाच्या दिवशी जेव्हा राम व रावण समोरासमोर आले. तेव्हा रामानं रावणाची हत्या करण्यासाठी तोच दिव्य बाण वापरला. जो मंदोदरीनं दिला होता. ज्यानं रावण मरण पावला. ज्यात त्याच्या मृत्यूवेळेस ती जेव्हा युद्धभुमीवर पोहोचली. तेव्हा आपली मुलं, आपला पती व आपला परीवार पाहून शोकसागरात बुडाली होती.
           दोष मंदोदरीचा नव्हताच. परंतु ते लोकांचं बोलणं. लोकांचं म्हणणं होतं की मंदोदरीनंच रावणाला मारलं. तसं ते बोलणं ऐकून मंदोदरी खजील झाली. ती तर पतीव्रता स्री होती. तिला लोकांच्या त्या बोलण्याचं वाईटच वाटलं. एवढं वाईट वाटलं की ती राजमहालात आली.
           मंदोदरी राजमहालात आली होती. तिला प्रजेचं बोलणं खुपलं होतं. तिला वाईटच वाटलं होतं त्याचं. त्यातच ती खजीलही झाली होतीच व ती राजमहालात येताच तिनं आपल्या कक्षात स्वतःला कोंडून घेतलं. ज्याप्रमाणे विभीषणाशी विवाह करण्यापुर्वी व रावण मरण पावल्यानंतर तिनं स्वतःला कोंडून घेतलं होतं तसं. त्यानंतर त्या कक्षात ती खुप रडली. तिनं अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. तद्वतच ती पश्चाताप करु लागली व आठवू लागली ते तिच्या जीवनातील सर्व प्रसंग. शेवटी ती फारच दुःखी झाली. कारण तिचा जरी रावणहत्येत दोष नसला तरी लोकांनी त्या हत्येचं पाप तिच्यावरच लावलं होतं. शेवटी न राहवून तिनं त्याच कक्षात गळफास तयार केला व कोणत्याही प्रकारचा विचार न करता तिनं स्वतःला गळफास लावला. त्यातच ती मरण पावली होती. राक्षसकुळातील सर्व प्रकारच्या यातनेपासून ती दूर गेली होती नव्हे तर तिनं राक्षसजातीतून मुक्ती मिळवली होती. 
            मंदोदरी पतीव्रताच होती. जरी तिनं विभीषणाशी विवाह केला असला तरी ती शेवटपर्यंत रावणावरच प्रेम करीत राहिली, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. अन् शेवटीही त्यालाच आठवलं होतं तिनं. तोच होता मंदोदरीच्या ह्रदयात घर करुन.
            मंदोदरी गळफासानं मरण पावली होती. त्यानंतर काळ हळूहळू सरकत होता. सरकत्या काळानुसार मंदोदरी इतर स्रियांसारखी मागं पडली. तिचं रावणाप्रती असलेलं प्रेमही मागे पडलं. तिच्या नावासमोर, तिनं सत्कर्म करुनही बदनामीचा डाग लागला. तिचा दोष नसतांनाही तिला दोषी धरत तिची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्या गेला. परंतु ते जरी खरं असलं तरी मंदोदरी ही पतीव्रताच स्री होती व तिचा रावणवधात कोणताही दोष नव्हता. ती बहुतांश त्यात दोषी नसून ती रावणावर निरतिशय प्रेम करीत होती हे विसरता येत नाही.
           रावण प्रकांड पंडीत होता. त्याला सर्व प्रकारचं ज्ञान होतं. परंतु त्यांचे जे कर्म होते. ते अतिशय वाईट होते तर मंदोदरी ही तेवढी ज्ञानी नव्हती. परंतु ती समजदार होती. शिवाय तिचे कर्मही वाईट नव्हते. त्यामुळंच ती पतीव्रता ठरली. तसंच काही लोकं तिला आजही पतीव्रताच मानतात. तसं रावणाला मानत नाहीत. शिवाय आजची मंडळी रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करतात. जरी तो प्रकांडपंडीत वा विद्वत्तेचा धनी असला तरी. 
          आजचे लोकं रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करतात आणि जे करतात. ते तेवढ्या प्रमाणात सात्विकही नसतातच. परंतु ते रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करुन दाखवतात की माणसानं आपलं कर्म हे चांगलं करावं. वाईट कर्म करु नये. वाईट कर्म केल्यास त्याची गत भविष्यात अशाच स्वरुपाची होईल. हा संदेशच असतो लोकांसाठी. वाईट कर्म कोणाच्या हातून घडू नये यासाठी. लोकं फक्त दुसर्‍याचंच बघतात, आजही आणि कालही. काल रावणात काही चांगले गुण असले तरी तेवढेच वाईट होते. परंतु लोकं त्याचेतील चांगले गुण पाहात नाहीत. वाईट गुणच तेवढे बघतात.
