Taddy - 7 in Marathi Fiction Stories by Bhavana Sawant books and stories PDF | टेडी(अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग ७

Featured Books
Categories
Share

टेडी(अ स्ट्रेंज लव्हस्टोरी)–भाग ७

भाग ७.


      एका हॉटेल मध्ये गायत्री आपल्या टेडी सोबत एका प्रायव्हेट एरियात बसली होती. तिथं श्रीमंत लोक डिनरसाठी बसत असायचे. गायत्री मेन्यू कार्ड वाचत असते. टेडी तिथं असलेल्या समोरच्या फुलदाणी सोबत खेळत असतो. त्यातील फुल हातात घेत गायत्रीच्या जवळ जाऊन द्यायचा प्रयत्न करायचा. ती घ्यायला गेली फुल की लगेच मागे करत असायचा. ती ही काही त्याला बोलत नव्हती. तिथं बसल्याने ते दोघे कोणाला ही दिसत नव्हते. 



"डॉक्टर, ते श्री. कधी येणार आहेत? बघ कॉल वगैरे करून. मला पण ऐकायचं आहे त्यांच्याकडून मी पुन्हा माझ्या शरीरात जाऊ शकेल का नाही?", टेडी टेबल वर असलेला फोन तिच्या जवळ सरकवत म्हणाला. 



"येणार आहे मग येणारच आहेत ते! टाईमला परफेक्ट आहेत ते. आपण तुझ्यामुळे इथ लवकर आलो आहोत. आता घालव वेळ कसा तो.",गायत्री मेन्यू कार्ड बाजूला करत म्हणाली. 



"डॉक्टर, तू ना समझेगी मेरी खुशी?",टेडी.



"मी समजूनच घेत आहे म्हणून तुझे हे सगळे नाटक सहन करत आहे. बघ माझ्या मनात नसताना लग्नासाठी तयार झाली आहे मी. पण त्या नंतर कोणताही प्रॉब्लेम होऊ नये असे वाटत.",गायत्री चिंता व्यक्त करत म्हणाली.



"कसला प्रॉब्लेम?",टेडी विचारतो. त्याला कोणीतरी चालत येताना दिसते तसा तो निर्जीव टेडी बनतो. गायत्रीला ही समजत तशी ती आपले बोलणे वाढवत नाही. ती ही स्वतःला नॉर्मल करते. तिच्या समोरच्या चेअर वर येऊन एक वयस्कर व्यक्ती बसतो. टेडी एका चेअर वर बसलेला असतो. तो त्या व्यक्तीला पाहत असतो. त्या व्यक्तीच्या हातावर बरेच टॅटू काढलेले असतात. ते थोडे विचित्र असतात. डोळ्यांवर चष्मा असतो. त्यांच्या चेहऱ्यावर या ही वयात कमालीचे तेज होत. निरीक्षण त्या व्यक्तीचं तो करून घेतो.



"हॅलो, बेटा!",ते गायत्रीला म्हणाले.



"हॅलो, अंकल.",गायत्री हसून त्याला बोलते. 



"तू आज खूप दिवसांनी माझ्यासोबत जेवण करायला तयार झाली आहे. याचा आनंद आहे मला. तू दुपारी कॉल केला होता. तर त्याबद्दल ही माझ्याकडे खूप काही सांगण्यासारखे. पण मला कळले नाही तू कशासाठी हे सगळ विचारत आहे? डॉक्टर चा व्यवसाय बंद करत आहेस का?",ते अगदी सहजच विचारत असतात. दुपारी गायत्रीने वेळ मिळाला होता तेव्हा त्यांना कॉल करून थोडक्यात माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी हा विषय कॉल वर न बोलण्यापेक्षा समोरासमोर भेटून बोलू असे सांगितले होते. त्याच मुळे गायत्री आणि ते आज भेटत होते.



