नशीबवान मुलगी ❤️ आज भाजी घेण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यात एक दृश्य नजरेस पडलं. एक गरीब वडील आणि त्यांची लहानशी मुलगी रस्त्याने चालत होते. अचानक मुलीने वडिलांकडे आईस्क्रीमचा हट्ट केला. क्षणाचाही विचार न करता वडिलांनी हसत-हसत तो हट्ट पूर्ण केला.
अंगावर साधे, जुने कपडे होते. संध्याकाळी जेवण मिळेल की नाही, याचीही खात्री नव्हती. तरीसुद्धा खिशात असलेले शेवटचे दहा रुपये त्यांनी केवळ तिच्या आनंदासाठी खर्च केले.
आईस्क्रीम हातात मिळताच ती मुलगी आनंदाने उड्या मारत, नाचत पुढे जात होती. तिच्या चेहऱ्यावरचा निष्पाप आनंद पाहून मन भरून आलं. त्या क्षणी जाणवलं—गरिबीकडे पैसे नसतात, पण प्रेम अपार असतं.
आणि नकळत ओठांवर हे शब्द आले—
**“जिद्द करे मेरी लाडली,
तो हर ख्वाहिश पूरी कर दूँ।
चाहे जेब हो मेरी खाली,
तेरी हँसी कभी फीकी पड़ने न दूँ।
घर में हो न हो अनाज की थैली,
कमीज़ मेरी चाहे फटी हो पुरानी।
दुनिया से लड़ लूँगा मैं अकेला,
बस मुस्कान रहे तेरी निशानी।”**. ✍️sana sayyad