The Mafia Couple - Chapter - 2 in Marathi Thriller by sanvi books and stories PDF | The Mafia Couple - Chapter - 2

The Author
Featured Books
Categories
Share

The Mafia Couple - Chapter - 2

काही महिने हळूहळू निघून गेले होते.Sanvi आता आधीसारखी राहिली नव्हती. Jack च्या अड्ड्यावर राहून तिने खूप काही शिकले होते — स्वतःला वाचवणं, लढणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीतीवर नियंत्रण ठेवणं.पण हे सगळं तिच्यासाठी सोपं नव्हतं.दिवसा ती कॉलेजला जायची, वर्गात बसून नेहमीसारखं सगळं करण्याचा प्रयत्न करायची. आणि संध्याकाळ झाली की ती सरळ अड्ड्यावर यायची — जिथे तासन्‌तास training, fight practice आणि कठोर सराव चालायचा.

कॉलेज आणि training… या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. कधी कधी शरीर थकून जायचं, हाताला जखमा व्हायच्या, आणि डोळ्यांत झोपही नसायची.

पण तरीही Sanvi कधीच मागे हटली नाही.

कारण तिच्या मनात एकच गोष्ट जळत होती — Riya साठी न्याय.

Riya च्या आठवणी तिच्या मनातून कधीच गेल्या नव्हत्या. तिच्या मैत्रिणीवर जे घडलं होतं, ते विसरणं अशक्य होतं.

Sanvi ने स्वतःशीच एक वचन केलं होतं —

“मी कमकुवत राहणार नाही… आणि ज्यांनी Riya चं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्यांना त्याची किंमत नक्की चुकवावी लागेल.”

काही महिने गेले आणि Sanvi खूप बदलली होती. कॉलेज आणि training दोन्ही सांभाळत तिने स्वतःला खूप मजबूत बनवलं होतं. पण तिच्या मनात अजूनही एकच गोष्ट जिवंत होती — Riya साठी न्याय.

एक दिवस अचानक तिला एक महत्त्वाची माहिती मिळाली.

Riya वर अत्याचार करणाऱ्या लोकांपैकी एकाचा पत्ता तिला सापडला होता.

तो माणूस होता Rajiv.

Sanvi ने लगेच घाई केली नाही. तिने शांतपणे त्याच्याबद्दल सगळी माहिती काढायला सुरुवात केली — तो कुठे राहतो, काय काम करतो, कोणासोबत फिरतो. या सगळ्यात Jack ने तिला खूप मदत केली.

काही दिवसांच्या शोधानंतर शेवटी Sanvi ला Rajiv चा exact address मिळाला.

त्या रात्री ती अड्ड्यावर आली. तिथे सगळे नेहमीप्रमाणे बसले होते. Sanvi काही क्षण शांत उभी राहिली आणि मग सगळ्यांकडे बघत म्हणाली,

“Thank you… तुम्ही सगळ्यांनी मला खूप काही शिकवलं.”

सगळे तिच्याकडे थोडे आश्चर्याने पाहू लागले.

Sanvi ने पुढे Jack कडे पाहिलं.

“Jack… तुला पण thank you. तू नसतास तर मी आज इतकी strong झाली नसते.”

Jack काही बोलला नाही, फक्त तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला.

Sanvi पुन्हा बोलली,

“मला त्याचा address मिळाला आहे… Rajiv चा. आता पुढचं मी स्वतः बघते.”

हे बोलून ती वळली आणि अड्ड्याबाहेर जायला लागली.

पण ती काही पावलं पुढे गेली इतक्यात मागून एक आवाज आला —

“Sanvi… थांब.”

ती थांबली आणि मागे वळली.

Jack तिच्याकडे चालत येत होता.

तो तिच्यासमोर येऊन शांतपणे म्हणाला,

“तू एकटी जाणार नाहीस… मी पण येतो तुझ्या सोबत.”

Sanvi ने Jack कडे पाहिलं आणि हलकंसं डोकं हलवलं.

“Jack… तू आधीच माझ्यासाठी खूप काही केलं आहेस,” ती शांतपणे म्हणाली. “आता पुढचं मी एकटी करेन. तुला यायची गरज नाही.”

Jack काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच शांतपणा होता, पण डोळ्यांत हट्ट स्पष्ट दिसत होता.

