खडकातलो झरो
उगवती लाल झाली तशी पाखरा किलबिलाट करूक लागली. गार वारो भिरभिराक लागलो.सोबतीक फुलांचोवास परमळाक लागलो.उगवतीकडे शुक्राची चांदणी चमका होती.मालग्या सुतारनीच्या कोंब्यान कुकूच कू केल्यान तसा सुगंधा गवंडी धडपडान उठला.तोंडार पाणी मारून भायर इला. खांद्यार टॉवेल टाकून ओसरीर ठेयलेली हडगी उचलून दर्याच्या दिशेनं चलाक लागला." शिरा पडो व्हरान, फटफटला तरी आज जाग येवक नाय."सुगंधा पुटपुटला.गारवो जाणावलो तसो तिना डोक्यावरसून पदर गुंडाळून घेतल्यान.मागे वळानं तिना आपल्या घराकडे बघलेन.तीच्या डोळ्यांन पाणी इला.' देवा माझ्या घराक कोणाची तरी नजार लागलीसा...ईडा पीडा टळांदे रे देवा .' सुगंधा मनातल्या मनात पुटपुटला.सुगंधा ' झापाच्या वाडीत ' रवा होता.थयसली बरीचश्या घरांची छप्परा माडांच्या झापांची होती.दर्यावर तुफान इला काय सगळी छप्परा गदागदा हलत.पण छप्परा कधी उडाक नाय होती.बघता बघता ता दर्यावर पोचला. आता बर्यापैकी उजवाडला होता. सामको सिंधुदुर्ग किल्लो मंद धुक्यातसून दिसा होतो.सुगंधान वाकन नमस्कार केल्यान." माझो राजा हय लक्ष ठेवून आसा. "सुगंधा मग डाव्या बाजूक वळला.थय माश्यांचो लिलाव सुरू होतो. बांगडे,पापलेट,इरडा,सुंगटा ,मुशी ,कालवा ह्येंचे ढिग रचलेले होते. सुगंधा रोजच्या होडयेवाल्याकडे गेला. थय विष्णू तांडेल उभो होतो. सुगंधाक बघून तेना त्वांड वाकडा केल्यान." अगे गवंडीनी, तूझे आधिचे पैसे रवलेत ते कधी दितलंय?""दादानू,तुमचे पैसे मीया ठकवयचय नाय.आतासो थोडो जादा खर्च झालो म्हणाना रवले.पुढच्या टायमाक देतय."" म्हणजे आताचेय पण देवचय नाय ? व्हय मा?" तांडेलान इचारल्यान." ह्या बघा, परवा देतय.पण आज माका मासे देवा."सुगंधान गयावया करत सांगल्यान." देतय....देतय...पण उधारी लवकर दे बाय.तूका नाय देवन कसा चलात?"विष्णू तांडेलान सुगंधाच्या हडगेत बांगडे,सुंगटा ,पेडवेआणिकर्ली घातल्यान." आजचे आठशे आणि आधिचे मेळान दोन हजार तुझ्यावर रवलेत. माका मागूक लाव नको ,समाजाला मा?"" दादांनू, उपकार झाले. दोन दिसांत देतय तुमचे पैसे." सुगंधान हडगी उचलून कपाळावर घेतल्यानं. आता मासे घेऊन दुपारतगयत मालवणाच्या दोन चार वाड्यातून हाकारे देयत फिरान सुगंधाक मासे खपवचे होते.दोंपाराच्या आधी सगळा आटपून घराक जावचा होता. सुगंधान एक उसासो सोडल्यान आणि चलाक सुरुवात केल्यान. खरा तर तिच्याकडे शिलकीक एक नयो पैसो नाय होतो.तांडेलाक दोन दिसात दोन हजार खयसून दितलय हेचो इचार ता करी होता.वाळूतसून अनवाणी चालत सुगंधा रस्त्यार इला.तितक्यात समोरसून फुला माना आपलो टेम्पो घेवून इला. सुगंधाक बघून त्येना टेम्पो थांबयल्यान." सुगल्या, आयक मीया जातलय थय तूया मासे घेऊन जायचा नाय. समाजला !" फुला मानानं सुगंधाक दम दिलो." नाय गो माना. मीया कशाक तूझ्या भानगडीत पडतलय.