किती नाही म्हटले तरी निशा व निलेश यावर विश्वास बसेना कारण सुरेश ने सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे कोणतीही शक्ती नव्हती असे यांना वाटले मग निलेश निशाला तिच्या घरी सोडतो रात्रही खूप झाली होती तिला सोडून तो त्याच्या घरी जातो मग दुसरा दिवस उगवतो निशाला काल घडलेल्या प्रकरणामुळे अस्वस्थ झालेली होती तिला काय करावे हे सुचत नव्हते मग तिला वाटायला लागले की जॉब चे काम करू नये त्या कामाला सुट्टी घ्यावी मग तिच्या बॉसला फोन करून ती सांगते हो मग बॉस सुट्टी देऊन टाकतो निशाला वाटते की बॉस कधीच सुट्टी देत नाही व अचानक हो कसा बोलला मग निशा तो विचार करणे सोडून देते कारण तिला दुसऱ्या विषयावर विचार करायचा होता पण तिला वाटते की मी खूप दमलेली आहे तिला थोडासा थकवा ही जाणवत होता मग ती आराम करण्याचे ठरवते ती तिचे आवरून आराम करते तेवढ्यात तिचे आई वडील येतात जे बाहेरगावी कामासाठी गेली होते मग ते बघतात की घर नीट आवरलेले आहे व मग निशा कोठे आहे हे बघतात तर ती झोपलेली असते मग ते म्हणतात की जाऊदे करू दे आराम ती काल तिकडे गेली होती म्हणून तिला बरे वाटत नसेल म्हणून झोपलेली असेल ती उठली की मग आपण तिच्याशी बोलू . तर निलेश लाही आज वाटत होते की शरीरात थोडी कणकण जाणवत आहे दमल्यासारखे त्याला वाटले की लांब फिरलो काल म्हणून वाटत असावे असे म्हणतो पण सुट्टी घेऊन घरी आराम करण्याची ठरतो व तोही झोपलेला असतो तर दोघेही आज आरामच करतात निशा झोपलेली असताना अचानक तिला आठवते की घरी मी एकटे आहे व दरवाजा उघडा असावा बहुतेक मग ती उठते व सर्व घराचे दरवाजे बंद आहे का ते बघते मग तुला आई किचनमध्ये दिसते तर पप्पा पेपर वाचताना दिसतात मग ती दोघांनाही विचारते की तुम्ही कधी आले मग ते सांगतात की आम्हाला येऊन अर्धा तास झाला तुला हाक मारली तर तू झोपलेली होती व म्हणून तुला काही उठवले नाही .
विशाखा - जा तू जरा फ्रेश हो मी नाश्ता बनवला आहे.
निशा - हो
व मग निशा फ्रेश होऊन नाश्ता करायला बसते व तिला विशाखा म्हणते की कालचा दिवस कसा गेला व सुरेशने तुमच्या दोघांविषयी काय सांगितले हे निशा ने ऐकल्यावर निशाला काय सांगावे ते समजत नव्हते पण मम्मीने विचारले म्हणून सांगावेच लागेल .
निशा - हो . सांगते व मग ती नाश्ता करताना आकाश विशाखा ला काल घडलेल्या सर्व काही सांगू लागली तर निलेश ही तिकडे झोपेतून उठला होता तो मग उठल्यावर फ्रेश झाला व त्याला लीलाने चहा ठेवला त्याने चहा घेतला मग लीला नाश्ता करायला सुरुवात करते . व मंग तोपर्यंत तो तसाच खुर्चीवर बसून राहतो फोन बघत असतो व मंग लीलाचा नाश्ता तयार होतो लीला योगेशला नाश्त्यासाठी हाक मारते व मग तेही नाश्ता करतात व मध्येच लिहिलेला आठवते की काल निलेश व निशा सुरेश कडे गेले होते व मंग लीलाला वाटते की निलेश ला विचारावे ती विचारते व मग तो तिला सर्वच नाष्टा करता करता सांगू लागतो . तर तिकडे निशाचे बोले थांबते व हे सर्व ऐकून विशाखा व आकाश जरा जास्त शॉक मध्ये जातात व आता काय करावे त्यांना समजत नाही तर विशाखाला चक्कर येणे बाकी असते तर निलेश सांगत असताना लिला व योगेश जास्तच घाबरून जातात व तरी पुढे काय झाले हे ऐकण्याचा धीर धरतात त्यांना वाटायला लागते की निलेश च्या जोडीला आम्ही तरी गेलो असतो निलेश आता सर्व सांगून मोकळा होतो व त्याला मन हलक झाल्यासारखं वाटतं .
