समर्थ कथा कथेचे नाव : अभद्रासी आमंत्रण.... समर्थ कृनालांना दूपारचा आराम म्हंणून कधी मिळालाच नाही, कधी कधी तर रात्री- अपरात्री सुद्धा त्यांना भक्तांना संकटातून निवारण्याकरीता जाव लागत असे - संकट कधी सांगून थोडी येत असे ? कोणाला पिंपळावर मुंजा धरे, तर कोणाला विहिरीत पडून मेलेली नयना हड़ळ झपाटे. कुणावर करणी, जादू टोणा, भानामती, मुठ मारण झालं , तरी संकटकर्ता, बधित ईसम अवलिये समर्थ कृनालांकडे येत असायचा.. ! मग समर्थ काही काही उपाय सांगत , ह्या वाटेतून जाऊ नको, ही विभुती घे रात्री दरवाज्यात टाक , कपाळाला लाव - पिंपळाच्या खाली तांदळाच्या गोळ्यांचा नैवेद्य ठेव.. असेच काही काही उपाय समर्थ सांगत असत.. आणि काय चमत्कार घडायचा बधिताची बाधा उतरलेली असे! आदल्या दिवशी मळूल, निराश चेह-याने आलेला भक्त दुस-यादिवशी आनंदी चेहरा घेऊन यायचा , समर्थांचे चरण स्पर्श करुन पाया पडायचा.. मुंबई शहरात समर्थ कृनाल ह्यांच एक छोठस मठ होत - सदा भरलेला ! तिथेच ते गबलू, मेनका सोबत राहत.. सोमवार ते रविवार , सकाळी 9 ते सायंकाळ 7 पर्यंत मठ चालू असायचा..- एवढ्यावेळेत मोठ्या संख्येने संकट ओढावळेले संकटकर्ते येत व आपल दुख समर्थांना सांगत असत. मठाच्या भल्या मोठ्या हॉलमध्ये असा एकही दिवस नसायचा की तिथे माणसे बसलेली नसतील - आजचा वार रविवार होता - सकाळपासून मठात तुडूंब गर्दी उसळली होती..- समर्थ न थकता आलेल्या भाविकांच दुख :निवारण करत होते..- पाहता - पाहता संध्याकाळ झाली, पावणे सात वाजता एक ढब्बू , जाड्या देहाचा , ढेरी सुट्या - पन्नाशीच्या आसपासचा ईसम मठाच्या द्वारातून आत आला - अंगात निळ्या रंगाचा शर्ट, त्यावर गडद निळसर रंगाच्या उभ्या -आडव्या रेश्या, खाली शिवलेली काळी कॉटनची पेंट, पायांत साधी चप्पल - डोळ्यांवर नंबरचा चष्मा होता - त्यातून ते थकलेले डोळे स्पष्ट दिसत होते - चेह-यावर निराश, दयनीय, काळजी, भय असे मिश्रित भाव पसरलेले , जणु हा ईसमा मोठ्या घोर संकटात सापडला होता.. हॉलमध्ये सतरंजीवर बसलेल्या मांणसांमध्येच तो ही बसला. हॉलमध्ये सर्व मांणसांच्या पुढे गादीवर मांडी घालुन समर्थ बसले होते - त्यांची नजर त्या ईसमावर गेली होती - समर्थांच्या वाचक दृष्टीने त्यांनी त्या ईसमाच्या चेह-यावरील भाव वाचले होते , हा ईसम कोणत्यातरी घोर संकटात सापडलेला आहे , हे त्यांना नुस्त पाहण्यानेच कळाल होत.. समर्थांच्या द्रुष्टीत एक दैवी शक्तिचा अंश होता , समोरच्या चेह-यावर पसरलेल्या नुसत्या भावनांत्मकांनीच ते पुढील माणसाच्या मनात काय सुरु आहे हे ओळखत असत! समर्थांच्या डाव्या बाजुला दात काढत हसणारा गबलू होता - तर उजव्या बाजुला मेनका. समर्थांनी उजव्या बाजुला उभ्या मेनकाला ईशारा करत आपल्याकडे बोलावलं , मेनका समर्थांपाशी आली, तसा समर्थांनी तिला त्या ईसमाला आपत्कालिन खोलीत नेहायला सांगितलं.. मेनका त्या ईसमापाशी चालत आली, एक मिनिट तीच आणि त्या ईसमाच काहीतरी बोलण झालं , तो ईसम जमिनीवरुन उठला - व हॉलच्या उघड्या दरवाज्यातून मेनका मागे बाहेर निघून गेला.. जरा पंधरामिनिटांनी मठ बंद व्हायची वेळ झाली , तसे सर्व भाविक निघुन गेले.. काहीवेळानंतर : ती एक प्रशस्त खोली होती - चारही दिशेला भिंतींवर महागड्या फरशी बसवल्या होत्या - हॉलध्ये भिंतीवर एक मोठी स्मार्ट टिव्ही होती, सोफा, टिपॉय , खुर्च्या - भिंतीवर एक थंड हवा देणारी एसी लावली होती , तीचा थंडगार वारा खोलीत फिरत होता. छताला एक भलमोठ्ठ झुंबर टांगल होत , त्याचा लखलखता , झगमगता प्रकाश सारी खोली उजळुन गेला.. खोलीतल्या त्या सोफ्यावर समर्थ बसले होते.