🟠सारणाच्या साटोऱ्या
🟠साटोरी म्हणजे सारण असणारच
हे सारण मात्र असेच उरले सुरले होतें 😊
🟠गणपतीच्या दिवसात
बरेच मोदक करून झाले
उकडीचे
तळलेले
कणकीचे उकडलेले... वगेरे
शेवटच्या दिवशी प्रसादा नंतर थोडे सारण उरलेच
खाऊन संपवावे असेही वाटेना
इतके थोडे होतें की त्याचे पाच मोदक पण झाले नसते..
मग त्याच्या या साटोऱ्या केल्या
🟠सारण फ्रिज मधे असल्यानं कोरडे होतें
ते प्रथम थोडा गूळ घालून परतून घेतले
🟠त्यात वेलदोडे पुड घालून
त्याला थोडा ताजेपणा दिला
🟠कणिक थोड डाळीचं पीठ आणि मोहन, मीठ घालून भिजवली
🟠थोड्या वेळाने दोन पारी मध्ये सारण घालुन भाजलेल्या खसखशी वर साटोऱ्या लाटल्या
🟠कडेने कातण्या ने कापल्या
साजूक तुपावर खरपुस दोन्हीकडून भाजुन घेतल्या