Marathi Quote in Blog by Vrishali Gotkhindikar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

#वन डिश मिल

🩸ओट्स प्रोटीन स्मूदी ,आणि प्रोटीन भेळ

🩸संध्याकाळच्या जेवणाऐवजी हा उत्तम पोटभरू मेनू आहे
या स्मूदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, ज्यात पचन सुधारणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणे (डिटॉक्स), ऊर्जा वाढवणे आणि त्वचेचे आरोग्य सुधारणे यांचा समावेश आहे.
🩸स्मूदीमध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि प्रोबायोटिक्स असल्याने ते पोटाचे आरोग्य सुधारतात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे देतात, ज्यामुळे एकूणच आरोग्य चांगले राहते.

🩸या स्मूदीचे प्रमुख फायदे
पचन सुधारते
स्मूदीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि अन्न पचण्यास मदत होते.
🩸साहित्य
दोन खजूर बिया काढून
किंवा सुके अंजीर
अर्धा कप ओट्स
एक पिकलेले केळ अथवा एक सफरचंद अथवा एक पिकलेला पेरू
यांपैकी एक फळ घेणे
बदाम बी अथवा काजू बिया आठ दहा अथवा पंधरा पिस्ते
छिया सीड , भोपळ्याच्या बिया, मगज बी आणि सूर्यफूल बी सर्व मिळून दोन चमचे
पाव चमचा दालचिनी

🩸कृती
ओट्स अर्धा तास भिजवणे
बाकी सर्व दोन तास पाण्यात भिजविणे
फळाचे तुकडे करणे
सर्व साहित्य मिक्सर मध्ये घालून एक ग्लास पाणी घालून फिरवणे
परत अर्धा ग्लास पाणी घालून सारखे करणे
सजावट बदाम पिस्ता काप आणि गुलाब पाकळ्या

🩸सोयाबीन हा प्रोटीन चा उत्तम स्त्रोत आहे
या सोयाबीन (प्रोटीन)भेळ साठी
मार्ट मध्ये मिळणारे लहान आकाराचे सोया चंक्स वापरावे
ते मंद आचेवर हलकेच तळून घेणे
त्यावर कांदा,कोथिंबीर, तिखट मीठ लिंबू व मितकुट अथवा आपल्या आवडीचा मसाला घालून आस्वाद घेणे
अतिशय चविष्ट पौष्टिक व कमी वेळात सहज होणारा पदार्थ

Marathi Blog by Vrishali Gotkhindikar : 112036049
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now