Savadh Chaal - 1 in Marathi Crime Stories by Akshay Varak books and stories PDF | सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 1

Featured Books
Categories
Share

सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ - 1

प्रस्तावना
"सावध चाल - अज्ञात चोराचा खेळ" ही एक गुन्हेगारी थरारक काल्पनिक कथा आहे. जिथे पोलीस निरीक्षका विजया साठे आणि बुद्धिमान चोर रुद्र यांच्यात एक मानसिक खेळ रंगतो. धक्का , सावधगिरी आणि बुद्धीची कसोटी यांचा अनोखा संगम या कथेत आपणास पाहायला मिळेल. 
            या कादंबरीत सर्व पात्र,घटना व   स्थळ पूर्णतः काल्पनिक असून , फक्त वाचकांसाठी रचलेली आहेत.
___________________________________

प्रकरण१: शांत रात्रीचा पहिला वार

भंडारा जिल्ह्यातील एका शांत,निवांत शहरावर संध्याकाळचा सावट झपाट्याने पसरत होता. घराघरांत दिवे मंद प्रकाश देत झगमगू लागले होते,आणि लोक हळूहळू त्यांच्या रात्रीच्या आरामासाठी सज्ज होत होते. रस्त्यांवरून क्वचितच गाड्या जात होत्या;काही चहाच्या टपऱ्या अजून उघड्या होत्या, पण एकंदरीत वातावरणात एक विशिष्ट थकवा आणि शांतता होती. परंतु,या शांततेच्या आड काहीतरी खोल,काळ आणि गुंतागुंतीचं घडत होतं. एक योजनाबद्ध चक्र सुरू झालं होतं. 

               शहराच्या मध्यवर्गीत भागात एक 'नवनित ज्वेलर्स'नावाचं एक प्रसिद्ध दागिने दुकान होत. दुकान वर्षानुवर्षे नावजलेलं, विश्वासार्ह, आणि खास वशिल्यांच मानलं जायचं. आत शोकेसच्या आत सुवर्ण हार,अंगठ्या,कर्णफुले, आणि दुर्मिळ मोत्यांचे तुकडे काळजीपूर्वक ठेवलेले होते. या सोन्याच्या साम्राज्यावर नजर होती अज्ञातांच्या एका टोळीची. 
                   
           
            
दुकानाच्या २ गल्लीमागे , एका अर्धवट बांधलेल्या इमारतीत पाच पुरूष सावधपणे एका गोलात उभे होते. त्यांच्या डोळ्यात तीव्रता होती. श्वास शांत पण विचार वेगवान होते.


 त्या टोळीचा मेंदू आणि म्होरक्या रुद्र हा ३२ वर्षांचा होता. लहानशा गावातून आलेला पण शहरी जगात आपला ठसा उमठवलेला. त्याच निरीक्षण तेजस्वी होत.डोक्यावर काळी कॅप, अंगावर काळा स्वेटर आणि हातावर एक छोटं वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाईस.

      त्याच्यासोबत रम्या- सडपातळ हाताचा,चोरट्या हालचालींचा उस्ताद. 
राकेश- हॅकर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा जादूगार.त्याचे बोट जितकेच किबोर्डवर हलके, तितकेच वायरींगवरही.सार्थक- शांत.थोडा गुंडगिरीचा पण विश्ववासार्ह. मंट्या- गाडी चालक, धाडसी पण सावध.


"टाईमर चालू झालाय,"राकेशने आपला लॅपटॉप ऑन करत म्हंटलं,"CCTV फिड ब्लॉकिंग सुरू....४० मिनिटांनी विंडो आहे."


रुद्रने सर्वांना शांत राहण्याचा इशारा दिला आणि गल्लीतून दुकानाच्या मागच्या बाजूने हालचाल सुरू केली.

' नवनीत ज्वेलर्स'च्या मागच्या गेटजवळ येऊन रुद्रने बॅगेतून एक खास "सायलेंट लॉक पीकर"काढलं. (आवाज न करता लॉक उघडणारी यंत्रणा) तो तंद्रीत काम करत होता. प्रत्येक क्लिप फिरवण त्याच्या बुद्धिबळावर होत.


