Quotes by Archana Rahul Mate Patil in Bitesapp read free

Archana Rahul Mate Patil

Archana Rahul Mate Patil

@archanapatil4545
(157.2k)

जसा ज्ञानोबा मुक्ताई साठी..
असाच माझा भाऊ माझ्यापाठी
दीर्घायुष्य लाभो प्रत्येक बहिणीच्या भावाला
दृष्ट नको लागायला दोघांच्या प्रेमाला...!!
✍️✍️Archu .
- Archana Rahul Mate Patil

Read More

जसा ज्ञानोबा मुक्ताई साठी..
असाच माझा भाऊ माझ्यापाठी
दीर्घायुष्य लाभो प्रत्येक बहिणीच्या भावाला
दृष्ट नको लागाला दोघांच्या प्रेमाला..✍️✍️Archu .
- Archana Rahul Mate Patil

Read More

#नातंजीवाभावाचं ..!!!

रक्षा करणं हे बंधन नाही..
एकमेकांचं कर्तव्य आहे..!!

आईच्या ममते इतकच
बहिणीच्या प्रेमालाही महत्त्व आहे...!!

ते लहानपणीचे लहान-मोठे भांडण..
छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठ्या मोठ्याने रडणं..!!

एकमेकांच्या गोष्टीसाठी एकमेकांना ओरडणं..
कधी हसवणार तर हसता हसता रडणं...!!

कसं असतं बालपण समजत नाही तोपर्यंत निघून जातं,
जेव्हा समजतं तेव्हा बालपण नसतं..!!

मोठेपणी कर्तव्याची जाणीव रुसवे फुगवे
एकमेकांची चेष्टा कुठेतरी हरून जातो..

खरंच काय असतो भाऊ एका बहिणीसाठी..
जसा ज्ञानोबा आदिशक्ती मुक्ताई साठी..!!

हेच का ते बंधन द्रौपदीने कृष्णाला बांधलेलं..
रक्ताच्या नात्यापलीकडे स्वतःच्या अस्तित्वासाठी जपलेलं..!!

आता नसतो मुळी हट्ट काहीतरी मौल्यवान वस्तूंचा...
अपूर्ण असलेल्या अपेक्षांचा...!!

आता वाटतं असावा ,सुखी संसार भावाचा
याचसाठी बहीण करते धावा देवाचा..!!

दीर्घायुष्य लाभो प्रत्येक भावाच्या त्या बहिणीला..
प्रेमळ भाव नेहमी राहो बहीनीच्या भावाला..!!

दृष्ट नको लागायला दोघांच्या प्रेमाला..
अशीच कायम राहो जिवाभावाला...!!

जसा ज्ञानोबा मुक्ताई साठी ..
असाच माझा भाऊ माझ्यापाठी..!!

✍️✍️Archu..!!

Read More

जो ज्ञानाचा भांडार
भक्तीदानाचा महासागर!!
संगम भक्तीचा
भक्त भगवंताचा !!
मोठा असो वा लहान
गुरु म्हणून कीर्ती महान!!
ज्यांच्याकडून मला प्रत्येक वेळी काहीतरी शिकायला अनुभवायला मिळालं त्या
सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

#गृहिणीची वारी घरच्या घरी#

पंढरीची वारी, तुळस डोईवरी
पंढरीची स्वारी आली माझ्या दारी..
राम कृष्ण हरी
गजर घुमतो वारी..
नाम घेते विठोबाचे
मस्तक ठेवते चरणावरी..!!
टाळ मृदुंगाच्या गजरात..
अभंग आणि भजनात..
देव आहे कीर्तनात ..
माझ्या घर संसारात!!
वारी दोघांचीच झाली..
एक घरी एक पाई..
विठ्ठला सोबतच भक्तांची
वाट पाहते माझी रखुमाई..!!
सारे गेले दिंडीत..
टाळ घेऊन हातात..
मीच राहिले घरात
दिवा लावून देव्हाऱ्यात..!!
टाळकरी नाचती दिंड्या पताका लयावरी
भक्ताची वाट पाहतो विठ्ठल उभा विटेवरी
डोळ्यात अश्रू येते दर्शनाच्या ओढीने..
एकदा तरी पायी जावेसे वाटते वारीने..
मनानेच गेले पंढरीला, देह इथेच राहिला. घरसंसार लेकरात मी देव इथेचपाहिला..
दूर नाही देव, देवाचा हृदयात ठाव..
मुखी म्हणा रामकृष्ण ठेवा मनामध्ये भाव..!!
आपली पंढरी घरातच आहे, आपलं काम त्याग सेवा आणि मुखी भगवंताचं नाव..
घरची गृहिणी कामात आहे तर वारीला गेलेले नामात दंग आहे.. पण दोघांचा भाव एकच.. भावभक्तीने भगवंताचे स्मरण..!!
#रामकृष्णहरी !!
- Archana Rahul Mate Patil

Read More

पंढरीला जायचं होतं, असं म्हणून घरी राहू नका.. देव माझ्या श्रीविठ्ठलाला वाट पाहायला लावू नका..!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

तिने सात जन्म मागावं,
असं त्यानं नेहमी वागावं!!
सौभाग्याचं लेणं
माझ्या सर्वस्वाचा मान
वटसावित्रीच देणं
अखंड सौभाग्यवतीचे मागणं!!

- Archana Rahul Mate Patil

Read More

कधी कधी आपलं पाहणं हा स्वार्थीपणा वाटत जरी असला तरी आजकालच्या युगात स्वार्थी लोकांमुळेच आपल्याला सुद्धा आपला स्वार्थ साधून घ्यावा लागतो.. तो ही अगदी निस्वार्थपणे..!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

आपण आपलं आपल्यापुरतं पाहायचं, आपलं कोणीच नसतं,आपल्या आसपास अवतीभवती असलेल्या अनेक जणांना आपल्या आयुष्याशी काही घेण देणं नसत..!!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

एखाद्याची चुकी नसताना त्याला Blame करणं खूप सोपं असतं.. कारण आरोपापेक्षाही प्रत्यारोप नेहमीच लक्षात राहतो..
- Archana Rahul Mate Patil

Read More