“Sanvi, ही तुझी लढाई आहे… मला माहित आहे,” तो म्हणाला. “पण तू एकटी नाहीस.”

“मी सांभाळू शकते,” Sanvi थोड्या ठाम आवाजात म्हणाली. “मी इतकं सगळं शिकले आहे त्यासाठीच.”

ती पुन्हा वळली आणि चालायला लागली.

पण काही पावलं पुढे गेल्यावर तिला मागून पावलांचा आवाज ऐकू आला.

ती थांबली, मागे वळून पाहिलं…

Jack तिच्या मागेच चालत येत होता.

“Jack!” ती थोडी चिडून म्हणाली, “मी तुला येऊ नकोस म्हटलं ना?”

Jack तिच्यासमोर येऊन थांबला आणि हलकंसं हसला.

“हो… ऐकलं मी,” तो म्हणाला. “पण मी कधी सांगितलं की मी ऐकणार आहे?”

Sanvi काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर थोडा राग होता, पण मनात कुठेतरी तिला दिलासा देखील वाटत होता.

Jack पुढे म्हणाला,

“चल… वेळ वाया घालवू नको. Rajiv आपली वाट पाहत बसलेला नसेल.”

Write

Chapter 2 – पहिला बदला

रात्र खूप शांत होती. Sanvi आणि Jack ने Rajiv ला शोधून काढलं होतं.

थोड्याच वेळात त्यांनी त्याला पकडलं.

Rajiv पळायचा प्रयत्न करत होता, पण Sanvi आणि Jack दोघांनी मिळून त्याला जोरात पकडलं. Jack चा राग आधीच वाढलेला होता. त्यांनी त्याला खूप मारलं आणि शेवटी एका एकांत जागी घेऊन गेले.

तिथे पोहोचल्यावर त्यांनी Rajiv चे हात-पाय बांधून टाकले.

काही वेळाने Rajiv ला शुद्ध आली.

डोळे उघडताच त्याने समोर पाहिलं…

त्याच्यासमोर Sanvi आणि Jack उभे होते.

Sanvi हळूहळू त्याच्या जवळ गेली. तिच्या डोळ्यांत राग आणि दुःख दोन्ही दिसत होते.

ती थोड्या भावुक आवाजात म्हणाली,

“तू असं का केलंस Riya सोबत? तिचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस?”

Rajiv च्या चेहऱ्यावर अजूनही घमेंड होती.

तो हसत म्हणाला,

“ती एवढी हॉट होती… म्हणून केलं.”

तो थांबला आणि Sanvi कडे वरखाली बघत पुन्हा म्हणाला,

“आणि तू पण काही कमी नाहीस… खरं तर तिच्यापेक्षा जास्त सुंदर आहेस. पुढची बारी कदाचित तुझीच असती.”

हे ऐकताच Jack चा राग अनावर झाला.

त्याने लगेच आपली gun बाहेर काढली आणि Rajiv च्या डोक्यावर रोखली.

Rajiv घाबरून गप्प झाला.

तेवढ्यात Sanvi जोरात म्हणाली,

“थांब Jack!”

Jack ने तिच्याकडे पाहिलं.

Sanvi पुन्हा Rajiv कडे वळली आणि कठोर आवाजात म्हणाली,

“तुझ्यासोबत जे लोक होते… त्यांच्याबद्दल मला सगळी माहिती पाहिजे. नाव, पत्ता, सगळं.”

Rajiv सुरुवातीला काही बोलायला तयार नव्हता.

पण Jack आणि Sanvi दोघांनी त्याला धमकावलं, त्याला मारलं… आणि शेवटी Rajiv घाबरला.

काही वेळाने त्याने सगळी माहिती सांगायला सुरुवात केली — त्याचे साथीदार कोण होते, ते कुठे राहतात, सगळं.

सगळं ऐकून झाल्यावर काही क्षण शांतता पसरली.

Sanvi च्या डोळ्यांसमोर Riya चा चेहरा आला.

तिने हळूहळू Jack च्या हातातून gun घेतली.

Rajiv घाबरून तिच्याकडे पाहत होता.

Sanvi चा आवाज थंड झाला होता.

“ही गोळी… Riya साठी.”

पुढच्याच क्षणी…

गोळीचा आवाज त्या शांत जागेत घुमला.

Rajiv जमिनीवर कोसळला.

