"सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ" ही एक गुन्हेगारी थरारक काल्पनिक कथा आहे. जिथे पोलीस निरीक्षका विजया साठे आणि बुद्धिमान चोर रुद्र यांच्यात एक मानसिक खेळ रंगतो. धक्का , सावधगिरी आणि बुद्धीची कसोटी यांचा अनोखा संगम या कथेत आपणास पाहायला मिळेल. या कादंबरीत सर्व पात्र,घटना व स्थळ पूर्णतः काल्पनिक असून , फक्त वाचकांसाठी रचलेली आहेत.
सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 1
प्रस्तावना"सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ" ही एक गुन्हेगारी थरारक काल्पनिक कथा आहे. जिथे पोलीस निरीक्षका विजया साठे आणि चोर रुद्र यांच्यात एक मानसिक खेळ रंगतो. धक्का , सावधगिरी आणि बुद्धीची कसोटी यांचा अनोखा संगम या कथेत आपणास पाहायला मिळेल. या कादंबरीत सर्व पात्र,घटना व स्थळ पूर्णतः काल्पनिक असून , फक्त वाचकांसाठी रचलेली आहेत.___________________________________प्रकरण१: शांत रात्रीचा पहिला वारभंडारा जिल्ह्यातील एका शांत,निवांत शहरावर संध्याकाळचा सावट झपाट्याने पसरत होता. घराघरांत दिवे मंद प्रकाश देत झगमगू लागले होते,आणि लोक हळूहळू त्यांच्या रात्रीच्या आरामासाठी सज्ज होत होते. रस्त्यांवरून क्वचितच गाड्या जात होत्या;काही चहाच्या टपऱ्या अजून उघड्या होत्या, पण ...Read More
सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 2
भाग २ : सावध चोरांची टोळी. तपासाच्या ओघात विजयाने मागील काही महिन्यांत घडलेल्या चोरिंची सर्व केस फाईल एकत्र केल्या. तिच्या टेबलावर शेकडो पानांचा ढीग पडलेला होता, पण ती शांत डोळ्यांनी प्रत्येक घटना पुन्हा पुन्हा चाळत होती.जणू अक्षरांमध्ये कोणतातरी सूर शोधत होती. ती ज्या ज्या केसकडे बघत गेली,त्यात एक विलक्षण समानता स्पष्ट होत होती.प्रत्येक चोरी रात्री २.४५ ते ३.१५ या अर्ध्या तासातच झाली होती. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा काही क्षणांसाठीच निष्क्रिय झाली होती. जणू एखाद्या कुशल माणसाने ते मुद्दाम ठरवून केलं असाव. आणि प्रत्येक वेळी चोरी झालेले दागिने एकच प्रकारचे, जुन्या ...Read More
सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 3
भाग ३ : पोलिसांची घडी आणि पहिला सापळासंध्याकाळच्या फुटत्या उजेडात, भंडारा पोलीस मुख्यालयाची चौथी मजला तलम नारिंगी प्रकाशात न्हाऊन होती. कॉरिडॉरमध्ये पायऱ्यांचे आवाज प्रतिध्वनित होत होते, तर कंट्रोल रूमच्या काचेमागे मॉनिटर्सवर निळ्या-हिरव्या रेषा सतत लुकलुकत होत्या. जणू शहराची धडधड त्या स्क्रीनवर झगमगतेय. याच धडधडीच्या पलीकडे, निरीक्षिका विजया राणे वेगात चालत आपल्या कॅबिनमध्ये शिरली. टेबलावर पडलेला तणाव तिच्या भुवईव्यतिरिक्त कुणालाच दिसत नव्हता, पण सगळ्यांनाच जाणवत होता. आता खेळ खरोखर गंभीर झाला होता.विजयाने आता ठाम निर्णय घेतला होता. तपासाच्या गतीला आणखी धार देण्याचा. एका लक्षवेधी अंतर्गत बैठकीनंतर तिने दोन स्वतंत्र पथकं नेमली, ज्यांचं काम स्पष्ट, आणि दिशा ठरलेली होती.पहिलं पथक — ...Read More