कृष्ण म्हणाला…
कृष्ण म्हणाला –
“कधीच हार मानू नकोस,
कारण युद्ध तेव्हाच हरतो,
जेव्हा मन लढणं सोडतं…”
कृष्ण म्हणाला –
“तू फक्त कर्म कर,
फळाची चिंता करू नकोस,
कारण प्रत्येक बियाणं लगेच उगवत नाही,
काही वेळ घेतात – पण फळ देतात!”
कृष्ण म्हणाला –
“जे घडलं ते चांगल्यासाठीच होतं,
जे घडतंय तेही अर्थपूर्ण आहे,
आणि जे होईल – ते तुला घडवण्यासाठीच होईल…”
कृष्ण म्हणाला –
“शांत राहा… तू आरंभ कर,
मी पाठीशी असेन –
कधी रथाचा सारथी म्हणून,
कधी तुझ्या अंतःकरणातल्या सत्वरूपाने…”
कृष्ण म्हणाला –
“माझ्या दर्शनासाठी मंदिर शोधू नकोस,
एखाद्याच्या अश्रू पुस,
माझं वास्तव्य तिथेच आहे…”
कृष्ण म्हणाला –
“तू अर्जुन आहेस – विसरू नकोस,
अंधार कितीही असला तरी,
शौर्य तुझ्यातच आहे,
मी तुझ्या आवाजात, तुझ्या कर्मात आहे…”
by Shiv Bhokare