- बाजुच्या खुर्चीवर तो ईसम बसलेला -चेह-यावर तेच ते अस्वस्थ, निराश, भीतीमय भाव पसरले होते - दोन्ही हातांचा चाळा सुरु होता.. " तुमच नाव काय !" समर्थ प्रेमळ स्वरात म्हंणाले. त्यावर त्या ईसमांनी आपली ओळख सांगितली... त्यांच नाव चंद्रकांत लेमाय , मुळचे अंबरनाथ शहरातील एक गावातील रहिवाशी होते .! अंबरनाथमध्ये त्यांचा चहाचा स्टॉल होता, धंदा चांगला होत - होता , घरात कसलीच अडचण नव्हती- परंतू ह्या ईसमांकडून अनावधणाने गोष्ट घडली होती..त्या अनावधणाने एक संकट त्यांच्या मित्रावर ओढावल होत.. तीच गोष्ट चंद्रकांतराव सांगू लागले..- माझा एका सदानंद नामक जवळचा मित्र आहे... सदा व्यवसायाने स्टेशनरी शॉप चालवतो तर माझा चहाच स्टॉलच दुकान आहे - आमच्या दोघांचीही दुकान एकाच बाजारात असुन थोडी लांब पण जवळच आहेत. आम्ही दोघेही एकाच गावात राहतो, दुकान बंद करायची वेळ एक असल्याने शेवटी संध्याकाळ झाली की एकत्रच घरी जायलाही निघतो.. तर झालं अस .. आकाशात निलसर आकाश गंगा अवतरली होती , आज पौर्णिमेची रात्र झालेली चांदने स्फटीकासारखे चमक होते... कावळे आकाशातुन उडत का,का,का करत घर गाठू लागले होते त्यांचा अभद्र आवाज जणु कसल्या तरी संकटाची चाहूल लावुन देत होता. मी दूकान बंद करुन सदाच्या दुकानावर आलो , तर सदा त्याच दुकानच बंद करत होता.! आज सदाने घरी जातांना मटण घेऊन जायचं ठरवलं होत , कारण आज त्याच्या घरी पाव्हणे आले होते.. बाजारातल्याच ओळखीच्या हकीम चाचाच्या मटणाच्या दुकानावरुन हलाल मटण विकत घेऊन आम्ही रस्त्याला लागलो.. सदाच्या हातात धरलेली काळ्या रंगाची प्लास्टीकची पिशवी येणा-या , जाणा-या लोकांना दिसत होती , तसं लोक पिशवीकडे पाहून मनघालत जिभळ्या चाटत होते. आम्ही .दोघेही हमरस्त्यावरुन चालत जाफ होते. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दोन्ही तर्फे विविध प्रकारची दुकाने लागत होती..येणा जाणा-यांना आकर्षित करण्याकरीता रंगीबेरंगी लाईटजने इलेक्ट्रॉनिक दुकाना सजली होती. एका नव्या नवेली नवरीसारख शृंगार करुन ती दुकान सजून बसली होती.आजुबाजुला रस्त्यावरुन जाणा-या वाटसरुंना जणू ती दुकान आपल्या सौंदर्यांची मोहीनी घालून संमोहिंत करुन आपल्याकडे बोलावतच होती. " दिग्या मटका सटक्याचा हंगाम कधी आहे रे ? " सदाने चालता चालताच मला प्रश्ण केला. मला आणि सद्याला मटक्याच फार वेड आहे. " हो आजपासून चार दिवसांवर !" मी म्हंटलं . " वा वा हे भारी झाल बघ ! लेय दिवस झालं मटका नाय खेळला - !" सदाने चालता चालता सहज नजर उजव्या बाजुला टाकली. तस त्यांना दिसल.. रस्त्यावर एक सुरकुतलेल्या चेह-याची काल्य रंगाची, एक चेटकी दिसणारी म्हातारी गोल टोपली घेऊन बसली आहे . टोपलीत मातीच्या लहान मुलांना खेळावयाच्या रंग दिलेल्या लहानसर बाहूल्या आहेत. तिचा बिचारीचा आज धंदा कमीच झाल्यासारखा वाटत होत! कारण तिच्या सुरकुतलेल्या चेह-यावर दु:खी भाव झळकत होते. सद्याला तिची किव आली. " थांब चंद-या ! " विलासरावांनी दिगंबररावांना नजरेने इशार करत पुढे पाहायला लावल." काय झाल रे ?" मी त्याला न समजून विचारलं..."अरे त्या बिचा-या म्हातारीचा धंदा नाय झाला वाटत! बघ ना कशी बसले बिचारी !" सदा म्हंणले. दोघांनाही तिची किव आली. तसे दोघेही तिच्या जवळ पोहचले. " काय ग म्हातारे , एक मूर्ती कितीला दिली ?" सदाने विचारले... त्यांच्या वाक्यावर त्या म्हातारीच्या चेह-यावर एक खूनशी, छद्मी हसू पसरले , डोळ्यांतली बाहुले चकाकली.! तिच्या सुरकूतलेल्या चेह-यावर हळुच एक क्रूर हास्य फूटल. . असो पुढे " एक मूर्ती दहा रुप्पे पोरा ! " ती म्हातारी तिचया खोल खर्जातल्या भसाड्या आवाजात म्हंणाली. सदाने दोन वीस रुपयांच्या मुर्त्या घेतल्या, व पन्नास रुपये म्हातारीला दिले , व तीस रुपये तुलाच ठेव म्हंटलं. सदाने दोन मुर्त्या हाती घेतल्या, सदाने मला सुद्धा एक मुर्ती घ्यायचा आग्रह केला.. परंतू त्या म्हातारीला माझ्याकडे ते विचीत्र न शोभणार हास्य करुन पाहता मला ती मुर्ती काही आवडली नाही... " पोरा आज तुझ्या मुळ माझा थोडासा तरी धंदा झाल बघ! नायतर आज माझी चुल पेटलीच नसती बघ ! " ती म्हातारी आपल्या जागेवरुन उठली...