वृत्त : भुजंगप्रयात
वृथा भावनांचा पसारा कशाला
तुझ्या अंतरीचा इशारा कशाला
नको आठवांचा पुरावा जराही
मला जाळणारा निखारा कशाला
सख्या ऐक आता नको स्पर्श हळवा
उगा कोंडणारा शहारा कशाला
मनाच्या तळाशी जरा ओल नाही
व्यथेच्या नदीला किनारा कशाला
नको हक्क सांगू मला कोणताही
सदा काळजावर पहारा कशाला
©®अक्षता देशपांडे