"नाही असे काही नाही. मी एक पिक्चर पाहत होते तर त्यात असे एक आत्मा निर्जीव वस्तूत जाते आणि व्यक्ती तो कोमात असताना. त्या नंतर ती त्याच्या शरीरात जाते का नाही? हे माहीत नाही झाले. कारण तेवढ्यात मला कॉल आला आणि मी हॉस्पिटलला निघून गेली. आता मला पिक्चर ही आठवत नाही म्हणून तुम्हाला विचारत आहे. अस घडते का? की उगाच पिक्चर वाले काहीही दाखवत असतात? जवळपास टिव्ही सिरियल, मूव्ही मध्ये लॉजिक नसलेल्या गोष्टी अतिप्रमाणात दाखवत असतात. त्यासाठी आपल विचारत आहे.",गायत्री तिथल्या तिथ अगदी कमी वेळात स्टोरी बनवून सांगते. ती स्टोरी ऐकून टेडीला खरोखरच तिचे कौतुक वाटत असते. ती त्याच्या बद्दल खर ही सांगू शकली नाही. पण त्याचा मॅटर मात्र त्यांच्यासमोर मांडू शकली होती. ते ही अगदी उत्तम प्रकारे. डॉक्टरच्या हुशारीची मनातच तो दाद देतो.



"ओह अस आहे का? ठीक आहे आपण खाता खाता बोलू. तू सांग तुला काय काय हवे आहे?",अंकल तिच्या जवळून मेन्यू कार्ड घेत म्हणाले. गायत्री त्यातील मेन्यू सांगते. ते ही आपले मेन्यू एका वेटरला बोलावून सांगतात. त्यांचं जेवण यायला वेळ लागणार होता. त्या वेळात अंकल त्यांच्यासोबत आणलेल्या बॅग मधून एक, दोन पुस्तकं बाहेर काढतात आणि फाईल ही असतात. ते सगळ काही ते तिच्या समोर ठेवतात.



"जसे आत्मा शरीर आपले खराब झालं किंवा या शरीरात राहून आता ते पुढील त्यांचं आयुष्य काढू शकत आहे हे जेव्हा समजून बाहेर पडतात. तेव्हा त्या मुक्त असतात. म्हटले जाते की, व्यक्तीच्या कर्मावरून त्याच्या आत्म्याचा न्यायनिवाडा केला जातो आणि त्याला स्वर्ग, नरक या मध्ये पाठवले जाते. पण खर तर आत्मा जेव्हा शरीरातून बाहेर पडतो, तेव्हा तो १३ दिवस कुटुंबाच्या आसपास फिरत असतो. त्या नंतर त्याचा प्रवास सुरू होत जातो. चांगला आत्मा आपल्या केलेल्या चांगल्या कामामुळे स्वर्ग लोक मध्ये निघून जातो. पण यात ही कधी कधी आत्म्याची अपुरी इच्छा राहिली तर त्याला इथेच भटकत ठेवले जाते. जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा त्याचा प्रवास सुरू होत असतो. जे काही आसपास आपण भूत प्रेत गोष्टी ऐकत असतो. ते याचेच एक उदाहरण आहे. वाईट आत्मा इथच वास करत असतात म्हणून आपल्याला काही ठिकाणी वाईट गोष्टी ऐकू येत असतात. त्यांनी जन्मभर लोकांच्या वाईटमध्ये आनंद मिळवलेला असतो किंवा त्यांना तसे करून सुख मिळत असते म्हणून ते मेल्यावर इथच वास करत असतात. आमच्या सारख्या लोकांना मग दिसत असतात कधी कधी. तर कधी गॅझेट मध्ये आमच्या त्यांच्या असण्याची खूण देत असतात. 



