Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

🫒ड्राय फ्रूट फ्राय कारले
एक शाही भाजी 🙂🙂

🫒कारले ही भाजी अशी आहे की आवडणाऱ्या लोकांना खूप आवडते
कशीही भाजी केली तरी त्यांना आवडतेच
मात्र त्याची कडवट चव न आवडणारे पानाला लावून पण घेत नाहित 😃

🫒हे कारले मात्र सर्वांना आवडेल ..शिवाय पौष्टिक..
ही भाजी एकदा एका टूर मध्ये एका हॉटेल मध्ये खाल्ली होती

🫒साहित्य

चार कारली
एक मोठा कांदा
ड्राय फ्रूट काजू ,मनुका, बदाम अथवा इतर आवडीचे
साखर, मीठ ,तिखट ,हळद, गरम मसाला
वरून घालायला ओले खोबरे ,कोथिंबीर

🫒कृती

प्रथम कारले उभ्या मध्ये चिरून त्यातील बिया काढून साफ करणे
याचे पातळ काप करुन घेणे
हे काप एका भांड्यात घालून त्याला तीन चार चमचे मीठ चोळून
पाण्यात बुडवून साधारण वीस मिनिटे ते अर्धा तास ठेवणे

🫒आता कांदा पण उभा पातळ चिरून घेणे
काजू बदाम तुकडे करावे
एका पसरट पॅन मध्ये काप तळले जातील इतके तेल घेऊन
(पॅन वापरल्याने कमीतकमी तेल वापरू शकता)
प्रथम काजू बदाम बेदाणे तळून घेणे

ते काढून कांदा कुरकुरीत तळणे

🫒आता भांड्यात भिजवून ठेवलेल्या कारल्याचे तुकडे पाण्यातून बाहेर काढून हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकावे

🫒हे काप पण तेलात कुरकुरीत मंद आचेवर तळणे
तळलेले काप बाहेर काढून त्यावर तिखट साखर व गरम मसाला घालून खालीच एकत्र करणे

🫒कारली मिठात भिजवलेली असल्याने बऱ्यापैकी खारट असतात त्यामुळे मीठ अजीबात घालू नये

🫒आता पॅन मधले उरलेले तेल काढून फोडणीत घालतो तितकेच तेल ठेवावे
मसाला मिसळलेले कारले काप कांदा व ड्राय फ्रूट
घालून एक मिनिट परतावे
व खाली उतरवून खोबरे कोथिंबीर पेरावी
कुरकुरीत चविष्ट कारले तयार 😊😊

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112034088
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now