The Mafia Couple - Chapter - 3 in Marathi Thriller by sanvi books and stories PDF | The Mafia Couple - Chapter - 3

The Author
Featured Books
Categories
Share

The Mafia Couple - Chapter - 3

Hotel मधून ते दोघे शांतपणे घरी गेले.

एक दिवस, Sanvi आणि Jack त्यांच्या अड्ड्यावर बसले होते.

समोर laptop उघडलेला… आणि Sanvi पूर्ण focus करून एक एक information काढत होती—

कोण कुठे राहतो, काय करतो… सगळं ती बारकाईने बघत होती.

Jack तिच्या बाजूला बसला होता, शांतपणे सगळं observe करत…

तेवढ्यात त्याचं लक्ष laptop च्या screen वर गेलं…

आणि अचानक त्याचा चेहरा बदलला.

Screen वर दिसणाऱ्या नावांपैकी एक नाव त्याला ओळखीचं होतं—

तो माणूस…

त्याच्या दुश्मनच्या group मधला होता.

Jack चं बोलणं ऐकून दोघांनी वेळ न घालवता त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली.

काही वेळातच त्यांना तो दिसला…

पण तो एकटा नव्हता.

ते त्याला पकडायला पुढे गेलेच होते…

तेवढ्यात तो अचानक पळायला लागला.

“थांब!” Jack ओरडला…

पण तो अजून वेगात पळत होता.

तेवढ्यात त्याच्या सोबतचे गुंडे अचानक समोर आले…

आणि Sanvi आणि Jack चा रस्ता अडवला.

क्षणात तिथे fight सुरू झाली.

Sanvi एका माणसाला जोरात ढकलून बाजूला करत होती…

तर Jack दोन जणांना एकटाच handle करत होता.

तेवढ्यात Jack जोरात म्हणाला—

“Sanvi! तू जा त्याच्या मागे!”

Sanvi थोडी थांबली—

“पण—”

“मी इथे आहे! तू जा!” Jack चा आवाज strict होता.

क्षणभर Sanvi ने त्याच्याकडे पाहिलं…

आणि मग ती वळली—

आणि त्या पळणाऱ्या माणसाच्या मागे धावू लागली.

तो माणूस पळत पळत थेट त्याच्या boss च्या अड्ड्यावर पोहोचला…

आणि Sanvi अजूनही त्याच्या मागेच होती.

तिथले लोक त्याला पाहून हसायला लागले—

“काय रे? एका पोरीला घाबरून पळतोयस?”

तो काही बोलणार इतक्यात—

Sanvi तिथे पोहोचली…

आणि क्षणातच तिने त्याला पकडलं.

ते दृश्य पाहून सगळे थोडेच वेळात serious झाले…

कारण त्यांना कळलं—

ही साधी मुलगी नाहीये.

“पकडा तिला!” कुणीतरी ओरडला.

क्षणात सगळे तिच्यावर तुटून पडले.

Fight सुरू झाली—

Sanvi एकटी…

पण तिचे moves जलद, अचूक… आणि खूप dangerous होते.

ती एकाला लाथ मारून खाली पाडत होती…

दुसऱ्याला punch देऊन दूर फेकत होती…

काही सेकंदातच scene बदलला—

एक एक करून सगळे खाली पडत गेले.

काही वेळात…

संपूर्ण जागा शांत झाली.

सगळे जमिनीवर होते…

आणि Sanvi अजूनही उभी होती.

हे सगळं… वरून कुणीतरी बघत होतं.

त्यांचा boss.

तो सगळं पाहून थक्क झाला…

“ही मुलगी… नेमकी आहे तरी कोण…?” तो हळू आवाजात म्हणाला.

बाकीचे लोक अजूनही तिच्यावर हल्ला करायला पुढे येत होते…

तेवढ्यात वरून जोरात आवाज आला—

“थांबा!”

सगळे जागच्या जागी थांबले.

तो boss हळूहळू खाली उतरू लागला…

त्याची नजर सरळ Sanvi वरच होती.

तो तिच्यासमोर येऊन थांबला…

आणि थोडं हसत म्हणाला—

“तू इथे आली आहेस… काहीतरी कारण असेल.”

Sanvi शांतपणे उभी होती…

तिच्या हातात अजूनही त्या माणसाची पकड घट्ट होती.

तो पुन्हा विचारतो—

“तुला काय हवं आहे?”

Sanvi सरळ त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाली—

“माझं तुमच्याशी काहीही वैर नाही…”

ती थोडी थांबली… आणि पुढे म्हणाली—

“मला फक्त हा माणूस पाहिजे.”

तो तिच्याकडे बघतच राहिला…

क्षणभर त्याने काहीच उत्तर दिलं नाही.

त्याची नजर तिच्या डोळ्यांत अडकली होती—

तिचा confidence… तिची भीती नसलेली नजर…

सगळंच वेगळं होतं.

आजपर्यंत त्याने खूप लोक पाहिले होते…

पण अशी कोणी नाही—

जी एकटी त्याच्या अड्ड्यावर येऊन

त्याच्या माणसांना हरवते…

आणि तरीही इतक्या शांतपणे उभी राहते.

त्याच्या ओठांवर हलकंसं स्मित आलं…

तो थोडा जवळ आला…

आणि हळू आवाजात म्हणाला—

“तू खूप वेगळी आहेस…”

 —

Sanvi काहीही न बोलता…

त्या माणसाला घट्ट पकडून तिथून घेऊन जायला लागली.

पण थोडं पुढे जाऊन ती अचानक थांबली.

क्षणभर सगळं शांत झालं…

आणि पुढच्याच क्षणी—

तिने चाकू काढला…

आणि सरळ त्याच्या अंगात खुपसला.

तो माणूस जोरात खाली कोसळला.

Sanvi च्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते…

ना राग, ना भीती…

फक्त शांतता.

तिने त्याला तिथेच संपवलं…

आणि मागे न वळता तिथून निघून गेली.

तिथले सगळे लोक फक्त बघत राहिले…

कोणी काहीच बोललं नाही.

Aarav पण शांत उभा होता…

त्यानेही काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

काही दिवसांनी…

Aarav ने तिची information काढायला सुरुवात केली.

एक एक detail त्याच्या समोर येत होती.

तेवढ्यात…

एक नाव त्याच्या नजरेत पडलं—

Jack.

क्षणात त्याचा चेहरा बदलला.

“तो… अजूनही जिवंत आहे…” तो हळू आवाजात म्हणाला.

Jack—

त्याचा जुना दुश्मन.

ज्याच्याबद्दल त्याच्या मनात आधीपासूनच राग होता.

Aarav च्या डोळ्यांत आता वेगळीच चमक होती…

राग आणि curiosity दोन्ही.

तो खुर्चीत मागे रेलला…

आणि हलकंसं हसत स्वतःशीच म्हणाला—

“आता तर Sanvi ला मी भेटूनच राहणार…”

Aarav च्या ओठांवर हलकंसं स्मित आलं…

पण त्या स्मितामागे एक धोकादायक इरादा होता.

तो खुर्चीत मागे रेलत डोळे मिटतो.

“यावेळी खेळ मोठा असणार आहे…” तो हळूच पुटपुटला.

तीन वेगवेगळे रस्ते…

तीन वेगवेगळे हेतू…

पण destination एकच—

समोरासमोर येणं.