योद्धा
का झुरावे, किती झुरावे कळले नाही मनाला?
'तू कोण? मी कोण?' हे ऐकूनच अर्धं आयुष्य आलं पणाला.
किती वनवास, किती ध्यास तो स्वप्नांचा!
निघून गेलं सारं आयुष्य बघितलेली स्वप्नं पूर्ण करण्याच्या.
कोणी करतो भरती, कोणी करतो चाकरी तर कोणी करतो नोकरी,
'स्वतःचं उभं करायचं' म्हटल्यावर देईल का ओ कोणी साथ खरी?
कोण नसतं कोणाचं, कमावलेलं सगळं इथेच राहतं,
फक्त बघतोय स्वप्न स्वतःचं नाव मोठं करायचं, पण तिथेही लोक पाय ओढून धरत आहेत.
इच्छा उरी घेऊन जगत आहे, मन आतून तुटलं आहे,
त्याला सावरून स्वतः धीट होत आहे.
फक्त "तू करू शकतो" एवढं म्हणावं आई-बापांनी,
मी ही आकाशात उंच भरारी घ्यायची स्वप्नं बघत आहे.
होतील जेव्हा ती खरी, तेव्हा प्रत्येक जण शाबासकी देईल;
पण मला माहीत आहे आयुष्यात किती संघर्ष आणि साथ मला कोणी दिली.
नसतं ओ कोण कोणाचं, साथ फक्त आई-बापाची,
आज ना उद्या मी ही कमावेल, फक्त 'लढ' म्हणायची ताकद हवी.

Marathi Motivational by Bhavana kamble : 112040957

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now