मीया भायरच मासे खपतय." सुगंधान आंग चोरीतचउत्तर दिल्यान.गेल्या चार म्हयन्या पासूनच सुगंधा मासे इकूक लागला होता .तेवापासूनच फुलाचो आणि तेचो झगडो सुरू झालो होतो.तशी सगळी गाबत्या सुधा फुलामानाक भियत.फुलाचा खरा नाव फ्लावेरीया होता.पण सगळे तेका फुला नायतर फुलामाना म्हणान ओळखत. फाटक्या तोंडाचा आणिपावला पावलावर झगडो करना असो त्येचो सोभाव होतो.टेम्पो स्वतः चलय आणि मालवण भर फिरान ता मासे इकी.तसा फुला गोरा आणि अंगाने धष्टपुष्ट होता.त्येचो आवाज थोडो कर्कश होतो.सुगंधाक तर ता जराय बघून घेय नाय.खय दिसला काय उगाचच हटकी आणि चढ्या आवाजांन बोला. सुगंधा तेका भियानच रवा. फुलांन टेम्पो पुढे न्येल्यान तसा सुगंधाक हायसा वाटला. दोंपारपर्यंत ऊनातसून फिरान सुगंधा घामाघूम झाला. पाय दुखाक लागले. वाटेत एका घरवालनीकडसून पाणी घेवून तिना गटागटा पिल्यान .आज चांगलो दिस होतो.सगळे मासे खपले होते .कमरेवरच्या कापडी पिशयेत दिड एक हजार रूपये जमा झाले होते." देव बरा करो. " सुगंधा पुटपुटला.बाजारात जावन तिना बटर, फरसान घेतल्यानं. चेडवाक आवडतात म्हणाना बटाट्याची कापा हॉटेलातसून घेतल्यानं.हडगेत सामान ठेवून ता मेडिकल स्टोअर्स मधे गेला.पदराक बांधलेली गाठ सोडून तिना डॉक्टरांची चिठ्ठी काढून स्टोअरवाल्याक दिल्यान." भाऊंनू ,सगळी औषधा दिव नका, अर्धी-अर्धी दिया."दुकानवाल्यान मान हलयल्यान. " भाऊंनू कितके रूपये झाले?"" चारशे !"सुगंधान पैसै देवन औषधा घेतल्यान आणि लवकर लवकर पाय टाकित घराची वाट धरल्यान.झापाच्या वाडयेत जावाक अजून अर्धो तास तरी चलाक होयो होता.सुगंधा भायर पडला आणि फुला दुकानात शिरला.फुलाक बघान सुगंधाच्या छातीत उगाच धडधडला." बरा झाला भायर पडलंय ता,नायतर कायतरी ऐकान घेवचा लागतला असता."सुगंधा झपकन थयसून निघाला. अर्ध्या एक तासात सुगंधा ' झापाच्या वाडयेकडे ' पोचला.दारात आंगाचा मटकुळा करून झोपलेल्या हडकुळ्या कुत्र्यान सुगंधा कडे डोळे किलकिले करून बघल्यान आणि पुना डोळे बंद करून तसोच पडान रवलो.दरवाजो ढकलून सुगंधा आपल्या घरात शिरला. थोडो येळ गेलो.भायरचो कुत्रो भुंकाक लागलो.कोणाच्या तरी पावलांचो आवाज इलो.जेवाण करीत असलेला सुगंधाभायर इला. दारात उभ्या असलेल्या बाईकडे बघान तेचा त्वांड उघडा ता उघडाच रवला. समोर फुलामाना उभ्या होता." अरे,माझ्या नशिबा....! आता गो काय करतलय? आता कसलो झगडो करुक इला ह्या." सुगंधा बडबडला." सुगल्या, भायर दारातच उभ्या करतलय काय आत घेतलयमाका?" फुलान इचारल्यान.सुगंधाक काय बोलाचा ता कळाना .ता गुपचुप दारातसून बाजूक झाला. फुला घरात शिरला.सुगंधाचा काळीज धडधडाक लागला.फुला सुगंधाचा घर बघूक लागला.भायर लोटो होतो.आत वळय, मागे जेवणाची खोली.वर झापांचा छप्पर.