४
ऑपरेशन सिंदूर झालं होतं. ज्यात बरीचशी पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणे नष्ट केल्या गेली होती. जीवीतहानी झाली नव्हती. तसं पाहिल्यास ऑपरेशन सिंदूर हा उपक्रम यशस्वी झाला होता. ज्याचं श्रेय रुकसार व तिच्या चमूला गेलं होतं व रुकसार चर्चेत आली होती. ऑपरेशन सिंदूरच्या उपक्रमानं पाकिस्तान हादरुन गेलेला होता व तोही आता बदल्याच्या भावनेने पेटून उठलेला होता. वास्तविक त्यानं पेटून उठायला नको होतं. त्याचं कारण होतं आतंकवाद. भारतानं पाकिस्तानात असलेली आतंकवाद्यांची रहिवाशी स्थळं नष्ट केली होती. पाकिस्तानला नष्ट केलं नव्हतं. ज्याला पाकिस्तान नाकारत होता.
आतंकवाद्यांना लपविण्याचं केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेला पाकिस्तान. त्यानं गतकाळात लादेन नावाचा असाच एक आतंकवादी लपवून ठेवलेला होता. आताही ऑपरेशन सिंदूरमधील संशयीत आतंकवादी हेही पाकिस्तानातील होते व त्यांनी भारतीय महिलांचं पहलगाममध्ये कुंकू पुसलं होतं. त्याच धर्तीवर भारतानं ठोस प्रत्युत्तर देवून संशयीत आतंकवादी केंद्रे नष्ट केली होती. त्यापुर्वी पाणी बंद केलं होतं.
पाणी....... भारतानं १९६० ला पाकिस्तानसोबत एक पाणी करार केला होता. ज्यात दोन राष्ट्रांनी काहीही केलं तरी हा करार मोडता येणार नव्हता. हा करार कच्च्या स्वरुपाचा होता. पुढे सन १९७१ मध्ये करार झाला. तो करार शिमला करार म्हणून प्रसिद्ध झाला. हा करार त्यावेळचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु व पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी केला होता. त्यानंतर स्व. इंदिरा गांधीनी. मात्र दि. २३ एप्रिल २०२५ ला राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत भारतानं हा करार रद्द केला.
सपना ही देखील ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रतिनिधित्व करणारी एक हिंदू मुलगी. ती विचार करीत होती आताही शिमला करारावर. शिमला करार नेमका काय? तर यामध्ये पाश्वभुमी होती. ती पाश्वभुमी अशी होती की भारतातून उगम होणाऱ्या सहा नद्या. ज्यात सिंधू ही प्रमुख नदी होती व तिला मिळणाऱ्या तिच्या पाच उपनद्याही होत्या की ज्यात मुबलक पाणी असतं. सपना यावरच विचार करीत होती. सिंधू प्रमुख नदी. त्यातील तीन नद्या पुर्ववाहिनी आहेत व तीन पश्चिम वाहिनी आहेत. पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये सिंधू, चिनाब व झेलम या नद्यांचा समावेश आहे व पुर्ववाहिनी नद्यात बियास, रावी व सतलज या नद्यांचा समावेश होतो. यात ज्या पुर्ववाहिनी नद्या होत्या. त्यांचं नियंत्रण भारताकडे ठेवून ज्या पश्चिम वाहिनी नद्या होत्या. त्यांचं नियंत्रण हे पाकिस्तानकडे देण्यात आलं. याचाच अर्थ असा की या तीनही नद्यांवरील बांधकाम करणे, अर्थात त्यात धरणे बांधल्यास वा त्यातील पाण्यातून मत्सोत्पादन केल्यास तोही पैसा पाकिस्तानला मिळणार. मग त्यांनी भारताला कितीही त्रास दिला तरी तो करार मोडता येणार नाही. यावर भारतानं कितीतरी वेळा पाकिस्तानला समजावलं की त्यांनी भारतावर वाकडी नजर टाकू नये. परंतु पाकिस्तान ते ऐकत नव्हता व तात्कालिक कारण घडलं, सिंदूर. भारतीय स्रियांचं कुंकू पुसणं. कारण दिलं की तुम्ही हिंदू आहात व मुस्लीम लोकांना सोडून दिलं. खरा हिंदू कोण? याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी कलमा पठन करायला लावल्या. काय गरज होती, हिंदू म्हणून विचारण्याची? अन् काय गरज होती हिंदू सांगताच मारण्याची. असं केल्यानंतरही भारतानं चूप बसावं काय?
