Santachya Amrut Katha - 1 in Marathi Spiritual Stories by मच्छिंद्र माळी books and stories PDF | संताच्या अमृत कथा - 1

Featured Books
Categories
Share

संताच्या अमृत कथा - 1

                            संतांच्या अमृत कथा.                                                    ----------------------------                                                      1 श्री मच्छेद्रनाथ                                 प्राचीन काळातील गोष्ट आहे. भगवान शंकर क्षीरसागरात नामस्मरण करीत बसले होते ते पाहून पार्वती त्यांना म्हणाली आपण कोणाचे ध्यान करीत आहात? त्यावर शंकर म्हणाले श्रीरामाचे नाम घेत आहे. राम सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्याचेच स्वरूप मी आठवतो. शंकराचे हे बोलणे ऐकून पार्वती म्हणाली मी तुमची पत्नी असून मला हे समजले नाही. तेव्हा कृपा करून तुम्ही मला हे  सांगा एकांतात नदीच्या काठी शंकराने पार्वतीला सांगायला प्रारंभ केला. तो उपदेश ऐकत असताना पार्वतीमातेला झोप लागली तिथेच एक गरोदर मच्छी होती. तिच्या पोटातील गर्भ हुंकार देत होता त्याच गर्भाने पुत्ररूपाने विश्वाच्या उद्धारासाठी जन्म घेतला मातेच्या (मच्छीच्या)उदरातून जन्मला  तेच महान योगी मछिंदरनाथ होय. त्यांचा जन्म होताच ते सोSहं ध्यान जपू लागला लगेच तो तीर्थयात्रा करायला निघाला. गावात भिक्षा मागून मिळेल ते खावे  देवाचे ध्यान करावे असा त्याचा क्रम बारा वर्षे चालला होता. एके दिवशी एका सावकाराच्या घरी गेल्यानंतर सावकाराच्या पत्नीने मला मुलगा नाही म्हटले मच्छिंद्रनाथांनी लगेच विभूति मंत्रून दिली. ही खाल्ली कि तुझ्या पोटी मुलगा होईल.  मात्र ही गोष्ट कोणाला सांगू नकाे म्हणून बजावले. सावकाराची पत्नी तिच्या  एका मैत्रिणीकडे गेली.  व तीने मैत्रिणीला सर्व हकीकत सांगितली. तिने सांगितले 'असल्या कशाला विश्वास ठेवते टाकुन दे  ती रक्षा उकिरड्यावर'. अन तीने तसेच केलें. बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ फिरत फिरत सावकाराच्या घरी आले. भिक्षा मागितली सावकाराची बायको भिक्षा घेऊन बाहेर आली. मच्छिंद्रनाथांनी तिला ओळखले म्हणाले मी बारा वर्षांपूर्वी तुला विभूति मंत्रून दिली होती. त्या विभूतीने झालेला पुत्र आणून दाखव मला. हे बोलणे ऐकून ती मनोमन घाबरली. सर्व खरी हकीकत सांगितली. त्यावर मच्छिन्द्रनाथ म्हणाले, जेथे तू ती राख टाकली तेथे  मला घेऊन चल. तेथे गेल्यावर नाथानीं "अलख निरंजन" म्हणताच आतुन आवाज आला आदेश  म्हणत तेजस्वी पुञ बाहेर आला. तेच गोरक्षनाथ! मच्छिंद्रनाथ सावकाराच्या म्हणाले "तुला दुसरा पुत्र होईल काळजी करू नकोस" अन पुढील तपसाधनेस्तव गोरक्षनाथला बरोबर घेऊन निघून गेले.                                                                              2      गोरक्षनाथांची कथा तीर्थ यात्रेला जाताना गोरक्षनाथ म्हणाले माझ्या मस्तकावर हात ठेवून मला मंत्राचा उपदेश करा मच्छिंद्रनाथ म्हणाले तुझी योग्यता नाही सध्या  फिरत दोघे शहरात पोहोचले मच्छिंद्राने गोरक्षनाथास भिक्षेस पाठवले. घरोघर भिक्षा मागत गोरक्षनाथ एका ब्राह्मणाच्या घरी आले "अलख निरंजन " ऐकून पत्नी बाहेर आली  पोळ्या वडे तिने दिले.  गोरक्षनाथानी भिक्षा गुरू पुढे ठेवली. गुरू म्हणाले "मला वडे आणखी खायचे आहेत" पुन्हा ते गावात आले वडे देता का गुरूनां आवडले आहेत. गोरक्षनाथास  स्त्री म्हणाली तुझा डोळा काढून दिला तर मी तुला वडे देते. ते ऐकूण गोरक्षाने तात्काळ एक डोळा काढून दिला. त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहु लागले. ब्राह्मण पत्नी घाबरून गेली. तिने आपल्या पदराने त्यांना पुसले गोरक्षाला ताजे वडे दिले गोरक्षाने वडे आणून मच्छिंद्रनाथाना दिले. "तुझा डोळा कशाने गेला " असे मच्छिंद्रनाथाने विचारले, तेव्हा सर्व वृत्तांत सांगितला. मच्छिन्द्रनांथानी गोरक्षच्या डोळ्यावरून हात फिरवला तोच गोरक्षनाथाला पूर्ववत दृष्टी लाभली. गोरक्षनाथ आपल्या परीक्षेस उतरला म्हणून मच्छिंद्रानी गोरक्षाला उपदेश करून आत्मज्ञान दिले. मच्छिंद्रनाथांनी उपदेश  गोरक्षाला दिला तोच उपदेश गोरक्षाने  शरण आलेल्या अद्वयानंदस दिला. त्यानी  गहिनीनाथास दिला अशाप्रकारे गुरुपरंपरा चालू राहिली. गहिनीनाथांनी निवृत्तीला, निवृत्तीनाथानी   ज्ञानदेव  सोपानदेव मुक्ताबाई ला व मुक्ताबाईनी  विसोबा खेचराला अन विसोबांनी नामदेवाला हा मंत्र दिला. नामदेवांनी जनाबाईला   अशी ही गुरू परंपरा आहे.               

