Quotes by Vrishali Gotkhindikar in Bitesapp read free

Vrishali Gotkhindikar

Vrishali Gotkhindikar

@jayvrishaligmailcom
(3.3k)

ice Tea ☕ अर्थात थंडगार मसालेदार चहा...

epost thumb

Audio
कविता
चेहरे

epost thumb

एक प्रवास फुलताना मे फ्लॉवर

epost thumb

कैरीची लाल चटणी

epost thumb

सुपर फूड राजगिरा लाडू

epost thumb

कैरी पुदीना हिरवी चटणी

epost thumb

#ठंडा_ठंडा_कूल_कूल

घरच्या बागेतल्या हिरवळी वर
मँगो मिल्क शेक..❤️

epost thumb

प्रभू तेरो नाम

epost thumb

नाश्ता टाईम

🍞पावाची भाजी किंवा
ब्रेडचा चिवडा ..

काही जण याला ब्रेडची उसळ पण म्हणतात

मी शाळेत असताना एक बाई शाळेत खाऊ विकायला येत असत.
त्यांच्याकडे दोन मोठे अल्युमिनियम चे डबे असत
एकात भडंग आणि एकात पावाची भाजी
पाच पैसे, दहा पैशाला मिळायची
तो काळ वेगळा होता
मुलांना घरचा डबा दिला जात असे
बाहेरचे खायला परवानगी नव्हती
पॉकेट मनीची तर पद्धतच नव्हती
पण कोणी मैत्रीणी डबा आणला नसल्यास हे दुपारच्या सुट्टी साठी विकत घेत
तेव्हा डबे वाटून खाल्ले जात.. मग आपल्या वाटणीला दोन घास येत असत

किंवा कधीतरी घरी आईला तिच्या शाळेत लवकर जायचे असेल आणि डबा द्यायला जमणार नसेल तर घरून पाच दहा पैसे मिळत

तेंव्हा ही पावाची भाजी दुपारच्या सुट्टीत हौसेने घेउन खाल्ली जात असे
यावेळी गंमत म्हणजे एकीने पावाची भाजी घेतली तर दुसरी भडंग घेतं असे
आणि दोन्हीं एकत्र करून वाटून खात असू
आत्ता विचार केला तर असे कॉम्बो कदाचित ऑड वाटेल
पण तेंव्हा मात्र त्याला अवीट चव लागत असे,😋
पावाची भाजी केली की शाळेची आठवण अपरिहार्य असते..🙂🙂❤️

सध्या सँडविच करायला मोठा पाव आणला की दोन वेळेस सँडविच करून सुध्दा पाव शिल्लक राहतो
कोल्हापूरला पेटी पाव मिळतो
अतीशय चविष्ट आणि रोज ताजा.. कडेच्या कडा कुरकुरीत आणि आतून मऊ सुत असतो
या पावाच्या भाजीला मात्र शिळा पाव हवा
म्हणजे त्याचे हाताने छान लहान तुकडे करता येतात
असे तुकडे करताना वेळीं अथवा चाकू वापरणे निषिद्ध असते😄

असे उरलेल्या पावाचे तुकडे करून
कांदा ,मिरची ,कढीलिंब फोडणीला टाकून त्यात हे तुकडे हळद ,साखर ,मीठ घालून झाकण ठेवून दणदणीत वाफ आणायची

छान पैकी कोथिंबीर खोबरे..
वरती खमंग भाजलेले शेंगदाणे
सोबत एखादी लिंबाची फोड घेउन
गरम गरम खायला घ्यायची 😋
कोणी कोणी यात बटाट्याच्या काचऱ्या सुध्दा घालतात
कोणी कांदा बटाटा दोन्ही घालतात
ज्याची त्याची आवड...

Read More
epost thumb

नुकताच मित्राच्या बागेतील
केशरी रंगाच्या मस्त मधुर चवीच्या देवगड हापूस आंब्याचा वानवळा येऊन पोचला आहे 🙂❤️

आमच्या बागेतील आंबे सध्या बाळसे धरत आहेत.🙂

या मोसमातील पहिला...

आंब्याचा शिरा

प्रमाण अंदाजे
प्रत्येकीने स्वतच्या पद्धतीने घेणे
एक वाटी रवा साजुक तुपात चांगला भाजून त्यात अर्धे दूध आणि जास्त आंब्यांचा रस घालुन वाफ आणली
शेवटी पाव वाटी साखर घालुन परत एक वाफ आणली (आंब्याच्या गोडी मुळे जास्त साखर लागली नाही)
सजावट मनुका काजु
वेलची केशर बिलकुल नाही
वाढप घरच्या कर्दळी पानावर..😊

Read More
epost thumb