सपनाचचं विचार करणं बरोबर होतं. कारण ती हिंदू होती व ती हिंदू असल्यानं तिचंही हित पहलगाम घटनेशी जुळलं होतं.
भारतानं आधीपासूनच मुस्लिमांचा जाच सहन केलेला होता. ज्यात काही मुस्लीम हे नक्कीच चांगले होते की ते भारताला मदत करत होते. जशी रुकसार की जिनं एक मुस्लीम असून भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.
ती पहलगाम घटना. त्या घटनेत रुकसारलाही अतीव दुःख झालं होतं. त्यातच त्याचदरम्यान तिनं आपली बालमैत्रीण सारिकाची भेट घेतली. दोघीत चर्चा झाल्या व न राहवून सारिकानं तिला विचारुनच टाकलं.
"रुकसार, तू सैन्यात आहेस. तू मुस्लीम आहेस. तुला काय? तुला जर आतंकवादी सापडला तरी तू त्यांना सोडून देशील?"
ते सारिकाचे शब्द. ते रुकसारनं ऐकले. ते तिच्या कानाला चिरुन गेले. वाटलं की सारिका आपल्या इमानदारीवर शंका घेतेय. सारिकाला आपण काय आणि कसे आहोत याची कल्पना नाही. ती बालमैत्रीण असून देखील.
रुकसारनं जसे सारिकाचे शब्द ऐकले. तसा तिला सारिकाचा रागच आला. परंतु थोड्याच वेळात तिचा राग निवळला. वाटलं की सारिका बरोबर बोलतेय. कारण तिच्यावर बरंच बेतलंय. तसा स्वतःचा राग निवळत ती म्हणाली,
"अगं सारिका, कसला संशय घेतेय तू माझ्यावर. हा भारत, भारत आहे, पाकिस्तान नाही. अन् इथले मुस्लीम, भारतीय मुस्लीम आहेत. पाकिस्तानी मुस्लीम नाहीत. तशीच मी मुस्लीम आहे व त्याआधी भारतीय आहे. तसाच आतंकवाद्यांना कोणताच धर्म नसतो. असं माझं मत."
सारिकासोबत रुकसारचं झालेलं बोलणं. त्यानुसार तिच्या मनात बदल्याची भावना निर्माण झाली व ऑपरेशन सिंदूर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यानुसार सत्ताधीशानं ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी रुकसारवर दिली. रुकसारनंही अतिशय उत्साहानं ती जबाबदारी स्विकारली. कारण तिला सारिकासाठी काहीतरी करायचं होतं. तिच्या मैत्रीणीनं ती मुस्लीम असल्यानं काहीच करणार नाही. असा कलंक लावला होता. तो तिला धुवून टाकायचा होता.
ऑपरेशन सिंदूर झालं होतं. रुकसारनं पुढे जावून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आपली जीवलग मैत्रीण सारिकाच्या कुंकवाचा बदला घेतला होता. तिनं अतिशय इमानदारीनं व सफाईनं ऑपरेशन सिंदूर घडवून आणलं होतं. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानकडून भारतीयांवर हमले सुरु झाले होते.
रुकसार मुस्लीम महिला होती. खरंच ती मुस्लीम असूनही तिनं भारताबद्दल केलंलं कार्य फार अनमोल होतं व ते भारतीय संविधानाला धरुन होतं. अशीच प्रत्येक मुस्लिमांनी भुमिका घेतली तर कोणतीच विदेशी ताकद भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही. आतंकवादी तर नाहीच नाही. असं तिला वाटत होतं.
