Savadh Chaal - 2 in Marathi Crime Stories by Akshay Varak books and stories PDF | सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 2

Featured Books
Categories
Share

सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 2

भाग २ : सावध चोरांची टोळी.



              तपासाच्या ओघात विजयाने मागील काही महिन्यांत घडलेल्या दागिन्यांच्या चोरिंची सर्व केस फाईल एकत्र केल्या. तिच्या टेबलावर शेकडो पानांचा ढीग पडलेला होता, पण ती शांत डोळ्यांनी प्रत्येक घटना पुन्हा पुन्हा चाळत होती.जणू अक्षरांमध्ये कोणतातरी सूर शोधत होती. 

         
ती ज्या ज्या केसकडे बघत गेली,त्यात एक विलक्षण समानता स्पष्ट होत होती. 

प्रत्येक चोरी रात्री २.४५ ते ३.१५ या अर्ध्या तासातच झाली होती. प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा काही क्षणांसाठीच निष्क्रिय झाली होती. जणू एखाद्या कुशल माणसाने  ते मुद्दाम ठरवून केलं असाव. आणि प्रत्येक वेळी चोरी झालेले दागिने एकच प्रकारचे, जुन्या डिझाईनचे,पारंपारिक कोल्हापुरी,बनारसी मिनाकारितले. जे दागिने बाजारात दुर्मिळ आणि  अमूल्य मानले जातात. 
पण हे सर्व धक्कादायक म्हणजे, या ठिकाणी ना कुठलं जबरदस्तीच चिन्ह, ना कुठल्या दरवाज्याच्या कुलुपाची तोडफोड,ना कोणतीही फिंगरप्रिंट. जणू चोरांनी फक्त दुकानात पाय टाकला आणि सावधपणे सगळंच उचलून नेलं. इतकं शांत काम केलं की कोणालाच याचा सुगावा लागला नाही. 

विजयाच्या मनात प्रश्नांचा भडिमारा झाला. 
हे साधं चोरांचा नक्कीच काम नाही. ती मनात हलकेच पुटपुटली. 

ती गुप्तचर विभागात गेली. काही जुने माहितीस्रोत खंगाळले. आणि तिथे एक नाव आल.'शून्य पथक'.

शून्य कारण हे लोग मागे कोणताही पुरावा ठेवत नव्हते. ही एक ५ जणांची टोळी आहे . तिच्या लक्षात आलं. तिच्या डोक्यात आता एकच आवाज घुमत होता.
'हे चोर नाहीत,हे एक गूढ नृत्य आहे. जिथे प्रत्येक हालचाल आधीच ठरलेली असते.'


कुणी हे नक्षत्रांच्या वेळेत काम करतय? कुणी जुने ऐवजी ऐतिहासिक कलाकृती शोधतय? की हे फक्त लक्ष्य विचलित करण्याचा हेतू आहे?. या विचारांनी तिच्या मनात थैमान मांडलं होत.

विजया आता यामध्ये केवळ तपास करत नव्हती तर ती या खेळात ओढली जात होती. ज्यात एक चुकीचा पाऊल टाकलं तर, पुढचा डाव चोरांचा असणार होता. 

विजयाला आता याची पूर्ण खात्री पटली होती की, ती अत्यंत हुशार आणि नियोजित गुन्हेगारांच्या टोळीच्या मागावर आहे. अशी टोळी जी फक्त चोरी करत नव्हती,तर चोरांच्या दुनियेलाच एक परिणाम देत होती.ते साधे गुन्हेगार नव्हते. त्यांच्या प्रत्येक हालचालीमागे बारीकसारीक विचार आणि शिस्त होती.


तीनं तात्काळ पोलीस मुख्यालयात एक विशेष तपास पथक उभारलं. या पथकात शहरातील सर्वोत्तम बुद्धिमान अधिकारी, सायबर विश्लेषक, आणि स्थानिक गुन्हेगारी नेटवर्कचा अभ्यास करणारे अधिकारी घेतले. 

प्रत्येक ज्वेलरी दुकानात भेट देणे सुरू झालं. विशेषता जिथे चोरी झाली नाही,पण होऊ शकली असती. विजयाच निरीक्षण काही वेगळं होत. ती फक्त चोरी झालेली ठिकाणचं नव्हती पाहत. तर ती त्याहून महत्वाची म्हणजे 'चोरी न झालेली ठिकाणही पाहत होती'. 


सीसीटीव्ही फुटेजच्या तासंतास क्लिप्स स्कॅन केल्या जात होत्या. पण विशेष म्हणजे,ज्या दिवशी चोरी झाली,त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मिनिटांचा गडबडलेला भाग आढळून आला. जणू कोणी मुद्दाम क्लिप एडिट केली आहे. 

त्याचवेळी विजयाने तिच्या सर्व महितीस्तोत्रांशी, गुन्हेगारी जगाशी थेट जोडलेल्या व्यक्तींशी संपर्क सुरू केला. काहींनी बोट हलवत टाळलं, काहींनी थेट नाव न घेता सावधगिरीचा इशाराच दिला. 
'विजया मॅडम, हे लोक सावलीत राहतात. त्यांचं नाव जरी घेतलं तरी त्यांची सावली मागे लागते'.
त्यांनी एकमताने ठामपणे विजयाला सावध केले.

