do you know what is love in Marathi Philosophy by Pratik books and stories PDF | तुम्हाला प्रेम कळत का?

The Author
Featured Books
Categories
Share

तुम्हाला प्रेम कळत का?

कस काय मंडळी.. मजेत ना.. गृहीत धरतो कि आपण सुखरूप असाल. चला सुरु करूया आपला आजचा प्रश्न तुम्हाला प्रेम कळत का?

या प्रश्नाचा उलगळा करत जाऊया. प्रेम हा दोन अक्षराचा शब्द स्वतामध्ये किती तरी भावना आणि कथा सामावून घेतो ना. 

प्रेम म्हटल्यावर तुम्हाला तुमची प्रियसी, प्रेमिका यांची कदाचित आठवण आली असेल. सध्याची परिस्थिती पाहता हे साहजिकच आहे.

आपण सुरुवात करूया प्रेमाच्या उगमापासून....
आठवतय का? लहानपणी जेव्हा आपण खोडकर कृत्ये करायचो, तेव्हा कळत न कळत छोटी-मोठी दुखापत करून घ्यायचो. 
                      त्या दुखापतीवर अगदी प्रेमाने उपचार करणारी, मायेने आपली समजूत काढणारी आपली "आई".
                   आईच प्रेम आपल्याला प्रसन्नतेच आणि मायाळूपानाच दर्शन घडवते. आई आपल्या हक्काची ती जागा असते, जिथे सगळं दिलखुलास बोलायला अगदी रडायला पण आपण घाबरत नाही. जेव्हा कधी आपलं मन दुखत, तेव्हा कळत नकळत आपण आईच नाव घेतो तिची आठवण येते.!
                   
                   पुढे चालायचं तर या नात्याच्या प्रेमात आपल्याला शिस्त, गांभीर्य आणि जबाबदारी पाहायला भेटते, म्हणजे आपले "बाबा".
                   आपण सगळे आपल्या बाबाचा खूप आदर करतो आणि त्यांच्याविषयी मनात थोडी भीती पण असतेच. काही मुला-मुलींसाठी त्यांचे बाबा त्यांच्यासोबत मित्रासारखे वागतात. म्हणून बाबांना सगळं काही मनमोकळेपणाने सांगण्यात, त्यांच्याशी गप्पा मारण्यात त्याना आनंदही मिळतो.
                   बाबांना दुनियादारीची चांगलीच ओळख असते. पुढे आपणही दुनियादारीमध्ये, व्यवहारामध्ये उतरणार, तेव्हा आपल्यालाही या सगळ्यांची समज असावी म्हणून असं समजा कि बाबा आपल्याला त्याच प्रशिक्षण देत असतात.
                   बाबाच्या बोलण्याचं वागण्याच वाईट वाटून घेऊ नका. शेवटी आपल्या आई-वडिलांनाच आपली सगळ्यात जास्त काळजी असते.

मग येतात आपले "भाऊसाहेब". भाऊ जर मोठा असेल तर त्याला आपल्यावर आधीपत्य गाजवण्यात रुबाब दाखवण्यात लय मज्जा येते बघा.
                          'एक ग्लास पाणी आन', 'हे काम कर', 'ते काम कर', अशी आदेश दादा आपल्यावर सोडते. मोठया भावासोबत बसण्यात, त्याच्यासोबत फेर-फटका मारण्यात मज्जा खूप येते.यात काही शंका नाही कि दादा आपल्याला चिडवणार आपली खूप मस्करी करणार. सोबतच दादा आपली काळजी पण तेवढीच घेते.
                       जर कोणी आपल्याला वाईट वागणूक दिली तर दादा आपला खंबीरपणे बचाव करतो. असं असत आपल बंधुप्रेम, यात खोडकरपणा आणि मस्करी भरभरून असते.
                       सुदैवाने आपण जर मोठ्या भावाची भूमिका निभावत असाल तर आपणही मोठा असल्याचा रुबाब दाखवतच असाल. पण लहान भावासाठी आपलं बंधुप्रेम ही तेवढच असते.

आता कोण? तर आपली "बहीण". का? आणि कोण जाणे? पण बहिणीसोबत आपलं थोडा 36चा आकडाच असतो.
ती 'बया' 'बाबांची लडकी' आणि आपण 'आईचे लाडके' 
जाणू काही गटच पडलेले...
                           आपण कोणतीही चूक केली तर आपल्याला बाबांचे बोलणे भेटतील याची जबाबदारी आपल्या ताईची.. टॉम अँड जेरी असतात ना तसंच काहीतरी आपल नातं.!
                           एखाद्या वेळेस जेव्हा बाबा आपल्यावर चिढलेले असतात. तेव्हा "ऐक, सध्या घरी येऊ नकोस. बाबा चिढलेले आहेत तुझ्यावर, मी सांगणार तेव्हा ये." असं सांगून आपला बचाव करणारी आपली ताई.
                           सकाळी तुम्हाला स्वयंपाकघरातून खणखणीत असा सुगंध येतो. तुम्ही आत जाऊन बघता तर काय? ताई शीरा (रव्याचा) बनवत आहे. तुम्हाला पाहून ती बोलते कि 
 "2 मिनिट थांब हा, झालाच शिरा. तू बस मी आणते."
                         मग एका प्लेटमध्ये ताई तुमच्यासाठी शिरा घेऊन येते. पहिला घास घेताच, "ताई एकदम छान झाला शिरा."असे शब्द तुमच्या तोंडून बाहेर पडतात.
                            अस आपल्या सोबत भांडणारी, मज्जा-मस्करी करणारी आणि वेळेवर आपल्या पोटाचे चोचले पुरवणारी आपली बहीण आणि तीच प्रेम..

                              आणि असच एक नातं ज्यांच्याकडे कथा-किस्से यांचा खजिनाच असतो. आपल्यावर संस्कार करण्यात आपल्याला घडवण्यात त्यांचा हात असतोच, असे आपले "आजी-आजोबा" अतिशय गोड असं नातं.
                              आपल्या सोबत खेळण्याची आणि फिरण्याची इच्छा आजी-आजोबा पेक्षा जास्त कोणाचीच नसणार. आपल्या आई-वडिलांचे अतरंगी किस्से यांनाच माहित असतात. आजी-आजोबामुळे आपल्या बालपणाला चांगल स्वरूप येते.

                  मग येतात आपले "कूल काका". म्हणजे एकार्थी जिथं आपले बाबा शिस्तबद्ध असतात. तिथे काका आपल्या मित्रासारखे असतात. कुठे पण थोडी काही अडचण आली तर आपण त्यांची मदत घेतो.
                   काही मुला-मुलींसाठी हे चक्र उलट असू शकते.

       आईसारखी माया देणार दुसर नातं म्हणजे "मावशी". लहानपणी मावशीला आपला लडा लागलेला. आपल्यासोबत खेळण्यात, आपल्याला कुशीत घेऊन मिरवण्यात तिला वेगळाच आनंद भेटायचा. 
       काही काळाने आपण मोठे झालो आणि जेव्हा कधी मावशीला भेटायला गेलो तेव्हा, कसा आहेस तू? तब्येत वैगरे सगळं ठीक आहे ना? 
          "मी पण ना थकून आला आहेस तू , जा आधी हात-पाय थुवून घे. तो पर्यंत मी तुझ्यासाठी गरमा-गरम जेवण बनवते." अस म्हणत आपल्या डोक्यावरून हात फिरवून मावशी स्वयंपाक घरात जाते. तिच्या या वागण्यातून तीच मायाळूपण, तिची काळजी, आपलपण किती स्पष्टपणे दिसते.!
             तिथेच बाजूला मावसा उभे असतात. "जो पर्यंत तुझी मावशी जेवण बनवते, तोपर्यंत आपण बसुया चल. " अस म्हणून मावसा आणि आपला चर्चा सत्रला सुरुवात होते. यामध्ये आपण सध्या काय करतोय? आणि चालू घडामोडी यावर आपली चर्चा रंगते.
               तब्बल अर्ध्या तासानंतर मावशीने गरमा-गरम जेवण तयार केलेल असते. मग आपण आणि मावसा जेवायला बसतो. जेवण स्वादिष्ट झालेल असते, कारण बऱ्याच वेळेनंतर आपण आपल्या मावशीच्या हातच जेवण जेवतोय ना.!
                 हे सगळं वातावरण प्रसन्नमय वाटत ना. मन रमत ना यात आपल. हाच तो नात्याचा गोडवा, प्रेम जे आपल्या प्रत्येकाला हवहवस वाटते.