अर्ध्या मिनिटात गेट हळूहळू कोणत्याही आवाजाशिवाय सरकला. राकेशने फायर अलार्म सिस्टमचे वायर शोधले. त्याने सावधपणे वायरिंगची दिशाच बदलून टाकली. सर्व सिक्युरिटी सिस्टमला भ्रम निर्माण करणारी सॉफ्टवेअर स्क्रिप्ट त्याच्या लॅपटॉप वरून सुरू झाली. "मोशन डिटेक्शन सुरू झालंय...आत जा,'तो खुणेने बोलला.'

टोळी दुकानात एकामागोमाग एक शिरली. काळोख्या दुकानात फक्त टॉर्चच्या मंद प्रकाशात सोन्याचा झळाळता तुकडा चमकत होता. 


दुकानात पोहचल्यावर रुद्रने स्पष्ट सूचना दिल्या,"हा खेळ नाही"प्रत्येक जण आपापला सेक्शन पहा. जर कोणी फालतूगिरी केलीच तर मी त्याला कायमचा घालवून टाकेन. 
रम्याने एकेक करून साऱ्या अंगठ्या उचलल्या. त्याची बोट जणू सोन्याला शिवूनही आवाज करत नव्हती. 
सार्थकने काळजीपूर्वक त्या गोष्टी पॅक केल्या. प्रत्येक हार एका गादीमध्ये गुंडाळत, बॅगेत ठेवलं जातं होत. 
रुद्रने दुकानातल्या काचेच्या काउंटरवर एक लाल शाईचा मार्कर वापरून लिहिलं:"तुम्ही गाढ झोपेत असताना,मी तुमचं सोन उचललं." ती एक प्रकारची चेष्टाच होती,पण पोलिसांसाठी आव्हानदेखील.


तेथून ते चोर त्यांच्या जागेवर निघून गेले. 


              सकाळी ८ वाजता दुकान मालक नवनीत शर्मा दुकान उघडण्यासाठी आले. गेट व्यवस्थित,काचा तशाच,आत देखील काही तोडफोड नाही. पण शोकेसमधून सर्व सोन गायब. 


"हे काय हे कसं शक्य आहे?" ते घाबरत आत घुसले. क्षणातच त्यांनी पोलिसांना फोन केला. 


दुकानात झालेली चोरी ही वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. त्या सकाळी शहरात एकच चर्चा सर्वत्र होत होती ती चोरीची. शहरातील प्रसिद्ध 'नवनीत ज्वेलर्स' मध्ये झालेल्या चोरीने संपूर्ण शहर हादरून गेल होत. लोक गर्दीकरून दुकानासमोर जमले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती,आश्चर्य आणि राग स्पष्ट दिसत होता. 


"अरे,इतकं सगळं कसं काय गेलं?"
"हे चोर कोण?आणि इतक्या सहज दुकानात घुसले कसे?"
या प्रश्नांची सर्व परिसर गुंजत होता.


      पोलीस निरीक्षक विजया साठे आपल्या टीमसोबत घटनास्थळी आली.ती उंच,बोलक्या डोळ्यांची,शिस्तबद्ध अधिकारी होती. तपास करताना तिच्या चेहऱ्यावर एक विचारी शांतता होती. दुकानांच्या दरवाजाची तांत्रिक पाहणी,काचांचे छोटे कण,शेल्फवरच्या छोट्या खुणा काहीही तिच्या नजरेतून सुटत नव्हतं. तिने CCTV केबिन तपासली पण सर्व फिड गायब होत. 

"हॅकिंग?" तर झाली नसले.ती मनातच पुटपुटली. 
दुकानात तपास करताना तिने काचेच्या काउंटरवर लाल शाईच्या मार्करने लिहिलेलं पाहिलं. 

तीच मन क्षनभर गोंधळल... पण मग ती हसली,एक आव्हान स्वीकारल्यासारखी.

विजयाने दुकानाच्या सर्व बाजूच निरीक्षण केल. लहानसहान गोष्टी लक्षात घेतल्या. 

"हे कुणी साधे चोर नाहीत"ती हळूच म्हणाली. इथे नीट प्लॅनिंग झालं आहे. 
   "चोरी झाली होती.... पण हा फक्त एक इशारा होता. खरी लढत अजून बाकी आहे. विजया साठेला अजून अंदाज नाही,की समोर फक्त चोर नव्हे तर चोरीच्या खेळातील एक खेळाडू उभा आहे. आणि हा खेळ नुकताच सुरू झालाय....