Prem katha ek Rahashy - 3 in Marathi Love Stories by Prajakta Kotame books and stories PDF | प्रेम कथा एक रहस्य - 3

Featured Books
Categories
Share

प्रेम कथा एक रहस्य - 3

मग त्यांचे बोलणे होते व ते त्यांच्या घरी जातात मग असेच काही त्यांचे दोन-तीन दिवस निघून जातात तरी त्या दिवसांमध्ये ते अमावस्या च्या दिवसाच्या विचारात होते व त्यासोबत ती त्यांचे त्या हॉटेलमधील झालेली मीटिंग आठवत होते मग ते पुढे काय होईल व काय करायचे या विचारात होते मग दोन दिवसांनी तो अमावसचा दिवस होता त्या दोघांच्या हृदयात धक धक होती काय होईल कसे होईल हे प्रश्न त्यांच्या डोक्यात धिरट्या घालत होते मग त्यांनी एकमेकांना फोन केला त्यांनी पहिल्यांदाच केलं होतं पहिल्यांदाच ते एकमेकांची फोनवर बोलत होते परत त्यांनी त्या विषयावर बोलणे सुरू केली परत नीट सर्व विचारविनिमय करून घेतला कारण दोन दिवसांनी अमावस्या दिवस येणार होता सुरेशने त्यांना संध्याकाळच्या वेळेस यायला सांगितले होते मेन म्हणजे त्यांचा अमावस्या , पौर्णिमा ,बाहेरचे , जादूटोणा, भूत, प्रेत ,राक्षस ,आत्मा यावर दोघांचाही विश्वास नव्हता पण त्यांना त्या गोष्टीवर जरा विश्वास व्हायला लागला होता कारण त्यांच्याबद्दल घडलेली तसेच आहे मग अमावस्येच्या दिवस आला मग ते सुरक्षा घरी जाण्यासाठी तयारी करू लागले दोघेही त्यांना भीतीही वाटत होती कारण आज काय होईल सुरेश काय सांगेल त्याची व दिवस कधी जाईल याची उत्सुकताही वाटत होती कारण सुरेश काय सांगेल हे समजायला पाहिजे कसा बसा दिवस त्यांचा संध्याकाळ होण्यात गेला मग संध्याकाळ झाली परत आज त्यांनी फोन केला कधी निघणार आहे असे विचारण्यासाठी.

निलेश -  मला जायला लांब आहे म्हणून मी लवकर निघेल जरा घरून . 
निशा - मला काही प्रॉब्लेम नाही माझ्याच गावात राहतो सुरेश त्यामुळे मी थोडे लेट निघाली तरी तिथे वेळेवर पोहोचेल . 
निलेश - एक काम करायचे का ? 
निशा - काय सांग ना ? 
निलेश- मी लवकर येतो तुझ्या घरी मग तु व मी सोबत जाऊ . 
निशा - हो. चालेल पण ? 
निलेश- पण काय ? 
निशा - माझे आई-वडील व तुझे आई वडील येणार आहे त्याची काय करायचे ? 
निलेश - अरे बापरे ! हे तर मी विसरलोच तुला सांगायला . 
निशा - काय?  
निलेश - माझे मम्मी-पप्पा येणार नाही कॅन्सल झाले कारण त्यांना बाहेर कुठे अचानक काम निघाले. 
निशा - हो का ? मग माझी पण मम्मी पप्पा येणार नाहीत . 
निलेश- ओके मग बरेच झाले आपल्याला सोबत जाता येईल . 
निशा -  हो. 
निलेश- तुला माझा प्लॅन आवडला ना सोबत जाण्याचा? 
निशा - हो नक्कीच तू लगेच निघ तुझ्या घरून . 
