Contract Marriage - 5 in Marathi Love Stories by Prakshi books and stories PDF | कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 5

The Author
Featured Books
Categories
Share

कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 5

विश्वनाथ :
दादाला सत्य समजेल तेव्हा तो काही बोलण्याच्या स्थितीतच उरणार नाही…

आता पुढे.......


**********
फार्महाऊससमोर Rolls-Royce Sweptail
👉 किंमत: (₹105 कोटी). गाडी थांबते
अभिराज रागाने बाहेर पडतो. हातात अजूनही फोन घट्ट पकडलेला.

अभिराज :
विक्रम, मला काही विचारायचं नाही... गाडी आत लाव आणि निघून जा.

विक्रम :
पण सर, तुम्ही.....

अभिराज मध्येच तोडत
I said leave me alone, विक्रम!

विक्रम:
ठीक आहे सर... पण काही झालं तर

अभिराज :
काही होणार नाही. जा आता.

विक्रम गाडी मागे घेतो आणि निघून जातो. फार्महाऊस शांत.

अभिराज बारकडे चालत जातो
तो एक ग्लास घेतो, बाटली उघडतो, आणि व्हिस्की ओततो.
पहिलाच घोट तीव्र. दुसरा जास्त खोल. तिसरा पूर्ण शांतता.

अभिराज स्वतःशी पुटपुटतो
Baba... तुमचं म्हणणं नेहमी बरोबर असतं ना... पण यावेळी नाही.
यावेळी मी माझ्या मनाने जगणार... काहीही झालं तरी.
तो ग्लास टेबलावर आपटतो, आणि बाहेर पूलकडे चालत जातो.

पाण्याचा मंद प्रकाश त्याच्या अंगावर पडतो. तो शर्ट काढतो.
त्याच्या शरीरावरच्या रेषा पाण्यातल्या चंद्रकिरणात उठून दिसतात.
खांदे रुंद, हातांवरच्या स्नायूंमध्ये ताण.
पाण्याचे काही थेंब चेहऱ्यावर पडतात आणि तो थेट पूलमध्ये उडी मारतो.

‘फटाक्!’

तो जोरात पोहायला लागतो
प्रत्येक स्ट्रोकमध्ये राग, वेदना आणि जिद्द मिसळलेली.
पाणी उडतंय, श्वास दाटलेत.
डोळ्यांतून निघणारे थेंब पाण्यात मिसळतात, अश्रू आहेत की पाण्याचे थेंब, कळत नाही.

काही मिनिटांनी तो पूलच्या काठावर थांबतो.
तो श्वास घेतो, आणि ठाम आवाजात म्हणतो 
कधी कधी पैशापेक्षा महत्त्वाचं असं काही नसतं; पण जे लोक ते समजत नाहीत, त्यांना शिकवायचं लागतं....

पूल मधुन बाहेर येऊन अभिराज विक्रमला कॉल करतो...
Hello विक्की... !!! कुठे पोहचला तू... ???? परत ये मला काम आहे तुझे....!!

विक्रम : हा रस्त्यातच आहे येतो सर परत....
कॉल कट करून स्वतःशीच पुटपुटला, हे सर पण ना... थांबतो म्हटल तर नाही म्हणाले आणि आता परत ये म्हणते आज तुझं काही खरं नाही विक्की कारण आता विक्की म्हटल म्हणजे आता मित्र बनून हेल्प करा लागेल😏

विक्की परत फार्महाऊसवर पोहोचतो.
तो आत शिरतो, बारकडे जातो. अभिराज पूलमधून नुकताच बाहेर आला होता, शर्ट परत घातला आणि बार काउंटरवर ग्लास ठेवलेला.

विक्रम : सर… … बोलावले परत , आलो मी?

अभिराज एकदम डोळ्यात राग आणत:
पहिल्यांदा... मला "सर" म्हणू नकोस.
मी तुला “विक्की” म्हटले म्हणजे, तू मला “अभि” म्हणणार. Right ???

विक्की : Ohhh ok sorry… बोल अभि, काय चाललय तुझ्या डोक्यात?

अभिराज : मला एक मुलगी हवी आहे… contract marriage साठी.

विक्की एकदम 😲 शॉक होऊन:
काय?? म्हणजे लग्न… कॉन्ट्रॅक्टवर? तू seriously बोलतोयस का?

अभिराज:
हो.
मला अशी मुलगी हवी जीला पैशांची गरज असेल.
तिला मी माझ्या अटीं मान्य करायला लावेन जर मंजूर असेल तर म्हणेल तितके पैसे देणार..
ना प्रेम, ना भावना. फक्त एक deal.

विक्की थोडं थांबून:
अभि, तू काही जास्त रागात निर्णय घेतोयस असं वाटतंय…

अभिराज कटाक्ष टाकत :
राग नाही विक्की, हे उत्तर आहे.
Baba म्हणतात काही गोष्टी नफ्यात मोजता येत नाहीत...
मी दाखवून देणार प्रेमही business deal असू शकतं.

विक्की एकदम हळू आवाजात:
आणि जर त्या मुलीच्या आयुष्यात तू गुंतलास तर…?

अभिराज :
Ohhhhhh..... Come on I m not that stupid.....
तु लवकरात लवकर एक मुलगी पहा....



*******************या
श्रावणीचं घर, दहिसरच्या एका छोट्या अपार्टमेंटमध्ये...

श्रावणी दरवाजा उघडते 
ती थेट हॉलमध्ये येते बॅग सोफ्यावर फेकते.

श्रावणी थकलेली आवाजात
“आई… कुठे आहे तू…???"

उत्तर नाही.
ती किचनमध्ये डोकावते गॅसवरचं दुध ओसंडून गेलंय.

श्रावणी :
“अगं बापरे! आई!!” आणि गॅस बंद करते...

ती हॉलमध्ये परत येते. आई सोफ्यावर झोपलेली दिसते. जवळ गेल्यावर लक्षात येतं आईचा श्वास जड झालाय, अंग तापलेलं आहे.

श्रावणी घाबरलेली : आई… आई...., तुला ताप आलाय का गं?

आई : नाही गं, थोडं अंग दुखतंय, थंडी वाजतेय…

श्रावणी : अरे पण थंडी वाजतेय म्हणतेस आणि फॅन चालू ठेवला आहेस?

आई : तू पण ना, ऑफिसहून आली आणि लगेच क्लास घ्यायला लागलीस…

श्रावणी : क्लास नाही घेत आई, तुझी तब्येत बघतेय मी!
तू स्वतःची काही काळजी घेत नाहीस, आणि मग मला रोज टेन्शन!




क्रमशः........