रुकसार सारिकाच्या बोलण्यावरुन आतंकवाद्यांबाबत विचार करीत होती. आतंकवादी म्हणजे गुंड प्रवृत्तीची मंडळी. ज्याप्रमाणे गुंडांना जात धर्म नसतो. त्याचप्रमाणे आतंकवाद्यांनाही जात धर्म नसतोच. ही बाब सत्य आहे. असे असतांना पहलगाम इथं जो आतंकवादी हल्ला झाला व त्यात आतंकवाद्यांनी हिंदू नावाच्या विशेष धर्माला लक्ष पकडून जो धर्मवादी हल्ला केला आणि हिंदू हा धर्म ओळखण्यासाठी कलमा पठन करायला लावल्या. त्यातून दिसून आलं की आतंकवादी हे कट्टर मुस्लीम होते व त्यांना भारताला मुस्लीममय बनवायचं आहे. जरी आतंकवाद्यांना कोणताही धर्म नसतो हे आपल्याला माहित असलं तरी.
आतंकवादी हे मुस्लीमच. म्हणूनच त्यांच्या दहशतवादी स्थळावर भारतानं हल्ला करताच पाकिस्ताननं कठोर भुमिका घेवून भारतावर हल्ला चढवला. बदल्यात भारतानं जो काही प्रतिकार केला. ते इथं महत्वाचं आहे. तसाच महत्वाचा आहे पाकिस्तानचा आतंकवाद्यांच्या बाबतीतील दृष्टिकोण. तो दृष्टिकोण आतंकवादी लोकांच्या हितसंबंधातील दृष्टिकोण आहे. जणू तोच दृष्टिकोण भारतीय मुस्लिमांना खुणावत आहे की तुम्ही भारतात राहून स्वतःत हिंदू मुस्लीम फुट पाडा. हिंदूंच्या वाट्याला जा. हिंदूंसोबत भांडणं करा. मारा, पिटा, कापा, इत्यादी सर्वकाही. परंतु आतंकवादी व पाकिस्ताननं काही गोष्टी लक्षात घ्याव्यात की हे भारतीय मुसलमान आहेत. हे काही पाकिस्तानचे मुसलमान नाहीत की पाकिस्तानची बाजू घेतील? भारतीय मुस्लीम काही काफिर नाहीत की ते आपलं जमीर विसरतील. त्यांना माहित आहे की त्यांचा जन्म हा भारतातच झाला आहे. ते इथेच लहानाचे मोठे झाले आहेत. इथंच त्यांचं शिक्षण झालं आहे व इथेच ते रोजगारालाही लागले आहेत. तसाच इथे हिंदू मुस्लीम असा भेदभाव नाही. तो हिंदू असो की मुस्लीम वा इतर कोणत्याच धर्माचा. इथं सर्व धर्मांना समान लेखलं जातं. वागवलंही जातं. त्यांना गर्व आहे, ते भारतीय असण्याचा. त्यांनाही माहित आहे की भारत त्यांचाही देश आहे व येथील सर्व लोकं त्यांचे भाऊबहिण आहेत. मग ते पहलगामला मारले गेलेले हिंदू लोकं का असेना. त्यांनाही माहित आहे की भारतानं त्यांनाही आधार दिलाय. त्यांचं कुटूंब पोषलं. अन्न, वस्र, निवाऱ्यांची सोय करुन दिली. एवढंच नाही तर त्यांना हेही माहित आहे की त्यांच्या धमणीतील जे रक्त आहे सळसळणारं. तेही भारताचंच आहे. त्यांना माहित आहे की ते मुसलमान आहेत. परंतु त्यापुर्वी ते भारतीय आहेत. त्यांना हेही माहित आहे की इथं संस्कार आहे. त्यांच्या संस्कारालाही इथंच खतपाणी मिळालंय. या भारतानं त्यांच्यातील चांगले संस्कार वाढवले. मग ते कसे बेईमानी करणार भारताशी? ते इमानदार आहेत. शिवाय त्यांना माहित आहे की आतंकवाद्यांना जात, धर्म नसतोच. ते गुन्हेगार