एक दिवस निशा तिची फ्रेंड शरयू सोबत एका पार्कमध्ये फिरण्यासाठी जाते कारण सध्या घडलेल्या घटनेमुळे तिला फ्रेश होणे गरजेचे होते . पार्क हा सिम्पल असतो त्यात झाडे होती एक छोटा स्विमिंग पूल होता एक छोटे हॉटेल असते मग त्या दोघी तिथे जातात मग ते झाडे बघून ती थोडी त्यात रमते व शरयू ला म्हणते की खूप छान वाटत आहे मला या झाडांकडे बघून .
शरयू हो ना खूप छान जागा आहे निशा व शरयू फिरत फिरत स्विमिंग पूल पर्यंत जातात . दोघींनाही पोहता नाही येत त्या पाण्यामध्ये पाय बुडवून बसतात पाणी स्वच्छ असल्याने चेहरा दोघींचाही स्पष्ट दिसत होता त्यामुळे दोघेही चेहरा पाण्यात सारखा सारखा बघत होत्या पण चेहरा बघत असताना निशाला वेगळेच काही दिसले तिला तिचा चेहरा न दिसता तिच्या चेहऱ्यावर जी दुसऱ्या मुलीचा चेहरा दिसतो ते निशापेक्षा दिसायला सुंदर असते व तिच्या कानात मोठाल्या झुमक्यासारखे कानातले ते पण सोन्याचे होते नाकात सोन्याची मूरनी होती हेअर स्टाईल केसांची खूप छान होती हे बघताच तिच्या मागे व पुढे बघू लागते व तिला तसे कोणीच दिसत नाही व परत पाण्यात बघते पण तिला तिचा चेहरा दिसतो व ती गोष्ट शरयू ला सांगते शरयू तिचा चेहरा पाण्यात बघते पण तिला निशाचा चेहरा दिसतो बाकी कुणाचाच नाही निशाला समजत नाही असे का झाले असावे हे झाल्यावर शरयू म्हणते मला ना भूक लागली आहे आपण हॉटेलमध्ये जाऊन बघू काय आहे हॉटेलमध्ये ?
निशा - हो. व मी ओले झाले आहे चेंजिंग रूम आहे का ते बघून कपडे चेंज करायचे होते .
शरयू - ओके चल मग बघू.
मग या दोघे हॉटेल कडे निघतात व हे हॉटेल याच पार्कमध्ये होते त्या दोघे बोलत बोलत जातात त्या हॉटेलमध्ये पोहोचतात हॉटेलमध्ये चौकशी करतात मग निशा व सर्व एका रूम मध्ये जाऊन कपडे चेंज करतात मग ते जेवणासाठी जातात मग त्यांचे जेवण होते मग रिटर्न रूम मध्ये जाते व निशा आरशासमोर जाते टचप करण्यासाठी . तर तिला तिचा चेहरा हा जसा तिने पाण्यात बघितला होता तसा सेम दिसला व तिचे कपडे पूर्ण बदललेले होते एखाद्या मूवी मध्ये जसे दाखवतात तसे ती एका राजकुमारी सारखी दिसत होती ती मागे वळून बघितले तर कोणीच नव्हते स्वतःकडे बघितले तर ती तिच्यासारखी दिसायची व आरशात दिसल्यावर राजकुमारी सारखी दिसायची तिला समजत नव्हते काय चालले आहे आज माझ्यासोबत ते ती गोष्ट परत शरयूला सांगते सर्व यु आरशात तिला बघते पण तिला निशा च दिसते नेत्रा नाही मग शरयू तिला विचारते आज तुला काय झाले आहे असे का दिसत आहे नेमकी तुझ्यासोबत काय चालले आहे मला नीट सांग शरयूला काहीच माहित नसते याबाबत मग निशा शरयू ला सर्व सांगू लागते.
शरयू - एवढे सर्व काही झाले व मला माहित पण नाही .
निशा - अगं मला कसे सांगू हेच समजत नव्हते कारण हे मी माझ्या मम्मी पप्पांना सांगितले तर ते खूप घाबरून गेले होते म्हणून मी तुला नाही सांगितले .
शरयू - ok.