Hello in Marathi Love Stories by Hrishikesh books and stories PDF | हेल्लो

Featured Books
Categories
Share

हेल्लो

सायली आणि निशात…

निशात हा खूप साधा-सरळ मुलगा. कुणालाही उगाच एक शब्दही न बोलणारा, कुणाशी काहीच न सांगणारा. स्वतःचे काम शांतपणे करत राहणे हा त्याचा स्वभाव.

आणि दुसरीकडे…

सायली अगदी मनमिळावू, बोलण्यात हुशार. कुणालाही उलट उत्तर न देणारी, पण तिला कुणी काही चुकीचे बोलले तर त्यालाच तिथल्या तिथे योग्य उत्तर देणारी अशी ती मुलगी.
नमकी गोष्ट सुरू होते अशी की, निशांत हा काही कामानिमित्त पुण्यातून बाहेर गेलेला असतो. छोटंसं गाव असतं. तो तिथे सोलार पॅनेलचा इंजिनिअर म्हणून गेलेला असतो. एका छोट्या शाळेत त्याला ते बसवायचे असतात.

तो मध्यरात्री तिथे पोहोचतो. जवळपास कुठे राहायची सोय नसते—हॉटेल नाही, बस स्टॉप नाही, अगदी साधं झाडाखाली बस थांबते इतकंच. म्हणून तो थोडा पुढे चालत जातो.

त्याला तिथे एक इमारत दिसते. तो मनात विचार करतो, “आजची रात्र इथेच झोपून जाऊया, उद्या सकाळी उठून कामाला लागू.”

नेमका त्याला उठायला उशीर होतो. तो नऊ वाजता उठतो. उठताच आजूबाजूला सगळे गोल बसलेले दिसतात. त्याचे डोळे उघडतात तेव्हा लहान मुलांना पाहून तो थक्क होऊन जातो… आणि मुलं त्याला पाहताच ओरडायला लागतात.

तो बाहेर पडतो तर बाहेर शाळेतील सगळे शिक्षक आणि कामगार उभे असतात. तो घाईघाईने सांगू लागतो, “मी चोर नाही हो! मी कामानिमित्त आलोय गावात…”

त्याला मुख्याध्यापकांकडे नेलं जातं. तो संपूर्ण प्रसंग सांगतो तेव्हा मुख्याध्यापक हसू लागतात आणि कामगारांना म्हणतात, “अहो, सोडा त्यांना. ते कुठले चोर वगैरे नाहीत. आपल्या शाळेत सोलरचे काम करणार मोठे इंजिनियर आहेत.”

कामगार म्हणतात, “ठीक आहे,” आणि निघून जातात. निशांत मात्र म्हणतो, “सर, मी थोडा बाहेर फिरून येतो. इथे कुठे हॉटेल वगैरे आहे का? बघतो.”

मुख्याध्यापक म्हणतात, “अरे इथे गावात साधी पक्की घरेही नाहीत, तुम्हाला हॉटेल कुठे मिळणार? चला, माझ्या घरी या. छान तयार व्हा आणि मग कामाला सुरुवात करा.” निशांत अनमनीने का हो ना करत त्यांच्या घरी जातो आणि तयार होतो.

पण त्यांच्या घरी इतकी लगबग, इतकं व्यवस्थित सर्व पाहून तो थोडा चकितच होतो. “बापरे! तुम्ही तर म्हणालात गावात साधं पक्कं घरही नाही… इथे तर शहरातल्यासारख्या सगळ्या सोयी आहेत!” तो आश्चर्याने म्हणतो.

मुख्याध्यापक हसतात व म्हणतात, “अरे बाळा, मी या गावाचा मुख्याध्यापक आणि पाटील दोन्ही आहे. आणि हे सगळं मी आत्ताच करून घेतलंय. माझी मुलगी पुण्यातून गावाला येतेय, ती शिक्षिका आहे. माझ्यानंतर या गावातील शाळा ती बघेल.” असं म्हणून ते शांत होतात.

दोघे मिळून मग शाळेत जातात आणि संपूर्ण पाहणी करतात. निशांत म्हणतो, “माझं काम झालं. मी ऑफिसला जाऊन रिपोर्ट सबमिट करतो. काही दिवसांत आमची टीम येईल आणि काम सुरू होईल.”