आहेत. जरी पाकिस्तान त्यांना आपल्या धर्माचे मानत असले तरी. त्यांनाही वाटते की आतंकवाद्यांनी असं करायला नको. गुन्हा नकोच व्हायला त्यांच्या हातून. इथलं कुणाचंही कुंकू पुसलं जाता कामा नये. या देशात हिंदू मुस्लीम वाद होवूच नये. एकजुटता राहावी कमालीची. अन् जो व्यक्ती यात फूट पाडत असेल वा पाडू पाहात असेल, त्यांना येथील प्रत्येक मुस्लीम बंधू धडाही शिकवायला तयार आहेत. मग तो पाकिस्तान का असेना. त्यांना जुनाट, बुरसटलेल्या गोष्टी त्यागायच्या आहेत. नवा भारत बनवायचा आहे. त्यासाठी ते कितीही संकटं आलीत तरी ते झेलायला तयार आहेत. त्यात त्यांना कितीही वेदना झाल्या, तरी ते त्या शोषायला तयार आहेत. तशी मानसिकताच बनवली आहे त्यांनी. मग कितीही संकट आली तरी आणि ती संकटं पाकिस्ताननं आणली तरी. हीच भारतात राहणाऱ्या प्रत्येक मुस्लिमांची मानसिकता. यातूनच अब्दुल कलाम घडले. यातूनच अब्दुल हमीद घडले. अन् यातूनच मदारी मेहतर व दौलतखान घडले. अन् यातूनच मोहम्मद इम्तियाज. प्रत्येक मुसलमान घडला याच मानसिकतेतून. म्हणूनच भारत, भारत आहे. पाकिस्तान नाही.
अब्दुल कलाम हेही मुसलमानच. हे देशाचे राष्ट्रपती होते. त्यापुर्वी ते शास्त्रज्ञ होते. खरे भारतीय शास्त्रज्ञ. भारतानं त्यांच्या विद्वत्तेचा गौरव करीत त्यांना भारताच्या सर्वोच्च पदावर बसवलं. त्यांना राष्ट्रपती बनवलं. सर्वात मोठा सन्मान दिला. त्यांनी मिसाईल तयार केल्या. त्या इतर देशासाठी नाही तर भारतासाठीच तयार केल्या. इथंच जन्मलेला अब्दुल हमीद भारत पाकिस्तान लढाई लढला. अन् इथंच जन्मलेला मदारी मेहतरही शिवाजी महाराजांची सेवा करुन गेला आग्र्याला महाराज कैदेत असतांना आणि शिवा काशिदनं तर पन्हाळ्याच्या कैदेतून स्वतःचा जीव धोक्यात घालून बाहेर काढलं.
शिवाजी महाराजांच्या सैन्यात काही प्रमुख मुस्लीम सेनापती होते, जसे की सिद्दी हिलाल, दौलत खान, इब्राहिम खान, काझी हैदर, सिद्दी इब्राहिम, सिद्दी वाहवाह, नूरखान बेग, शमा खान, हुसेन खान मियानी, सिद्दी मिस्त्री, सुलतान खान, दाऊद खान आणि मदारी मेहतर. शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा सिद्दी संबल यांच्याकडे होती. त्यातच शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लीम मावळेही होते की ज्यांच्यामुळे शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करता आलं. अफजल खान वधाच्या वेळीही तीन सरदार शिवाजी महाराजांसोबत होते. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याचा प्रसंग इतिहासात आहे. शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांतही नेहमी तीन मुसलमान सरदार असायचे. सरदार नूर खान, इब्राहिम आणि सुलतान अशी त्यांची नावे आहेत.
शिवाजींचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी सुफी संत शाह शरीफ यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी ठेवली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनात मानवतेचं जे धोरण अवलंबलं होतं, ते कोणत्याही धर्मावर आधारीत नव्हतं. लष्कर आणि नौसेनेत सैनिकांच्या नियुक्तीसाठी धर्म हा निकष नव्हता आणि त्यातील एक तृतीयांश सैनिक मुस्लीम होते. त्यांच्या गुप्तहेर प्रकरणांचे सचीव मौलाना हैदर अली होते आणि त्यांच्या शस्त्रागाराची कमान इब्राहिम खानच्या हातात होती. हा झाला शिवाजी महाराजांचा काळ. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे प्रमुख मुस्लीम नेते डॉ. झाकीर हुसेन, मौलाना अबुल कलाम आझाद, खान अब्दुल गफ्फार खान, मौलाना मोहम्मद अली जौहर, मौलाना मोहम्मद अली, मोहम्मद शौकत अली, मोहम्मद बरकतुल्ला, बद्रुद्दीन तय्यबजी आणि हकीम अजमल खान इत्यादी होते. अनेक मुस्लीम अनुयायांनीही या आंदोलनात भाग घेतला. हा कारवा इथंच थांबला नाही. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही कित्येक मुस्लीम सैनिकांनी भारत पाकिस्तान युद्धात हिरीरीनं भाग घेवून पाकिस्तानी सैनिकांचा सफाया केला. कारण काय तर मी मुस्लीम नक्की असलो तरी मी प्रथम भारतीय आहे ही भावना. म्हणूनच भारतावर कितीही संकट आलं. मुस्लीम देश असलेल्या पाकिस्ताननं जरी भारतीय मुस्लिमांना पहलगाम करुन भडकविण्याचा प्रयत्न केला तरी भारतातील बहुतःश मुस्लीम समुदाय भडकणार नाही. महत्वपूर्ण बाब ही की भारत, भारत आहे. तो पाकिस्तान नाही. अन् भारतातील मुस्लीम भारतीय आहेत. ते पाकिस्तानी नाहीत. हेच समजून घ्यायची गरज आहे. त्यामुळं कोणी कितीही एखाद्या विशिष्ट धर्माला वेठीस धरुन कितीही वेळा पहलगाम केलं. तरी भारतातील मुस्लीम व इतर धर्मीयांची एकी कोणी तोडूच शकणार नाही. तसा कोणी प्रयत्नही करु नये. अन् तसं कोणी केल्यास ऑपरेशन सिंदूर करण्यात येईल. यात शंका नाही. कारण मुस्लीमही म्हणतात की आम्ही भारतात राहणारे जरी मुस्लीम असलो तरी त्याआधी भारतीय आहोत व आमच्या रक्तात पुर्वजांच्या इमानदारीचं व पराक्रमाचं रक्त सळसळत आहे. हे गद्दारपणाचं रक्त नाही की आम्ही भारताविरुद्ध दगाबाजी करणार. ज्यांचं खाणार, तिथंच विष्ठा करणार नाही. आमचं इमान हे शिकवीत नाही आणि आमचा इस्लामही तसे करायची परवानगी देत नाही.
भारत हा केवळ हिंदूंचाच देश नाही तर तो मुस्लिमांचाही देश आहे. या देशात हिंदूच नाही तर तमाम इतर धर्मीय लोकंही अगदी गुण्यागोविंदानं राहात आहेत. ज्यात मुस्लीम, शिख, ईसाई, पारशी, जैन, बौद्ध तसेच ख्रिश्चनसह इतरही धर्माचा समावेश आहे. तसेच ते युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास भारताला मदत करतीलच.
भारताला अब्दूल कलाम या एकाच नावाच्या मुस्लीम व्यक्तीनं मदत केली नाही तर यापुर्वीही अनेक मुस्लीम समुदायाच्या लोकांनी एक व्यक्ती म्हणून न्यायाची बाजू घेवून येथील तमाम राजेरजवाड्यांना गतकाळात मदत केली. ज्याला इतिहास साक्ष आहे. जसे शिवाजी महाराज. त्यांच्या सैन्यातील महत्वाच्या जागा या मुस्लिमांनाच देण्यात आल्या होत्या. परंतु हे जरी खरं असलं तरी काही औरंगजेब, अफजलखान सारखी माणसं याही देशात होवून गेली की ज्यांनी या देशातील ताराबाई, सईबाईसारख्या महिलेंचं कुंकूच पुसण्याचं काम केलं.
