🟨पाटवडी
🟨कोल्हापुरात हीला बेसन वडी किंवा थापट वडी किंवा पिठल्याची वडी पण म्हणतात🙂
रेणुका देवीच्या (जी यल्लंमा देवी म्हणून ओळखली जाते)प्रसादात या वडीला अग्र स्थान आहे
शिवाय नेवेद्याच्या पानात
श्राद्धाच्या जेवणात सुध्दा या वडीचे महत्व आहे
🟨साहित्य
बारीक बेसन पीठ दिड वाटी
दोन मोठ्या मिरच्या बारीक ठेचून
मिरची तिखट असावी म्हणजे चव लागते
नाहीत वडी मिळमिळीत होते
कढीलिंब एक डहाळी
भाजलेली खसखस व तीळ
कोथींबीर ओले खोबरे
पंच फोडण.. किंवा फोडणीचे साहित्य
हींग ,हळद
🟨कृती
🟨प्रथम कढईत तेल घालून पंच फोडण ,हिंग ,हळद ,कढीलिंब ,
ठेचलेली मिरची घालून फोडणी करावी
त्यात एक वाटी पाणी घालावे
चवीनुसार मीठ घालावे
🟨पाणी उकळले की गॅस बारीक करुन त्याला हळू हळू डाळींचे पीठ लावावे
गुठळी होऊ देऊ नये
🟨पिठाचा गोळा झाला की झाकण ठेवून पाच मिनीटे शिजवून घ्यावे
एका ताटलीला तेल लावून हे गरम मिश्रण त्यावर थापावे
🟨वरती भाजलेली खसखस व तीळ लावावे
थोडे खोबरे कोथींबीर थापावे
🟨गरम असतानाच आवडीच्या आकारात वड्या कापून घ्याव्या.
🟨तोंडी लावणे म्हणून चांगल्या लागतात
आवडतं असल्यास यात आले लसूण वापरता येते
(पण नैवेद्य करताना काही ठिकाणी लसूण चालत नाहीं )