Maziya Priya doesn't know love - Part 9 in Marathi Love Stories by Pradnya Chavan books and stories PDF | माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 9

Featured Books
Categories
Share

माझिया प्रियाला प्रीत कळेना - भाग 9

★ स्थळ : कृष्णकुंज ★*

मीरा बाथरूम मधून येते आणि तिच्या मनात परत प्रश्नांचं काहूर माजते....  ती तिचा फोन हातात घेऊन गूगल वर सर्च करते , why I see a person and my heart beat racing so fast ????

It's totally normal to see someone and heart racing so fast because of nervousness , excitement and anxiety.....

" Hmm , म्हणजे हे सर्व nervousness मुळे होत आहे.... अँड इट्स नॉर्मल , मी का उगाच ओवर थिंक करत आहे काय माहीत .... तसं ही दादा म्हणाला आहे या वयात हे सर्व हार्मोन्स मुळे होत असत.... जाऊ दे जास्त विचार नको करायला.... 

ती बेड वर पडून फोन मध्ये कोरियन ड्रामा पाहत असते....

तिकडे , मृगजळ 

उद्या ऐश्वर्या कोल्हापूरला परत जाणार होती , त्यामुळे प्रीतम थोडा sad होता.... 

" यार ऐश्वर्या तू का इतक्या लवकर चालली आहेस , थांब ना अजून दोन दिवस .....

" प्रीत दोन दिवसांनी सुद्धा जावच लागेल ना ..... तू जेव्हा माझ्या शी लग्न करशील ना तेव्हा मी तुझ्या जवळ असेन कायम तुला सोडून कुठेच जाणार नाही.... पण आता नाही एक तर कोणाला आपल्या बद्दल माहीत नाही.... आणि इतक्यात ते कोणाला सांगायचं ही नाही असं तूच म्हणाला आहेस.... सो मी उद्या कोल्हापूरला जाते, कारण माझं सुद्धा कॉलेज आहे .... अशा किती दिवस सुट्ट्या घेणार मी.... 

" बर बाई ..... जा तू उद्या सकाळी पण त्या आधी एकदा मला मिठीत घे ना.... उद्या वेळ नसेल , घरातल्यांसमोर कसं तुला मी मिठीत घेणार ना.... Please ना....

तो तिला मिठी घट्ट मारतो....

" मला अस वाटतंय की वेळ इथेच थांबावी आणि तू अशीच माझ्या जवळ रहाविस....

" वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे तू लवकरात लवकर आपल्या बद्दल सर्वांना सांग नाही तर माझं दुसऱ्या कोणा सोबत लग्न होईल आणि तू तसाच बघत बसशील.....

" काय ग.... माझ्या सर्व रोमँटिक मूडचा कचरा केलास.... मी इथे रोमँटिक होत आहे आणि तू हे काय बोलत आहेस ..... एक लक्षात ठेव , तू फक्त माझीच आहेस.... 

तो रागातच तिला बोलला आणि तिथून निघून गेला...

दुसरा दिवस : सकाळी नऊ वाजता 
स्थळ : मृगजळ 

ऐश्वर्या आणि तिचे आई बाबा हे कोल्हापूरला परत गेले...

आज अनुरागचा ऑफिसचा पहिला दिवस होता....
त्यामुळे तो त्याचं  चहा -नाष्टा आवरून ऑफिस साठी लागणारं सर्व साहित्य बॅगेत भरुन ठेऊन छानसा blue कलरचा शर्ट  आणि ब्लेझर घातला....


खाली हॉल मध्ये येऊन डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी आला..... आज सर्वांचा नाश्ता लवकर केला होता कारण ऐश्वर्या आणि तिचा आई बाबा कोल्हापूरला सकाळी लवकर निघून जाणार होते.... 

अनुराग : गुड मॉर्निंग बाबा 😊

बाबा : गुड मॉर्निंग अनु , आज ऑफिसचा फर्स्ट डे आहे tension आले नाही ना.... 

अनुराग : बाबा त्यात टेन्शन घेण्यासारखे काय आहे मी या आधी ही जॉब करतच होतो पण तो ऑनलाईन होता आणि हा ऑफलाईन आहे इतकाच फरक आहे.... मला काही टेन्शन आलं नाहीये.... 