                     3  चांगदेवाची कथा     

                   एकदा चांगा नावाचा इंद्र नारदांना हात जोडून म्हणाला बंदिवासातून मुक्त होण्यासाठी मला काही मार्ग सांगा. नारद म्हणाले  तुला मृत्युलोकात पंढरीत अवतार घ्यायला पाहिजे. तिथे संत समागम हरिकीर्तन वगैरे मार्गाने तुला आपला उद्धार करून घेता येईल. मृत्युलोकात गेल्याशिवाय मुक्ती नाही.   त्यांनी नारदाला नमस्कार केला.आणि त्याला त्या मंत्राचा उपदेश केला पुणतांबा येथे मुरुगन ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्म झाला. त्याच वेळी आपेगावी ब्राम्हण कुटुंबात ज्ञानंदेवानी अवतार घेतला. विठ्ठल  रुक्मिणी हे त्याचे आईबाप. म्हातारपणी चांगदेव हा पुत्र झाल्यामुळे त्यांचे आईवडील फार आनंदी झाले. तो फार तेजस्वी होतात आठव्या वर्षी त्याची मुंज केली लग्नही केले. लहानपणी सर्व विद्या फार लवकर मिळवल्या त्याचा योगाभ्यासही चांगला केला आत्मा ब्रह्मांडी नेऊन ठेवण्याची सिद्धी त्याला प्राप्त झाली होती. या सिद्धी मुळे तो मरण वेळ चुकवित असे   अशाप्रकारे तो  चौदाशे वर्षे जगला त्यांनी शिष्यही खूप केले त्यांची संख्या चौदाशे होती त्या सर्व शिष्यांना घेऊन तो आकाश मार्गाने प्रवास करत असे. एवढे सामर्थ्य त्यांच्या अंगी होते त्यामुळे  गुरू करण्यासारखी व्यक्ती त्याला मिळेना. ज्ञानदेव विष्णूचा अवतार असल्याचे वृत्त त्याच्या कानी गेले तेव्हा चांगदेवाने ठरविले प्रथम त्यांना पत्र पाठवावे म्हणून त्याने पत्र लिहायला प्रारंभ केला. मायना लिहिताना तो अडखळला पत्रात चिरंजीव लिहावे तर गुरू करायचे आहे.   तीर्थरूप राहवे वयाने लहान असा मनात विचार येऊन कोरेच पत्र पाठवले. शिष्याने आकाशमार्गाने ज्ञानदेवाना पञ दिले कोरे पत्र पाहून ज्ञानदेव म्हणाले 14 वर्ष जगुन सुद्धा हा कोराच  आहे. मग ज्ञानदेवाने त्याला उत्तर लिहिले तीच चांगदेव पासष्टी होय.चैतन्य हे सर्वाठायी एकच आहे ते लहान कि मोठे नाही ते ब्रह्मांडात दिसते तेच पिंडात आहे चांगदेव वाघावर बसुन हाती नागाचा आसूड शिष्य बरेबर घेऊन निघाले भेटायला.  त्यावेळी ही भावंडे भिंतीवर बसली होती ते त्याला सामोरे गेले भिंत चालवत. हे पाहून चांगदेवाचा अभिमान नष्ट झाला. त्याने सापाचा चाबुक  फेकून यांचे  पाय धरले त्याची भेट एका वडाच्या झाडाखाली. ज्ञानदेवांनी चांगदेवाला घरी आणले त्यावेळी मुक्ताबाई स्नान करत होत्या हे पाहून चांगदेव माघारी फिरला. मुक्ताबाई म्हणाली  गुरू नसलेला  आहे मुक्ताबाईचे वचन ऐकुन   परत फिरला आणि तिच्या पाया पडून तिला म्हणाला,  मी गुरु केला नाही हे तुला कसे समजले? मुक्ताबाई म्हणाली "तुजवर गुरुकृपा झाली असती तर तुझ्या मनात विकल्प आला नसता".

                मच्छिन्द्र  माळी, छत्रपती संभाजीनगर.