“अन् लोहशृंखलेचा खळळ् खळळ् असा ध्वनी ऐकू आला. काही क्षणांतच जहाज स्थिर होऊन लाटांवर हेलकावे खाऊ लागले. जहाजाचा कप्तान,खलाशी वर्ग, रक्षक कमरबंदातल्या थैल्या सांभाळीत जहाजाबाहेर निघाले. द्रविड प्रांतातले ते थिरुकोट्टा नबंदर मदिरा आणि वारांगनासाठी खास प्रसिद्ध. तिथून जा - ये करणारी जहाजे हटकून थिरुकोट्टाला नांगरली जाायची. जहाजावरच्या गुलामांना जखडबंद केलेले होते. खेरीज दोन तीन हरकामे नोकर होते. म्हणून केवळ दोन हशमांना जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी मागे थांबायची सूचना देऊन बाकीचे मौजामजाा करायला निघून गेले. आपल्याला पहाण्यासाठी थांबवले याचा राग त्या हशमांनी जेरबंद गुलामांवर आसूडाचे प्रहार करुन व्यक्त केला.तेजदत्त! तो क्षण माझे अन् तुमचेही भवितव्य ठरविणारा निर्णायक होता. थोडा अवधी गेल्यावर एका हशमाला मी खूण करुन जवळ बोलाविले. तो येताच काही न बोलता मूठ उघडली. मुठीतचमकणाऱ्या दोन सुवर्णमुद्रा पाहून त्याचे नेत्र चमकले.”
पापक्षालन - भाग 1
पापक्षालन भाग 1 “अन् लोहशृंखलेचा खळळ् खळळ् असा ध्वनी ऐकू आला. काही क्षणांतच जहाज स्थिर होऊन लाटांवर हेलकावेखाऊ लागले. कप्तान,खलाशी वर्ग, रक्षक कमरबंदातल्या थैल्या सांभाळीत जहाजाबाहेर निघाले. द्रविड प्रांतातले ते थिरुकोट्टा नबंदर मदिरा आणि वारांगनासाठी खास प्रसिद्ध. तिथून जा - ये करणारी जहाजे हटकून थिरुकोट्टाला नांगरली जाायची. जहाजावरच्या गुलामांना जखडबंद केलेले होते. खेरीज दोन तीन हरकामे नोकर होते. म्हणून केवळ दोन हशमांना जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी मागे थांबायची सूचना देऊन बाकीचे मौजामजाा करायला निघून गेले. आपल्याला पहाण्यासाठी थांबवले याचा राग त्या हशमांनी जेरबंद गुलामांवर आसूडाचे प्रहार करुन व्यक्त केला.तेजदत्त! तो क्षण माझे अन् तुमचेही भवितव्य ठरविणारा निर्णायक होता. थोडा ...Read More
पापक्षालन - भाग 2
पापक्षालन भाग 2इतिहासात झालेल्या घनघोर लढाया आणि यावनी सेनेचे हल्ले यामध्ये फार फार अंतर होते. साधन शुचितेचे ताळतंत्र नसलेले यावनी हल्लेखोर! पादाक्रांत केलेल्या भागातील प्रजेवर अनन्वित अत्याचार त्यांनी केले. वृद्ध, बालके, स्त्रिया यांची निर्घृण कत्तल केली. स्त्रियांवर अत्याचार केले. मार्गातील मंदिरे, पाठशाला, विजयस्तंभ, शिलालेख, धर्मस्थळे, गुरुकुले,स्वागत कमानी उद्ध्वस्त करीत, सक्तीने धर्मांतरे करीत महान संस्कृतीची राखरांगोळी करीत हल्लेखोर मुसंडी मारीत विभवेच्या सीमेवर आले. सीमावर्ती भागातील प्रजाजनांवर होणाऱ्या अत्याचारांची वर्णने ऐकून मेघवत्साना अन्न गोड लागेना. या परचक्रात विभवेचे साम्राज्य अस्तंगत होणार असे भाकित राज ज्योतिषानीही वर्तविले. हल्लेखोरांच्या एक एक कारवाया एोकून महाराजांच्या काळजाचे पाणी झाले. धर्मभंजक, संस्कृती ...Read More