मग एका रात्री, एका जुन्या केसचा माहितीदार 'बब्बू'ला विजयाने बोलावल. त्याला या प्रकरणाविषयी काही माहीत आहे का? अस त्याला विचारलं. तो हळूच कुडबुडू लागला,

" मॅडम... काही आठवड्यांपुर्वी,जुन्या बंद पडलेल्या मोकळ्या गोदामात काही माणसं दिसली होती. ते रात्रीच्या अंधारात आले, आत काहीतरी मिटिंग झाली,कोणी काही उचललं नाही ,पण खूप वेळाने ते बाहेर आले.... शांत एकामागोमाग एक. शांत. ना आवाज, ना गडबड. पण एक गोष्ट स्पष्ट होती. त्या पाच जणांनी काहीतरी मोठं ठरवलं होत".


त्याच म्हणणं ऐकताच विजयाच्या मेंदूत एकच शब्द ओरडत होता. 

"टोळीच्या मुळावर आपली नजर जाऊ लागली आहे".

तिने लगेचच त्या जुन्या गोदामाची जुनी मालकी नोंद मागवली. आजूबाजूचे सीसीटीव्ही आणि त्या रात्रीचे मोबाईल लोकेशन्स मागवले. आता तिची रणनीती स्पष्ट होती. त्या टोळीचा चेहरा समोर आणणे नव्हे तर त्यांच्या सावलीला प्रकाशात खेचन. 


दुसरीकडे रुद्र आणि त्याची टोळी झपाट्याने दुसऱ्या टप्प्यावर काम करत होती. यावेळेस त्यांनी लक्ष केल होत. शहरातील सर्वात जुना प्रतिष्ठित आणि सुरक्षा घेरावतला दागिन्यांचं अड्डा. 'महालक्ष्मी ज्वेलर्स'. हा एक लाखो रुपयांचा सोन्याच्या साठ्याचा किल्ला होता. ज्याच्या भिंती केवळ काँक्रीटच्या नव्हत्या. त्या विश्वासाच्या आणि शतकानुशतकांच्या परंपरेच्या होत्या. 


राकेशने त्या दुकानाची सुरक्षा यंत्रणा अगदी बारकाईने अभ्यासली. त्याने स्वताने एक नकाशा तयार केला. CCTV च नेटवर्क, अलार्म सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक लॉकिंग तंत्र आणि शेवटी स्टाफच वेळापत्रक. हे नुसतं नकाशा नव्हतं तर युद्धनीयमपत्र होत. 


रम्याने त्याहिपेक्षा सखोल काम केलं होतं.मागील दोन आठवड्यांपासून दुकानाच्या आसपासच्या गल्यांमधून विक्रेता म्हणून वावरत होता. सकाळी कोणता स्टाफ येतो. कोण किती वेळ तिथे राहतो. कुणाच्या हातात कुठल्या चाव्या असतात, दुपारच्या जेवणाच्या वेळेस कोण कुठे जात,रात्रपाळी कशी असते... प्रत्येक क्षणांची माहीत त्याच्या नोटपॅडवर नोंदवली जात होती. 

रुद्रने एक दिवस सर्वांना एका गुप्त ठिकाणी बोलावल. दाट अंधारात,एका जुन्या वर्कशॉपकच्या माघे. तिथे तो उभा होता,चेहरा अर्ध्या सावलीत,आणि आवाजात एकप्रकारचा भेदक संयम.



"ही चोरी आपली खरी कसोटी असेल, यशस्वी झालो तर आपली ओळख बदलुन आपलं नव आयुष्य सुरू होईल. पण एक चूक. एकही चूक यात होता कामा नये. तो सर्वाना उद्देशून सांगत होता. 


टोळीतील सगळ्यांनी एकमेकांकड पाहिलं,पण कोणीही काहीही बोललं नाही. पण हवेतल्या तणावाला कात्रीन कापाव इतकं धारदार वाटत होत. 



दरम्यान,विजयाचा तपास अधिक गती घेत होता. तिला जास्तच जाणवू लागल होत की, ही टोळी जरा जास्तच हुशार नाही तर समोरच्याच्या मनाचा आरसा वाचणारी आहे.


"हे लोक दुकान फोडत नाहीत...
ते चोरीचा प्रसंग अगदी साहजिकपणे घडवून आणतात. आणि नंतर जणू काही कधी अस्तित्वातच नव्हते, अशा प्रकारे नाहीसे होतात".


तिच्या मनात आता एक ठोस विचार रुजायला लागला होता.
"आपण जितके त्यांच्यामागे धावू, तितके आपण त्यांच्या सापळ्यात अडकू.... पण एक पाऊल पुढे गेलो तर त्यांच्या सावलीच्या आधीच त्यांना गाठता येईल. 


तिने एका गुप्त बैठकीत आपलं खास पथक बोलावल. एका सापळ्याच प्रारूप मांडलं. एका अशा प्रकारची 'अदृश्य सापळा गाथा'. जी टोळीच्या पुढच्या हालचालींना अधोरेखित करेल. आणि त्यांच्या नकळत त्यांनाच जाळ्यात अडकवेल. 


आता सुरू झाला होता एक थरारीक मानसिक संघर्ष. 
एकिकडे नियोजनबद्ध चोरांची टोळी होती , तर दुसरीकडे सावधगिरीने तपास करणारे अधिकारी. 

अशा दुभंगलेल्या रेषेवर दोन्ही पक्ष चालत होते. कोण आधी पुढचं पाऊल टाकेलं. यावर सर्व ठरणार होत. विजय कोणाचा आणि पराभव कोणाचा. 

भाग ३ मध्ये लवकरच भेटुयात. जर आतापर्यंत आपल्याला कथा आवडली असेल तर कृपया आपल्या अभिप्राय कंमेंट section मध्ये कळवा. 

आपलाच.
अक्षय वरक.