Marathi Quote in Poem by Archana Rahul Mate Patil

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#गृहिणीची वारी घरच्या घरी#

पंढरीची वारी, तुळस डोईवरी
पंढरीची स्वारी आली माझ्या दारी..
राम कृष्ण हरी
गजर घुमतो वारी..
नाम घेते विठोबाचे
मस्तक ठेवते चरणावरी..!!
टाळ मृदुंगाच्या गजरात..
अभंग आणि भजनात..
देव आहे कीर्तनात ..
माझ्या घर संसारात!!
वारी दोघांचीच झाली..
एक घरी एक पाई..
विठ्ठला सोबतच भक्तांची
वाट पाहते माझी रखुमाई..!!
सारे गेले दिंडीत..
टाळ घेऊन हातात..
मीच राहिले घरात
दिवा लावून देव्हाऱ्यात..!!
टाळकरी नाचती दिंड्या पताका लयावरी
भक्ताची वाट पाहतो विठ्ठल उभा विटेवरी
डोळ्यात अश्रू येते दर्शनाच्या ओढीने..
एकदा तरी पायी जावेसे वाटते वारीने..
मनानेच गेले पंढरीला, देह इथेच राहिला. घरसंसार लेकरात मी देव इथेचपाहिला..
दूर नाही देव, देवाचा हृदयात ठाव..
मुखी म्हणा रामकृष्ण ठेवा मनामध्ये भाव..!!
आपली पंढरी घरातच आहे, आपलं काम त्याग सेवा आणि मुखी भगवंताचं नाव..
घरची गृहिणी कामात आहे तर वारीला गेलेले नामात दंग आहे.. पण दोघांचा भाव एकच.. भावभक्तीने भगवंताचे स्मरण..!!
#रामकृष्णहरी !!
- Archana Rahul Mate Patil

Marathi Poem by Archana Rahul Mate Patil : 112030796
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now