आसा बोलून तो बसस्टॉपकडे जातो… जरा घाई‑घाईतच असतो… जाताना त्याची धडक सायलीशी होते. खूप अंधारही नसतो आणि खूप उजेडही नसतो, पण तिला त्याच्याकडे काही विशेष लक्षही नसतं. ती तर साधं “सॉरी”सुद्धा म्हणत नाहीत दोघं एकमेकांना. पण निशातच्या मात्र तिचा चेहरा पक्का डोक्यात बसलेला असतो…

तो तिथून निघून ऑफिसमध्ये पोहोचतो, पण सायलीचा चेहरा काही डोक्यातून जात नाही…

दुसऱ्या दिवशी निशात सकाळी बहिणीकडे (ताईकडे) जातो. आणि त्याचा फोन घरी विसरलेला असतो. तो पुढे निघून आल्यानंतर त्याला आठवतं—“अरे देवा, फोन राहिला!” म्हणून तो ताईकडे पोहोचतो. सगळे गप्पा‑गोष्टी करायला लागतात, जेवण होतं. त्यांच्या घरी भाऊ‑बहिणींपेक्षा मित्र‑मैत्रिणींची जास्त वर्दळ असते… म्हणून तो ताईला सायलीबद्दल सांगायला सुरुवात करतो. ताईही लक्ष देऊन ऐकायला लागते. तिने ती मुलगी कधी पाहिलेली नसली, तरी भावाच्या वर्णनामुळे तिलाही तिच्याबद्दल उत्सुकता वाटायला लागते. “आपला भाऊ इतकं कौतुक करतोय म्हणजे मुलगी नक्कीच सुंदर असेल,” असं ताईला वाटतं…

थोड्याच वेळाने ताईच्या फोनवर कॉल येतो आणि ताई खाली गेलेली असते, म्हणून तो कॉल निशात उचलतो. तिकडून एखादी मुलगी म्हणते—

“मॅडम, मला प्लीज नोट्स पाठवता का? माझे नोट्स काही सापडत नाहीत…”

खाली तुमचा संपूर्ण प्रसंग **शुद्ध, नीट स्पष्ट केलेल्या मराठीत** लिहून देत आहे. कथा जशी तुम्ही सांगितली तसंच भाव, संवाद आणि प्रवाह राखून:

---

इकडून निशांत म्हणतो, “मॅडम, ताई खाली गेल्या आहेत. मी ताईचा भाऊ बोलतो. तुम्ही थोड्या वेळाने कॉल करा,” असं सांगून निशांत फोन कट करतो.

ताईला आवाज देत म्हणतो, “अरे, तुला सायली नावाच्या मुलीचा कॉल आला होता. काय तरी नोट्स दे म्हणत होती.”
सायलीला निशांतने एकदाच पाहिलं होतं, पण नाव आणि आवाज त्याला जरा ओळखीचा वाटतो.

ताई म्हणते, “थांब, मी वर येते,” आणि ती सांगते, “त्या कपाटात नोट्स आहेत, तिचे फोटो काढून शेअर कर.”

निशांत त्या नोट्स काढतो आणि तिला व्हॉट्सअॅपवर पाठवायला जातो, तेवढ्यातच तो तिचा फोटो पाहतो…
तो फोटो पाहून थबकून राहतो. त्याला समजेनासं होतं नेमकं काय चाललंय. तो इतका खुश होतो की ताईला जोरात हाक मारायला लागतो.

ताई घाबरून वर येते आणि विचारते, “काय रे? काय झालं?”
निशांत हातातला फोन तिच्या हातात देतो आणि फोटो दाखवतो.

ताई म्हणते, “काय? ही फोटो… ती माझ्या कॉलेजमध्ये होती. मी जेव्हा लास्ट इयर होते तेव्हा, तिचं मी नोट्स वगैरे देते होते.”
निशांत म्हणतो, “अरे तसं नाही… हीच ती मुलगी आहे, जिच्याबद्दल मी तुला सांगत होतो.”

ताई थोडी शांत होते आणि म्हणते, “खोटं नको बोलूस. ही ती मुलगी नाही. तू आता मला हा फोटो दाखवून काहीतरी वेगळंच सांगतोयस.”
निशांत म्हणतो, “ताई, एक काम कर. तिला call कर… आणि विचार, तिच्या notes बद्दल.

ताई सायलीला कॉल करते. सायली कॉल उचलत नाही. मग ताई पुन्हा कॉल करते. यावेळी सायली उचलते.
ताई, सायलीला विचारलं, तिला नोट्स मिळाले का? सायली म्हणाली हो, मिळाले....