निलेश- ok 
मग दोघेही फोन ठेवतात निलेश आवरून लगेच निघतो तर निशा पण आवरून ठेवते कारण तिला घ्यायला निलेश येणार असतो मग निलेश तिला घ्यायला येतो पण तो निशाच्या मदनपूर या गावात जातो पण निशाचे घर कुठे आहे ते माहीत नसते त्याला असे वाटते की मी मगाशीच कॉलवर का विचारले नाही मग निलेश निशाला कॉल करतो निशाला वाटते की निलेश घ्यायला आला म्हणून त्याने कॉल केला मग निशाणी कॉल उचलला . 
निशा - hello 
निलेश- hello 
निशा - काय रे  का कॉल केला?  काही काम होते का? 
निलेश-  हो ना  मी मदनपूर  गावात आलो  पण तू मला नक्की कुठे राहते तो पत्ता माहीत नाही तुझ्या घराचा प्रॉपर पत्ता सांग . 
निशा - ok  माझ्या घराचे नाव आकांक्षा बंगलो घराचा नंबर 10 आहे . 
निलेश- ok. येतो मी तू आवर लवकर. 
निशा - हो मी आवरून ठेवले आहे फक्त तुझीच वाट पाहते . 
निलेश- ok. चालेल पाच दहा मिनिटात येतो मी ठेव फोन . 
निशा - ओके
मग दोघेही फोन ठेवतात मग निलेश गाडी चालवत असतो मोजून दहा मिनिटात तो निशाकडे पोहोचतो निलेश हा निशा च्या घरी पहिल्यांदा जातो. निशा त्याची वाट बघत घराबाहेर थांबते म्हणजे निलेश का समजेल की निशा कोठे आहे ते निलेश ला निशा दिसते व तो तिला बघून गाडी थांबवतो व ती पण पटकन जाऊन त्याच्या गाडीत बसते व निलेश ला सुरेश चे घर कुठे आहे सांगते मग अर्ध्या तासात सुरेशच्या घरी पोहोचतात मग तिथे जाऊन बघतात तर काय की सुरेशने भगवे वस्त्र परिधान केलेली असतात सुरेशच्या कपाळावर भस्म लावलेलं असतो व समोर दोन-तीन यज्ञ पेटवलेली असतात सुरेशचे एका स्त्री एवढे केस होते जे मोकळे होते व त्याकडे पाहिल्यावर वाटले की सुरेश हा  चिडलेला दिसत होता कारण त्याचे डोळे लाल बुंद  झालेले होते त्याच्याकडे कोणीही बघितल्यावर त्याला घाबरेल असे वातावरण तेथे असते ज्यावेळेस निलेश व निशा दोघे सुरेश कडे जातात तेव्हा तिथे खूप गर्दी असते मग निशा व निलेश नंबरला बसतात व जसे ते नंबरला बसतात तसे खूप स्पीडने तिथले सुरेशचे काम सुरू होते व गर्दी अचानकपणे कमी होते मग लवकर निलेश मनीषा चा नंबर लागेल असे वाटायला लागले मग थोड्यावेळ थांबतात मग मोजून दहा मिनिटांनी नंबर लागतो तो यांच्या नंबर सुरेश साठी शेवटचा असतो त्यांच्यापुढेही कोणी नाही व मागेही कोणी नाही गेले तर हे वेळेवरच होते लेट नव्हते गेले हे बघून सुरेश आचार्य वाटले की अचानक एवढी गर्दी कमी झाली तर कशी हो मग पुढे सुरेश हा निलेश व निशाला प्रश्न विचारतो . 
सुरेश - तुमचे नाव काय गाव काय काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला दोघांना हे प्रश्न ऐकून दोघे सर्व काही माहिती सुरेशला सांगतात व मग सुरेश त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला सुरुवात करतो पण निशा व निलेश ही त्याला काही प्रश्न विचारतात व त्यांच्या प्रश्नाचे उत्तरे सुरेश त्यांच्याकडे पाहून त्यांना सांगणार असतो . 
