Reunion - Part 11 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्मिलन - भाग 11

Featured Books
Categories
Share

पुनर्मिलन - भाग 11

त्या रात्री सतीश परतलाच नाही आता परत तो दारू ढोसून येतो आहे की काय असे ऊमाला वाटले  त्या रात्री ऊमा न जेवता सतीशची वाट पहात राहिली होती  ..पण सतीश आलाच नाही. सकाळी उठल्यावर तिने आधी स्वतःचे आणि नयनाचे आवरून घेतले .तिचे डोळे खरेतर सतीशच्या येण्याकडे लागले होते .पण तिची निराशा झाली ..अखेर ती घराला कुलुप लावून नयनाला घेऊन बाहेर पडली नयनाला नेहेमीसारखे काकुकडे सोडले .बहुतेक वेळेस नयनाला काकुकडे सतीश सोडत असे .त्यामुळे काकूने विचारले सतीश कसा आला नाही असे ..ऊमाने काहीतरी थातूर मातुर सांगून वेळ भागवली आणि ती तेथून बाहेर पडली .काका काकूंना सतीशबद्दल हे काही सांगण्यात काहीच अर्थ नव्हता .मग तिने तिच्या ऑफिसमध्ये आपली एक दिवसाची रजा साहेबांना सांगितली .आणि नंतर चौकशीसाठी ती तडक सतीशच्या ऑफिसमध्ये गेली .आज तिला सतीशचे ऑफिस मध्ये काय चालू असते हे बघायचेच होते .काय तो सोक्षमोक्ष आज लागायला हवा होता .ती ऑफिसमध्ये पोचली आणि रिसेप्शन मध्ये बसून राहिली .ती थोडी लवकर तिथे पोचल्याने ऑफिसची वेळ व्हायची होती ..ऑफिसमध्ये स्टाफ नुकता यायला लागला होता .तेवढ्यात तिला सतीशचा मित्र मोहन येताना दिसला .त्यानेही तिला पाहिले आणि तो तिच्याजवळ गेला .हसून म्हणाला “नमस्कार वहिनी मी मोहन...ओळखले न मला?तुमच्या लग्नाला आलो होती मी  “ऊमाने ओळख दाखवून मान हलवली .. मग मोहननेच विचारले , वहिनी बोला काय काम होते इथे ऑफिसमध्ये  ऊमा काळजीच्या स्वरात म्हणाली ,  “ अहो सतीश काल पासुन घरी आला नाहीय म्हणून चौकशी करायला आलेय  ऑफिसच्या कामासाठी कुठे पाठवले आहे का ? तुम्हाला माहिती आहे का तो कोठे आहे ?असे विचारताच मोहन म्हणाला ,”वहिनी अहो गेले चार दिवस सतीश ऑफिसला आलेलाच नाही .आम्हीच नवल करतोय ना फोन ना चीठ्ठी ना निरोप हा गेला कुठे ?त्याचा फोन सुद्धा बंद लागतो आहे .आता तुमच्या घरीच शिपाई पाठवायचा होता चौकशीसाठी .कालच साहेबांनी तसे सांगितले होते .हे ऐकल्यावर मात्र ऊमाला चक्कर आल्यासारखे झाले .आणि जवळच्या खुर्चीवर ती मटकन बसलीच !!!रोजच नेमाने सतीश डबा घेऊन ऑफिसला जायला बाहेर पडत होता .ऑफिसला येत नव्हता मग जात कुठे होता हा ?ऊमाची तशी अवस्था झालेली पाहताच मोहनने आधी तिला पाणी दिले प्यायला .मग मोहन ऊमाला  ऑफिसच्या लंच रूम मध्ये घेऊन गेला .आणि ऊमासाठी कॉफी बिस्किटे मागवली .सकाळच्या गडबडीत आणि विचारांच्या तंद्रीत घरातून बाहेर पडताना तिने काहीच खाले नव्हते .काल रात्री पण सतीशची वाट पहात ती न जेवताच झोपली होती .खरेच तिच्या पोटात खड्डा पडला होता .मोहनने मागवलेली कॉफी बिस्किटे खाल्ल्यावर ऊमाला थोडी तरतरी आली.तिने जे जे घडले होते ते सगळे मोहनला सांगितले .त्यानंतर मोहनने जे सांगितले ते ऐकुन ती अक्षरश: हादरलीच .मोहन तिला म्हणाला .“ काय सांगायचे वहिनी.. सतीशचा स्वभाव पहिल्यापासूनच अतिशय चमत्कारिक आहे .ऑफिसमध्ये त्याचे कोणाशीच पटत नाही .त्याचे दारूचे व्यसन तर जुनेच आहे .आत्ता सुद्धा ऑफिसला तीन चार दिवस तो गैरहजरच आहे .मनात येईल तेव्हा ऑफिसला दांड्या मारायची सवयच आहे त्याची . गेले वर्षभराच्या त्याच्या अनियमित उपस्थितीमुळे बरेच मेमो सुद्धा मिळाले आहेत त्याला.पण असल्या मेमोना तो दाद देत नाही . आमच्या साहेबांचा स्वभाव चांगला असल्याने ते त्याला सांभाळून घेतात .नाहीतर त्याचे काही खरे नव्हते .