Marathi Quote in Poem by Vrishali Gotkhindikar

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

माझ्या भावाचा मित्र सध्या प्रेमात पडलाय .
पडलाय कसले चक्क ..बुड्लाय.म्हणा ना ..
खूप ..जवळची म्हणून सध्या मी आहे त्या प्रेमाची 'साक्षीदार "
अद्य्याप तिचा होकार नाही मिळाला त्याला
तशी ती त्याच्या खूप जवळची आहे.. .वागते पण एकदम आपुलकीने
पण त्याने प्रेम आहे असे सांगितले .की फक्त हसण्यावारी नेते
अशी त्याची आहे तक्रार !!
हे सारे सध्या जवळून पाहतेय ना ,,
मग काय मला मिळालाच कवितेला "विषय "..

तिच्यावरचे त्याचे प्रेम 'अजब ' असते भारी !
नकारात पण तीच्या "होकार '..हुडकत.असते 'स्वारी '
तीचे.'रूप 'तीचे 'गुण "..सारेच काही ..
कीती.'भुरळ..घालतात त्याला ..
स्वतालाच नसते उमगत ..कसे समजावील तो तिला ??
होत असतात खरे तर गप्पा" दिवसा आणी रात्री "..
पण यालाच म्हणतात "प्रीती '..तीला नसते खात्री ..
सतत होत असतात त्याला ..तीचेच भास "आसपास "..
'अशरीरी'..पण प्रीती असते? .तीचा नसतो बिलकुल विश्वास !
तसे काही मागणे नसते त्याचे तिच्याकडे "खास "
फक्त सुरूच राहावा असे वाटत असते "प्रेमाचा हा सुंदर "प्रवास "
तीच्यासाठी.काय करावे बरे ?हेच त्याला उमगत नसते
तीला गमवायचे नसते हे मात्र डोक्यात "पक्के " असते .
तीला भेटेन तेव्हा सांगेन प्रेमाचा "खरा " अर्थ समजावून
मग 'स्वीकार ' अथवा नकार 'असो त्याने ठरवलेले असते "मनापासून '
अशी ही त्यांची "प्रेमकहाणी 'नुकतीच झालीय सुरु .
भरकटू नये "तारू "एवढीच प्रार्थना करू !.

..........................................
...वृषाली **

Marathi Poem by Vrishali Gotkhindikar : 112032041
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now