आई : अनु नाष्टा कर आणि देवाच्या पाया पड आणि मग जा ऑफिसला .....

अनुराग नाष्टा करून देवाच्या पाया पडतो, तोच एक नोकर त्याला डबा आणि पाण्याची बॉटल देतो.... तो  आई बाबा आणि काका काकी यांच्या पाया पडून ऑफिसच्या दिशेने रवाना होतो.....


स्थळ : अनुरागच ऑफिस 

अनुराग ऑफिस मध्ये यायच्या आधीच ऑफिस मध्ये चर्चा सत्र सुरू होते , चर्चेचा विषय होता एक सव्वीस वर्षाचा मुलगा या पुण्याच्या नव्या AJ group of companies च्या ब्रांचचा नवा सीईओ असणारं आहे....  

Aj group of companies मध्ये गेले दहा वर्ष काम करणाऱ्या अमित गोडबोले याला सीईओ व्हायचं होतं.... जेव्हा या कंपनीने पुण्यात त्यांचं  ऑफिस काढल त्यावेळी त्याला असं वाटल की या नव्या ब्रांचचा तो सीईओ असेल पण असं झालं नाही म्हणून त्याला अनुराग विषयी  मनात खंत व राग होता .... कंपनीने त्याच्या सारख्या अनुभवी कर्तव्य निष्ठ एम्पोईला का डावललं....


अमित : मला वाटतं हा अनुराग जहागीरदार साहेबांचा नातेवाईक असेल म्हणूनच त्याला सीईओ केलं आहे या ऑफिसचा....

" मग काय तर सव्वीस वर्षाच्या मुलाला कोणी सीईओ करत का ???? नक्कीच तो tyancha खास असेल....
अमित सोबत गेले तीन वर्ष काम करणाऱ्या सारिका रणदिवे त्यांना म्हणाल्या....

" माझ्या पेक्षा तो मुलगा दहा वर्षांनी लहान आहे, त्याला साधं presention करता आले तरी खूप झाले.... 
निखिल नाईक जो अमित सोबतच नोकरीला लागलेला गेली दहा वर्षे या कंपनीत काम करत होता... तो म्हणाला...

"एका सव्वीस वर्षाच्या मुलाला आता आपण सर म्हणायचं , लायकी आहे का 


इतक्यात अनुराग ऑफिस मध्ये आला .....

त्याने घातलेला  नेव्ही ब्ल्यू कलरचा शर्ट आणि त्यावर घातलेले ब्लॅक कलरचे ब्लेझर मध्ये तो चर्मिंग दिसत होता.... सर्वच ऑफिस मध्ये येणाऱ्या त्याला पाहत होते.... त्याचं चालणं ही attitude मध्ये होत.....


तो आला आणि सर्वांसमोर उभा राहिला....

" Hii, माझं नाव अनुराग  प्रकाश देशपांडे  तुमचा नवा सीईओ ..... 

" तुमचं या ऑफिस मध्ये स्वागत आहे सर अमितने च त्याला बुके देऊन त्याचं स्वागत केलं....

त्याने ही आदर पूर्वक सर्वांचे आभार मानले मग ऑफिस मध्ये अनुरागच्याच वयाचा असणारा अभिषेक राणे याने त्याला त्याचं केबिन दाखवल.....

तो ऑफिस मध्ये खुर्चीत बसला.... 

तो विचार करू लागला की तो सीईओ झाला आहे हे इथे असणाऱ्या स्टाफला फार काही रूचल नाहीये....

हे सर्व विषय बाजूला ठेऊन तो कामाला लागला त्याला हे सर्वांना लवकरात लवकर  सिद्ध करावं लागणार होतं का की का तो सीईओ हे पद डिझर्वे करतो....


असेच दिवस मागून दिवस जात होते.... मे महिना संपून जुन महिना सुरू झाला होता....

मीराची शाळा आता सुरू झाली होती.... दहावी च वर्ष म्हणून थोड लवकरच शाळा सुरू झाली होती.... मीरा सुध्दा आता अभ्यासाला सुरुवात केली होती....

बघता बघता जुन संपून जुलै महिना सुरू झाला , त्यांच्या वर्गाच्या क्लास टीचर ने शिकवलेल्या अभ्यासावर फर्स्ट युनिट टेस्ट ठेवली होती.... 