टोपल डोक्यावर ठेवून घरी जाऊ लागली.. आम्ही दोघेही पुन्हा रस्त्याला लागलो, माझ्या मनाला मात्र त्या म्हातारीच वागण फार विचीत्र वाटलं होत , म्हंणूनच मी मागे वळून पाहिलं.. तसा मला दिसलं..ती महातारीने मागे वळुन मान हलवत आम्हालाच पाहत होती , तिच्या एका गालात तेच ते क्रूर हसू होत.- डोळ्यांत कू चेष्टेची लकाकी होती. मला तीचे ते भाव भयंकर अस्वस्थ करत होते , आम्ही तीची मदत केली , आणि ती अशी पाहत होती , ईतक्या भयंक हास्याने..? वीस - पंचवीस मिनिटांनी आन्ह दोघांनिही बाजार मागे सोडल ...होत. आता आमच्या गावचा मातीचा माळराण रस्ता लागला होता. अवतीभवती माळरान होत , उंच उंच डोंगर द -या दिसत होत्या, माळरानातल्या खालच्या जमिनीवर हिरवा गवत उन्हाच्या उष्ण प्रकाशाने सुकून तपकिरी झाला होता - त्याच तपकिरी गवतात कधी- कधी एक सळसळ ऐकू होती- नक्कीच त्यावरुन मानवी चाहुलीला भिऊन जमिनीवर रेंगाळणारा सर्प दूर पळून जात होता.. सदाला लहानपणापासून भुताच्या गोष्टी ऐकायला , व मसाला लावून सांगायची फार हौस, आता सुद्धा तो मला माळरानातल्या माटुळक्या नामक भुताची आपबीती सांगत होता.. " सदा हा विषय ईथ काढु नको, घरी गेळ्यावर बोलू ! कारण माझी आई म्हंते रात्री अश्या जागेंवर असा विषय काढू नये, नाहीतर चेष्टा होते..- .!" " अरे दिग्या अस काहिही नसत रे , भुत -बित ह्या गोष्टी खोट्या आहेत - मी तर फक्त तू भितो म्हंणून तुला मुद्दामून सांगत होतो..हिहिहिहिही!" सदा माझ्या बोलण्यावर मला व मोठ्याने येड्यासारखा लागला.. तेवढ्यात मला त्याच्या हातात असलेली ती राजस्थान पेहराव असलेली , स्त्री आणि पुरुष अशी मातीच्या बाहुल्यांचे डोळे लाल रंगाने चकाकतांना दिसले.. परंतू पुन्हा पाहिल्यावर मात्र ते डोळे जशाच तसे होते..- मला वाटलं माझा भास असावा..- असंच थोडवेळ भुत आहे की नाही ह्या विधानावर आमच्या गप्प चालल्या. सदा माझी जरा जास्त चेष्टा करत होता.. मला त्याच हे बोलण पटल नव्हत - शेवटी मी आणी सदाच एक छोठस भांडण झाल आणि रागाच्या भरात मी काय ते बोलून गेलो .. समर्थांच्या पुढ्यात खुर्चीवर बसलेल्या चंद्रकांतरावांचे हात लटा लटा काफू लागले,.चेह-यावर भीती छा गई, श्वास मोठयाने आत बाहेर ओढले जाऊ लागले.. जणू पुढे जे कही घडलं भितीदायक होत. चंद्रकात राव थिजल्यासारख्या जागेवर बसले होते - मेनका, गबलू, समर्थ ते पुढे काय सांगतील ? हे ऐकण्यासाठी आतूर झाले होततसे चंद्रकांतराव बोलू लागले.. " मला सद्याचा खुप राग आलेला.! " तसा मी रागातच त्याला म्हंटलं " ठिक आहे सद्या लेका, खुप हिंम्मत आहे ना तुझ्यात , जाम दम आहे ना ! तर एक काम कर , तुझ्या ह्या मटणाच्या पिशवीतून एक मांसाचा तुकडा काढ आणि पुढे बंद पडलेली फैक्ट्री आहे .! माहीतीये ना तिथे , त्या फैक्ट्रीत एक वडाच झाड आहे- त्या झाडाला नाही का एका कामगाराने चार महिन्याचा पगार न मिळाल्याने फास लावून जिव दिला होता , आणी त्यामुळे फैक्ट्री बंद झाली होती., चल त्याच झाडाखाली हा मटणाचा तुकडा ठेव , आणी त्या आत्म्याला आव्हान दे..!" मी एवढ बोलून शांत झालो, आणी एकटक सदाची प्रतिक्रीया काय येते ते पाहू लागलो. पन खुपवेळ निघुन गेला सदा गप्पच होता. मला वाटलं सदा घाबरला , आम्ही वाटच चालतच होतो , हळू हळू रस्ता कापला जात होता , आणि बंद पडलेली खुराना फैक्ट्री जवल येत होती. शेवटी पाच मिनीटांवर फैक्ट्री आली.. आणि तोच सदा पुन्हा मस्तीत आला..! ईतक वेळ शांत चालणारा सद्या येड्यागत वागू लागला , त्याने मला फैक्ट्री बाहेर उभ राहायला सांगितलं आणि स्वत: हा आपल्या हातातली मटणाची काळी पिशवी, त्या दोन अभद्र थोबाडाच्या बाहुल्या - घेऊन फैक्ट्रीच्या तूटलेल्या गेटमधून आत घुसला.. " चंद-या रांxxच्या तुझ्या मनासारख करुन येतो, तुझ्या आईची गां xx तुझ्या..! ह्ह्ह्ह्ह्ह्हह्ह्ह , थांब.. !" सदाने मिल्या शिव्या दिल्या व फैक्ट्रीच्या दिशेने निघाला.. फैक्ट्रीला चारही बाजुंनी तारेच्या जाळ्याच कंपाउंड होत , मधोमध दोन झापांच गेट होत - एकीकडच शाबूत, तर दुसरा दारुड्यासारख झुकल होत.. गेटमधून पुढे आल्यावर शंभर पावळांवर ती बंद पडलेली काळीकट्ट श्रापित वास्तु होती, कधीकाळी तिथे मानवांचा चौवीस तास राबता होता , फैक्ट्रीत काम करणा-या वामन सिर्वे त्याच चार महिन्याच पगार मालकाने थकवल्याने त्याने फैक्ट्रीच्या पुढे असलेल्या वडाला अमुश्याच्या रातीला फास घेऊन आत्महत्या केली होती , मरणाच कारण चिठ्ठीत लिहिलं होत , चार महिन्याच पगार मालकाने थकवल्याने आत्महत्या करत आहे.. वामनच्या आत्महत्यानंतर फैक्ट्रीत रहस्यमय घटनांचा जनू पिसारा फुलला होता - मशीन आपो-आप चालू होत , बंद होत ! रात्री-अपरात्री एका अनोळख्या आस्तित्वाची चाहुल लागे , अंधारात एकट चालत जातांना काळी सावली उभी दिसायची, अगदी प्रेतासारखी ताठरपणा आलेली सावली. एक दोन जणांनी तर वडावर लटकणार ते वामनच भुत की प्रेत , वडाच्या झाडाला लटकलेल पाहिलेल- त्याचे निर्जीव मृत बेडकासारखे खोंबणीतून बाहेर आलेलेडोळे , तोंडातून सरड्यासारखी बाहेर लोंबत असलेली जिभ . रात्रभर मयत झाडाला लटकत राहिल्याने त्वचा पांढरी पडली होती .-मयतातून घाण, कुजकट वास हवेत सुटला होता... चंदरने समर्थांकडे पाहिलं - " समर्थ , खर तर एकक्षण तर मला असं सुद्धा वाटल की मी सदाला हे असं काही कर म्हंणू सांगायलाच नको होत - पन राग हा रावण असतो , हेच खरं ! सदा आता थांबणार नव्हता.. वेळ निघुन गेली होती - सदा आता कितीही थांबवण्याचा प्रयत्न केल तरी तो माझं ऐकणार नव्हता. " -फैक्ट्रीपासून जरा बाजुलाच एक पंधराफुट उंचीच वडाच झाड होत ..! वडाच्या झाडाच्या अजस्त्र भुतावळी फांद्या वाकड्या तिक्ड्या जखिणीच्या वाढलेल्या नखांसारख्या चहोबाजूंनी झाडावर पसरल्या होत्या. वडाच्या पानांनी चंद्राचा दुधाळ पांढरा प्रकाश आपल्या आत शोषुन घेतला होता ,वडाची काळी सावली जमिनीवर पसरली होती.. ह्याच झाडाला एकेकाळी अमुश्याच्या रात्रीच्या वेळेस वामन ने फास लावून घेतला होता- फैक्ट्रीतली कामगार मांणस तर अस म्हंणत होती की त्या झाडावर वामनचा आत्मा बांधूण पडलाय, त्या मुक्ती मिळाली नाही..- तो अद्याप सुद्धा पगार मिळेल ह्या आश्याने तिथेच टपून बसला आहे.. चंद्रकांत गुढ स्वरात हकीकत सांगत होते - गबलू , मेनका, समर्थ कृनाल सर्वजन.कान देऊन मग्न होऊन ऐकत होते.. वातावरणात अंधारुन आल होत - उजेड म्हंणायला सदाकडे स्मार्टफोन टॉर्च पेटलेली होती. वामनच्या मृत्युनंतर घडणा-या अपरिचित, भयावह, अकल्पनिय प्रकारांनी एक एक करत सर्व मजुर कामगारांनी फैक्ट्रीत कामाल यायच बंदच केल होत - सर्वाँनाच काहीबाही चेष्टा होतांना जानवल्या होत्या. जिव सलामत तो पगडी पचास , नाही का !? फैक्ट्री बंद असल्याने तिथे साफ सफाई होणे अशक्यच , त्या झाड लोट होत नव्हती टॉर्चच्या उजेडात वडाच्या झाडाची पान , अजुबाजुला बराच कचरा खाली अंगनात पडलेल दिसत होत.. दारु पिणा-यांनी बाटल्या फ़ोडल्या होत्या , सिगारेट, गांजा, बिडीची अर्धवट झालेली बुडे फ़ेकली होती. आकाशात हळकस चांदण पडलेल ,तोच चांदण्याचा प्रकाश वडाच्या झाडावर पडल जात अंगणात झाडाची काळीशार अभद्र , काळ सावटी अतृप्त - अशुभ छाया उमटलेली , सदाच्या अंगाला अंगणात एक हलकासा गारवा झोंबत होता . रातकीटकांचा किरकीरण्याचा आवाज मंद गतीने कानांवर पडत होता. त्या आवाजाव्यतिरिक्त तिथे एक विळक्षण , अप्रिय शांतता होती. सदाच्या उजव्या हातात बोकडाच्या मांसाचा तुकडा होता.. - उजव्या हातात त्या बाहुल्या होत्या.. तोच तुकडा त्यांनी कंबर वाकवून त्या चिंचेच्या झाडाखाली ठेवला आणि वाकलेल्या अवस्थेतच वर पाहिल .. तेव्हाच उजव्या हातातील बाहुल्यांच्या बारीकशी डोकी मंद गतीने सदाच्या रोखाने फिरली , त्यांवर असलेले ते डोळे विस्तवागत चकाकले.. चिंचेच झाड अंधाराने गिळल होत - वेडेवाकड्या काळ्याशार फांद्यांमधुन चंद्राची कोर दिसत होती .. एकक्षण सदाला अस वाटल , भास झाला की हातातील बाहुल्यांची डोके फिरलेत , आणि आपल्याकडेच पाहत आहेत - सदाने गर्रकन वळुन उजव्या हातात पाहिलं , परंतू त्या निर्जीव बाहुल्या तश्याच होत्या - चेह-यावर एक गुढ हास्य घेऊन उभ्या .. ईकडे मी चंद्रकात भेदरलेल्या अव्स्थेत सदाच्या कृतीला पाहत होतो- आजुबाजुच वातावरण ईतक भयावह होत , की ईथली हवा सूद्ध कोणाचीतरी हेर असल्यासारखी वाहत होती..- " ए सद्या, रांडxxच्या चल ना बास झाला चल, माझी हौस फिटली ना भडव्या हरलो मी चल...!' मी भीतच जागेवरुन ओरडत तोंडात येतील तेवढ्या शिव्या सदाला दिल्या.. शिव्यांची अक्षरक्ष लाखोळी वाहिली.. पन सदाने मात्र माझ्याकडे ढुंकूनही पाहिल नाही .. जणु त्याला आवाजच जात नव्हता ? किंवा ऐकून ही प्रतिकार देत नव्हता!° मी सद्याला सांगितल्यानुसार तो वडाच्या झाडाखाली जागेवर उभा राहिला व मोठ्याने ओरडून म्हंणाला. " हे माझे मायबाप अंधाराचे राज्यकर्ता, अंधारातले रहिवासी आता त्वरा करा , माखन नैवेद्य चाखा - आणि माझ्या बरोबर यावे , यावे , यावे , यावे..!!" सदा एवढे बोलून दोन्ही हात हवेत उठवून वेड्यासारखा हसू लागला.. - पन काहीच झाल नाही..! फक्त रातकीड्यांची किरकीर तेवढी थांबली जात एक विळक्षण थरथराट माजवणारी सुन्न शांतता पसरलेली. तोच अचानक निल्याभ्र आकाशातल्या पुनव्याच्या चांदण्याला , काळसुट ढगांनी घेरल- व धाड असा कर्णभेदक आवाज झाला , ढगांच्या घर्षणाने म्हंणा की , त्या हैवानाची सिद्धांत खून म्हंणा - एक लक्ख प्रकाश पडला जात , सळसळती विज- आकाशातून खाली झेपावली- कोठेतरी पडली ... मग वातावरणात घोंघों करत वारा वादळ सुटल- व आला तसाच तो थोडवेळ थैमान घालून निघुन गेला.. ह्या घडलेल्या घटनेने सदा जरी घाबरला नसला , तरी माझी मात्र भयंकर भीतीने गर्भगळीत अव्स्था झाली होती.. मनाला कोठेतरी धोका घडला आहे , आपल्या हातून निसर्गाचे नियम मोडुन टाकले गेले आहेत अस मन सांगत होता.. काहीवेळाने आम्ही दोघेही पुन्हा घरच्या वाटेला लागलो - तेव्हा मला सदाच्या हातातील त्या बाहुल्यांमध्ये एक अघोरी बदल झालेलं जाणवलं .. जणू त्या निर्जीव बाहुल्यांमध्ये एक अघोरी चेतना शिरली होती. चंद्रकांतने समर्थांकडे पाहीलं , चंद्रकांतह्यांचा चेहरा जरासा ओढला ताणला गेला होता - भयाची एक रसरसती ठिंणगी अंगात शिरली होती. खोलीमधल्या एसीतल्या थंडीतही चंद्रकांत ह्यांना दरदरुन घाम फुटला होता -खोलीत एक गडद शांतता पसरली होती , त्या शांततेत फक्त चंद्रकांतरावांचा तो अनुभवाच आवाज घुमत होता. चंद्रकांतराव पुढे सांगू लागले. " त्या दिवसा नंतर पुढच्या आठवडाभर सदाला विचीत्र भास , आभासी खेळांनी झपाटून टाकलं - त्या मध्यरात्री काही काही विचीत्र स्वप्ने पडत होती- झोपेतून