श्रावणी : क्लास नाही घेत आई, तुझी तब्येत बघतेय मी!
तू स्वतःची काही काळजी घेत नाहीस, आणि मग मला रोज टेन्शन!
आई थोडं खोकत : थोडं औषध घेतलंय गं, बरं होईल…
श्रावणी : नको मला तुझं ‘बरं होईल’.
चल, आत्ता डॉक्टरकडे जाऊया.
मी बोलले म्हणजे बोलले, discussion संपला.
ती स्कार्फ घेत आईचा हात धरते.
आई : इतकं रागावतेस का गं?
श्रावणी हळू आवाजात पण डोळ्यात पाणी आणत
राग नाही गं… भीती वाटते. काही झालं ना तुला तर मी नाही राहू शकणार…
आई : मला काही नाही होत... अजून तुझं लग्न पहायचे आहे तुझे लेकरं माझ्या मांडीवर खेळवायचे आहे...
श्रावणी थोड हसत बोलली,बर बरं चला आता....
ती आईला डॉ. शिर्केकडे घेऊन आली
डॉ. शिर्के टेबलासमोर बसले होते. श्रावणी आणि तिची आई समोरच्या खुर्च्यांवर.
डॉ. शिर्के: ताई, ताप तर आहेच थोडा. पण नेमकं कारण समजायला काही टेस्ट्स लागतील.
श्रावणी: टेस्ट्स म्हणजे… काही गंभीर आहे का डॉक्टर?
डॉ. शिर्के: तसं काही सांगता येणार नाही आत्ता. पण ब्लड टेस्ट, शुगर, आणि काही special टेस्ट्स करवून घ्या. रिपोर्ट्स आल्यावर नीट बघूया काय treatment घ्यायचं.
आई: अगं श्रावणी, एवढं काही नाही गं... साधा ताप असेल.
श्रावणी: आई, तू शांत बस. आता सगळं मी बघते. डॉक्टर जे सांगतील तेच करायचं.
डॉ. शिर्के: बरोबर बोलली श्रावणी. आज विश्रांती घ्या. मी औषध लिहून देतो. उद्या सकाळी टेस्ट्स करूया.
श्रावणी पर्ची घेत आईला धरून उठते.
काउंटरवर बिल भरताना ती थोडी थांबते, मनात विचार करते हे सगळं जमेल कसं… आईची तब्येत, घराचा खर्च, आणि माझं ऑफिस…
आई बाहेर येते, हळूच म्हणते ,खूप थकतेस गं तू, श्रावणी…
श्रावणी आईचा हात घट्ट पकडते
“थकले तरी चालेल आई, तू बरी झालीस की सगळं ठीक होईल.”
दोघी क्लिनिकच्या बाहेर पडतात.
श्रावणीच्या मनात फक्त एकच विचार होता
माझ्या आईला बर कर देवा लवकर...
दुसऱ्या दिवशी श्रावणी आईला लॅब मध्ये घेऊन आली
आई थकलेली होती
लॅब टेक्निशियन:
“मॅडम, डॉ. शिर्केंनी काही routine checkup आणि काही special टेस्ट्स लिहून दिल्या आहेत. रक्त तपासणी आणि एक स्कॅन आहे.”
श्रावणी:
“हो, करा सगळं. लवकर report द्या please.”
आई थोडी हळू आवाजात म्हणते,
गं, एवढ्या टेस्ट्सची गरज आहे का?
श्रावणी:
“डॉक्टरांनी सांगितलंय ना, म्हणजे गरज असेलच. तुला बरी व्हायचंय, बस मग शांत.”
श्रावणी तिचा हात धरून म्हणते,
“सगळं ठीक होईल आई. तू फक्त positive रहा.”
थोड्याच वेळात रक्त तपासणी होते, आणि टेक्निशियन म्हणतो, Reports तीन दिवसांत मिळतील. काही special test reports थोडं उशिरा येतील.”
श्रावणी फॉर्मवर सही करते, आईला बाहेर घेऊन जाते.
ती आईला auto मध्ये बसवते आणि मनात पुटपुटते
“देवा, काही गंभीर निघू नये... मला आईशिवाय जगायचं नाही…”
अभिराजच्या कॅबिनमध्ये silence.
समोर मोठं conference table, आजूबाजूला फायली, presentation slides, आणि मोबाईलवर सतत येणारे कॉल्स. तो एकामागून एक meeting घेत होता investors, clients, media team.
विक्रम बाहेरच्या कॅबिनमध्ये बसलेला, लॅपटॉप समोर पण मन कुठेतरी दुसरीकडे.
तो सतत विचारात...अशी कोणती मुलगी शोधू मी... जी या माणसाचं मन बदलू शकेल?
अंदरून अभिराजचा आवाज येतो
“विक्रम!! where the hell are you man?? Presentation ready आहे का?”
विक्रम दचकतो, आत धावत जातो.
“हो सर, तयार आहे. पण तुम्ही थोडा आराम करा, सकाळपासून बघतोय मी”
अभिराज त्याच्याकडे एक कटाक्ष टाकतो
मला emotional lecture नकोय, काम दाखव.
विक्रम मनातच... “हा माणूस कधी हसेल पुन्हा खरं…?”
Meeting सुरू होते. सगळे टीम मेंबर्स gathered.
अभिराज pitch करत होता cold, focused tone मध्ये.
त्याच्या बोलण्यात perfect confidence होता...
Presentation संपल्यावर सगळे बाहेर पडतात.
विक्रम थांबतो, आणि शांतपणे म्हणतो
अभि, तुला माहिती आहे का, तू तुझ्या कामात जितका dedicated आहेस ना… तितकाच तू तुझ्या emotionsना बंद करून टाकलंस.
अभिराज हसतो हलकं, पण त्या हसण्यात sarcasm राहते...
Emotions? ते loss देतात विक्की. मी आता profitच बघतो.
विक्रम : पण कधीकधी profit पेक्षा peace महत्त्वाचं असतं.
अभिराज म्हणतो,
Peace मिळते ती आपल्याला हवी ती deal मिळाली की. आणि मला ती deal मिळवायची आहे लवकर.
क्रमशः.......