तो ठरला पडद्यामागचा कलाकार......
नाही कधी हसताना पाहिलं,
नाही कधी रडताना पाहिलं,
सगळ्या कामाचा तो धनी,
त्याच्याकडे सगळा सोपस्कार,
कारण तो ठरला पडद्यामागचा कलाकार......
सगळ्यांना चांगले कपडे देऊन,
स्वतः फाटके कपडे घातले,
तरी तो हासत आयुष्य जगला,
नाही होऊ दिला कोणाच्या आयुष्याचा बाजार,
कारण तो ठरला पडद्यामागचा कलाकार......
नाही त्यानी नऊ महिने कष्ट झेलले,
पण हिर्या सारख्या जपलेल्या हिऱ्याला,
दुसर्याच्या हातात सोपवले,
तेव्हा हि त्याच्या चेहरा निराकार,
कारण तो ठरला पडद्यामागचा कलाकार....
तो होता बाप,
ज्याच्या कामाला नाही माप,
तो सगळ्यांच्या आयुष्याचा चित्रकार,
पण तो ठरला पडद्यामागचा कलाकार.......
तो ठरला पडद्यामागचा कलाकार......