गुलाबी पेरूचे पंचामृत
श्रावण महिन्यात अथवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात जेवणात पंचामृताचे फार महत्व असते
कोणत्याही फळाचे पंचामृत करता येते
पानात वाढलेले पंचामृत पानाची शोभा वाढवत असते
साहित्य..
एक मोठा गुलाबी पेरू
दोन मुठभाजलेले शेंगदाणे
मुठभर भाजलेले तीळ
कढीलिंब,बडीशेप
जीरे मोहरी हिंग मेथी
एका लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
तेवढाच गुळ
मीठ, तिखट, हळद ,काळा मसाला
दोन सुक्या मिरच्या
कृती
गुलाबी पेरूच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या
सुके खोबरे काप तळून घेतले
एक मूठ दाण्याचे आणि भाजक्या तिळाचे कूट केले
एक मुठ दाणे अखंड ठेवले
जीरे ,मोहरी ,हिंग ,मेथी , सुक्या मिरच्या घालून फोडणी केली
कढीलिंब त्यात खरपुस तळून
पेरूच्या फोडी घातल्या
वेगळे ठेवलेले दाणे आणि तळलेले खोबरे काप घातले
झाकण ठेवून एक वाफ आली की
फोडी बुडतील ईतके पाणी घालून परत झाकण ठेवले
एक उकळी आली की आवडीनुसार तिखट ,मीठ, हळद, काळा मसाला, गूळ, चिंचेचा कोळ , बडीशेप घातली
दाण्याचे आणि तिळाचे कुट घालून एकसारखे करून घेतले
शेवटी एक झाकण ठेवून वाफ आणली
चवीष्ट चमचमीत पेरुचे पंचामृत तयार आहे
पोळी ,पुरी, भात, धिरडी कशासोबत ही मस्त लागते
नुसते सुध्दा टॉक,😋 लागते
तोंडाला चव आणते 😊😊