मीरा अभ्यास तर करत होती पण तिला गणित हा विषय म्हणजे तिच्यासाठी महा संकट होतं.... गणितचा अभ्यास करायचा म्हणजे तिच्या जीवावर यायचं.... मराठी इंग्लिश हिंदी  सोशल सायन्स या सर्व विषयांमध्ये तिचा अभ्यास खूप चांगला होता पण गणित तो म्हणजे अतिशय घाणेरडा सब्जेक्ट कारण किती अभ्यास केला तरी तिला गणित अवघडत जात होतं..... 



जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा झाली....

तिला सर्व विषय चांगले गेले होते फक्त एक सोडून तो म्हणजे गणित....

तिला तर कळतच नव्हतं की काय करावे आता गणित या विषयासाठी तिला एक होम टीचर ठेवावा लागेल की काय असंच वाटत होतं.....

आज शाळेमध्ये शिक्षक चेक केलेले पेपर विद्यार्थ्यांना दिले होते..... कोणाला किती मार्क पडले कोणाचा परफॉर्मन्स किती चांगला आहे हे बोललं जात होतं....

तिच्या क्लास टीचर ने आज स्पेशली मी याचं कौतुक केलं कारण तिला ऑलमोस्ट सर्व विषयात चांगले मार्क होतात फक्त गणित सोडून.... ती टॉपरच्या पोझिशनला पोचण्यासाठी काय आडवा येत असेल तर तो म्हणजे गणित हा विषय.....


स्थळ : मीराची शाळा छत्रपती शिवाजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल 

वेळ : संध्याकाळी साडे पाच वाजता 

" मीरा तू तर टॉपर झाली आहेस ग 

" अस काही नाही ग संजना ....

" तसचं आहे मीरा बघ ना त्या टिचरच्या मागे पुढं करणाऱ्या साईशाला तुझ्या इतकेच मार्क्स आहेत.....
तू तर टॉपर झालीस ग 

" अस काही नाही आहे प्रिया , बघ ना मला maths मध्ये किती कमी मार्क्स आहेत.... कशी करणार ग मी टॉप अशाने.... 

शाळेच्या गेट मध्ये हे सर्व संभाषण सुरू होत....

आज प्रियाला शाळेतून पीक करायला अनुराग आलेला असतो, त्याचं ऑफिक शाळेच्या जवळ होत.... त्याने प्रिया मीरा आणि त्यांच्यासोबत एकत्र काही मुली बोलताना दिसल्या..... मीरा च्या हातात कसला तरी पेपर होता.... 

" प्रिया..... अनुराग 

" दादा तू आलास ही...
ती तो जिथे उभा होता तिथे आली सोबत मीराला ही घेऊन आली.....

" प्रिया तुझ्या हातात काय आहे दाखव ना जरा....

तिच्या हातात सर्व विषयांचे पेपर होते....

तो ते पाहतो, तुला तर सगळ्या विषयात बरे  मार्क्स आहेत फक्त गणिताचा प्रोब्लेम आहे गणित आवडतं नाही का तुला ????

हो दादा... मला maths अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही.... म्हणजे आजचे इक्वेशन माझ्या डोक्यातच घुसत नाहीत..... आणि त्यात ते गणितचे वैद्य मला अजिबात आवडत नाही त्यांचं लेक्चर सर्वात बोरिंग असतं..... 

हमम.... त्यात काय एवढं तुला मी म्हटलं होतं ना की तुझ्या दहावीचा अभ्यास मी घेईन म्हणून..... मी शिकवेन तुला गणितचे प्रॉब्लेम्स कसे सॉव्ह करायचे.....

ओके .... तू घे माझा अभ्यास.... ती खुश होत म्हणाली...

मग अनुराग मीरा चे पेपर घेतो आणि पाहू लागतो तिला सर्व विषयात आऊट ऑफ आऊट मार्क्स पडले होते फक्त एक विषय सोडून तो म्हणजे गणित.....

" अरे मीरा तुला तर किती छान मार्क्स आहेत.... मग गणित मध्येच का तुझ घोड अडतय..... गणित तर मला वाटतं सर्वात सोपा विषय आहे.....

"सोपा आणि गणित कोणत्या अँगल ने ????

