भाग १०.
गायत्री निखिल सोबत कस बोलायचे? याची तयारी करत असते आणि टेडी तिला तयार करत असतो. त्यांचे चालू असते, त्याच वेळी गायत्री वर अननोन नंबर वरून कॉल येत असतो. गायत्री त्या कडे इग्नोर करते आधी. नंतर पुन्हा पुन्हा येतो. तसा टेडी हात मारत उचलतो. पण त्याच्या त्या स्किन मुळे मोबाईल काही उचलला जात नाही. गायत्री मग स्वतः कडे घेत कॉल रिसिव्ह करून स्पीकर बर टाकते.
"हॅलो, गायत्री देशमुख.",पलीकडून आवाज येतो. टेडी तो आवाज ऐकून मोबाईलला पाहू लागतो.
"हॅलो, काही काम असेल? तर आज जमणार नाही!",गायत्री अस बोलून कॉल कट करायला जाते.
"ही चूक करू नको डॉक्टर. तुझी बहिण घरी एकटी आहे आणि माझी माणसे तुझ्या घरात पोहचली आहे जवळपास. तुझी बहिण वयात आलेली आहे. बघ विचार कर.",पलीकडून त्याचा क्रूर हसण्याचा आवाज येतो. त्याच ते बोलणे आणि हसू ऐकून गायत्रीचा चेहरा बदलतो.
"कोण आहेस तू? काय हवे आहे तुला? माझ्या बहिणीला हात लावायचा प्रयत्न ही करायचा नाही!",गायत्री चिडून बोलत असते.
"माझी ओळख तुला काही कामाची नाही. माझं काम केलं तर तुझ्या बहिणीला सोडेन मी!",ती व्यक्ती आता सिरियस होत म्हणाली. गायत्रीला समजत नाही कॉल कोणाचा होता आणि हे लोक तिच्या मागे का लागले होते?
"कोणते काम?",गायत्री विचारते. टेडी तो आवाज आठवत असतो.
"युवराज पाटील याच्या डोस मध्ये वाढ करून त्याला मारून टाक मग मी तुझ्या बहिणीला सोडून देईन.",तो व्यक्ती बोलतो. तशी गायत्री टेडीला पाहते. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळे चालू होते. टेडी ही तिच्या कडे गरीब चेहरा करून पाहतो.
"मी माझ्या पेशंट सोबत अस वागू शकत नाही!",गायत्री ठाम उत्तर देते.
"मग तू तुझ्या बहिणीला विसर! बघ ती कश्या अवस्थेत तुला भेटते ते?",तो व्यक्ती क्रूर हसत बोलतो.
"प्लीज.....प्लीज.....असे करू नका......माझ्या बहिणीला काही करू नका......मी तुमच्याकडे........", गायत्री अगदी रडत बोलत असते आणि नंतर शेवटच्या वेळी हसू लागते. पलिकडील व्यक्ती शॉक होतो आणि पुढे बसलेला टेडी ही जवळपास उठून उभा राहत तिला पाहत असतो. आता तिच्या चेहऱ्यावर गूढ हसू होते. वेगळे तेज होते.
"तू वेडी झाली आहेस का?",पलीकडून तो व्यक्ती तिच्या हसण्याने विचित्र प्रश्न विचारतो.
"अरे, तू जो कोणी आहेस माझ्याबद्दल चांगली माहिती काढून वार करायचा प्रयत्न कर! काय आहे ना माणसा, माझी बहिण आर्मीसाठी तयारी करत आहे. ती शूटिंग पासून ते मार्शल आर्ट पर्यंत सगळ्यात पारंगत आहे. तुझ्या माणसांना पार्सल करून मी आणि माझी बहिण पाठवून देतो. फक्त अड्रेस सांग! आम्ही एकटे राहतो कोण नाही आहे अस समजून चूक करू नको. आमच्या वडिलांनी आम्हाला स्वतःचे रक्षण करायचं शिकवलच आहे. तू जिला मारायला पाठवलं आहेस? ती त्या व्यक्तींचे हाड नक्कीच मोडून ठेवेल. सीसीटिव्ही असतील लोक तर त्यांना विचार घरात काय झालं आहे ते?",गायत्री खूपच रहस्यमयी हसत म्हणाली. ती हसतच कॉल कट करते. नंतर आपल्या घरात कॉल लावते. तर तिथं काम करणारी मेड कॉल उचलते.
"काय चालू आहे घरात?",गायत्री स्पीकर वर कॉल टाकत विचारते.
"छोट्या मॅडम, धोबीपछाड करत आहेत. मार मार त्याला. असेच फोडून काढ चांगल. आता पर्यंत पाच जण झाले आहे. टोटल अजून वीस जण आहेत. त्या लोकांच्या हातात हॉकी स्टिक आणि इतर साहित्य आहे. पण त्या साहित्याचा वापर अंतरा मॅडम जास्त करत आहे. एकदम त्या साऊथ मूव्ही मधील हिरोसारख्या फाईट करत आहेत.",एक मेड हसून बोलत असते. घरात खूप काही फुटण्याचे आवाज येत असतात. ते ऐकूनच तिला समजून जात आज कोणी तिच्या हातून वाचणार नाही आहे.
"तिला सांग कोणाला सरळ पायाने चालत बाहेर पाठवू नको! ज्याने कोणी पाठवलं आहे त्याला देखील कळले पाहिजे देशमुखांच्या मुली कश्या आहेत त्या? संध्याकाळी दोन आयस्क्रिम टब मिळतील तिला!",गायत्री बोलते. तशी मेड जोरात ओरडून अंतराला सांगते. आयस्क्रिम टब बद्दल ऐकून तर ती आणखीन जोरातच त्या व्यक्तींना मारत असते. सगळ्यांना जमिनीवर लोळवून ती फोन घ्यायला येते.