          मंदोदरीवरही तसंच लांच्छन लावलं होतं लोकांनी. जेव्हा ती जीवंत होती. ज्यात तिचा दोष नव्हता. तरीही तिनं पश्चाताप केला. ती रडली. तिच्या डोळ्यातून अश्रू निघाले. जरी तिचं रडणं एकांतात असलं तरी. जरी लोकांनी तिचे अश्रू पाहिले नसले तरी. परंतु तिच्यावर प्रजेनं लांच्छन लावताच तिला जो पश्चाताप झाला व ती पश्चातापाच्या जेव्हा अग्नीत जळत रडली. ज्यातून ती शुद्ध झाली. परंतु ती शुद्ध झाली असली तरी तिनं आपल्या स्वतःला गळफास लावून घेतला. तद्नंतर लोकांनाही तिचा पश्चातापच झाला होता. 
          मंदोदरी मरण पावली होती आत्महत्या करुन. तद्नंतर प्रजेनं तिचं मरणधरण साजरं केलं. त्यातच काही लोकं तिला विसरले. जरी तिचे कर्म चांगले असले तरी. परंतु असं जरी झालं असलं तरी काही लोकांनी तिला लक्षात ठेवलं, लंकेची महाराणी म्हणून. काही लोकांनी तिला पतीव्रता मानून सन्मान दिला, तर काही लोकांनी तिला पंचकन्याही मानलं. 
          आजही मंदोदरी लोकांना आठवते एक पतीव्रता स्री म्हणून. काही लोकांना ती आठवते, एक पंचकन्या म्हणून तर काही लोकांना आठवते लंकेची पट्टराणी म्हणून. ती तिच्यात असलेल्या चांगुलपणाच्या गुणावरुन. तशीच ती आठवते रावणाची पत्नी म्हणून. कारण रावणानं मंदोदरीला म्हटलंच होतं की जर मी रामाच्या हातून मरण पावलोच तर जसा लोकांना राम आठवणार. तसाच मीही आठवणार. जेव्हापर्यंत राम लोकांच्या ह्रृदयात असेल, तेव्हापर्यंत मीही लोकांच्या ह्रदयात असेल. त्यातच ही मंदोदरीही आठवणार रावणाची पत्नी म्हणून. 
         रावणाला एक हजार पत्नी होत्या. त्यातील पहिली तीन नावं होती मंदोदरी, धन्यमलिनी व चिरंगी. तशी धन्यमलिनी ही मंदोदरीचीच सख्खी बहिण. परंतु मंदोदरीच प्रसिद्ध झाली. बाकी त्याच्या एकहजार भार्यांपैकी एकही प्रसिद्ध झाली नाही. धन्यमलिनी आणि चिरंगीही नाही. त्याचं कारण होतं तिच्यातील चांगले गुण. लोकांना आपल्या चांगल्या गुणानं तिनं आकर्षित केलं होतं. जे तिलाच जमलं. बाकी इतर रावणाच्या पत्नींना जमलं नाही. तिची सख्खी बहीण धन्यमलिनीलाही नाही. म्हणूनच तीच पतीव्रता वा पंचकन्या ठरली. त्याच्या बाकीच्या पत्नी नाही. शिवाय रावणाची पत्नी म्हणून लोकांना फक्त मंदोदरीच आठवते. बाकी भार्या आठवत नाहीत.
          आजही मंदोदरी जरी काळाच्या पडद्याआड गेली असली व त्या गोष्टीला एवढे वर्ष झाले असले तरी रावणासोबतच तिचं नाव अजरामर राहील. जेव्हापर्यंत राम या धरणीवर असेल तेव्हापर्यंत. हे शक्य झालं रावणामूळं. अन् त्याच्यातील तमाम गुणांमूळं. तसं पाहिल्यास आजही आदिवासी लोकं रावणाला मानतात. त्यांचा आदर करतात व पुजाही करतात नव्हे तर ते मंदोदरीलाही आदर्श मानत असतात. तिचीही पुजा होत असते. ते तिच्यातील रावण भक्तीमुळं. 
         मंदोदरीनं रावणानंतर विभीषणाशीही विवाह केला होता. परंतु तरीही लोकांना ती विभीषणाची पत्नी बनलेली होती हे माहीत नाही वा तिला लोकं विभीषणाची भार्या म्हणून ओळखत नाही. तर ते ओळखतात तिला रावणाचीच पत्नी म्हणून. त्याचं कारण आहे तिचं रावणावर असलेलं निरतिशय प्रेम. ती विभीषणाची जरी पत्नी बनली असली तरी ती विभीषणाची पत्नी शरीरानं बनली होती. मनानं नाही. तिचं मन विभीषणाचीही पत्नी बनल्यानंतर रावणासोबतच होतं. जरी रावण तेव्हा मरण पावला होता तरी. तिचं प्रेमही रावणावरच होतं, जरी रावण मरण पावला होता तरी. तेच लोकांनी पाहिलं. म्हणूनच तिच्या मरणानंतरही तिनं जरी विभीषणाशी विवाह केला असला तरी तिला लोकांनी पतीव्रताच ठरवलं होतं. ते तिचं तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत रावणावर असलेलं प्रेम पाहून. खरं तर ती पतीव्रताच होती. ती आपला पती रावणाशी पतीनिष्ठच राहिली होती. अन् प्रेमही करीत राहिली होती तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत. जरी तिनं विभीषणाशी विवाह केला असला तरी, तो विवाह तिनं त्याचेशी तनानं केला होता, मनानं नाही. अन् रावणाशी तिनं तन व मन, या दोन्ही स्वरुपानं विवाह केला होता. 

       *********************************************************समाप्त**************