सयली म्हणते, 'अरे, परवा माझ्या घरी आले ना, तर एका मुलाला मी धडकले आणि त्याच्या हातात एक पुस्तक होतं. ते माझ्याकडे आलं आणि माझं त्याच्याकडे गेलं, वाटतं... निशात, ताईला हलूच म्हणते, 'अरे ताई, तिला विचार, लव्ह स्टोरीचं पुस्तक होतं का?

ताई तिला जरा विचकट विचारते आहे म्हणते ते काय लव्ह स्टोरी वरचं पुस्तक होतं का ...सायली म्हणते थांब तुला कसं काय माहिती ....ताई म्हणते अरे नाही आजकाल सगळे मुलं नुसतं तसंच काय तरी वाचत असतात...

निशात म्हणतो ताई, त्या मध्ये बघ, त्याचं नाव वगैरे आहे का....
ताई परत जरा विचकट बोलते आणि विचारते, म्हणते, "बघ, जरा त्यात काही त्याचं नाव वगैरे आहे का...."
तर ती पाहते आणि म्हणते, "हो आहे ना.... निशी म्हणून..."
सायली ताईला म्हणते, "तुला कसं काय माहित एवढं...."
ताई विषय बदलते आणि म्हणते, "अरे ते सोड, मी तुला नोट्स शेअर करते, तू ते स्टडी कर आणि ते पुस्तक बाजूला ठेव..."
आणि ताई कॉल कटा करते....

दुसऱ्या दिवशी,

सयलीताईला कॉल करतोय असं म्हंटलं, "मॅडम अहो, काल रात्री मी ते सहज पुस्तक वाचलं…पहिला खूप वाईट वाटला, बोर वाटलं पण नंतर खूप छान वाटलं हो…आणि जोपताना बघते तर काय त्या पुस्तकाचं आणि त्या पुस्तकावर लेखकाचं नाव एकच…"

ताई म्हणली, "हो का…???"

ताईने निशातला सांगितलं, निशात म्हणाला, "अरे देव माझा पहिलाच पुस्तक आहे आणि त्याची ती पहिलीच प्रत…मला ती लागेल…सयलीच्या नादात मी काय लक्षातच नाही दिलं…तो ही टेन्शनमध्ये येतो…"

ताई म्हणते, "थांब, मी जरा तिला कॉल करते आणि तुझं नाव सांगते, आणि ते पुस्तक परत करायला सांगते…"
निशात म्हणतो नको...तू नाको करूस असा....जे सुरु ते सुरु असुदे...तीला वाचू दे ते पुस्तक....पूर्ण...आणि ऐक त्यावर मजा नंबर पण आहे मगच्या बाजुला....

ताई रात्री झाली की सायलीला एक मेसेज करते...वाचले का गा नोट्स??? सायली काय reply करत नाही...ताई तिला कॉल करते तरी ती काय reply करत नाही....दुसऱ्या दिवशी सायली ताईला कॉल करते आणि म्हणते मॅडम सॉरी मी काल नाही केलं अभ्यास....तर ताई म्हणते का नाही केलं अभ्यास...??? सायली म्हणते मी काल ते संपूर्ण पुस्तक वाचलं आणि मला मी दिसायला लागले त्या पत्रामध्ये....ताई हसायला लागते आणि सायलीला म्हणते वेडी रे वेडी...बर ठीक आहे ते पुस्तक वाचले एवढा कोणाचा आहे ते पुस्तक....बघ जरा आणि मला पण सांग मी ही वाचते...

सायली म्हणते पुस्तक नाही आहे ते नोट्ससारखं आहे...म्हणून तर माझी त्या दिवशी गडबड झाली ना...बहुतेक त्या मुलाने लिहिलं असावं...ताई हाय ऐकतातच म्हणते एक काम कर त्यावर त्याच नंबर वगैरे आहे का बघ...सायली बघते तर मगच्या पनावर असतो....सायली म्हणते मी कॉल करू का मॅडम त्या मुलाला आणि देते पुस्तक....

ताई म्हणते बघ कॉल कर आणि विचार कुठे पाठवायचं आहे ते पुस्तक....

निशातला ताई कॉल करते, म्हणते सायली तुला कॉल करेल...आज कधी पन तयार राहा.... निशात म्हणतो काय झालं...मला का कॉल करेल तू काही बोलली का...ताई म्हणते मंदाडा ऐक म्हनला म्हनला तर....ऐक... निशात शांत बसतो आणि वाट पाहू लागतो...

अचानक फोनचा आवाज येतो....

आणि निशात कॉल उचलतो....

सायली बोलते, हेल्लो...

निशात....हेल्लो...

भाग २ लवकरच...