      या उलट, कोमा मध्ये असलेल्या पेशंट सोबत होत असते. ती व्यक्ती शरीराने आपल्या असली, तरीही तिच्या आत्म्याने ती पूर्ण ब्रह्मांडात फिरत असते. कारण ती आपल्या शरीरात तग धरून राहत नाही. त्याचेच परिणाम वेगळे होतात, ती भेटेल त्या शरीरात वास करायला जात असते. हा वास ठराविक काळापर्यंत असतो. हे खूप कमी केस मध्ये होत असते. आता पर्यंत जगात असे १२५ ते १३० केसेस समोर आल्या आहेत. काही लोक ब्लॅक होल द्वारे दुसऱ्या ग्रहात ही जाऊन येतात, तर काही जण स्वर्ग पाहून येतात. यात जास्त प्रकरण ही दुसऱ्या समांतर पृथ्वी वर जाऊन आलेल्या लोकांचे होते. या पुस्तकात असे केसेस आहेत. वाटल्यास तू वाचू शकते. पण आत्मा जरीही दुसऱ्या शरीरात असली, तरीही तिची ताकद सामान्य लोकांपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे ती आत्मा खूपच शक्तिशाली होत असते कधी कधी.",अंकल एक एक सांगत असतात. टेडी कान देऊन ऐकत असतो. त्याच्यासाठी हे नवीन होत. गायत्री मात्र भीतीने एक आवंढा गिळते. इतके ऐकून नक्कीच तिला भीती वाटत होती. 



"अंकल, कोमात असलेल्या लोकांच्या शरीरात त्यांची आत्मा जाऊ शकते का? ते आत्मा असतात तेव्हा फिरत असतात असे तुम्ही म्हटले आहे. मग त्यांना ते कुठे फिरले? काय पाहिले हे आठवत का?",गायत्री आपली चेहऱ्यावरची भीती लपवत टेडी कडे पाहत म्हणाली. भीती वाटली होती. पण त्या टेडी चा क्यूट फेस पाहून ती कमी झाली होती. 



"हेच तर मोठ आहे. यावर अजून ही रिसर्च चालू आहे. यांची आत्मा यांच्या शरीरात जाते. पण त्यांना आत्मा म्हणून फिरत असतानाचे काहीच आठवत नाही. ते कोणत्या लोकांना भेटले? काय काय केलं? हे काहीच आठवत नाही कधी कधी. काही वर्षांनी यांना आठवत तेव्हा लोक वेडे म्हणतील, या भीतीने हे लोक कधी कधी बोलत नाही. असे बहुतेक ब्रेन मुळे होत असते आपल्या शरीरातील. अस मला वाटते सध्या तरी. कारण आत्मा एक अमर आहे. पण शरीरात कंट्रोल ठेवायचं काम ब्रेन करत असतो. ब्रेन फक्त त्याच्यासोबत जितके घडले तितके लक्षात ठेवत असतो. आत्मा सोबत त्याचा संबंध जास्त येत नाही म्हणून असे घडत असते.",अंकल तिच्या प्रश्नाला चांगल विस्तारित उत्तर देत तिला समजावत असतात. ते सगळ ऐकून तिला काय बोलावे कळत नाही? तिच्या समोर असलेला टेडी तिला काही महिन्यानंतर ओळखणार नव्हता! हे ऐकून हलक तिच्या हृदयात कळ येते.



"वेल पण शरीराला जपणे गरजेचे असते गायत्री.", अंकल  तिच्या कडे पाहत म्हणाले. ते एकदा टेडीला आणि एकदा तिला पाहून म्हणाले. बोलण्याचा रोख तिला चांगला कळला होता. 



"आयथिंक, तुला आता सगळ समजल आहे. तर तू त्या पिक्चरचा एंड काय असेल? याचा विचार करून मला सांगशील नंतर. काय आहे असा पिक्चर मी अजून पाहिला नाही. तू पाहिला आहेस, म्हणते तर नक्कीच त्याची स्टोरी आणि एंड मला काही महिन्याने सांगशील?",सूचक शब्दांत ते बोलत असतात. कदाचित, त्यांना समजल होत. ते ही थोडफार.



