सविता - अहो मुलीची जात आहे ती. एक दिवस परक्याच्या घरी जाणार तेव्हा काय कराल?
श्रीधर - तेव्हाच तेव्हा बघू. पण जेवढ शक्य आहे तेवढ मी तिला माझ्या नजरेआड होऊ देणार नाही.
त्यावर सविता ताई ने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाल्या हे आणि ह्याचं लेक प्रेम. काय होणार आहे पुढे काय माहित?
आता पुढे.....
दुसऱ्या दिवशी आर्या मेघा च्या आईला बघायला तिच्या घरी गेली. त्यांची विचारपूस करून ती मेघा सोबत तिच्या रूम मधे गेली. आर्याचा उतरलेला चेहरा पाहून मेघा ने तिला विचारलं आर्या काही झालाय का?
आर्या - हम्म 😒
मेघा - काय झालं? आणि चेहरा का एवढा पडलाय तुझा?
आर्या - मेघा बाबांचं ट्रान्स्फर झालंय मुंबईला. आम्हाला पुढ्याच्या आठवड्यात जायचं आहे.
आर्याच बोलून ऐकून मेघा शॉक झाली. तिला काय बोलाव कळत न्हवत.
अगं पण अस अचानक? आणि तुझ्या कॉलेज च काय?
आर्या - बाबांनी प्रयत्न केला ग, पण वरून ऑर्डर्स आहेत सो जाव लागेल. बाबांनी आधीही माझ्यामुळे बऱ्याचदा ट्रान्स्फर नाकारली होती, पण ह्यावेळी शक्य नाही अस बाबा बोलले.
मेघा - आणि तुझं कॉलेज?
आर्या - काकांशी बाबांचं बोलणं झालय त्यांच्या ओळखीने एका कॉलेज मध्ये ॲडमिशन मिळतंय. तिथे गेल्यावर फॉर्म भराव लागेल.
मेघा - मला तुझी खूप आठवण येईल आर्या. मेघा आर्याला मिठी मारून रडत होती. आर्याच्या पण डोळ्यात पाणी आलं. मग दोघी बऱ्याच वेळ गप्पा मारत बसल्या.
आर्याच्या मोबाईल वाजला. आईचा कॉल होता. आईशी बोलून आर्याने मेघा आणि तिच्या घरातल्यांचा निरोप घेतला.
आर्या घरी आली, आई किचन मधे स्वयंपाक करत होती. आर्या फ्रेश होऊन किचन मध्ये आली आणि आईला म्हणाली आई काही मदत करू का?
आई - नको अगं झालंच आहे सगळ, तू जा बाहेर बस नाहीतर तुझ्या रूम मधे जा तुझी पॅकिंग करून घे. ऐनवेळी उगाच गडबड नको.
आईच बोलणं ऐकून आर्याच्या चेहऱ्यावर उदास भाव आले. आताच मेघाला भेटल्यामुळे तिला छान वाटत होत पण आईच्या बोलण्याने ती पुन्हा उदास झाली. आईला तिची स्थिती समजत होती पण ती ही काही करू शकत न्हवती.
असेच चार पाच दिवस निघून गेले उद्या मुंबई साठी निघायचं होत. आर्याच्या बाबांनी सगळी तयारी केली होती. पॅकर्स अँड मूवर्स कडून त्यांनी शिफ्टिंग ची सगळी व्यवस्था करून ठेवलेली. त्यामुळे त्यांना कष्ट करावे लागणार न्हवते.
आर्याचा उदास चेहरा पाहून बाबांना वाईट वाटलं. ते आर्याला म्हणाले बाळा आपण उद्या जाणार आहोत, परत लवकर तुला तुझ्या मित्रांना भेटता येणार नाही तर तू जाऊन त्यांना भेटून ये. आर्याने मानेनेच होकार दिला आणि तिच्या रूम मध्ये निघून गेली.