पुर्वी या भारताला हिंदुस्थान म्हणत व या हिंदुस्थानात गतकाळात सोमनाथ लुटणाऱ्या मोहम्मद गझनीने सोमनाथ लुटतांना कितीतरी भारतीयांचे कुंकू पुसले. त्यानंतर इ. स. च्या सातव्याच शतकात आलेल्या मोहम्मद बिन कासीमनंही अलोरचा शासक असलेल्या राजा दाहिरची हत्या करुन कितीतरी स्रियांचे कुंकू पुसले. हा आवाका एवढ्यावरच थांबला नाही तर बाराव्या शतकात आलेल्या मोहम्मद घोरीनं पृथ्वीराज चव्हाणला कैद करुन त्यांची हत्या केली होती व महाराणी संयोगीतासह कितीतरी राज्यातील महिलांचं कुंकू पुसलं होतं. हा क्रम इथंच थांबला नाही तर महाराणी पद्यावतीचं कुंकू पुसलं गेल्यानंतरही तिला स्वतःची अब्रू वाचविण्यासाठी आपल्या राज्यातील कित्येक स्रियांसह जोहार करावा लागला. महाराणी संयोगीता, महाराणी पद्यावती यांना जोहार करणं पसंत होतं. परंतु कोणत्याही मुस्लीम समुदयाची वा शासकाची बेगम बनणं पसंत नव्हतं. काही हिंदू महिलांनी, असेच मुस्लीम शासक विनाकारण वैदिक धर्मातील पुरुषांची हत्या करतात. विनाकारण युद्ध करतात. हा युद्धविराम व्हायलाच हवा. असा विचार करुन व हे पाहून आपला विवाह मनात इच्छा नसतांनाही मुस्लीम शासकांशी केला. हे सम्राट अकबर व जोधाबाईच्या विवाह उदाहरणावरुन दिसून येते. त्यानंतर असे विवाह बरेच घडले. विशेष म्हणजे सन १९६० ला झालेल्या पाणी कराराच्या निमित्याने झालेला पाणी करार हा पाकिस्तानसाठी जमेची बाजू जरी असला तरी या करारानं पाकिस्तान संतुष्टच झाला नाही. त्याला असं कधीच वाटलं नाही की कदाचीत आम्ही जर भारताच्या वाट्याला गेलो तर उद्या हीच मंडळी आम्हाला मिळणारं पाणी बंद करतील वा धरणाचे दरवाजे उघडे करुन आमच्या देशात पुरस्थिती निर्माण करतील. ते सतत भारतीयांना त्रासच देत राहिले व त्रासच देत आहेत. ज्यातून पहलगामची घटना घडली. कारण भारतीय हे सहिष्णू विचारांचे आहेत व हे सहजासहजी कोणाच्या वाट्याला जात नाहीत. याचा अर्थ हा नाही की भारतीय मंडळी ही त्यांना घाबरतात. भारतीयांच्या धमणीत एवढी ताकद आहे की त्यांनी विचार केल्यास क्षणभरही वेळ लागणार नाही पाकिस्तानला नष्ट करायला. परंतु याबाबतीतही भारत विचार करतोय. मात्र पाकिस्तान तसा विचार करीत नाही. ज्यातून विभाजनाच्या वेळेस दंगे पेटले. १९६५ ची लढाई झाली. एवढंच नाही तर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरुंनी ऐन वेळेस सैन्य माघारी बोलावून जो काश्मीरचा भाग सोडला. त्यावर फुकटफाकट पाकिस्ताननं कब्जा मारला. जो आज पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो. एवढंच नाही तर पाकिस्ताननं एवढे वेळेस हमले करुनही भारतानं पाकिस्तानचं पाणी बंद केलं नाही वा त्यांच्या देशात पुरस्थिती निर्माण केली नाही वा