तो प्रियकर नव्हता, तो फौजी होता

(2)
  • 45
  • 0
  • 993

कधीकाळी प्रेमात वेडावलेला राजवीर, आणि त्याला अर्ध्यावर सोडून गेलेली सरिता. ती आता नवऱ्यासोबत फिरायला आली होती, आणि पुन्हा एका अशा वळणावर भेटली… जिथं आयुष्य आणि मृत्यूच्या सीमारेषा मिटलेल्या होत्या. आतंकवाद्यांनी सर्वांना पकडलं. ती असहाय… तो मात्र गुप्त मिशनवर. एक फौजी, कैदी म्हणून पाठवलेला! कोणालाही न सांगता, न आवाज करता, तो एक एक करत सर्वांना वाचवण्याचा प्लान रचतो. आणि शेवटी, जेव्हा त्याची ओळख उघड होते. सर्वांनाच समजतं, "तो प्रियकर नव्हता… तो फक्त देशासाठी झुंजणारा एक खरा योद्धा होता.

1

तो प्रियकर नव्हता....तो फौजी होता. - 1

कधीकाळी प्रेमात वेडावलेला राजवीर, आणि त्याला अर्ध्यावर सोडून गेलेली सरिता. ती आता नवऱ्यासोबत फिरायला आली होती, आणि पुन्हा एका वळणावर भेटली…जिथं आयुष्य आणि मृत्यूच्या सीमारेषा मिटलेल्या होत्या.आतंकवाद्यांनी सर्वांना पकडलं.ती असहाय… तो मात्र गुप्त मिशनवर.एक फौजी, कैदी म्हणून पाठवलेला!कोणालाही न सांगता, न आवाज करता,तो एक एक करत सर्वांना वाचवण्याचा प्लान रचतो.आणि शेवटी, जेव्हा त्याची ओळख उघड होते.सर्वांनाच समजतं, तो प्रियकर नव्हता… तो फक्त देशासाठी झुंजणारा एक खरा योद्धा होता.◆ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील घटना, पात्रं आणि स्थळं केवळ मनोरंजनासाठी रचलेली असून, कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्ती वा संस्थेशी यांचा संबंध नाही.◆ वाचकांनो, तुमचा प्रतिसाद अनमोल आहे!ही कथा आवडल्यास, कृपया तुमचे विचार, प्रतिक्रिया ...Read More

2

तो प्रियकर नव्हता,तो फौजी होता - 2

भाग २ – कैदेतला योद्धापहाटेच्या अंधारात कैदगृहाच्या भिंती जणू थंडीने कापत होत्या. हवेत जड, गूढ नीरवता भरलेली होती. खोलीतील गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या पातळीवर पोचलं होतं. एका कोपऱ्यात लागलेला जुना, धुळीने झाकलेला पंखा झरझर आवाज करत होता, पण त्याच्या त्या कंपकंपीत फिरण्याने अधिकच अस्वस्थ शांतता पसरत होती. पंख्याच्या वाऱ्याने भिंतीवर लटकलेला एक किडक्या कागदाचा झुबका हळूहळू हलत होता. आणि त्या मागून पसरत होता एक विचित्र जंगली वास. तो वास कोणत्यातरी सडलेल्या गोष्टीसारखा, न ओळखता येणारा, पण नकळत नाकात भरून राहणारा होता.त्या अंधाऱ्या, दमट खोलीत एका कोपऱ्यात बसलेले होते दहा थकलेले, भांबावलेले चेहरे.सरिता, आदित्य, श्रुती, रोहित, पूजा, वैशाली, प्रतीक, सचिन, अमेय ...Read More