दचकून जाग येत होती. सतत दोन्ही खांद्यांवर भार असल्यासारख अंग दुखत होते - अस वाटत होत की अंगा खांद्यावर कसला तरी ओझा आहे. रात्री दिड वाजेच्या समई छातीवर कोणीतरी बसल्याची जाणिव होई , एक दोनदा उठून पाहिल्यावर छातीवर त्या दोन बाहुल्या पडलेल्या दिसायच्या - बैडवर एका कुशीवर झोपले असताना सतत मागे कोणीतरी उभ राहून आपल्याकडे एकटक पाहत्ंय अस मनाला वाटायचं , पन मागे वळून पाहिल्यावर रिकामी जागा नजरेस पडायची , रात्री - अपरात्री चार पाच वेळा त्याने आपल्या खोलीत स्त्री- पुरुष असा दोन आवाजातील हलक्या स्वरातल्या कुजबूजण्याचा तर कधी हसण्याचा आवाजही ऐकला होता. .. चंद्रकांतने समर्थ गबलू मेनकाकडे पाहिलं .. पुढे बोलू लागले. एकेदिवशी सदा मटका खेळायला म्हंणून हनूमान गल्लीत गेला होता . हनुमान गल्लीतला मटका सटका संध्याकाळी सात ते बारा वाजेपर्यंत चालू असायचा .. मटक्याच्या मालकाने पोलिस हफ्त्यावर काबूत ठेवले होते - म्हंणूनच रेड वैगेरेच काही प्रॉब्लम नव्हत.. त्या दिवशी सदा रात्री बारा वाजेपर्यंत सदा मटका खेळत होता - मग सव्वा बारा वाजता तो घरी परत यायला निघाला.. आकाशात चंद्राची कोर उगवली होती,चंद्राचा निळसर, जांभला प्रकाश चौहू दश दिशेना पसरला होता . त्या निळसर प्रकाशात आजुबाजुला असलेली झाडे गडद काळीशार दिसत होती. आणी समोरची मातीची ती सरळ गेलेली पायवाट कालोखात बुडली होती.. हातातल्या बैटरीचा पिवळसर गोल प्रकाश बिंदू अंधाराच्या काळ्या पडद्याला चिरुन सदाला समोरची वाट दाखवण्याच काम बजावत होत.. थंडीचा महिना असल्याने मध्यरात्रीच पांढ़रट मंद धुक अवतीभवती पसरल होत. त्याच धुक्यातून चालत जातांना थंडी अंगाला चिटकली जात एक तीव्र सनक हाडा मांसात घुसत होती व थंडीच्या स्पर्शाने सर्व शरीर शहारुन उठत होत.. सदाच्या पायात असलेल्या पैरागॉन चपलीचा चट चट आणी रातकिड्यांचा किरकिर असा मिश्रित आवाज त्याच्या स्वत:च्या कानांवरच पडत होता. सदा बैटरीच्या पिवळसर उजेडात वाट कापत निघालेला ..! तोच अचानक त्यांच्या मागून कोणीतरी वेगाने धावत गेल.. जमिनीवर धावतानाचा धप धप असा पावळांचा आवाज कानांवर पडला तसे सद्याने गर्रकन वळून मागे पाहिल.. हातातल्या बैटरीचा पिवळा प्रकाश मागे मारला.. पन बैटरीच्या उजेडात मागे धुक्याव्यतिरिक्त कोणिही दिसल नव्हत.. भास झाला समजून सदा पुन्हा चालू लागला - सुरक्षाखातर त्याने रस्त्याबाजुची एक झाडाची जमिनीवर तूटून पडलेली जाडजुड फांदी हातात घेतली.. सदाला चालतांना असा भास होत होता ..की आपल्या शरीरापासून दोन पावळे मागेच कोणीतरी मर्कट चाले करत चालत आहे - दबक्या पावळाने आपला पाठलाग करत मागे मागे येत आहे.. सदाच्या कपालावर जरासे घामाचे द्रवबिंदू साचले गेले - नाकपुड्या फुगवून फुगवून तो श्वास आत ओढु लागला कारण मागे जे कोणी होत , त्याची भयंकर अजस्त्र उंच सावली सदाच्या पुढ्यात पडली होती , उंच ताठलेल शरीर , अंगात फुल बाह्यांचा सदरा, खाली फुगीर विजार - डोक्यावर राजस्थानी फेटा होता - आणि दोन्ही हातांच्या दहाही बोटांची नख पाच ईंचानी वाढलेली होती.. सदाच्या मनात भयाने भलते सलते विचार येऊ लागले.. कोणी चोर असेल तर? , किंवा भुत असलं तर ? आपण एकटे त्याला मारु रोखू तरी शकू का ? सदाला चाहुल लागत होती -मागे चोर नाही , भलतंच काहीतरी आहे ! एकवेळ चोर पैसे घेऊन सोडेल , पन त्यांच्या मागावर जे काही आहे , ते जिव घेतल्याशिवाय बिल्कुल सोडणार नव्हत..! हातातल जाडजूड लाकूड़ गच्च पकडून सदाने गर्रकन मागे वळत, मागे जे कोणी होत त्याच्या अंगावर मारत ती फिरवली, परंतू त्या लाकडाचा फटका कोणालाही बसला नाही.. कारण मागे कोणिही नव्हत. दुस-या हातातल्या