A farewell message... - 5 in Marathi Thriller by Ashish Devrukhkar books and stories PDF | एक निरोप असाही... - 5

Featured Books
Categories
Share

एक निरोप असाही... - 5

सुमित आणि कंपनीचा शोध घेणाऱ्या मिग २१ बायसन घेऊन गेलेल्या स्कोड्रॅन लीडर अजितला बेपत्ता होऊन बराच वेळ झाला होता. त्यामुळे त्याला शोधायला फ्लाईट लेफ्टनंट संजीव आपले मिग २१ बायसन घेऊन निघाले होते. 

मिग २१ बायसन हे मूळ रशियन बनावटीचे मिग २१ लढाऊ विमान आहे. त्याच्यामध्ये योग्य ते बदल करून जसे इंजिन, रडार आणि शस्त्रास्त्रे यांमध्ये बदल करून त्यांना बायसन आहे नाव दिले गेले. 

लेफ्टनंट संजीव उड्डाण घेऊन थोडाच वेळ झाला होता आणि ते AFATC ला परिस्थिती सांगत होते. त्यामुळे एअरबेसवर सुरू असलेली मीटिंग रद्द करून पायलट आणि AFATC चे संभाषण मीटिंग रुममध्ये ऐकवायला सुरुवात केली. 

ले. संजीव : "Egle eye, this is falcon. I have a lead, over" 

ATC : "Copy that, what you've seen, over." 

"Something is visible in the valley below, near point 453. I try to get closer and see, over."

"Umm, negative. That area is very remote. The weather is getting worse. Our previous 'Bison' was last seen in the same area. Over."

"Allow me once, I won't go too low. over."

"Ummm. Affirmative. Be careful. Over."

"Roger that."

लेफ्टनंट संजीव आपल विमान अचानक त्या पॉइंटच्या दिशेने वळवतात आणि त्यांना समोर जे दिसते ते पाहून ते पटकन ATC ला संपर्क करतात.

"Egle eye, this is Falcon. This is terrible."

"Copy that, Control yourself! Stay calm."

"Ummm. Negative. I've found the missing 'Bison'. The plane is broken into two pieces. But Egle eye... there's something strange here. Over."

"Falcon Be clear. What's strange? Is there any trace of the pilot? Over."

"The plane's fuselage is still burning."

"What about polit? Is there any trace?"

"Negative."

"Copy that."

थोडा वेळ शांततेत गेला आणि पुन्हा रेडिओ वाजला.

"Egle eye. I see our air force parachutes falling, but this is far from the plane."

"Copy that. Return to base. I repeat return to base."

"Roger that."

आधीचे मिग २१ बायसन पाडले गेले आहे हे तर सिद्ध झाले होते पण पायलटचा पत्ता लागला नव्हता. तोच पुन्हा रेडिओ वाजला. 

"Egle eye, something has hit my plane, possibility of missile hit cannot be ruled out, I am ejecting over..."

आणि पुढे त्यांचा संपर्क तुटला. हे घडल्यावर डी. आशू ताडकन उभा राहिला.

"काय झालं?"

"Sir, Flight Lieutenant Sanjiv was my schoolmate."

"Oh, I'm really sorry."

"......"

"वाईट वाटून नको घेऊस, आपल्या देशासाठी तो कामी आलाय. तुला त्याचा बदला घ्यायचा आहे ना?"

"Yes sir."

ज्या मित्रासोबत लहानपणी शत्रूला यमसदनी पाठवायची शपथ घेतलेली आणि आजच त्या घटनेची आठवण आली होती, तोच आज निघून गेला होता.

       युद्धाचे ढग आता दाटू लागले होते. भुज एअरबेसवर पुढच्या कारवाईची तयारी सुरू झालेली होती आणि रात्री आणखी एक बातमी येऊन धडकली. पाकिस्तानच्या सीमेवर पॅट्रोलिंग करणाऱ्या नौसेनेच्या एका पॅट्रोलिंग नावेवर 'ICGS समर्थ'वर पाकिस्तानच्या फायटर जेट्सने मिसाइल्स डागले. खरेतर बोटीवरचे रडार तांत्रिक कारणाने बंद झाले होते आणि ती बोट पुन्हा माघारी येत होती तेव्हा हा हल्ला झाला पण बोटीवरच्या सैनिकांनी डोके लढवले आणि बोटीवरच्या १२.७ मिमी च्या मशीन गन ने मारा केला. पाकिस्तानच्या जेट्सना वाटले प्रत्युत्तर मिळतंय म्हणून ते तसेच माघारी फिरले.

