पापक्षालन भाग 1
“अन् लोहशृंखलेचा खळळ् खळळ् असा ध्वनी ऐकू आला. काही क्षणांतच जहाज स्थिर होऊन लाटांवर हेलकावे खाऊ लागले. जहाजाचा कप्तान,खलाशी वर्ग, रक्षक कमरबंदातल्या थैल्या सांभाळीत जहाजाबाहेर निघाले. द्रविड प्रांतातले ते थिरुकोट्टा नबंदर मदिरा आणि वारांगनासाठी खास प्रसिद्ध. तिथून जा - ये करणारी जहाजे हटकून थिरुकोट्टाला नांगरली जाायची. जहाजावरच्या गुलामांना जखडबंद केलेले होते. खेरीज दोन तीन हरकामे नोकर होते. म्हणून केवळ दोन हशमांना जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी मागे थांबायची सूचना देऊन बाकीचे मौजामजाा करायला निघून गेले. आपल्याला पहाण्यासाठी थांबवले याचा राग त्या हशमांनी जेरबंद गुलामांवर आसूडाचे प्रहार करुन व्यक्त केला.तेजदत्त! तो क्षण माझे अन् तुमचेही भवितव्य ठरविणारा निर्णायक होता. थोडा अवधी गेल्यावर एका हशमाला मी खूण करुन जवळ बोलाविले. तो येताच काही न बोलता मूठ उघडली. मुठीतचमकणाऱ्या दोन सुवर्णमुद्रा पाहून त्याचे नेत्र चमकले.”
“संकटकाळी आप्त-स्वकीयांपेक्षाही द्रव्य-सुवर्ण हाच माणसाचा एकमेव तारणहार असतो. या राजगुरुंच्या आदेशाचे मर्म त्यावेळी मला समजले. त्यामुद्रांच्या बदल्यात मी गुलामांमधल्या एका म्हाताऱ्याजवळच्या पोराची मागणी केली. मी नेहमी या मार्गाने प्रवास करतो.बंदरात जवळच्याच एका जमिनदाराला मुलगा हवाय्. त्याच्या बदल्यात तो आठ सुवर्णमुद्रा मला देईल. पाहिजे तर सौदा झाल्यावर आणखी दोन सुवर्ण मुद्रा देण्याची लालूचही मी त्या हशमाला दाखविली. माझ्या हातीच्या सुवर्ण मुद्रा खेचून घेऊन त्या हशमानेमाझ्या मुखावर जोरदार मुष्टीप्रहार केला. मी त्या हशमाची जामिनदाराशी गाठ घालून देण्याची सक्ती त्याने केली. मी नाईलाजाने निघण्यास तयार झालो. तो पोर रडू नये म्हणूनम्हाताऱ्यालाही सोबत घेऊन आम्ही जहाजावरुन खाली उतरलो. खाली उतरताच त्या परिसराचे निरिक्षण करुन दूरवर दिसणाऱ्या एका वाड्याच्या दिशेने मी चालू लागलो.”
“ वाडा सन्निध येत असता मी त्या हशमाला म्हणालो की, माझ्या सोबत हशम आलेला पाहून हा मुलगा गुलामांच्या तांड्यातला आहे म्हणून जमिनदार तो घेणार नाही. तेव्हा नाईलाजाने हशम तिथेच थांबला.चार पावले दूर जााताच माघारी वळून मी त्या हशमाकडे माझ्या हातून घेतलेल्या सुवर्ण मुद्रांची मागणी केली.तू पोराला विकून आल्यावर बघून घेईन असा मुद्राविष्कार करीत एक शब्दही न बोलता हशमानेत्या सुवर्ण मुद्रा मला परत दिल्या. म्हाताऱ्याला घेऊन आम्ही वाड्यात षिरलो. त्या गर्भश्रीमंताच्या वाड्यात खूप लोकांचा राबता होता. आमच्याकडे कुणीच लक्ष दिलेनाही. वाड्याला वळसा घालून आम्ही मागील बाजूला गेलो. मागील बाजूच्या दरवाजााने बाहेर पडल्यावर अक्षरश:धावतच आम्ही दूर जाऊन एका अरुंद गल्लीत लपून राहिलो. तेजदत्त! मी समयसूचकतेने संधीचा फायदा घेतला नसता तर आज सात समुद्रापलीकडे कोण्या गावात गुलाम म्हणून जिाणेतुमच्या नशिबी येणार होते.”
भावनावेगाने थरथरणाऱ्या वृद्ध पित्याचे कथन ऐकून तरुण तेजदत्तांचे रक्त उष्ण झाले. अंगावर शहारे उठविणारा तो वृत्तांत त्यांचा शौर्यस्फुल्लिंग जागृत करणारा होता. मौंजी बंधनानंतर आचार्यांच्या गुरुकुलात असता त्याने एक दोन वेळा पित्याकडे पूर्व वृत्ताची पृच्छा केली होती.गुरुकुलातील कष्णवर्णी छात्रांपेक्षा भिन्न असणारा आपला गौरवर्ण,पित्याशी संवाद करतानाची आपली भिन्न बोली... . .त्याच्यापुढे अनेक प्रश्न उभे रहात. आपली माता कुठे आहे? पित्याचा व्यवसाय काय? आपले घरदारआप्त स्वकीय कुठे आहेत? इतर छात्रांचे कुटुंबिय दुर असताना केवळ आपलाच पितागुरुकुलात कसे काय वास्तव्य करतो? इतरांशी कठोर भाषण करणारे, सर्वांना जरबेत ठेवणारे साक्षात क्रोधमूर्ती असे आचार्य! पणआपल्या पित्याषी अदबीने, मृदू स्वरात कसे काय बोलतात?