रूम मधे आल्यावर तिने व्हॉट्स अँप ओपन करून त्याच्या ग्रुप वर एक मेसेज पाठवला आणि सगळ्या फ्रेंड्स ना कॉलेज जवळच्या कॅफे मध्ये भेटायला बोलवाव. तिने मेघा सोडून अजून कोणालाही तिच्या बद्दल काही सांगितलं न्हवत. आज ती सगळ्यांना सांगणार होती.
आर्या तीच आवरून मेघा कडे गेली. मेघा आर्याची वाट पाहत होती. आर्या येताच त्या दोघी आर्याच्या स्कूटी वरून कॅफे मधे पोहचल्या. अजून तरी कोणी आलं न्हवत म्हणून मेघा आणि आर्या गप्पा मारत होत्या...
मेघा - तू त्यांना आधीच सांगायला हवं होतंस आर्या, आता अचानक सांगितल्यावर सगळे कसे रिॲक्ट करतील काय माहित?
काय सांगायला हवं होत? मागून निखिलचा आवाज आला तस मेघा आणि आर्या ने त्या दिशेला पाहिल. तिचे सगळे फ्रेंडन्स तिच्याकडे रोखून बघत होते.
आर्या ला काय बोलाव कळत न्हवत. ती शांत बसली. ते पाहून सगळे तिच्या जवळ आले आणि टेबल वर बसले. आर्याचा उदास चेहरा पाहून निखिल ने विषय बदलला
निखिल - चील यार. We are just kidding... काय झालं? Anything serious? तू असा अचानक सगळ्यांना इथे का बोलावलंस?
आर्या - सांगते रे आधी काहीतरी ऑर्डर करूया , मला खुप भूक लागली आहे.
प्रिया - हो चालेल.
सगळ्यांनी आपापली ऑर्डर दिली आणि आता गप्पा मारत बसले होते.
नीता, प्रिया, अविनाश, ईश्वरी, मेघा सगळे गप्पा मारत होते, सुट्टीच्या दिवसात काय काय केलं ह्या बद्दल गप्पा रंगल्या होत्या. आर्यचं मात्र त्यात लक्ष न्हवत. सगळ्यांना कस सांगायचं हाच विचार ती करत होती.. निखिल ने मात्र ते ओळखलं आणि हळूच आर्याच्या बाजूला झुकून तिच्या कानात म्हणाला
Hey it's ok. एवढ टेन्शन नको घेऊ. आपण सगळे फ्रेंड आहोत, तू सगळ शेअर करू शकतेस. त्यावर आर्याने हो मध्ये मान डोलावली.
निखिलला अस आर्याच्या जवळ बघून अविनाश ने नीता ला खुणावलं.
तुम्हाला जर दोघांनाच बोलायचं होत तर आम्हाला इथे का बोलावल? नीता आर्या आणि निखिल कडे बघून बोलली. त्यावर निखिल लगेच बाजूला झाला आणि सरळ बसला. अविनाश त्याच्या कडे बघून गालात हसत होता. निखिल ने त्याला तुला नंतर बघतो असा लूक दिला.
आर्या - मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. I know मी हे आधीच सांगायला हवं होत but मला नाही जमलं.
ईश्वरी - आर्या सगळ ठीक आहे ना? काय झालंय प्लीज नीट सांग.
आर्या - माझ्या बाबांना ट्रान्स्फर मिळाली आहे. आम्ही सगळे मुंबईला शिफ्ट होणार आहे तेही उद्याच.
आर्यचं बोलणं ऐकताच सगळ्यांना शॉक लागला फक्त मेघा शांत होती.
नीता - आर्या फालतुगिरी करू नको हा. Prank करताना जरा चांगली आयडिया शोध.
त्यावर सगळे हसायला लागले कारण त्यांना वाटत होत आर्या नेहमी सारखी मस्करी करत असेल. निखिल मात्र आर्यचं बोलणं ऐकून एकदम शांत झाला कारण तिच्या चेहऱ्यावरून ती मस्करी करतेय अस त्याला वाटलं नाही.