आता तर त्याची रजा अजिबात शिल्लक नसल्याने या महिन्यात त्याचा पगार सुद्धा झाला नाहीये .शिवाय पुढची रजाही बिनपगारी होईल त्याची दारूच्या व्यसनामुळे त्याची मित्रांकडे सुद्धा उधारी आहेच  .त्यात त्याचा पगार झाला नसल्याने त्याने माझ्यासकट दोन चार मित्रांकडून थोडी रक्कम पण उधार घेतली आहे .मध्यंतरी त्याचे मानसिक संतुलन सुद्धा बिघडलेले होते .मागच्याच वर्षी त्यासाठी त्याला दवाखान्यात पण ठेवले होते.मीच होतो त्यावेळी त्याच्यासोबत आणि नंतर काही दिवस मीच शुश्रुषा केली होती त्याची .त्यावेळेस काही गोळ्या पण चालू होत्या त्याला .तरीही अधून मधून त्याला झटके येतात , अतिशय विचित्र वागतो तेव्हा तो ,आणि कधीकधी नंतर त्याला आठवत पण नाही आपण काय केले ते .. सतीश सारख्या माणसाशी तुम्ही लग्नच कसे केले याचेच मला नवल वाटते . तुमच्याकडे मी त्याच्यासोबत जेव्हा काकांना जेव्हा भेटायला आलो होतो तेव्हा मी सतीशला सांगितले होते असे कोणाला फसवून लग्न नको करूस .तुझ्याविषयी सगळे खरे खरे सांग त्यांना ...त्यावर त्याने माझ्याशी बोलणे पण सोडले ..त्यानंतर तुमच्या काकांना भेटून त्याने काय मोहिनी त्यांच्यावर घातली हे समजलेच नाही त्याचे लग्न झाले ही बातमी त्याने ऑफिसमध्ये कोणालाच सांगितली नव्हती.मला सुद्धा अचानक लग्नादिवशीच त्याने बोलावले .ही सगळी नवीन आणि सविस्तर माहिती समजल्यावर ऊमा हादरून गेली  ..तिच्या लग्नाच्या वेळी नक्की काय काय सतीशने काकांना सांगितले होते .हे आता ती काय सांगणार होती मोहनला ?शेवटी मोहनचा निरोप घेऊन ती ऑफिसमधून निघाली . जाण्यापूर्वी मात्र काहीही मदत लागली तर मला सांगा असे मात्र त्याने ऊमाला सांगितले .ऑफिसमधून बाहेर तर पडली ती पण त्याचा शोध कुठे घ्यायचा या काळजीतच .लवकरात लवकर पोलीस तक्रार करून टाका जास्त वाट पाहू नका असेही मोहनने तिला सांगितले होते  .आणि ह्या सगळ्या गोष्टी काकांपासून लपवणे हे तिच्यासाठी खूपच कठीण झाले होते .तशात अचानक त्याच दिवशी दुपारी नयनाला डायरियाचा त्रास होऊ लागला .अतिशय उन्हाळा असल्याने तिला बहुधा हवामान सोसले नसावे .खरे म्हणजे काकू आणि काकूंच्या मदतीसाठी ठेवलेली नयनाला सांभाळणारी मेड दोघीही नयनाची अगदी व्यवस्थित काळजी घेत असत .पण काय झाले कोण जाणे अचानकच ती सिरीयस झाली.घरगुती उपचारांना ती दाद देईना म्हणल्यावर तातडीने ऊमाला  नयनाला घेऊन दवाखान्यात जायला लागले .तिथेच डॉक्टरांनी तिला सलाईन लावून उपचार सुरु केले .काकुच्या आणि ऊमाच्या दोघींच्याही तोंडचे पाणी पळाले .काकांना पण अतिशय टेन्शन आले .नयनाची अवस्था तर फारच वाईट झाली होती .तिच्या वेगवेगळ्या तपासण्या ताबडतोब कराव्या लागल्या .त्यासाठी एकटीला करावी लागणारी धावपळ आणि खर्च यामुळे ऊमा मेटाकुटीला आली दोन तीन दिवस दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर तिला थोडे बरे वाटू लागले .पण अशक्तपणा आणि आजारामुळे होणारी तिची चिडचिड खूप वाढली होती .फार काळजीने जपायला लागत होते .या काळात काका काकू पण घाबरून गेले होते व ऊमाची एकटीची धावपळ बघून सतीश कुठे गेला आहे याची सारखी चौकशी करीत होते .ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलाय तो मी त्याला कळवले आहे येईलच तो .असे सांगून तिने वेळ मारून नेली होती .नयनाच्या नाजूक तब्येतीमुळे ऊमाने काकांच्या घरीच मुक्काम ठेवला होता .सतीशचा अजून पत्ता नव्हताच ... या गडबडीत पोलीस तक्रार पण करायची राहून गेली होती .नयनाच्या या दवाखान्यातील तातडीच्या उपचारासाठी ऊमा जवळची होती ती सगळी शिल्लक संपली .क्रमशः