"काय दीदी?", अंतरा विचारते.
"आज लवकर घरी आली तू? सांगितले नाहीस मला?",गायत्री शांत होत विचारते.
"आज एक लेक्चर ऑफ झाला म्हणून लवकर आली. थोड वॉर्म अप करत होती. तर हे लोक आले. आता माझा चांगला वॉर्म अप झाला आहे. आता मी काय पुन्हा वेगळा करत नाही.", त्या लोकांवर नजर टाकत ती म्हणाली.
"ठीक आहे. तू तुझा अभ्यास कर. त्या लोकांना सरकारी हॉस्पिटल मध्ये भरती कर!",गायत्री समाधानाने हसत म्हणाली. तशी अंतरा "ओके" म्हणून कॉल ठेवते. टेडी तर आतापर्यंतचे त्यांचे बोलणे ऐकून दूर होऊन बसतो.
"तुम्ही आहात कोण डॉक्टर नक्की? मला भीती वाटत आहे आता! सॉरी तू माझा पती मी तुझी पत्नी नाही. ते बोलले ना....त्या बद्दल सॉरी....",टेडी त्यांचे बोलणे ऐकून घाबरून जे सुचते ते बोलत असतो. आता ती हसून त्याच्या जवळ जाते आणि त्याला उचलून डेस्कवर ठेवते.
"इतका घाबरत नको जाऊ. फक्त वाईट लोकांसाठी होत ते! अंतराला मिलिटरी मध्ये जायची आवड आहे. तर त्याची तयारी ती करत असते. कुठे ही ती एकटी फिरत असते मग अस घडल तर काय करेल? याचा विचार करून मी तिला ट्रेनिंग सेंटरला पाठवलं. आता ती स्वतःची रक्षा स्वतः करू शकते. प्रत्येक संकटासाठी तयार रहावे लागते मिस्टर टेडी. आज जर ती तयार नसती तर मला घाबरून रहावे लागले असते त्या लोकांना? पण मला समजल नाही तुला का मारत आहे ती लोक?",गायत्री खर खर जे आहे ते सांगते. शेवटी मात्र ती प्रश्न करते.
"तेच तर डॉक्टर? पण हा आवाज अनिल सारखा वाटत होता?", टेडी आवाज आठवत म्हणाला.
"कोण अनिल?", प्रश्नार्थक नजरेने ती विचारते.
"माझ्या काकांचा मुलगा. तो का माझ्या जीवावर उठला असेल? हा प्रश्नच पडला आहे. तस ही त्याला कशाची कमी नव्हती. बहुतेक माझा गैरसमज होत असेल. डॉक्टर माझ्यामुळे तुला एवढ सहन करावे लागत आहे?",टेडी फेस पाडत म्हणाला. त्याला खात्री होत नव्हती, आपला भाऊ असा वागेल याची. म्हणून तो आपल्या मनाची समजूत काढत असतो. गायत्री मात्र याचा विचार करत असते. तो देखील खूपच गहन असा. कुठे तरी पाणी मुरत आहे? असे तिला वाटत होते. आधीच प्रॉब्लेम त्याच्या आयुष्यात कमी होते का हे एक नवीन संकट उभ राहिले होते. या सगळ्यात तिला श्री. श्रीवर्धन अंकलचे बोलणे आठवते.
"शरीराची सुरक्षा गरजेची आहे."
ते आठवताच ती टेडीला पाहते. नंतर आपला मोबाईल हातात घेऊन सिक्युरिटी स्टाफ मागवून घेते. टेडीला तर वागणे समजत नव्हते.
"तू इतके सारे लोक का मागवले आहेस?", टेडी बोलणे ऐकून विचारतो.
"तुझ्यासाठी. तुझे शरीर आपल्याला वाचवावे लागेल. एकीकडे प्रॉपर्टी आहे आणि दुसरी कडे तुझे शरीर आहे. मी आता तुझ्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून तुझ्या शरीराला माझ्या घरी घेऊन जायची तयारी करणार आहे. त्यासाठी मी लोक बोलावले आहे. तुझ्या घरच्या लोकांना संध्याकाळी सांगू!",गायत्री काळजीने म्हणाली.
"डॉक्टर, तुझ्या कडे अधिकार....",तो बोलणार या आधीच गायत्री त्याला बोलते.
"तू नवरा झाला ना माझा? मग मला अधिकार भेटला. प्रॉपर्टीसाठी आपण त्या निखिलला अंतराला पत्ता सांगून घरी आणायला सांगू. या क्षणी रिस्क नाही घेऊ शकत. शरीराला काही झालं तर तू असाच या टेडीत अडकून राहशील. हे नको आहे आपल्याला.",गायत्री एक दीर्घ श्वास घेऊन सोडत त्याला बोलून मोकळी होते. एवढं सारे ऐकून आणि तिच्या डोळ्यातील मनापासूनचे प्रयत्न पाहून त्याला खरच तिच्याबद्दल खूप काही वाटत असते. ती अगदी मनापासून त्यालाच नाही जपत होती तर त्याच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करत होती. तो ही अगदी मनापासून. या क्षणी जे त्याला सुचले नव्हते. ते तिला सुचलं होत. ती आता आधी त्याच्या शरीराला सुरक्षित करण्यासाठी त्याचे डॉक्युमेंट बनवत साईन करत असते. रात्री ती सगळ पूर्ण करून त्याला आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन येते.
अंतरा घरी नसते. ती निखिलला शोधण्यासाठी त्याच्या घराच्या अड्रेस वर गेलेली असते.
क्रमशः
*********