ICGS म्हणजे Indian Coast Gaurd Ship म्हणजेच भारतीय तट रक्षक दलाची गस्ती नौका आहे, जिच्यावर  रडार आणि हेलिपॅड असतात. यावर ३० मिमीची सीआरएन-९१ तोफ (CRN-91 Gun) आणि दोन १२.७ मिमीच्या मशीन गन बसवल्या आहेत. एकदा इंधन भरले की ती ६००० नॉटिकल मैलांपर्यंतचा प्रवास करू शकते आणि सलग २० दिवस समुद्रात राहू शकते. वेग सुद्धा २५ नॉटिकल मैल (जवळपास ४६ किमी/तास) आहे. 

       आय.एन.एस. विक्रमादित्य लांब होती. तिच्याकडच्या Mikoyan MIG 29 K या फायटर जेट्सना इथे पोहचायला वेळ गेला असता. इतक्यात AFATC (Air Force Air Traffic Control) मधून सायरन वाजू लागला. सगळे बाहेर आले. बाहेर आल्यावर कळले की पाकिस्तानची ६ फायटर जेट विमाने भारतीय समुद्री हद्दीत घुसली होती. लागलीच बेसवर पळापळ सुरू झाली.

        पुढच्या पाचव्या मिनिटाला भुज एअरबेसवरून भारताची ३ लढाऊ विमान उडाली. संपूर्ण भारतीय बनावटीची HAL Tejas होती ती. पाकिस्तान नेहमी त्यांची मिराज विमाने घेऊन यायची. त्यामुळे पाकिस्तानने त्यांची मिराज विमाने आणली असावीत असे वाटत होते. नियोजित जागी पोहचल्यावर त्यांना कळले की पाकिस्तानची आपल्या हद्दीत आलेली फायटर जेट्स ही मिराज नसून F-16 Fighting Falcon ही आधुनिक जेट्स होते. रडारवर ही माहिती कळल्यावर AFATC मधून तिन्ही तेजसला संदेश गेला.

"Therimachus, Diecoon and Creontiades.... Hercules here. return to the home. Lycus is more powerful than usual. I repeat return to the home."

Therimachus, Diecoon and Creontiades ही Hercules ची तीन मुले आणि Lycus म्हणजे त्यांच्या राजाचा शत्रू. तर इथे अशी कोड लँग्वेज वापरली गेली जेणेकरून हे संभाषण पकडले गेले तरी कोणाला कळणार नाही. Hercules म्हणजे भारत, home म्हणजे भुजचा एअरबेस आणि Therimachus, Diecoon and Creontiades ही तीन मुले म्हणजे पाकिस्तानच्या दिशेने गेलेली ३ तेजस विमाने. Lycus म्हणजे पाकिस्तान आणि त्यांची विमाने अत्याधुनिक होती म्हणून आपली विमान परत बोलावली गेली.

तेजसमधून उत्तर आलं, "copy that."

     तोपर्यंत इकडे डी. आशूने आपत्कालीन उड्डाणाची मागणी केली आणि आताच आलेल्यापैकी चौघांना इथून ह्या मिशनवर पाठवण्याचा निर्णय झाला. 

AFATC मधून हा संदेश गेला तोपर्यंत हे तिन्ही तेजस विमान पाकिस्तानच्या टप्प्यात आली होती. त्यांनी तेजसच्या दिशेने उड्डाण सुरू केले आणि त्याचवेळी तेजस माघारी फिरले. पाकिस्तानला वाटले की तिन्ही विमान घाबरून परत गेली. त्यांनी त्यांच्या ATC ला कळवले. आनंदाच्या भरात पाकिस्तान वायू दलाने ट्विट केले.

"ये तो TEJAS तेज भाग गये।"

त्या ट्विटमुळे सगळे खवळले. पुढच्याच मिनिटाला भारतीय वायुसेनेने प्रत्युत्तर म्हणून ट्विट केले.

"Sun will rise again."

(क्रमशः)