" तुलाही गणित आवडत नाही का ????

"हो... गणित मला आवडतं नाही... म्हणजे मी कितीही वेळ इक्वेशन्स  सॉल्व करण्यात घालवला आणि कितीही मन लावून गणित लेक्चर समजून घेण्याचा प्रयत्न केला तरीही मला गणित खूप कठीण जातो....   I hate maths....😩


"कमाल आहे तुम्हाला गणित कसा कठीण जाऊ शकतो.....  Maths is very easy subject .....

" नाही मला तर अस वाटत गणित हा महा कठीण सब्जेक्ट आहे हो ना प्रिया ..... मीरा

" हो ना... आम्हाला नाही आवडतं maths.... प्रिया 

" तुला किती मार्क्स होते 10th मध्ये maths subject मध्ये.....

" मला 100 आऊट ऑफ 100 होते..... तो attitude मध्ये बोलतो....

" काय !!!!! 😱😱😱😱 कसं शक्य आहे हे....

" शक्य आहे.... I love maths..... त्यामुळे मला आऊट ऑफ आऊट मार्क्स पडले.....

" Hmmm.... मला ही हवेत maths मध्ये आऊट ऑफ आऊट पण हे इम्पॉसिबल आहे.....

" नाही हे शक्य आहे... माझ्या कडे आहे एक  सोल्युशन.... मी तुला जर गणिताच्या प्रेमात पाडल तर.... 

" हे शक्यच नाही आहे.... मला गणित एक टक्का ही आवडत नाही.....

" मी शिकवेन तुला गणित त्यानंतर जर तुला गणित हा सर्वात सोपा विषय नाही वाटला तर नाव नाही सांगणार...

" पण तुला तर तुझ ऑफिस असत ना.... मग कसं काय मला तू maths शिकवणार?????
  तिचा प्रश्न 

" ऑनलाईन पर्याय आहे ना .... आणि मला शनिवारी मला हाफ डे असतो आणि रविवार सुट्टी असते .... त्यावेळी मी शिकवीन तुला.... 

" मीरा अग दादा maths topper आहे, तो तुला खूप छान शिकवेल... दे ना तुझा नंबर मग आपण एकत्र ऑनलाईन maths lecture घेऊ.....


आता तिला काय करावं कळेना.... तो अनुराग म्हणाला....

माझ्या वर तुझा विश्वास नाही का  मीरा ???? 

"तस काही नाही...  

" मग तुझा नंबर दे ना , मी शिकवीन तुला गणित .... If you don't mind.... आता मी प्रिया ला शिकवणार आहे तर तुला ही शिकवीन....

"ओके माझा नंबर नोट कर....

तो नंबर नोट करतो आणि तीला व्हॉट ॲप वर हाय पाठवतो.... 

" मी तुला व्हॉटस ॲप वर हाय पाठवलय, माझा नंबर सेव कर घरी गेल्यावर....

" ओके .....

" तू घरी कशी जाणार आहेस???? मी ड्रॉप करू तुला....

" नको नको.... ड्रायव्हर काका येतच असतील....

" बर ....

"प्रिया चल आपण आता घरी जाऊ या

" ओके.... बाय मीरा, उद्या भेटू.....

तीने ही त्या दोघांना बाय केलं.... तेवढ्यात तीचे ड्रायव्हर काका ही गाडी घेऊन आले...... ती गाडीत बसली आणि गाडी घराच्या दिशेने जाऊ लागली.....


पुढे काय होणार यासाठी वाचत रहा माझिया प्रियाला प्रीत कळेना....🩷🩷🩷🩷

अनुराग तिला गणिताच्या प्रेमात पडतो की ती अनुरागच्या प्रेमात पडते..... हे येणारा काळच सांगेल.....😁😁😁

मला तुमच्या कंमेंट्स दिसतात पण रिप्लाय द्यायला गेलं कि रिप्लाय सेंड होतं नाही... का काय माहित नाही अँपचा प्रॉब्लेम असेल... 

 मला माहित आहे खुप महिन्यांनी मी उगवले आहे पण आता रेगुलर एपिसोड पोस्ट करत जाईल.. आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा...



Bye bye stay tuned ❤️ ❤️ ❤️ ❤️ 


भेटू पुढच्या भागात लवकरच.....✨✨✨✨