Santachya Amrut Katha - 8 in Marathi Philosophy by मच्छिंद्र माळी books and stories PDF | संताच्या अमृत कथा - 8

Featured Books
  • THE TALE OF LOVE - 15

    Catagory-(Romantic+Thriller️+Psycho+Toxic+Crime‍️+Foreign pl...

  • অচেনা আলো - 5

    “ঝড়ের আভাস”---নীরব অস্থিরতাদিনগুলো বদলাচ্ছিল।মিশা আর ইশানি...

  • মার্কস বাই সিন - 5

    মার্কস বাই সিন-৫পানশালার দরজা ঠেলে বৃষ্টিভেজা অন্ধকার রাস্তা...

  • জঙ্গলের প্রহরী - 34

    জঙ্গলের প্রহরী পর্ব - ৩৪স্থানীয় সাংবাদিকরাও হাজির রায়চৌধুর...

  • ঝরাপাতা - 34

    #ঝরাপাতাপর্ব - ৩৪সিনেমা হল থেকে বেরিয়ে দেখা হয় পিউদের সঙ্গ...

Categories
Share

संताच्या अमृत कथा - 8

.                       " नामदेवाची परीक्षा "                                   


     महायात्रा करून आलेले यात्रेकरू त्यांचे सोवळे विशेष पाहून हळूच देव श्वानरूपाने त्यांना जेवताना स्पर्श करी. विटाळ झाला म्हणून सगळे ओरड करीत. श्वानाने उच्छाद मांडला काहीं शेतकरी जेवत असताना त्याच्या जवळचे अन्न तोंडात घेऊन ते श्वान पळत निघून जाऊ लागले की, त्याच्या तोंडातले अन्न हिसकावून घेत.            