तेजादत्ताने एकदा तशी पृच्छा केल्यावर पित्याचा इंगळासारखा जळजळीत नेत्रकटाक्ष अन् व्याघ्राच्या गुरगुरण्यासारखा कंठस्वरयामुळे तो हादरुन गेला. “असली क्षुद्र निरर्थक पृच्छा करण्याऐवजी आचार्यांनी दिलेला पाठमुखोद्गत करा. योग्य समय येताच साऱ्या गोष्टी तुम्हाला आपोआप ज्ञात होतील. दत्त... तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. पराकाष्ठेचे कष्ट सोसून तुम्हाला ते उज्ज्वल करावयाचे आहे. एका महान व्रताची सांगता करावयाचेउत्तरदायित्व नियतीने तुम्हावर सोपविले आहे. पुनश्च असल्या निरर्थक बाबींना मनात थाराही देऊ नका. तुम्ही सामान्य नाही, दत्त. तुमच्या सर्व शंकांचे हेच एकमेव उत्तर समजा.”
पित्याच्या मुखातून उमटलेले हे धारदार शब्द ऐकल्यावर कुमार तेजादत्तानी पुनश्च असली पृच्छा करण्याचे धाडस केले नाही.वेदाध्ययन आणि त्याच्या जोडीला अष्वारोहण, खड्ग युद्ध, चक्र फेक अषा क्षात्र विद्यांचे अध्ययन सुरु असायचे. काहीवेळा दत्तांचे पितासुद्धा त्यांचे गुरु असायचे.
“संस्कृती नष्ट होण्याचा समय पातला आहे. आचार्य! आक्रमकाना फक्त निर्दालन करणे एवढेच माहिती आहे आणि त्यांना केवळ शस्त्राचीच भाषा कळते.वेदांचे रक्षण करु इच्छिणारा देह प्रथम स्वतःचे रक्षण करु शकेल इतपत तरी समर्थव्हायला नको का?” पित्याचे आचार्यांशी होणारे असले संभाषण.... त्याचा अर्थ काही दत्ताना कळत नसे. मात्र दुसऱ्या दिवसापासून प्रातःवंदन झाल्यावर सर्व छात्रगणाना घेऊन त्यांचा पिता मैदानावर गेला. मग कष्टप्रद अशा शारीरिक हालचाली,अवघड कसरती कराव्या लागल्या. मग हा नित्यक्रमच बनला. कोण कोण शुष्क शरीरयष्टी असलेले दाढीधारी गुरुयायचे. त्यांच्या देखरेखीखाली खड्ग युद्ध, भालाफेक, अश्वारोहण यांचे पाठ दिले जायचे. दहा बारा संवत्सरांचा तो परखड काळ कुमार दत्तांमध्ये आमुलाग्र परिवर्तन करणारा ठरला.
सळसळणाऱ्या उष्ण रक्ताचे,सुदृढ देहयष्टी असलेले कुमार दत्त आता खरोखरच तेजदत्त याउपाधीला पात्र झाले. हीच वेळ त्यांचा आर्य स्फुल्लिंग जाागृत करण्यासाठी योग्य आहेहे ओळखून पिता आता त्यांना तुकड्या तुकड्यांनी पूर्ववृत्त कथन करु लागला. उत्तरप्रांतात हिमाचलाच्या सान्निध वसलेल्या विभवा नगरीचे यवनानी हस्तगत केलेले साम्राज्य खरे तर वारसा हक्काने तेजादत्तांचे आहे. सम्राट इंद्रसेन,देवदत्त, भार्गवराज, शंभुनाद,अमर्त्यसेन, सूर्यदत्त आणिस्वतः पिता मेघवत्स अशा महान सामर्थ्यशाली राजापुरुषांची परंपरा असलेल्या चंद्रघराण्याचे आपण अंतिम वारस आहोत हे रहस्य तेजदत्तांपुढे उलगडले. वैभवसंपन्न विभवेच्या साम्राज्यावर यवनांचे आक्रमण झाले अन् कालपटावरुन एक महान राजघराणे पुसले गेले. विभवेच्या समृद्धीची किर्ती ऐकून कुणा पदभ्रष्ट यवन सरदाराच्या तोंडाला पाणी सुटले. दाम-भेद नीतीचा अवलंब करुन राजसेवेतील काही उच्चपदस्थांशी संधान बांधल्यावर निवडक हशमांची फौज घेऊन त्याने आर्यावर्ताकडे कूच केले. विभवेच्या पश्चिमेला असलेली कुलिंग, मालव ही छोटी मांडलिक राज्ये तर यवनाला सामील झाली.(क्रमश:)