आर्या - guy's I m serious. आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत.
प्रिया - पण अस अचानक ? आणि तुझं कॉलेज?
त्यावर आर्याने त्यांना सगळ सांगितलं..तीच बोलण ऐकून सगळे उदास झाले कारण आर्या त्यांची खूप चांगली मैत्रीण होती. तिच्या खोडकर स्वभावामुळे ती सगळ्यांची favourite होती. ती नेहमी सगळ्यांशी प्रेमाने वागायची. तिच्या अशा जाण्याने सगळे भावूक झालेले पण आपण कॉल आणि मेसेज वर टच मधे राहू म्हणून सगळे शांत झाले. निखिलला काही सुधारत न्हवत. मी आलोच अस बोलून तो washroom मध्ये निघून गेला. त्याला जाताना पाहून अविनाश पण उठला आणि त्याच्या मागे गेला. बाकी सगळे आर्या शी बोलत बसले. त्यांच्याशी बोलून आर्याला सुद्धा आता छान वाटत होत.
Washroom मध्ये आल्यावर निखिल ने आरशात पाहिलं त्याचे डोळे पाणावले होते. अविनाश ने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला. निखिल ला आर्या आवडत होती. अगदी लहानपणा पासून...प्रेम ही भावना कळायला लागल्यापासून ती त्याला आवडत होती. तिची प्रत्येक गोष्ट तो ऐकत होता. तिला काय हवं काय नको ह्याकडे त्याने नेहमी लक्ष दिलं होत निखिल अभ्यासात हुशार होता दिसायलाही सुंदर होता. कॉलेज मध्याला बऱ्याच मुली त्याच्या मागे मागे करायच्या पण त्याने कधी त्यांना ढुंकूनही पाहिल न्हवत. त्याला फक्त आर्या आवडायची. तिला पहिल्यांदा पाहिल्यावरच तो फ्लॅट झाला होता.
आर्या होतीच तशी एकदम सुंदर
लांब सडक मुलायम केस, कमनीय बांदा, गोरा रंग, चाफेकळी नाक, दाट काळे डोळे, गुलाबाच्या पाकळी सारखे नाजूक गुलाबी ओठ. त्यावर एक छोटा काळा तिळ. जणू देवाने नजर लागू नये म्हणून आधीच तीट लावून पाठवलं होत तिला.
तिला बघून बरेच जण तिच्या सोबत मैत्री साठी पुढे यायचे पण निखिल ने मात्र कोणाला तिच्या जवळ येऊ दिलं न्हवत. त्याने मनातच तिला आपलं मानलं होत.
ती फक्त त्याची होती आणि कॉलेज संपल्यावर तो तिला प्रपोस करणार होता. कारण कॉलेज मध्ये रिलेशन बनवून त्याला तिच्या आणि त्याचा अभ्यासात व्यत्यय नको होता. म्हणूनच तो इतके वर्ष थांबला होता. पण आर्यचं बोलणं ऐकून त्याला त्याच्या डिसिजन चा राग येत होता. कारण त्याने त्याच्या मनात काय आहे हे कधीच आर्याला किंवा दुसऱ्या कोणाला कळू दिलं न्हवत. तो फक्त एक चांगला मित्र म्हणून आर्या सोबत वागत होता.
त्याच सिक्रेट फक्त अविनाश ला माहित होत. त्यामुळे तो त्याच्या मागे washroom मध्ये आलेला.
निखिल च्या डोळ्यात पाणी बघून अविनाश बोलला चील यार ती काय out of India नाही जात आहे......
तुम्हाला जर अस वाटत असेल की निखिल या कथेचा नायक आहे तर अस अजिबात नाही. निखिल कथेचा खूप महत्वाच पात्र आहे. आपल्या नायकाची एन्ट्री अशी साधी थोडीच असणार आहे. एकदम दमदार एन्ट्री होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला थोड थांबव लागेल.....
,...............................................,.........................................
To be continued.. .