The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
किती बघावं तुला नेहमी , फक्त माझा दिसतो मला , कधी माझा मित्र , तर कधी प्रियकर दिसतो मला , आज माझा साथीदार होऊन गेला तू....!! न जुळलेला धागा , आज जुळणी गेला सहज , न सांगता कधी, मनात घर केलंस, आणि नकळत माझं सगळंच बनलास तू सहज...!! तुझ्या नजरेत हरवून जाते मी, आणि स्वतःलाच सापडते तुझ्यात, प्रत्येक क्षणात तुझीच चाहूल, आणि प्रत्येक श्वासात तुझीच साथ...!! काय नाव द्यावं या नात्याला, जे शब्दात कधी मावत नाही, फक्त इतकंच कळतं मला, तुझ्याविना आता काहीच पूर्ण होत नाही...!! तुझ्या स्पर्शात एक शांतता आहे, जिथे सगळ्या चिंता विरून जातात, तुझ्या हसण्यात एक जग आहे, जिथे माझी स्वप्नं उमलून येतात...!! रात्रीच्या प्रत्येक शांत क्षणी, तुझाच विचार डोळ्यांत भरतो, आणि पहाटेच्या पहिल्या किरणासोबत, तुझाच चेहरा मनात उमटतो...!! तू असलास की सगळं काही आहे, तू नसताना सगळं रिकामं वाटतं, हे प्रेम आहे की सवय तुझी, हेही आता कळेनासं होतं...!! तुझ्या नावानेच हसू येतं, आणि तुझ्यामुळेच डोळे ओलावतात, असं काहीतरी नातं जडलंय आपलं, जे फक्त मनालाच समजतं...!! जर आयुष्य एक प्रवास असेल, तर तुझ्यासोबतच चालायचं आहे, प्रत्येक वळणावर, प्रत्येक क्षणी, फक्त तुझंच हात धरायचं आहे...!!
मैत्री व्यक्त नसेल करता येत रे मला , पण तुला जपता मात्र येतं रे मला ..!! हव्या हव्या श्या गोष्टी ,नसेल जमत मला ,. पण तुला शब्दात मांडायला मात्र जमत रे मला..!! पुस्तके पडली माझी आता आस्था व्यस्त ,. पण तुला मात्र सावरता येत रे मला..!! तू साधा कागद रे,मला कविते ची जान तरी , पण तुझ मन वाजता येत रे मला ...!! तू प्रश्नाचा साठा माझा , पण मात्र तुझ उत्तर बनता येत रे मला ..!! नसेल ओढखता येत मला हे जग , एक तुला ओढखन्न जमलं रे मला...!! ❤️ _Anuuu
Copyright © 2026, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser