सुदीपने पुढे होऊन निधीशी हस्तांदोलन केले ..निधीकडे पाहत हसून तो म्हणाला “ओहो ..आपण का त्या ?खुप ऐकलेय रिया आणि प्रिया कडून तुमच्याबद्दल ..“शी जीजू अहो जाहो काय ?फक्त निधी म्हणा न मला ..बर बुवा ..असे म्हणत सुदीपने आपल्या जवळच्या एका तरुणाला हात धरून पुढे ओढले आणि म्हणाला ..“समित ये ना पुढे तुझी पण ओळख करून घे आमच्या “साली”बाई आणि त्यांच्या मैत्रिणीशी ..क्रीम रंगाचा झब्बा आणि सलवार घातलेला समित खूपच उमदा तरुण होता .“प्रिया तुझी जशी ही खास मैत्रीण आहे तसाच हा माझा जवळचा मित्र बर का ..हा पण सी ए आहे आम्ही एकत्रच शिकलोय .नागपूरला स्वतःचे ऑफिस आहे त्याचे ..आणि समित या आमच्या सालीसासाहीबा आणि ही त्यांची मैत्रीण निधी ..”गुलाबी रंगाच्या साडीतल्या प्रियाशी समितने “हस्तांदोलन” केले आणि निधीकडे पण बघुन अभिवादनाचे स्मित केले .प्रियाला पाहिल्यावर समितच्या मनात काहीतरी झंकारले ..! या कार्यक्रमानंतर एक महिन्यावर लग्न आले .घरात खुप गडबड चालु होती ..खरेदी , फराळ तयार करणे ,आमंत्रणे ,दागिने घडवणे ..सगळ घर नुसते “बिझी” झाले होते . आणि एक दिवस रिया आईकडे येऊन म्हणाली “आई अग सुदीपचा फोन आला होता आत्ता ..“हो का ? काय ग बाई ही गोष्ट आम्हाला सांगायचे काय बर कारण?इतर वेळेस तर कधी आम्हाला काही सांगत नाहीस ..”आई चेष्टेने म्हणाली ..“अग आई बातमीच तशी आहे आपल्या प्रियुला सुदीपच्या मित्राने समितने मागणी घातलीय .मला तर एवढा आनंद झालाय म्हणून सांगु..”रियाचा चेहेरा अगदी खुलला होता .ही बातमी घरात समजल्यावर सगळ्यांना खुप आनंद झाला .रियाकडुन त्यांना समजले समितचे स्थळ अगदी प्रियाला “साजेसे “होते समित आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता .एक बहीण होती पण ती लग्नानंतर आपल्या पतीसोबत परदेशी स्थायिक झालेली होती . त्याचे आईवडील दिल्लीला स्थायिक होते .तिथे त्यांची मोठी कोठी असुनपिढीजात कार व्यवसाय होता समितचे काका व वडील मिळुन हा व्यवसाय पहायचे ..सी ए झालेल्या समितने स्वतःचे ऑफिस नागपूरला येथे थाटले होते .प्रथम भाड्याच्या जागेत असलेले हे ऑफिस तीन चार वर्षातच स्वतःच्या जागेत स्थलांतरित झाले होते .शिवाय त्याचा स्वतःचा चार खोल्याचा एक ब्लॉक पण होता .लहान वयात त्याचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे होते,हे स्थळ अगदी लाखात एक होते ,प्रियाला कसलाच त्रास होणार नव्हता ना कसली जबाबदारी असणार होती . शिवाय रिया आणि प्रिया नागपुरातच राहणार होत्या .दोघींना एकमेकींची चांगली सोबत होती कारण सुदीप च्या घराजवळच समित राहत होता .खारेतर ही बातमी आधीं प्रियाला द्यायची होती पण प्रिया सध्या परीक्षेच्या गडबडीत असल्याने आणि लग्नघरी अभ्यास होणे अशक्य असल्याने निधीच्या घरीच राहायला गेली होती .त्यामुळे तिची परीक्षा संपेपर्यंत हा विषय नाही काढता आला .दोन तीन दिवसांनी प्रियाची परीक्षा आटोपली आणि ती घरी परत आली .निधी पण लग्नानिमित्त प्रियाकडेच राहायला आली होती .जेवताना रियाने तिला समितच्या “मागणी” बद्दल सांगितले . तेव्हा ती खुपच अपसेट झाली ..“आई काय चाललेय हे ?अजुन शिकायचे आहे मला ..इतकी जड झालेय का मी तुम्हाला ?ताईला मात्र लग्नानंतर नोकरी पण करायला दिली आणि माझे अजुन शिक्षण पुरे व्हायचे त्याआधीच लग्न ?प्रियाने उगाचच आकांड तांडव सुरु केले आणि मुख्य म्हणजे मला आणि निधीला इतक्या लवकर नाही लग्न वगैरे करायचे .हो न ग निधी ..यानंतर तिने निधीची पण साक्ष काढली निधीने तिच्याकडे पाहुन मान डोलवली ..“प्रिया काहीतरीच असते तुझे अग समितला भेटली आहेस न तु ?किती चांगला मुलगा आहे तो आणि नोकरी बिकरी करायची गरज काय तुला ?राजाच्या राणी सारखी राहशील तिथे .काही म्हणजे काहीही खोट नाही समितच्या स्थळात ..समजले ?रियाचा स्वर रागीट झाला आईबाबांनी पण रियाचीच बाजु उचलून धरली होती .आई तर म्हणाली,” काय ग मुली आईवडीलाना कधी जड होतात का ?उगाच काहीच्या काही बोलायचे ते ,आणि ताई तुझ्यासाठी चांगलाच तर विचार करणार ना “बाबांनी प्रियाला जवळ घेतले तिच्या डोक्यात एक टप्पल मारली आणि म्हणाले “कुल कुल प्रिया बेटा ..आपण सावकाश शांतपणे विचार करू ओके ?तुला मंजुर असेल तरच हो म्हण ,बळजबरी नाही काही “जेवताना बरेच नातेवाईक सोबत होते त्यामुळे हा विषय तिथेच थांबला ..प्रिया आणि निधी बेडरूम मध्ये गेल्या जेवल्यावर “निधी काय ग करायचे आता ?मला तर काही सुचतच नाहीये .निधी तर खुपच रागावली होती ..“प्रिया आपण ठरवले होते न लग्न नाही करायचे मग तिथल्यातिथे नाही म्हणायचे ना ..एवढे पण डेअरिंग नाही तुझ्याकडे “अशीच मुळूमुळू वागणार आहेस का कायम ?प्रिया आता मात्र रडायला लागली ते पाहुन मग निधी जरा विरघळली घरच्या लोकांना धाडकन नकार द्यायचे धाडस नव्हतेच प्रियाकडे हे माहित होते निधीला .“लगेच रडतीस का ग ..तु रडलेले मला नाही ग सहन होत माहित आहे ना ?असर म्हणून निधीने प्रियाला जवळ बसवुन घेतले .तिच्या केसातून हात फिरवला आणि तिला थोडे थोपटले “हे बघ आता रडु नकोस ,मला माहित आहे घरच्या लोकांच्या पुढे तुझे काही नाही चालणार ..ठीक आहे बघु आपण यातुन काही मार्ग निघतो का “निधी असे म्हणाली तेव्हा प्रियाला खुपच आधार वाटला .. प्रियाला लग्नासाठी तयार करण्याचे काम घरात जोरदार सुरु होते .