निशा व निलेश त्यांनाही प्रश्न विचारतो की मागच्या जन्मात आमच्या दोघांचा काय संबंध आहे?,आम्ही मागच्या जन्मात कोण होतो? आम्हाला मागच्या जन्माची शक्ती कोणती असते ?कोणी दिली शक्ती आम्हाला? शक्ती कोणती प्राप्त होती ? हे प्रश्न एकूण सुरेश त्यांच्या प्रश्नाचे उत्तरे द्यायला सुरुवात करतो . 
सुरेश सांगतो की तुम्ही दोघे मागच्या जन्मात राजांची मुले होती म्हणजेच एकाच राजाचे नाही वेगवेगळ्या राजाची मुले होते तेव्हा तुमचे एकमेकांवर खूप प्रेम होते मग तुमचे लग्न झाले नाही व होऊन पण नाही दिले नाही कारण तुमच्या दोघांचे वडील एकमेकांच्या शत्रू होते मागच्या जन्मात तुमच्या दोघांचा संबंध प्रेमीका व    प्रेमी होता निशा ही कालिका देवीची भक्त होती मागच्या जन्मात तिचे नाव नेत्रा असते तर निलेश चे नाव अद्वैत असते तो महादेवाचा भक्त असतो तुम्ही दोघे प्रेमी व प्रेमिका असल्याने देवी कालिकेने तुम्हाला दोघांना वेगवेगळ्या शक्ती प्रधान दिली  होती निशाला देवि कालिका अशी दैवशक्ती देते की तिला पुढे वाईट घटना कोणते घडणार आहे तिला हे समजते व निलेश ला  राक्षस व वाईट आत्मा ज्या असतात त्यांना मारण्याची त्याला देवी कालिका देते . मागच्या जन्मात तुम्हाला ही शक्ती मिळाली आहे या शक्तीचा वापर पण तुम्ही केला आहे पण तुम्हाला आता ते आठवत नाही ते काम अधूरे राहिले आहेत ते तुम्हाला या जन्मात पूर्ण करायचे आहे निशा व निलेश ऐकतच राहिले सुरेश सांगत होता पण दोघांनाही विश्वासच नव्हता सुरेश एखादी गोष्ट सांगतोय असे निशा व निलेश ला वाटत होते पण ते खरे आहे हे त्यांना समजून घेतले पाहिजे एवढेच निशा व निलेश ऐकत होते व सुरेश बोलत होता मग सुरेश चे बोलणे संपते मग सुरेश या दोघांकडे बघतच असतो सुरेश ला वाटते की मी जे यांना सांगितले आहे त्यावर यांचा विश्वास बसलेला दिसत नाहीये थांबतो बोलू त्याचा घसा जरा कोरडा होतो मग परत बोलतो की मला माहित आहे की तुम्हाला मी बोललो त्यावर विश्वास नाहीये हे ऐकताच निशा व निलेश जरा त्याला बघून आधीच घाबरलेले असतात मग त्यांना वाटते की आपण हो बोलल्यावर अजून काही वेगळे आमच्यासोबत नको करायला म्हणून ते दोघेही सुरेशला म्हणतात की असे काही नाही पण एवढे सगळं तुम्ही जे बोलले ते मी फक्त गोष्टींमध्ये ऐकले होते वाटत नाही की ते प्रत्यक्षात ही माझ्यासोबत घडेल हे ऐकून सुरेश हासतो व म्हणतो की तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी दिली आहे व तुमचे सर्व ऐकून समाधान पण झाले तर तुम्ही येऊ शकता मग तिथून हे दोघे उठून बाहेर जातात व सुरेश पण उठतो व जरा ब्रेक घेतो हे दोघे उठल्यानंतर परत सुरेश त्याच्या जागेवर बसण्या अगोदर तिथे पहिल्यासारखेच माणसांचे गर्दी सुरू होते हे बघून निशा व निलेश ला ही आश्चर्य होते .