ऑपरेशन सिंदूर

(0)
  • 4k
  • 0
  • 1.5k

माझी ऑपरेशन सिंदूर ही पुस्तक वाचकांपुढे प्रदर्शित करतांना अतिशय आनंद होत आहे. नुकतीच पहलगाम घटना घडली व पाकिस्तान भारत वादाला तोंड फुटलं. त्यावरुन दोन्ही देशात संघर्ष सुरु झाला. ज्यातून ड्रोनहल्लेही झाले व दोन्ही देशांची अपरीमीत हानी तशीच जीवीतहानीही झाली. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाबाबत एक गोष्ट नक्कीच सांगाविशी वाटते की ही माझी काल्पनिक कादंबरी असून ही कादंबरी पाकिस्तान व भारत संघर्षामध्ये पुर्णतः जुळणारी कादंबरी नाही. ही कादंबरी मी माझ्या मनातील काल्पनिक कल्पनेनं बनवलेली आहे. त्याचा वास्तविक जगाशी काहीही संबंध नाही व तो संबंध वाचकांनी लावू नये. शिवाय मी यात पात्रांचीही नावं बदलवली आहेत. ते वाचकांनी समजून घ्यावे म्हणजे झालं.

1

ऑपरेशन सिंदूर - भाग 1

ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाबाबत माझी ऑपरेशन सिंदूर ही पुस्तक वाचकांपुढे प्रदर्शित करतांना अतिशय आनंद होत नुकतीच पहलगाम घटना घडली व पाकिस्तान भारत वादाला तोंड फुटलं. त्यावरुन दोन्ही देशात संघर्ष सुरु झाला. ज्यातून ड्रोनहल्लेही झाले व दोन्ही देशांची अपरीमीत हानी तशीच जीवीतहानीही झाली. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकाबाबत एक गोष्ट नक्कीच सांगाविशी वाटते की ही माझी काल्पनिक कादंबरी असून ही कादंबरी पाकिस्तान व भारत संघर्षामध्ये पुर्णतः जुळणारी कादंबरी नाही. ही कादंबरी मी माझ्या मनातील काल्पनिक कल्पनेनं बनवलेली आहे. त्याचा वास्तविक जगाशी काहीही संबंध नाही व तो संबंध वाचकांनी लावू नये. शिवाय मी यात ...Read More

2

ऑपरेशन सिंदूर - भाग 2

२ ऑपरेशन सिंदूर (कादंबरी) अंकुश शिंगाडे कुंकूला हिंदू धर्मात विशेष असं महत्व आहे. त्याला सौभाग्याचं लक्षण समजलं जातं, नव्हे तर प्रत्येक सणासुदीला महिला वर्ग कुंकू लावून सण साजरे करतांना दिसतात. कुंकू हे स्रियांच्या सौंदर्यातील सोळा श्रृंगारापैकी एक वस्तू आहे. ते विजयाचं प्रतिक आहे. एवढंच नाही तर अगदी विवाह करतांना नवरदेव नवरीच्या भांगात कुंकू भरुन तिचा पत्नी म्हणून स्विकार करतो. असे करतांना स्री आपल्या घरी विजयोत्सव साजरा करते. कारण तिनं आपल्या सौंदर्यानं मोहीत करुन कुणालातरी आणलेलं असतं. पुर्वी जगात मातृसत्ताक कुटूंब पद्धती होती. ज्यात ...Read More

3

ऑपरेशन सिंदूर - भाग 3

३ रुकसार तिचं नाव होतं. नावाप्रमाणेच ती लाजवंत होती लहानपणी. तिला काही म्हटल्यास ती शरमत असे व घरात जावून मुसमुसून रडत असे. या तिच्या वागण्याबाबत तिचे आईवडील चिंतेत असायचे. त्यांना वाटायचं की ही अशीच मुसमुसून रडत बसली तर हिचं कसं होईल. आज ती वैमानिक बनली होती व ती केवळ वैमानिकच नाही तर विंग कमांडर बनली होती. रुकसार आज वैमानिक बनली होती. लहानपणची लाजीरवाणी, डरपोक रुकसार नव्हती आता ती. तिला भीती अजिबात वाटत नव्हती. ती विमान जेव्हा चालवायची. तेव्हा तिला अजिबात भीती वाटायची नाही. आकाशात दूर अंतरावर ती ...Read More

4

ऑपरेशन सिंदूर - भाग 4

४ ऑपरेशन सिंदूर झालं होतं. ज्यात बरीचशी पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे नष्ट गेली होती. जीवीतहानी झाली नव्हती. तसं पाहिल्यास ऑपरेशन सिंदूर हा उपक्रम यशस्वी झाला होता. ज्याचं श्रेय रुकसार व तिच्या चमूला गेलं होतं व रुकसार चर्चेत आली होती. ऑपरेशन सिंदूरच्या उपक्रमानं पाकिस्तान हादरुन गेलेला होता व तोही आता बदल्याच्या भावनेने पेटून उठलेला होता. वास्तविक त्यानं पेटून उठायला नको होतं. त्याचं कारण होतं आतंकवाद. भारतानं पाकिस्तानात असलेली आतंकवाद्यांची रहिवाशी स्थळं नष्ट केली होती. पाकिस्तानला नष्ट केलं नव्हतं. ज्याला पाकिस्तान नाकारत होता. आतंकवाद्यांना लपविण्याचं केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तान. त्यानं ...Read More