    अगदी असच मायाळूपण आणि काळजी आपल्याला आपल्या "आत्याच्या" स्वरूपात पाहायला भेटते. आत्याच्या घरी गेल्यावर आपल्या भावाची मुल आपल्याला भेटायला आली, याचा तिला खूप आनंद असतो.

            लहानपणची आठवण आठवते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झालेल्या असायच्या. सकाळ-सकाळी आपल्या घराबाहेर हॉर्नचा आवाज यायचा, बाहेर जाऊन बघतो तर काय?
                   मोटारसायकल घेऊन आपले मामा आलेले असतात. त्यांना बघताच तुमच मन खुश!!
आता आपण मामाच्या घरी जाणार, खूप मज्जा, खूप धमाल करणार, हाच एक विचार तुमच्या मनात फिरत राहायचा... 
                  किती गोड आठवणी आहेत ना त्या,, ज्या कदाचित आता तुम्हाला आठवल्या असतील.

                     वर्गात पहिल्या दिवसी भेटलेले ते तिघे जण आज तुमचे मित्र अगदी परममित्र होऊन बसलेले असतात. कोणताही मुद्दा असो यांना सांगण्यात समाधान वाटते आणि मनाशी ही खात्री असते कि यांच्याकडे आपल्या गोष्टी सुखरूप आहेत. जाणूकही हे आपल्यासाठी एक सुरक्षित लॉकर सारखे असतात.
                       आपल्या बहुतांश समस्यांचे यांच्याकडे समाधान असतेच अस नाही बर का! पण यांना समस्या सांगितल्यावर मनाला थोडं हलक वाटते.
                       आपल्या या 3 इडियट्स सोबत गप्पा रंगतात ना, तेव्हा तास-न-तास कधी निघून जातात. कळतच नाही.
                       हेच तर नात्याच प्रेम आहे, कुटुंबिक प्रेम ज्याबद्दल मला तुम्हाला सांगायच होत.
                       लहानपणापासून आतापर्यंत आपण कितीतरी नाते पाहिली, त्यांचं प्रेम अनुभवल. मग थोडक्यात प्रेम म्हणजे काय? आणि त्याची परिभाषा याबद्दलची कल्पना आपल्या सगळ्यांनाच आहे.


चला आता एक पाऊल पुढे जाऊया, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते, जिच्याबद्दल आपल्या मनात नेहमी काही प्रश्न असतात.
जसे कि, तो किंवा ती माझ्यावर का रुसून बसली? 
मला अस एकट सोडायची गरज होती का?
तिने किंवा त्याने माझ्यासोबत अस करायला नको होत?
असेच काही प्रश्न आपल्या मनात असतात. या प्रश्नामुळे तुमच्या मनातील काही आठवणी तुम्हाला आठवल्या असतील.
             चला थेट मुद्द्याकडे जाऊया. त्याआधी तुम्हाला एक गंमत सांगायची होती.
             मी 15-16 वर्षाचा असेल तेव्हा माझा हा पूर्ण समज होता कि, एखाद्या मुलीवर प्रेम करायच वय हे 22 वर्षाचे झाल्यानंतरचा विषय आहे. सध्या आपण लहान आहोत. 
               आणि आता जेव्हा मी 21 वर्षाचा झालोय, तर काय बघतोय? 15-17 वर्षाची मुलं-मुली relationship मध्ये आहेत. आणि या love-relationship च्या नादात काय काय अगडे-वेगडे कारनामे करत आहेत.
                 याची कल्पना social Media ने तुम्हाला दिलेली असणारच. त्यांच्या या करणाम्यांना पाहून मला आश्चर्य कमी आणि हसायला जास्त येते.
                 म्हणजे बघा ना हार्मोनमध्ये होणारे बदल आणि आकर्षण याला या मुलांनी प्रेमाच नाव दिल राव!!
                 वेळेनुसार हे आकर्षण, हे हार्मोनचे बदल कमी होत जातील. समोरची व्यक्ती तुमच्यावर पूर्वीसारख लक्ष्य देत नाही 
                 मग आता तुझ माझ्यावर प्रेम नाही राहील?
तू पूर्वीसारखा नाही राहिला? तू बदलला?
कोणीतरी दुसरी भेटली वाटत?          
              अशी तिखट दुषणे एकायला भेटतात. काही अनुभवी प्रेक्षकांना ही दुषणे आठवली असणार.
        
               बहुतेक असच होत. आपण आपल्या भावना समजून घेण्याऐवजी भावनाच्या प्रवाहात वाहत जातो. आणि याच एका चुकीच्या पावलामुळे आपण एखाद्या व्यक्तीविषयी मनात राग आणि हिंसा निर्माण करून घेतो. कारण ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही. 
का म्हणून ती व्यक्ती अशी वागली?
तिने आपल्या मनातल समजून का घेतल नाही?
 पण तुम्ही त्या व्यक्तीच मन समजून घेण्याचा प्रयत्न केला का?

          मग जर का यामध्ये पुरुषी अहंकार जागृत झाला कि व्यक्ती अशी पाऊल उचलतो जी खरंच खूप हिंसक असतात. एखाद्या प्रेम प्रसंगामध्ये मुलगी मुलाच ऐकत नसेल तर, मुलगा मुलीच्या जीवावर झेप घेतो. तिचा विनयभंग करतो. तिला जीवघेण्या धमक्या देतो. 
             अश्या कित्येक बातम्या आपण ऐकल्या असतील. कदाचित काही प्रसंग तुम्ही स्वतः पाहिले सुद्धा असतील.

              मुलीच नाही तर मुलांच्या बाबतीत सुद्धा अश्या गोष्टी होतात. मुलीला नात तोडायच असेल तर ती हळूहळू बोलणं कमी करणार, छोट्या-मोठ्या गोष्टीवर तुमचे भांडण होईल, कधी-कधी तुमच्या मध्ये आरोप-प्रत्यारोप होतील. आणि बघता-बघता नात नाहीस होऊन जात.
       
              ( इथे मी मुलगा किंवा मुलगी कोणाच्याही चरित्र्यावर प्रश्नचिन्ह उभ नाही करत आहे, तर सध्य परिस्थितीचा आढावा घेत आहे.)

         काय भेटत या सगळ्यातून तर नैराश्य, राग तिरस्कार, अगदी काही मुलं तर सगळ्या मुलींचा तिरस्कार करण सुरु करतात. प्रत्येक नात्याला नाव ठेवणं सुरु करतात. नातं म्हटलं कि त्यांच्या मनामध्ये नकारात्मक भावनाच उरतात. 
            हे सगळं ऐकायला आणि बोलायला जरी एवढं विशेष वाटत नसेल, पण जेव्हा अनुभव करायची वेळ येईल तेव्हा खूप त्रास होईल.
                  हल्ली ना मुलांच कस झालाय कि "तू माझी नाही तर कोणाचीच नाही" किंवा एका वेळेस 3-4 मुलींना फिरवायच, काय तर म्हणे माझा heart-break झाला आहे म्हणून अस करत आहे.
                  आणि मुलींच्या बाबतीत "तो आता कमी लक्ष्य देत आहे." "Interest कमी होत चालला आहे. "
"आमचं नातं पुढे टिकणार नाही. "                   
किंवा दोघांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आकर्षण संपल म्हणून आता सोडायच आहे.
      
                           ऐकायला कठोर वाटत ना, पण हे सत्य आहे. आणि हे सुद्धा तेवढच सत्य आहे कि प्रत्येक मुला-मुलींच्या बाबतीत अस होत नाही. ज्यांनी भावनाच्या पुरात वाहून न जाता त्यांना समजून घेतल. ती मंडळी एका योग्य निर्णयावर पोहचते.
            एरवी आजची mordern generation या सगळ्या प्रकाराला लव्ह आणि love faliure म्हणतात...... हो ना.!


      प्रेम काय असत? याची परिपूर्ण कल्पना आपल्याला साक्षात "शिव-पार्वती" "राधा-कृष्णा" यांनी दिलेली आहे. 
      अहो.. भारताच्या प्रत्येक संस्कृतीमध्ये अश्या कित्येक कथा आहेत, ज्या आपल्याला प्रेम, नाती, अर्पण, समर्पण, मानवी भावना या सगळ्याच महत्व समजावून सांगतात.

         मग मला सांगा का म्हणून आजच्या युवा पिढीने या fast dating culture नुसार वागावे?
         "आपल्याकडे आपली समृद्ध संस्कृती आहे." विचारात टाकणारा प्रश्न आहे ना!!
                असो.. खूप होडताड केली ना आपण प्रश्नांची, आता आपण निष्कर्षकडे जाऊया.
                  बघा, आपल्याला कोण पसंद करते? कोण नाही? खरंच कोण प्रेम करते? कोण नाही? कोण आपला कामापुरता वापर करते? कोण नाही?
                    या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या अंतर मनाला बऱ्यापैकीमाहित असतात. गरज फक्त एवढीच असते कि, "आपल अंतर-मन जे म्हणत आहे ते स्वीकार करायची, आणि त्या नुसार योग्य ती पाऊल उचलायची."
                    बस... मग बघा बदल आपोआप दिसतील. खूप भव्य बदल दिसतील अस नाही, पण हा सकारात्मक बदल नक्कीच दिसतील.

                  आता मुलांचा प्रसिद्ध प्रश्न कि, ती मला सोडून का गेली? माझ्यामध्ये अशी काय कमतरता होती? वैगरे वैगरे....

              चला समजा तुमची एक 20 वर्षाची सुशिक्षित आणि सुंदर मुलगी आहे. तिला एका मुलावर प्रेम आहे. आणि त्याची सध्य-परिस्थिती अगदी तुमच्या सारखी आहे.
                आता एक बाप म्हणून तुम्ही तुमच्या मुलीच लग्न त्या मुलासोबत लावून देणार का?
                तुमची मुलगी त्या मुलाचा विषय, तिच्या प्रेमाचा विषय तुमच्या समोर काढणार का?
               करा... विचार करा. या दोन प्रश्नांची उत्तरे कदाचित तुम्हाला तुमच्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरे देऊन देईल. 
                अस सगळ्यांच्या बाबतीत नसणार, काही जणांची परिस्थिती वेगळी असू शकते. मी बस उदाहरण दिल आहे.
                 एक मुलगा म्हणून आपल जबाबदार आणि कमावत असण गरजेच आहे. नाहीतर ते इंस्टाग्राम वर ट्रेंडिंग नाही का, "पसंदीदा औरत" तसच तुमची "पसंदीदा औरत " कदाचित तुमच्या आयुष्यात नाही येईल.
                
                बर, मी हल्ली gen-z generation चे relationship चे प्रकार त्याच्याविषयी वाचत होतो.
जसं कि situationship, nanoship, benching... 
बापरे म्हणजे काय हा प्रकार!.. यांचे अर्थ माहित करून पहा.एकतर तुम्हाला हसू येईल किंवा तुमच डोक फिरेल.

                 बघा या प्रेमाच्या नात्यामध्ये सम्मान करणे, साथ देणे महत्वाच आहे. आपुलकी, मैत्रीभाव असण महत्वाच आहे.
                 त्याच किंवा तीच बोलण ऐकून घेण्याएवढ, त्यांची वाट पाहण्याएवढ संयम असाव. ती चुकली तर तिला समजून घेण्याएवढी किंवा तुम्ही केलीली चूक मान्य करण्याएवढी समजदारी तुमच्याकडे असायला हवी. थोडीफार बोल-चाल कोणाची होत नाही हो.. पण जिथं ती योग्य असणार, तिथे खंबीरपणे तिची साथ द्यायला हवी.
                   कोणतेही नाते किंवा व्यक्ती परफेक्ट नसते. आपले प्रयत्न, समजदारी, विश्वास यातून एक चांगल नातं बनते.

            आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, मित्रांसोबत, कुटुंबासोबत मिळणारा प्रत्येक क्षण आनंदाने दिलखुलासपणे जगा. आणि ह्याच त्या गोष्टी आहेत ज्या नात्यांला मजबूत बनवतात.
             नातं हे एका रोपट्यासारख आहे, ज्याला आपुलकी, प्रामाणिकपणा, सम्मान, मर्यादा, संयम, जबाबदारी अश्या अनेक गुणांच पाणी द्यावं लागत. अश्याप्रकारे त्याची जोपासना केली, तर ते रोपट झाडाच स्वरूप घेते. फुलते, बहरते. मजबूत होते.
 बरोबर बोलतोय ना मी!....
  
          एक वाक्य आपण वेगवेगळ्या चित्रपट, नाटकामध्ये ऐकलं असेल कि "नात तोडायला काही मिनिट पुरेशी आहेत, पण नातं जपायला वर्ष लागतात.
            अनेक लोक येतील-जातील. काही नाती बनतील आणि तुटतील. हा पण त्याचा राग आणि तिरस्कार केल्याने त्याच बर-वाईट होईल कि नाही माहीत नाही....
         पण तुम्हाला मानसिक त्रास होईल हे मात्र नक्की..
आधीच आपल्या मेंदूला नकारात्मक विचार करण्यात मज्जा येते. म्हणजे काही प्रमाणात आपला मेंदू नकारात्मक विचार करतोच.
         मग त्यामध्ये या नकारात्मक विचारांची भर पडली कि झालं.. मन उदास होऊन बसते. आपण चिडचिड करतो. स्वतःला कोंडून घेतो. मग या सगळ्याचा आपल्यालाच त्रास नाही का?
               त्या पेक्षा जे झालं ते मान्य करायला नको का?
जी लोक जी नाती जिथं तुटली त्यानां तिथंच सोडून पुढे जायचं. हे सगळं बोलायला जेवढ सोपी आहे, करायला तेवढंच अवघड जाईल.
            पण शेवटी तुम्हाला समाधान वाटणार कि, "तुम्ही स्वतःचा एका मानसिक त्रासापासून बचाव केला."
              एक फिल्मी वाक्य आहे ना कि "ज्यांना तुमची साथ द्यायची, ते शेवट पर्यंत तुमची साथ देतील. "
आणि हा हे सत्य आहे.
           
          प्रत्येकालाच तुमच्या स्वभाव, सहवास आवडेल अस नाही. पण ज्यांना तुमचा स्वभाव आवडेल ते तुमची साथ देतील.
             स्वतः स्वतःच्या चुका सुधारून घ्या. थोडफार कमी-जास्त होईल, समजून घ्या. सांभाळून घ्या आणि पुढे चला.
              "BE YOURSELF"
              
    आता हा चर्चा-सत्र इथेच संपवूया... आशा करतो कि ही चर्चा तुम्हाला अर्थपूर्ण वाटली असणार.
 यावर तुमचे विचार मला नक्की कळवा.

तोच दाराजवळून आवाज आला. "दादा चाल ना, आपल्याला प्रोग्राममध्ये जायला, उशीर होईल. "
हा आलोच.. 2 मिनिट थांब..   

चला तर मंडळी, सध्या मी तुमची रजा घेतो..
तुम्ही तुमची प्रेमाची नाती जपा. ही नातीच तर माणसाला माणुसकी शिकवतात..

धन्यवाद.....