तो प्रियकर नव्हता, तो फौजी होता

(2)
  • 24
  • 0
  • 3.3k

कधीकाळी प्रेमात वेडावलेला राजवीर, आणि त्याला अर्ध्यावर सोडून गेलेली सरिता. ती आता नवऱ्यासोबत फिरायला आली होती, आणि पुन्हा एका अशा वळणावर भेटली… जिथं आयुष्य आणि मृत्यूच्या सीमारेषा मिटलेल्या होत्या. आतंकवाद्यांनी सर्वांना पकडलं. ती असहाय… तो मात्र गुप्त मिशनवर. एक फौजी, कैदी म्हणून पाठवलेला! कोणालाही न सांगता, न आवाज करता, तो एक एक करत सर्वांना वाचवण्याचा प्लान रचतो. आणि शेवटी, जेव्हा त्याची ओळख उघड होते. सर्वांनाच समजतं, "तो प्रियकर नव्हता… तो फक्त देशासाठी झुंजणारा एक खरा योद्धा होता.

Full Novel

1

तो प्रियकर नव्हता....तो फौजी होता. - 1

कधीकाळी प्रेमात वेडावलेला राजवीर, आणि त्याला अर्ध्यावर सोडून गेलेली सरिता. ती आता नवऱ्यासोबत फिरायला आली होती, आणि पुन्हा एका वळणावर भेटली…जिथं आयुष्य आणि मृत्यूच्या सीमारेषा मिटलेल्या होत्या.आतंकवाद्यांनी सर्वांना पकडलं.ती असहाय… तो मात्र गुप्त मिशनवर.एक फौजी, कैदी म्हणून पाठवलेला!कोणालाही न सांगता, न आवाज करता,तो एक एक करत सर्वांना वाचवण्याचा प्लान रचतो.आणि शेवटी, जेव्हा त्याची ओळख उघड होते.सर्वांनाच समजतं, तो प्रियकर नव्हता… तो फक्त देशासाठी झुंजणारा एक खरा योद्धा होता.◆ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यातील घटना, पात्रं आणि स्थळं केवळ मनोरंजनासाठी रचलेली असून, कोणत्याही प्रत्यक्ष व्यक्ती वा संस्थेशी यांचा संबंध नाही.◆ वाचकांनो, तुमचा प्रतिसाद अनमोल आहे!ही कथा आवडल्यास, कृपया तुमचे विचार, प्रतिक्रिया ...Read More

2

तो प्रियकर नव्हता,तो फौजी होता - 2

भाग २ – कैदेतला योद्धापहाटेच्या अंधारात कैदगृहाच्या भिंती जणू थंडीने कापत होत्या. हवेत जड, गूढ नीरवता भरलेली होती. खोलीतील गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या पातळीवर पोचलं होतं. एका कोपऱ्यात लागलेला जुना, धुळीने झाकलेला पंखा झरझर आवाज करत होता, पण त्याच्या त्या कंपकंपीत फिरण्याने अधिकच अस्वस्थ शांतता पसरत होती. पंख्याच्या वाऱ्याने भिंतीवर लटकलेला एक किडक्या कागदाचा झुबका हळूहळू हलत होता. आणि त्या मागून पसरत होता एक विचित्र जंगली वास. तो वास कोणत्यातरी सडलेल्या गोष्टीसारखा, न ओळखता येणारा, पण नकळत नाकात भरून राहणारा होता.त्या अंधाऱ्या, दमट खोलीत एका कोपऱ्यात बसलेले होते दहा थकलेले, भांबावलेले चेहरे.सरिता, आदित्य, श्रुती, रोहित, पूजा, वैशाली, प्रतीक, सचिन, अमेय ...Read More

3

तो प्रियकर नव्हता,तो फौजी होता - 3

भाग ३ : गुप्त योजनारात्र गडद होत चालली होती. बाहेर कुठेतरी दूरवर एखाद्या लांडग्याचा ओरडण्यासारखा आवाज येत होता. थंड झुळुकीत तुरुंगाच्या सळई हलके हलके किरकिरत होत्या.कैदेतली माणसं.सरिता, आदित्य, श्रुती, पूजा, रोहित, वैशाली, प्रतीक, सचिन, अमेय, आणि मानसी. एकमेकांच्या जवळ बसलेली. कुणी अंगावर चादर ओढून बसलं होतं, तर कुणी नुसतं भिंतीला डोकं टेकवून विचारात हरवलं होतं.त्यांच्या चेहऱ्यावर दिवसाभरातला थकवा होता, पण आता राजवीरच्या कालच्या शब्दांनी त्यांच्या मनात एक वेगळाच ठिणगा पेटवली होती. भीतीचं ओझं थोडं हलकं झाल्यासारखं वाटत होतं.एका कोपऱ्यात, अंधाराच्या सावलीत, राजवीर शांत बसला होता. डोळे मिटलेले, पण त्याचा मेंदू झपाट्याने काम करत होता. चेहऱ्यावर स्थिरता, श्वास मोजून घेतल्यासारखा ...Read More

4

तो प्रियकर नव्हता,तो फौजी होता - 4

भाग ४ : रणसंग्रामाच्या उंबरठ्यावरतुरुंगाच्या भिंती आता पूर्वीसारख्या शांत नव्हत्या. अंधारातही जाणवणाऱ्या हलक्या हालचालींनी हवेत एक वेगळीच सळसळ निर्माण होती. जणू एखाद वादळ येण्याआधीचा क्षण.सगळं स्थिर, पण त्यामागे काहीतरी भयंकर घडणार याची चाहूल देणारं.राजवीर एका कोपऱ्यात उभा होता. डोळे मिटलेले, पण मनात प्रचंड हालचाल होती. त्याने पुन्हा एकदा मनातली योजना उलगडली, तपासली... आणि पक्की केली. वेळ खूप कमी होता.त्या देशद्रोह्यांनी, जे स्वतःला क्रांतीकारक म्हणवतात, देशावर हल्ला केला होता. त्याच्या सहकाऱ्यांना ठार मारलं, पर्यटकांना बंदी बनवलं... आणि देशाच्या सन्मानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.पण आता वेळ होती उत्तर देण्याची. एकट्यानं नाही.पण त्या धूसर अंधारात ज्या डोळ्यांत अजूनही आशेचा झरा होता, जे ...Read More

5

तो प्रियकर नव्हता,तो फौजी होता - 5

भाग ५: अंतिम संघर्षपौर्णिमेचा चंद्र आज वेगळाच भासवत होता… तो तुरुंगाच्या लाकडी खिडकीतून अलगद डोकावत होता. जणू अंधारावर मात स्वतःच्या सर्व तेजाने झगडत होता. त्या शितल प्रकाशात तुरुंगाच्या फटींतून एक अलौकिक शांतता झिरपत होती. झोपलेले कैदी खोल श्वासात हरवले होते, पण एका कोपऱ्यात – एक धग अजूनही जिवंत होती.राजवीर.तो एकटक चंद्राकडे पाहत होता. मानवी देहातले असंख्य भाव एकत्र लपवलेले त्याच्या डोळ्यांत झळकत होते. समोरच्या जमिनीवर त्याने स्वतःच्या हातानं नीट करून ठेवलेला एक छोटासा कागद होता… त्यावर काही अक्षरं टपकत होती. काळजीपूर्वक, सावधपणे. जणू प्रत्येक अक्षर त्याच्या हृदयातून ओघळत होतं.ते पत्र होतं.सरितासाठी नव्हतं.त्या अधुऱ्या प्रेमकथेवर तो आता पूर्णविराम देऊन पुढे ...Read More