बैटरीचा पिवळसर प्रकाश थोड दूर एका झाडाच्या खोडावर पडला होता आणी त्याचक्षणाला त्या खोडाजवळ उभ असलेल ते पिठासारख काटकूळ ध्यान वेगान झाडाच्या मागे लपल होत.. सदाल वाटल झाडा पल्याड लपलेला तो ईसम चोर आहे , तस त्यांनी जोरात हाक दिली.. " ए कोण आहे तिथ, बाहेर ये !' सदाच्या वाक्यावर एक हलकासा घोगरा हसण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून विलासरावांना जराशी भीतिच वाटली , कारण तो सामान्य मानवी आवाज मुळीच वाटत नव्हता. त्यात घोग-या स्वराचा ताळ होता. त्यात कुटीळ भाव होते - एक वाईट जहरी स्पर्श होता. " sसदा ssss ..!" झाडामागून सदाच नाव घेतल्याच आवाज आला. सदाच्या हातातल्या बैटरीचा पिवळा प्रकाशझाडाच्या खोडावरच मारलेला होता.. आणी त्याच पिवळसर उजेडात झाडाच्या खोडामागून पिठासारखा एक प्रेताड म्हातारीचा चेहरा हळुच बाहेर आला.. पुर्णत चेह-यावरच रक्त शोषल गेल होत, डोक्यावर मुंज केलेल टक्कल होत - डोळ्यांची बुभळे पिवळेजर्द काजव्यासारखी चमकत होती आणी त्या दोन्ही डोळ्यांत दोन मीरीएवढे काळसर टिपके..होते.. काळेशार ओठ फाकवत जबडा विचकून दात दाखवत ती चेटकी म्हातारी सदाकडे पाहून हसत होती.. हे असल ध्यान पाहून सदाची बुद्धीच काम करायची ब्ंद झाली , हातातली काठी केव्हाच गळून खाली पडली- " सदाssss..! तू माझ्या बाहुल्या घेतल्या ना , त्यांना जागवल्या तू ..हिबिहिबिहिहीह..! बघ त्या आता सोबतच आहेत हिहिहिहिहां त्यांना तू जाम आवडला आहे सदा आता ह्या आमुश्याला ..ती तुला त्यांच्यासोबत घेऊन जाणार आहेत ..आणी मगत्या बाहुल्या तुला त्यांच्या सारख्या बनवतील....! " अस म्हंणतच ते ध्यान हळु हळु तुरु तुरु धावत सदाच्या दिशेने येऊ लागल.. सदा भीतिपोटी हळू हळू मागे मागे सरकू लागले..- भीतीने त्यांच्या तळपायाखालची जामिन सरकली होती.. समोरच द्रुष्यच ईतक भयंकर होत की मर्दानगी दाखवणा-या सदा भीतिने कोंबडा, कासव , कुत्रा, बैलसर्व होऊन गेल होत.. " ये म्हातारे म मला सोड वाटलस तर मी तुला पैसे देतो !" सदा भीत भित बोलला.. .. " पैसे ? पैसे नको ..- तू सोबत पाहिजे मला, खिखिखिखी ..!" ती चेटकी म्हातारी सदाच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागली.. मानवाला मृत्युची भीती वाटली , किंवा स्वत: वर कधी कठीण प्रसंग ओढावला तर त्याच्या हालचालिंना अमानवी वेग येतो सदा उर फाटेस्तोवर धावत सुटला. मरणाच्या भीतिने पायांना फ्लश सुपरहीरी वेग आल होत..दहा - बारा मिनिटातच त्याने गावाची वेस ओलांडली.. वेस ओलांडताच मागून तो मोठा आवाज सदा ऐकला होता. " वाचलास रे वाचलास, पन घरातल्या त्या बाहुल्यांपासून कोण वाचील..तुला हिहिजी! " शेवटी कसातरी सदा त्याच्या घरी पोहचला , धाड धाड करत त्यांनी दार ठोठावल.. त्यांच्या पत्नी नीरीनी दार उघड़ल आणी दार उघड़ताच सदा झटकन आत घुसला , त्याच घामाजलेल शरीर, फुललेले श्वास पाहून नीराला त्याची खुपच काळजी वाटली ..तस त्यांनी काय झाल हे विचारल सुद्धा पण सदा बोलण्याच्या मनस्थीत नव्हते.., दुस-या दिवशी विलासराव अंथरुनाला खिळले होते त्यांना सड़सडून ताप भरला होता.. ! काळचे कपडे सुद्धा अंगावर जसेच्या तसे होते.. चंद्रकांतरावांनी समर्थांकडे पाहिलं.. " शेवटी दुस-या दिवशी मी सदाच्या घरी गेलो तेव्हा सदाची ही अव्स्था पाहून मला लागलीच कळुन चुकल की काय झाल आहे ते.. तरी सुद्धा मी सदाला विचारलंच की काय झाल आह , तुला असअचानक काय झाल , कालरात्री पर्यंत तर एकदम ठिक होतास - शेवटी विलासरावांनी चार पाच दिवसांअगोदर फैक्ट्रीपासून , ते रात्री - अपरात्री पडणारी स्व्पन, विचित्र असे होणारे भास , आणी कालरात्री घडलेला तो भयंकर प्रसंग मला