जागृत देवस्थानं

(6)
  • 258
  • 0
  • 2.6k

हनुमान जयंती झाली नी दुपारची समाराधना आटपल्यावर पैऱ्यानी भांडी घासून सभामंडपात एका कोपऱ्यात उपडी घालून ठेवली. पैरी घरी जायला निघाल्यावर बाबी म्हाजन म्हणाला, “ आता चार सहा दिवसानी दोगा जणां येवा नी सगळी भांडी पेटाऱ्यात सोयन् भरून ठेवा.” भाताची तपेली, आमटी भाजीचे टोप, ओगराळी, पितळ्या नी शंभर माणसांचा ताट, वाटी, तांब्या -पेला असा देवस्थानच्या मालकीचा भांड्यांचा संच होता. उत्सवापूर्वी पेटारे खोलून सगळी भांडी घासून घेतली जात आणि समाराधना झाल्यावर आठ दहा दिवसानी सगळी भांडी पुन्हा पेटाऱ्यात भरून ठेवली जात. त्यावर्षी समाराधना झाल्यावर चार दिवसानी बाबी म्हाजन पुजा करायला देवळात आला. तो दार उघडून आत आला नी पहातो तर सभामंडपाच्या कोपऱ्यात उपडी घातलेली सगळी भांडी गायब झालेली. त्याच पावली घरी जावून त्याने ही गोष्ट घरच्यांच्या कानी घातली.

1

जागृत देवस्थानं - भाग 1

हनुमान जयंती झाली नी दुपारची समाराधना आटपल्यावर पैऱ्यानी भांडी घासून सभामंडपात एका कोपऱ्यात उपडी घालून ठेवली. पैरी घरी जायला बाबी म्हाजन म्हणाला, “ आता चार सहा दिवसानी दोगा जणां येवा नी सगळी भांडी पेटाऱ्यात सोयन् भरून ठेवा.” भाताची तपेली, आमटी भाजीचे टोप, ओगराळी, पितळ्या नी शंभर माणसांचा ताट, वाटी, तांब्या -पेला असा देवस्थानच्या मालकीचा भांड्यांचा संच होता. उत्सवापूर्वी पेटारे खोलून सगळी भांडी घासून घेतली जात आणि समाराधना झाल्यावर आठ दहा दिवसानी सगळी भांडी पुन्हा पेटाऱ्यात भरून ठेवली जात. त्यावर्षी समाराधना झाल्यावर चार दिवसानी बाबी म्हाजन पुजा करायला देवळात आला. तो दार उघडून आत आला नी पहातो ...Read More

2

जागृत देवस्थानं - भाग 2

उत्सव आठवड्यावर आला. सालाबाद प्रमाणे महानैवेद्य करणे भागच होते. थोडीतरी मोठी भांडी खरेदी करणे भाग होते. घर्डा कंपनीने भांडी पंचवीस हजाराचा चेक दिला. देवस्थानचे दोन ट्रस्टी मुंबईला रवाना झाले. मुख्य ट्रस्टी भाऊ दात्ये यांचा मुलगा मोहन हायकोर्टात वकिली करायचा. रहायचा. तो गिरगावला सेंट्रल सिनेमा जवळ मंडळी मुक्कामाला तिथे गेली. त्यांच्या आंघोळी -पांघोळी भाऊनी येण्याचे प्रयोजन सांगितले. मोहन त्याना म्हणाला, “ग्रॅण्ट रोडला खोज्यांची जुनी दुकाने आहेत. त्यांच्याकडे जुन्यातली मोठी पातेली मोडीच्या दराने मिळतात. देवस्थानसाठी अॅल्युमिनीयमच्या भांड्यांपेक्षा जुन्यातली तांब्या पितळेची पातेली, तपेली मिळतात का बघुया. ” नाष्टा पाणी उरकून साडेदहाच्या सुमाराला मंडळी ग्रॅण्ट रोडला खोज्याच्या दुकानात गेली. तिथे गेल्यावर ...Read More

3

जागृत देवस्थानं - भाग 3

मंदिरात दर्शनाला आलेल्या एक दोघाना उसळलेल्या आग्या माशांची भिरी घंव घंव करीत येताना दिसल्यावर लोकानी हातातल्या पिशव्या वगैरे तिथेच “आग्यो माश्यो उसाळल्यो........ ” अशी बोंबाबोंब करीत गावाच्या दिशेने पळायला सुरुवात केली नी ते बचावले. डुक्कर नेणारे सात केरळी त्याना माशा डसायला लागल्यावर डुक्कर तिथेच टाकून सैरावैरा धावत सुटले. ते गैर माहितगार असल्यामुळे गावच्या दिशेने न जाता चढणीच्या दिशेने पळाले नी दमछाक होवून नेमके माशांच्या हल्ल्यात गावले. या सगळ्या गदारोळात भिकुभाऊनी शांत चित्ताने डोळे मिटून आवर्तनं सुरूच ठेवली. दोन तासानी वारा थांबला नी आग्यामाशा शांत झाल्या. मध्यान्ही नंतर एकादष्णी पुरी झाल्यावर नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भिकु भाऊनी वरण-भात रांधून देवाला नैवेद्य दाखवून ...Read More

4

जागृत देवस्थानं - भाग 4

पूर्ण विचार करता कोर्टाचा बेलिफ़ नी पोलिस पार्टी आल्यावर मिळकतीचा ताबा सोडावाच लागणार हे अटळ भवितव्य ध्यानी घेता चारही बंधूनी सूज्ञ विचार करून रोकड आणि सोने चांदी असा महत्वाचा ऐवज गुठाळून दोन भाऊ बायका माणसे नी मुले याना घेवून तत्काळ पळसंब्यात मामाकडे रवाना झाले. लिलावाला अजून चार दिवस अवधी होता. राहिलेल्या दोन भावानी गुरे ढोरे गावातल्या कुळाना वाटून टाकली. मोठी हांडी भांडी होती ती गावदेवीला दान म्हणून देवून टाकली आणि दुसरा दिवस उजाडता उजाडता वाड्यासमोर उभे राहून वास्तू देव आणि ग्रामदेवी काळकाई यांची प्रार्थना करून याचा फैसला तुम्ही करा. आम्ही या मिळक्तीवर तुळशी पत्र ठेवून पाय नेतील तिथे परागंदा ...Read More