      एकदा पांडुरंगाने नामदेवाला विचारले, ' सर्व जीवांमध्ये माझी व्यापकता आहे हे तुला नित्यस्मरण राहते ना?' नामदेव म्हणाले, देवा! गुरु विसोबांनी माझ्या मनावर ते चांगले बिंबवले आहे. त्यामुळे मी प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी समान दृष्टी ठेवली आहे. तुझ्या कृपेने मी सर्वाच्या ठिकाणी दया भाव धरतो. नामदेवाच्या मनाची परीक्षा पहाण्यासाठी देवांनी श्वानरूप घेतले. द्वादशीच्या दिवशी यात्रेत ते श्वान फिरू लागले. कोणी जेवायला बसले की, ते श्वान त्याच्याजवळ जाई. पण कोणीही त्याला खायला एक तुकडाही देत नव्हते. सगळे म्हणत या श्वानाला हाकला. कोणाच्या अन्नाच्या टोपलीत तोंड घाली तेथे लोक त्याला मारायला धावत. परंतु ते श्वान कोणाच्याही हाती सापडत नसे. ब्राह्मण जेवायला घालीत. तेथेच देव श्वान रूपाने तिष्ठत असे; परंतु कोणीही घासभर अन्न देत नसे. याचे देवाला आश्चर्य वाटे. महायात्रा करून आलेले यात्रेकरू त्यांचे सोवळे विशेष पाहून हळूच देव श्वानरूपाने त्यांना जेवताना स्पर्श करी. विटाळ झाला म्हणून सगळे ओरड करीत. श्वानाने उच्छाद मांडला काहीं शेतकरी जेवत असताना त्याच्या जवळचे अन्न तोंडात घेऊन ते श्वान पळत निघून जाऊ लागले की, त्याच्या तोंडातले अन्न हिसकावून घेत. सर्व यात्रेमध्ये देव श्वानाच्या रुपाने हिंडले पण त्यांना कोणीही अन्न दिले नाही. कोणाचाही सर्वाभूती भाव आढळला नाही. हे श्वान यात्रेतून मारून घालवा. असेच सर्वजन म्हणू लागले. जेवत होते. श्वान रूप घेतलेल्या देवांनी त्याच्या पानातली एकदा ते श्वान नामदेवाच्या जवळ गेले नामदेव भाकरी तोंड घालून उचलली व ते कोणी मारील म्हणून पळू लागले. नामदेवाने ते पाहिले व आपल्या पानातली तुपाची वाटी घेऊन श्वानाच्या पाठीमागे धाऊ लागला. तोंडाने थांब! थांबा! कोरडी भाकरी का खातोस असे म्हणून श्वानाच्या जवळ जाऊन भाकरीला तूप लावून त्याच्या मुखात घास घालू लागला. नामदेवाने प्रेम भक्तीने खाऊ घातलेले घास देव मोठ्या आवडीने खाऊ लागले. लोक नामदेवाच्या वागण्याला हसू लागले, म्हणाले, नामदेवाला वेड लागले. या सर्व जीव समानच दिसतात श्वान रुपातील देव हसून म्हणाले, 'नामदेवा! तू मला कसे ओळखले ?' नामदेव म्हणाला, मला गुरु विसोबा खेचराने या बद्दल खुण सांगितली होती. श्वानाच्या जागी प्रत्यक्ष पांडुरंगाचे स्वरूप पाहून ते म्हणू लागले. नामदेवाची भक्ती धन्य आहे. त्याला श्वान रूपाने देव भेटला आम्ही मात्र जरासुद्धा श्वानरूपातील देवाला तुकडाही दिला नाही. असे कौतुक दाखवून देव अदृश्य झाले. एकदा कार्तिक एकादशीच्या दिवशी नामदेव एकादशीव्रत म्हणून उपवासी होते. देव म्हणाले, “नामदेवा ! चल आपण दोघे मिळून भोजन करू या !” नामदेव म्हणाले, देवा! आज एकादशी तिथी आहे. या दिवशी अन्न ग्रहन करू नये. त्याचा परिणाम म्हणजे जन्मोजन्मी तुझे पाय दुरावतील. देव म्हणाले, नामदेवा ! ऐक! रुक्मांगदराजा, आणि अंबरिषाने ज्या निष्ठेने एकादशीव्रत केले. त्या निष्ठेने कोणीही आजकाल एकादशीव्रत करीत नाहीत. अंत:करणात निष्ठेचे बळ नसल्यामुळे एकादशीव्रत निष्फळ होते. त्यापेक्षा देहदंड सोसून एकादशीव्रत करू नये. नामदेव म्हणाले, देवा! तुमची कृपा माझ्यावर असल्यावर माझा निश्चय मोडणार नाही. काही झाले तरी मी निश्चय मोडू देणार नाही. ते ऐकून देव हसले, म्हणाले, नामदेवा ! तू गुणी आहेस. मला याचे फार कौतुक वाटते. देव मनात म्हणाले, नामदेवाची परीक्षा घेऊन पहावे. त्या प्रमाणे देवांनी एकादशीच्या दिवशी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन नामदेवाच्या घरी गेले. हातामध्ये काठी अंगावर जीर्ण जुने वस्त्र नेसलेला तो वृद्ध ब्राह्मण नामदेवाला म्हणाला, फार भूक लागली आहे. तू वैष्णव आहेस म्हणून तुझ्याकडे आलो चल मला लवकर भोजन दे. माझे प्राण भूकेने व्याकुळ होत आहेत. नामदेव म्हणाले, ब्राह्मण देवता! अहो ! आज एकादशीच्या व्रताचा दिवस आज भोजन कसे करता येईल. या दिवशी अन्न दान करता येणार नाही. या ऐवजी खजुर, फळे स्वीकारणार असाल तर त्वरित आणून देतो. हे ऐकून ब्राह्मण म्हणाला, मला अन्नावाचून दुसरे काही आवडत नाही तू उदार आहेस हे ऐकून मी तुझ्या दारात भिक्षेसाठी आलो आहे. तू जर अन्न दिले नाहीस तर माझे प्राण जातील आणि ब्रह्महत्येचे पाप तुझ्या डोक्यावर येईल. यावर नामदेव म्हणाले, मी विष्णू भक्त आहे. पांडुरंगाच्या चरणावर चित्त ठेवून मी विदेह स्थितीयुक्त, मुक्त झालो आहे. आम्ही पापपुण्याचा ठाव मोडला त्यामुळे आम्हांला घोर नरकवास नाही. ब्राह्मण म्हणाला, नामदेवा! तुझ्या मनात भूतदया नाही आणि ज्ञानमात्र ढीगभर सांगतोस. माझा भूकेने प्रान जाणार आहे. नामदेव म्हणाले, "मी ही तुमच्याबरोबर मरण पत्करीन परंतु तुम्हाला आज भोजन म्हणून भात-भाकरी देणार नाही. हे ऐकून ब्राह्मण वेषधारी पांडुरंगाने लीला केली. डोळे गरगरा फिरविले आणि उभ्याने अंगणात मुर्च्छित होऊन पडला. नामदेवाने जवळ जाऊन पाहिले. तो ब्राह्मण मृत झाला होता. श्वास थांबला होता. लोक म्हणाले, अरे! अरे! ब्राह्मण हत्येचे पातक नामदेवाच्या शिरी आले.      नामदेवाचा निश्चय अटळ होता. त्याने ब्राह्मणाचे । प्रेत उचलून चंद्रभागेच्या तीरावर नेले. तेथे चिता रचली. यावर ब्राह्मणाचे प्रेत ठेवून आपण स्वतः त्याच्या शेजारी झोपला. आणि लोकांना चिता पेटविण्यास सांगितले. लोकांनी चितेला अग्नी लावला. चिता चहुबाजूने पेटली हे पाहून ब्राह्मण चितेवर उठून बसला. त्याक्षणी चिता विझून शांत झाली. ब्राह्मणाचे रूप टाकून विठ्ठलाने आपले चतुर्भूज रूप प्रकट केले. नामदेवाला उठवून आलिंगन देत देव म्हणाले, “नामा तुझ्यासारखा एकनिष्ठ भक्त झाला नाही..     

    अंबरिष भक्तापेक्षा तुझी निष्ठा बळकट आहे. अंबरिषासाठी मी दहा अवतार घेण्याचे मान्य केले. आता कलियुगात मी बौद्ध होऊन मौन असावे असा युगधर्म असून तुझ्या विनंतीवरून सगुण साकार होऊन राहिलो आहे. असे म्हणून देव व ब्राह्मण दोघे अदृश्य झाले. अंबरिषराजाने केवळ आपली नगरी उद्धरून विमानातून वैकुंठाला नेली. परंतु नामदेवासारखा भक्त विश्वाचा उद्धार करण्यासाठी जन्माला आला. अशा भक्तांचा पांडुरंगाला सदैव अभिमान वाटतो.

                🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

                     मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर.