तसे पाहायला गेले तर समितच्या स्थळात तसे काहीच आक्षेपार्ह नव्हते .
आई, बाबा, आजी, आजोबा, काका ,आत्या घरच्या इतक्या सगळ्यांचे प्रियाचे मन वळवणे चालले होते
निधीची ताटातूट होतेय म्हणुन प्रिया लग्नाला नाही म्हणत होती की काय
असे वाटुन रिया म्हणाली ,” प्रिया थोडे दिवसात निधीसाठी पण आपण तिकडचे स्थळ पाहु मग तर झाले .”
निधी आणि प्रिया यावर काहीच नाही बोलल्या .
तशात खुद्द समितचे फोन प्रियाला येऊ लागले .
समितच्या आर्जवाने प्रियाच्या मनात “चलबिचल” होत होती .
अखेर एकदाची नाईलाजानेच प्रिया लग्नासाठी तयार झाली!!
निधीला हे बिलकुल पटले नाही पण सद्य परिस्थितीत काहीच उपाय तिला सुचत नव्हता .
सुदीपच्या लग्नासाठी समितच्या सोबत त्याच्या घरचे लोक पण आले होते प्रियाला पाहायला
त्यांनाही खुप आवडली प्रिया .
आता साखरपुडा करून जायचे असे त्यांनी ठरवले .
समितचे आईवडील दिल्लीला राहणारे होते तरीही ,
इतक्या लांबून ते आपल्या मुलाने पसंत केलेली मुलगी पहायला आले म्हणल्यावर प्रियाच्या घरच्या लोकांना त्याचे खुपच”अप्रूप” वाटले ..
प्रिया खरेच नशीबवान होती !!!
रियाच्या लग्नानंतर लगेच प्रियाचा साखरपुडा पण झाला .
लग्नाचा मुहूर्त पंधरा दिवसा नंतरचा निघाला
समित खुप खुष होता.प्रिया जाम आवडली होती त्याला .
प्रियाच्या मनाचा तसा कुणालाच काही अंदाज येत नव्हता .
पण होईल लग्नानंतर सगळे ठीक असे घरच्यांना वाटले.
पुढचे पंधरा दिवस खुप वेगाने पार पडले
या दिवसात निधी आणि प्रिया सतत एकत्र होत्या
रियाच्या लग्नासाठी राहायला आलेली निधी परत गेलीच नव्हती .
एकदोन वेळा समित भेटायला आला होता दागिने ,कपडे पसंती साठी ..
पण त्यालाही प्रिया एकटी अशी भेटलीच नाही ..
सोबत निधी असायचीच ..
दोघींच्या घरच्या लोकांना ही बाब थोडी खटकली होती .
पण आता लग्न जवळ आलेय कशाला दोघींना नाराज करा असा विचार झाला त्यांचा आणि ते गप्प राहिले
समितच्या पण मनात आले, इतकी जुनी घट्ट मैत्री आता दोघींची सोबत पण संपणार होती
..राहूदे सोबत दोघींना.
लग्न सुरळीत झाले.
संपूर्ण कार्यक्रमात निधी आणि प्रिया दोघींचे डोळे सारखे भरून येत होते .
जड अंतःकरणाने दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला .
फोन होतेच की संपर्कासाठी ..
आणि मांडव परतणीसाठी प्रिया माहेरी येणारच होती काही दिवसासाठी .मग भेट होणारच होती .
हनिमुनसाठी नवीन जोडी मनालीला गेली होती .
समित खुप उत्साहित होता .
बरेच प्लान होते मनात त्याच्या .
पण गेल्यावर एक दिवसभर प्रिया उदासच राहिली होती .
कदाचित थकली असेल म्हणून समितने काहीच फोर्स नाही केला .
बाहेर फिरायला गेले तरीही प्रिया बळेबळे सगळे रेटत होती असे वाटले समितला
दुसर्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर दोघे थोडे फिरुन आले आणि खोलीत परतले .दार लाऊन समितने प्रियाला जवळ ओढले .
तिच्या कानात कुजबुजला “ प्रिया किती मस्त दिसते आहेस .
मला खुप आवडली आहेस तु .मला तुझ्यात पुर्ण विरघळून जायचे आहे .
कीती “धुंद” आहे मौसम त्यापेक्षा धुंद करणारे तुझे “रूप” आहे ग “
प्रिया समितच्या मिठीत आली पण त्यात फार जोर नव्हता ..
समितने तिचे ओठ ओठात घेऊन तिचे दीर्घ चुंबन घेतले ..
इथे मात्र प्रियाचा थोडासा प्रतिसाद होता .
हलके हलके प्रिया गरम होत होती ..
बेडवर प्रियाचा अनावृत्त देह पाहुन समित वेडावला ..
स्वताचे कपडे काढुन तो प्रियाच्या अंगावर झेपावला ..
प्रियाचे डोळे बंद होते ..
आत्तापर्यंत बरी साथ देणाऱ्या प्रियाने अचानक समितला अंगावरून दूर ढकलले “प्लीज सोड मला समित ..असे म्हणून ती दूर झाली ..
आणि स्वतःला तिने बाथरूम मध्ये बंद केले ..पुर्ण कपडे घालूनच ती बाहेर आली ..
समितला काहीच समजेना काय झाले हीला अचानक ..
“प्रिया काय झाले माझे काही चुकले का “
यावर काहीही उत्तर न देता प्रिया गुडघ्यात तोंड घालुन मुसमुसून रडु लागली .
यानंतर तिने समितच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही .
शेवटी कंटाळून समित तिच्याकडे पाठ करून झोपी गेला .
नंतरचे दोन तीन दिवस हेच चालु राहिले .
दिवसा सगळे ठीक असायचे रात्री मात्र पुर्ण “असहकार “...
बर त्याचे कारण विचारले तर चिडीचूप.
काय कराव असा विचार करून समितचा मेदू थकुन गेला .
तशात प्रियाचा स्वभाव गरीब होता आणि समितचे तिच्यावर प्रेम असल्याने तो तिच्यावर रागावू शकत नव्हता .
आणि त्या हॉटेलमध्ये लोकांसमोर तमाशा करण्यात काहीच अर्थ नव्हता .
ठरलेले चार दिवस नाईलाजाने तिथे राहून अखेर दोघे बाहेर पडले
हनिमुन दौरा एकदाचा आटोपला आणि जोडी स्वगृही परत आली .
नंतर दोन तीन दिवस असेच गेले
दिवसभर सगळे बरे असे रात्र झाली आणि सेक्स चा विषय आला की प्रियाचे रडणे सुरु होई .
संसार सुरु होण्यापुर्वी प्रियाच्या माहेरून तिला माहेरी पाठवण्याविषयी विचारणा झाली .तसे रितीप्रमाणे पाठ्वावेच लागणार होते .
तिला न्यायला तिची मावशी आली होती .
अतिशय आनंदाने प्रिया माहेरी गेली .
चार पाच दिवसांनी तिच्या वडीलाच्या सोबत ती परत आली .
वडील राहिले चार पाच दिवस ,त्यांच्यासोबत नागपूर दाखवायला समित पण प्रिया सोबत गेला होता .
सासरे खुप खुष होते जावयावर ,लेकीला उत्तम स्थळ मिळाल्याचे सतत सांगत होते .शिवाय प्रियाने पण माहेरी समितचे खुप कौतुक केले होते म्हणे !!.