सांगितला.. " समर्थ !" चंद्रकांतरावांनी मदतमय स्वरात बोलायला सुरुवात केला. " सदा खुपच घाबरला आहे ,घरातून बाहेर निघायला तैयारच नाही, मनात भीती भरली आहे त्याच्या , नाहीतर मी त्याला ईथेच आणनार होतो, कृपया आमची मदत करा समर्थ - माझ्या चुकीमुळे माझा मित्र अडचणीत सापडला आहे..!" चंद्रकांत दयनीय स्वरात म्हंटले.. चंद्रकांतना अजुन काहीही सांगायचं नव्हत .. समर्थांच सर्वकाही ऐकूण झालं होत , तसे समर्थ म्हंटले. " अनावधणाने घडलेली चुकी ईश्वर पदरात घेतो, मग आम्ही तर फक्त नाममात्र - जशी श्री ची ईच्छा, चला - सदा ह्यांच घर दाखवा..!" समर्थ म्हंणाले. ईतक ऊशीर दयनीय, निराश , भाव चेह-यावर घेऊन बसलेले चंद्रकांत , समर्थांच्या ह्या वाक्यावर फार खुश झाले.. मेनकाच्या जीपमध्ये बसून सर्वजन सदाह्यांच्या घरी आले.. - सदा त्यांच्या खोलित बेड़वर पडले होते , सर्व शरीर भीतीने अन्न,पाणी सर्वाँच त्याग केल्याने देहाच सांगाडाच झाला होता - त्वचे हाड मांस चिटकलेल, डोळ्यांनी तळ गाठला होता ., गालफाड आत गेले होते.- पस्तीशीतले - सदा सत्तरीतले म्हातारे वाटत होते.. समर्थांनी त्या म्हातारीकडून विकत घेतलेल्या बाहुल्या त्यांना द्यायला सांगितल्या, सदा ह्यांच्या बायकोने समर्थांना त्या राजस्थानी बाहुल्या आणुन दिल्या. समर्थांनी त्या हाती घेताच , बाहुल्यांमधली अशुभ उर्जेचा उच्चांक त्यांना जाणवला.- त्या साधारणश्या मातीच्या बाहुल्या त्या निर्जीव बाहुल्यांमध्ये एक.आसूरी चेतना घुमसत होती. समर्थांनी एक काळा दोरा हातात घेतला, मग एक काळ्या रंगाची ताविज सदा ह्यांना गळ्यात घालायला दिली.. .सदा ह्यांनी ती लागलीच गल्यात घातली. " मेनका , सदांच्या टाळू ते पायांपर्यंत नारळ उतरव!" समर्थ म्हंटले. मेनकाने सदाच्या अंगावरुन दोन डोळ्यांचा नारळ उतरवला ! मग तोच नारळ मेनकाने फरशीवर आपटत फोडला , नारळातून पाणी निघण्या ऐवजी तो फुटताच आतून काळशार चिपचिपित द्रव बाहेर पडलं - ज्या घाणेरड्या द्रवातून पामलेला ओकारीयुक्त दुर्गँध बाहेर पडत खोलीभर पसरला होता.. " नारळाने सदा ह्यांच्या अंगातून वाईट शक्तिची तंतू , उर्जा खेचली आहे - म्हणुंनच हा नारळ आणि पाणी नासलं आहे.!" समर्थ स्पष्टीकरण देत म्हंटले. समर्थांनी त्या दोन्ही बाहुल्यांना काळ्या दो-यांनी बांधल , व त्या बाहुल्यांचे हात पाय तोडून टाकले.- तसा त्याचवेळेस त्या बाहुल्यांमधून ओरडण्याचे , विव्हलण्याचे, रडन्याचे, शिव्या श्रपाचे आवाज येऊ लागले..- मध्येच दया याचनेची विनवणी केली जात होती.. परंतू समर्थांनी त्या बाहुल्यांचे बारीक बारीक.तुकडे करुन एका पिशवीत भरले, ती पिशवी गबलूकडे सोपवली.. जी गबलूने घाबरतच हाती घेतली " घाबरु नका, संकट ईतकंही मोठ नव्हत -फक्त एक लक्षात ठेवा - रात्रीच्यावेळेस कधीही मातीची खेलणी विकत घेऊ नका. कारण रात्रीची वेळ सैतानाची असते..!" समर्थ म्हंणाले.. त्यावर सदाने फक्त होकारार्थी मान हळवली.. समर्थांनी सदा ह्यांना अजुन काहीबाही उपचारार्थ दिले की महिनाभर घरातच रहा , गावाची वेस ओलांडून महिनाभर कुठेच बाहेर जाऊ नका समर्थांनी अशी सक्त कडक ताकीद दिली.. सदा ह्यांनी कठोरतेने समर्थांचे बोलणे मान्य केले , महिनाभर ते घरीच होते गावाची वेस ओलांडूण ते कुठेच गेले नव्हते...आणी अश्या पद्धतीने महिन्याभरानंतर सदा बरे ते सुखरुप सुटले होते...आणी ह्या जगात भुत,पिशाच्छ, आस्तित्वात आहेत ह्यांवर त्यांचा विश्वास बसला होता. चंद्रकांत ह्यांच्या डोक्यावरच ओझ समर्थांनी हलक केल होत , चंद्रकांत हे समर्थांचे कायम ऋणी राहणार होते..! तर मित्रहो अश्या त-हेने समर्थांच्या सत्याचा विजय झाला.. लवकरच भेटु पुढील समर्थ कथेत.. समाप्त..