"ह....हा अंकल. मी नक्कीच बघून सांगेन. तुम्हाला नाव ही सांगेन.",भानावर येत ती म्हणाली. आता त्यांचे जेवण येत तसे ते बोलणे आपले संपवत खायला लागतात. टेडी मात्र सगळ ऐकून सुन्न होत असतो. श्री. श्रीवर्धन अंकल तिच्या हातात पुस्तक आणि फाईल देऊन आपले जेवण आटपून तिथून निघून जातात. ते जाताच गायत्री टेडीला पाहते. तो नाराज दिसत होता तिला.



"तुला भूक लागली आहे का?",गायत्री विचारते. तो सरळ लेफ्ट टू राईट मान हलवून नकार देतो. 



"मी तुला विसरून जाईल डॉक्टर!",उदास होत तो आपले हात टेबलवर ठेवत म्हणाला.



"पण मी नाही विसरणार ना तुला!",गायत्री फेक स्माईल चेहऱ्यावर ठेवत म्हणाली. 



"डॉक्टर, मी खूप अरोगंट आहे. खूप रागीट आणि गर्विष्ठ आहे. जर मी तुला विसरून गेलो तर मी खूप तुला त्रास देऊ शकतो. तेच मला नको आहे. टेडी मध्ये राहून मी खूप बदललो आहे. तुला टेडी मध्ये असताना त्रास कमी दिला तरीही मी माझ्या शरीरात असताना खूप त्रास देऊ शकतो. तुला नाही माहीत माझ्याबद्दल जास्त म्हणून मला भीती वाटत आहे.",टेडी अगदी प्रामाणिकपणे तिला सत्य सांगत असतो. ते ऐकून ती त्याला पाहते.



"तू त्याचा विचार नको करू. मी ही हट्टी आहे. नंतर बघून घेईन. तू आता पुढे सांग कधी पुढचं पाऊल उचलायचे आहे? तुझ्या फॅमिलीला आधी भेटूया ना?",गायत्री सरळ विषय बदलत विचारते. तो उदास होणार होता. तेच तिला नको होते. तिचे ऐकून तो थोडा सरळ बसतो.



"डॉक्टर, तू माझी खूपच काळजी करत आहेस. तू फॅमिलीला भेटायला आधी नको जाऊ. फॅमिली सीआयडी सारखी चौकशी करून तुला भंडावून सोडतील. ते अजिबात नको आहे मला.",टेडी तोंड वाकड करत म्हणाला.



"मग त्यांनी नंतर विचारले तर?",गायत्री विचित्र नजरेने त्याला पाहत विचारते. फॅमिलीला आधी नको भेटू सांगत होता! हे ऐकून तिला राग आला होता.



"तेव्हा आता जशी स्टोरी बनवली तशी सांग तू त्यांना. आपल लव्ह मॅरेज होत. तू माझ्यावर मरत होती. खूप जास्त प्रेम करत होती.....", टेडी स्वतःच कौतुक करत तिला बोलत असतो. जे ऐकून ती डोळे मोठे करते. काहीशी गुस्यात पाहते. ते तिचे डोळे पाहून टेडी बोलायचा थांबतो. तिचा लाल झालेला चेहरा पाहून तो समजून जातो. 



"अस नको सांगू. मी तुझ्यावर मरत होतो. खूप जास्त प्रेम होत माझं तुझ्यावर. सुंदर अशी प्रिन्सेस सारखी दिसत होती म्हणून मी वेडा झालो होतो. पण अस लग्न करायला मिळणार नव्हते म्हणून आता केले. माझी शेवटची इच्छा होती. असे सांग!",आपले शब्द फिरवत टेडी तिला म्हणाला. ते ऐकून तिचा चेहरा चांगला होतो. तसा तो मोठा सुस्कारा सोडतो. 



"हे चांगल आहे.",गायत्री ही याला सहमती देते. नंतर ते दोघे थोडा वेळ बोलून खाऊन बाहेर पडतात. 



क्रमशः
*******