Quotes by Fazal Esaf in Bitesapp read free

Fazal Esaf

Fazal Esaf

@fazalesaf2973
(312)

"डोंगराच्या कुशीत

डोंगरांच्या पायथ्याशी,
गवताने लिहिलेल्या ओळी सापडतात,
जणू पृथ्वीच्या हृदयातून निघालेला श्वास असतो,
आणि प्रत्येक वाऱ्याचं ध्वनीपटल –
त्या ओळी वाचून जातं… हलकेच…

धुक्याची चादर गुंडाळून झोपलेली वाट,
पक्ष्यांच्या गाण्यांतून जाग येते रोज,
सूर्य उगवतो तिथं –
एक कवि, ज्याच्या प्रत्येक कवितेचा कागद असतो आकाश…

तुझ्या कुशीत बसून,
मी निसर्गाशी बोलतो काही क्षण,
आणि मग तू –
डोंगरासारखी उभी राहतेस माझ्या समोर,
माझ्या मनाच्या क्षितिजावर…

By Fazal Abubakkar Esaf

Read More

पावलांचे अग्निनर्तन"


चालत रहा...
दगडधोंड्यांच्या पदरांतून, काळोखाच्या कपारीतून,
पावलांना चिखलाची नाही, पण स्वप्नांची ओढ असते।
दर क्षणाला गळून पडणारा, पण अजूनही न पडलेला
हा एक प्रवासी — स्वतःच्या छायेला ओलांडतो आहे।

पायाखालची वाळूही जळते,
वारं अंगावर चटके देतं —
तरी, हे पाय मागे हटत नाहीत,
कारण कुठे तरी, एखादा "शब्दांचा दीप" उजळत आहे।

रस्ता म्हणतो — मी तुझ्या वेदनेचा साक्षीदार आहे,
आणि आभाळही म्हणतं — माझ्या कुशीत एक दिवस
तुझं श्रमाचं सूर्यफूल उमलेल।

थांबू नकोस...
घड्याळाच्या ठोक्यांत तुला कोणी थांबवणार नाही,
पण एक दिवस, वेळच तुला वाकून नमस्कार करेल।

ही वाट अंगारांची आहे,
पण पावलांचं नर्तन साजिरं आहे —
कारण चालणं म्हणजेच आयुष्याशी केलेली एक शांत,
पण अस्सल क्रांती आहे।

Read More

कधी शांततेत बोलतो तो, माझ्यासारखा
कधी स्वप्नात फिरतो तो, माझ्यासारखा...
लपवतो प्रत्येक वेदना हास्याआड
आणि मग एकटाच रडतो तो, माझ्यासारखा...

कधी नजरेतून उलगडतो सारे रहस्य
कधी स्वतःपासूनही घाबरतो तो, माझ्यासारखा...
प्रत्येक प्रवासात शोधतो एक आपलंसं चेहरा
आणि मग स्वतःलाच भेटतो तो, माझ्यासारखा...

तोही लिहितो भावना कागदावर शांतपणे
प्रत्येक शब्दात हुंदके असतात त्याचे, माझ्यासारखे...
जरी कितीही लपवला स्वतःला दुनियेकडून
आतून तुटतो तो, माझ्यासारखा...!! 🥀

– फज़ल अबुबकर एसाफ

Read More

माझं हसणं
अजूनही त्याचं
परत येण्याची वाट पाहतं
- Fazal Esaf

तिचं मौन
हा तिचा
सर्वात मोठा
बंडाचा आवाज होता
- Fazal Esaf

झोप येते जुन्या आठवणींना,
पण स्वप्नं मात्र अजून जागी आहेत
- Fazal Esaf

Clouds weep, earth smiles wide
Rain's blessing, life inside

Fazal Esaf

मीच होतो दीप, मीच होतो वात"
मी चाललो गंधाशिवाय, पण सुगंध मला व्यापून गेला,
ना फुलं होती हातात माझ्या, ना वसंत कुठे थांबलेला।
क्षणांचे थेंब सांडत गेले, ओंजळीने मी का घेतले?
शब्द नव्हते ओठांवर, पण मौनाने मी गाणं केलं

कोणी दिलं नव्हतं वचन, तरी मी वाट बघत राहिलो,
आसवांच्या ओघातून, कवडसे शोधत मी चाललो।
नभात जरी चंद्र नव्हता, तरीही चांदणं सोबत होतं,
रात्र काळोखात हरवली, पण मीच त्या रात्रीचा दीप होतो

श्वासांतून येते जळजळ, आणि हृदयात होते वादळ,
मन सांगतं — ‘थांब', पण आत्मा म्हणे — ‘थोडं अजून चाल।’
मी फाटलेल्या क्षणांत शिवलं, एकतर्फी एक स्वप्न जुनं,
जिथे कुणी उभं नव्हतं, तिथे मीच होतो सावलीसारखं

मी विचारला स्वत:लाच — ‘तू कोण आहेस रे, जीवना?’
हसून उत्तर आलं — ‘तूच प्रश्न आणि तूच उत्तर मानवा।’
मीच होतो दीप, मीच होतो वात,
वाऱ्याशी लढणाऱ्या प्रकाशाचा मीच एकान्त हात

Read More

शब्दांच्या कुंडांत माझं मन दहवतं,
शब्दांमध्ये लपलेलं जीवन गदगतं
- Fazal Esaf

जगाने जितकं तोडलं, तितकाच घट्ट मी उभा राहिलो,
माझा हरवलेला आवाज शेवटी मीच शोधून काढला.
- Fazal Esaf