त्यांना दोषी ठरवलं नाही. परंतु पाकिस्तान काय करतं. एवढे वेळेस भारत आपली त्यांच्याप्रती सौहार्दपूर्ण वागणूक दाखवूनही सुधारण्याची चिन्हं घेत नाही. याला काय म्हणावे. ज्यातून पहलगामचं कुंकू पुसणं प्रकरण घडलं. त्यानंतर भारतानं फक्त त्याचं प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानला काहीही म्हटलं नाही. तरीही पाकिस्तान चवताळून उठल्यासारखा भारतीय सिमेलगतच्या भागात गोलाबारी व ड्रोनहल्ले करीत आहे. युद्धाचे आव्हान देत आहे. याबाबत बोलायचं झाल्यास पाकिस्तानला असं करण्याची काय गरज आहे? तरीही पाकिस्तान असं करीत आहे. याचाच अर्थ असा की पाकिस्तान युद्ध करु पाहात आहे की जी गोष्ट गरजेची नाही. विशेष म्हणजे यातील महत्वपुर्ण भाग हा की जर भारतानं विचार केला तर पाकिस्तान हा देशच राहणार नाही. परंतु भारत जगाचा विचार करतोय. विचार करतोय की युद्ध हे यातून पर्याय काढण्याचं साधन नाही. जपानच्या हिरोशिमा व नागासाकी सारखी आपल्याही देशाची स्थिती होईल. त्या लोकांनी काय बिघडवलं की ज्यांचा यात दोष नाही. परंतु पाकिस्तान याचा विचारच करीत नाही. ते सतत युद्धाच्या मागे लागले आहे व भारताला चिथावत आहे.
भारत विचारशील देश आहे व कलिंगच्या युद्धापासून शांततेवर जास्त भर देत आहे. परंतु याचा अर्थ असा की नाही की भारत केवळ शांतताच धरुन राहिल. एकवेळ अशीही येवू शकते की त्या वेळेस भारत पाकिस्तानची गोलाबारी सहन करणार नाही. त्यांचे ड्रोनहल्ले सहन करणार नाही. एका रात्रीत हल्ला करेल, पाकिस्तान बेसावध असतांना. दुसऱ्या दिवशी इथं पाकिस्तान नावाचा एक देश अस्तित्वात होता हेही दिसणार नाही. जसं भुस्खलनात माळीण नावाचं गावंच दुसऱ्या दिवशी दिसलं नाही तसं. ही देखील हिंमत भारत करु शकतो. याचा पाकिस्ताननं विचार करावा. जे काही घडलं, ते भारतीय स्रियांचं कुंकू पुसलं गेल्यानं घडलं. असं पाकिस्ताननं समजावं. ज्यातून आतंकवादी बहुल क्षेत्रच निशाणा बनवून नष्ट केल्या गेली. जीवीतहानी केली नाही. परंतु पाकिस्तान यातून जर धडा घेत नसेल तर तोही दिवस दूर नाही की भारत पाकिस्तानला तो साखरझोपेत असतांना एका रात्रीतूनच नेस्तनाबूत करेल. ऑपरेशन सिंदूर दूरच. ऑपरेशन पाकिस्तान होवून जाईल. यात शंका नाही. ज्यात हिंदूच नाही तर हिंदुस्थानचं रक्त धमणीत सळसळत ठेवणारे माझ्यासारखे मुस्लीमच व स्वतःला भारतीय समजणारे मुस्लीमच मदत करतील. हे तेवढंच खरं.
रुकसारचा तो विचार. तिचा तो रास्त विचार होता. ती मुस्लीम होती. परंतु तिचे विचार भारतीय होते. ती मुस्लीम होती. परंतु तिचा व्यवहारही भारथीय होता. ती मुस्लीम असूनही भारताच्या भवितव्याबाबतचाच विचार करीत होती.
****************************************