वळेयत याक चवदा पंधरा वरसांचा चेडू प्लास्टिकच्या खुर्चेरबसान कसलातरी बुक वाची होता.त्येच्या पायार टॉवेल टाकलेलो होतो." काय गो चेडवा , तुझा नाव काय?"" त्येचा नाव गौरी. " सुगंधान सांगल्यान." तू चूप रव. मीया तूका इचारलय , काय त्येका?"फुलान आपल्या जाड्या भरड्या आवाजान सुगंधाक दम दिल्यानं." गौरी बाय, किती बुका शिकलय गो?"" आण्टी,नववीत आसय मीया."" तूझ्या पायावर टॉवेल कित्याक आसा?"गौरी आपल्या आवशीकडे बघीत गपचीप रवला." आता तूया बोल." फूला सुगंधा कडे वळान बोलला." चार म्हयन्या पयलो गौरीक बारीक बारीक ताप आसान नसान येय. भूक लागा नाय.वैद्याक दाखयला... डॉक्टर केले पण अचानक येके दिसा.... गौरी चालता चालता पडला तेका उठाक येयना. तेचे दोनय पाय कमरेखालसून लुळे पडले."सुगंधा रडत रडतच बोलला." अरे देवा ! अगो दोतारांनी काय सांगला?"" डॉक्टरांनी इंजेक्शना दिली...औषधा दिलीहत...बरा होयत म्हणतत.म्हयनाक नायच म्हणला तरी दोन एक हजाराची औषधा होतत."" देव बरे करो. तूझो घोव खय आसा गो?"" म्युनसिपाल्टीन कामाक आसा.पण चेडवाच्ये पाय गेले तसो तो खूपच दारू घेवक लागलो.कामार धड जायना.आतापण खयतरी घेवक गेलो असतोलो."फुलांन हात जोडले." सायबीनी , ह्या चेडवाक बरा कर गे. तेचे पाय पयल्यासारखेहोव दे. सुगल्या, नशिबाचे भोग असतत गो बाय.पण तूया भीया नको.मीया आसय आता तूझ्या वांगडा."फूलाच्या डोळ्यान पाणी इला." सुगल्या, अगो तूया माका पयला कित्याक सांगूक नाय?"फुला सुगंधाच्या खांद्याक धरून हलयत बोलला." मीया तूका नको नको ता बोललय.माझा मेल्याचा त्वांडच फाटक्या."फुलामाना ढसा ढसा रडाक लागला.ता बघान सुगंधा आणि गौरी पण रडाक लागली.फुलान डोळे फुसले. गळ्यातलो पाच तोळ्याचो मोठो हार काढून सुगंधाच्या हातानं दियत बोलला..." ह्यो हार इक, चेडवाक मुमयक नाय तर गोव्याक व्हार.होडल्या दोताराक दाखय."सुगंधा हार बघून घाबरला." फुला, हार नको गे बाय. पयलाच बराच रीण् झालासा.माका जमात तसा करतंय बाकी देवार भरवसो."सुगंधा हार परत करीत म्हणाला." गपचीप ठेय.मीया त्या मेडिकलवाल्याक तू गेल्यार इचारलय...तेना माका सांगल्यान म्हणान मीया पाठोपाठ हयइलंय.अगो आता माका माझीच लज वाटता."फुला खालच्या आवाजान बोलला.सुगंधाच्या डोळ्यान आसवांची धार लागली. फुलाचा ह्यो नवो अवतार बघाना सुगंधा चकित झाला." ह्या बग सुगल्या, तूझ्या चेडवाचे पाय पयल्यासारखे होय पर्यंत मीया पायानं चप्पल घालूचय नाय. तूका कधी गरज लागत तेव्हा माका हाक मार.मीया चर्चान गेलय काय गौरी साठी प्रेअर करीन.तूया माझ्या वांगडा मासे इकूक फिर .नाय म्हणशीत तर बघ."फुला सुगंधाक पकडीत दम दियत बोलला. दोघय एकमेकांकडे बघून हसली. दर्यावरचो गार वारो दरवाज्यातसून आत शिरलो.छप्पराची झापा थोडी हलली आणि पयल्यासारखी झाली.
बाळकृष्ण सखाराम राणे गरड सावंतवाडी.मो.नं.8605678026