Sanvi च्या आयुष्यातला पहिला बदला पूर्ण झाला होता.

थोड्याच वेळात Sanvi आणि Jack तिथून निघून गेले.

रात्र खूप पुढे सरकली होती आणि दोघेही खूप थकले होते.

आता इतक्या उशिरा परत जाणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ठरवलं की आजची रात्र जवळच्या एखाद्या हॉटेलमध्ये घालवायची.

थोडा वेळ गाडी चालवल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला एक छोटंसं हॉटेल दिसलं. ते दोघे तिथे गेले.

रिसेप्शनवर चौकशी केली तेव्हा कळलं की तिथे फक्त एकच रूम available होती.

Sanvi लगेच म्हणाली,

“नको… आपण दुसरं हॉटेल बघू.”

पण Jack ने बाहेर पाहिलं.

चहूकडे अंधार होता. दूर दूरपर्यंत दुसरं काहीच दिसत नव्हतं.

“इतक्या रात्री दुसरं काही मिळणार नाही,” तो शांतपणे म्हणाला.

काही क्षण विचार केल्यानंतर शेवटी त्यांनी त्याच एका रूममध्ये राहायचं ठरवलं.

दोघेही रूममध्ये गेले.

Sanvi थोड्या वेळाने बाल्कनीत जाऊन उभी राहिली. बाहेर रात्रीची शांतता पसरली होती, पण तिच्या मनात मात्र खूप वादळ चालू होतं.

तेवढ्यात Jack shower घेऊन बाहेर आला.

त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याला Sanvi बाल्कनीत उभी दिसली.

तो हळूहळू तिच्या जवळ गेला.

जवळ येताच त्याला जाणवलं… Sanvi रडत होती.


Jack ने Sanvi ला हलकेच मिठीत घेतलं. काही क्षण ती फक्त रडत राहिली. रात्रीची थंड हवा बाल्कनीतून आत येत होती, पण त्या क्षणी दोघांनाही त्याची जाणीवही होत नव्हती.

थोड्या वेळाने Jack शांत आवाजात म्हणाला,

“Sanvi… माझ्याकडे बघ.”

ती हळूहळू त्याच्याकडून दूर झाली. तिचे डोळे अजूनही ओले होते.

“तुला वाटतं तू चुकीचं केलं?” Jack ने विचारलं.

Sanvi काही क्षण शांत राहिली आणि मग हलक्या आवाजात म्हणाली,

“मला माहित नाही… Jack. मला Riya साठी बदला घ्यायचा होता. पण आज… जेव्हा मी trigger दाबला… तेव्हा मला जाणवलं की मी कुणाचं तरी आयुष्य संपवलं.”

Jack काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला.

“तो माणूस आधीच अनेक आयुष्यं संपवून बसला होता, Sanvi,” तो गंभीर आवाजात म्हणाला. “तू जे केलंस ते चुकीचं नाही… कधी कधी न्याय मिळवण्यासाठी कठोर व्हावं लागतं.”

Sanvi ने खोल श्वास घेतला.

“पण मला भीती वाटते, Jack… जर मी हळूहळू तुझ्यासारखी बनले तर?” ती म्हणाली.

Jack हलकंसं हसला, पण त्या हसण्यात थोडं दुःख होतं.

“माझ्यासारखी?” तो म्हणाला. “Sanvi… तू माझ्यासारखी कधीच होणार नाहीस.”

“का?” तिने विचारलं.

Jack काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला,

“कारण तू अजूनही रडतेस. तुला अजूनही लोकांच्या वेदना जाणवतात. आणि हेच तुला वेगळं बनवतं.”

हे ऐकून Sanvi पुन्हा थोडी शांत झाली.

ती आकाशाकडे बघत म्हणाली,

“हा फक्त सुरुवात आहे… अजून बरेच लोक बाकी आहेत.”

Jack तिच्या बाजूला उभा राहिला.

“हो,” तो शांतपणे म्हणाला, “आणि त्या सगळ्यांसाठी… मी तुझ्या सोबत आहे.”

त्या रात्री दोघेही बराच वेळ तिथेच उभे राहिले —

एकजण बदला घेण्यासाठी तयार होत होता…

आणि दुसरा तिच्या प्रत्येक पावलावर तिच्या सोबत उभा राहण्यासाठी.