Quotes by Vrishali Gotkhindikar in Bitesapp read free

Vrishali Gotkhindikar

Vrishali Gotkhindikar

@jayvrishaligmailcom
(5.1m)

जा जा जा मेरे बचपन

epost thumb

अख्खा मसुर

अख्खा मसूर कोल्हापूरचा अत्यंत लोकप्रिय प्रकार😊
कोल्हापूर मध्ये याची अनेक हॉटेल आहेत
आता बाकी शहरात पण हा प्रकार फेमस झालाय
अनेक पद्धतीने हा प्रकार बनवला जातो
वेगवेगळे मसाले वापरून... अनेक प्रकारची वाटणे लावुन 😊..
ही माझी पद्धत सोपी चविष्ट आणि चमचमीत 😊😋

साहित्य
एक वाटी मसुर
एक कांदा बारीक चिरून
आले लसुण बारीक करून
एक 🍅 टॉमेटो बारीक चिरून
कोल्हापुरी कांदा लसुण चटणी
(ही कोल्हापुरी मसाल्याची खासियत आहे ❤️)
तिखट मीठ चवीनुसार
कसुरी मेथी
कोथिंबीर
क्रीम.. आवडीनुसार

कृती
प्रथम मसुर कमी पाण्यात शिजवून घ्यावी
मसुरचा आकार सलग अख्खा राहिला पाहिजे
तेलात हिंग मोहरी फोडणी करुन
कांदा छान मऊ आणि गुलाबीसर करून घ्यावा
त्यावर आले लसूण घालून
जरा परतून
त्यावर दोन चमचे तिखट आणि एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी घालावी
थोडे परतून टोमॅटोच्या फोडी घालाव्यात
त्या मऊ झाल्या की शिजलेली मसुर घालून
चवी प्रमाणे मीठ, कसुरी मेथी व बारीक कोथींबीर घालावी
झाकणं ठेवून चांगलीं वाफ आणावी
चमचमीत अख्खा मसूर वर
क्रीम ची सजावट करावी 😊
पोळी भात पराठा यासोबत खावे

Read More

तुम.. ♥️
...जो खाबोमे अक्सर आते थे...
आज सामने आये हो...शायद...
कई बरसोसे नजरको तलाश थी..रुह बेकरार थी..
शायद वो तुमही हो जिसे मेरा दिल पाना चाहता था..
कीतनी बार सोचा था..तुम होते तो ये होता...
तुम होते तो ऐसा करते....
पर जब तुम सामने हो तो दिलमे एक वहमसा है..
के तुम"वोही"..हो के नही..??
कैसे कहु मुझे यकीन अपने दिलपे है..
जो तुम्हे" अपना" समझ. बैठा है...!!
ओर अपना बनानेको कह रहा है...
अब तो बात इस हदतक है...
के भगवान करे "वो" ..तुमही..हो
जो सिर्फ.."मेरे अपने" हो..|

वृषाली **

Read More

🟢अळू वडी 🟢
थोड्या वेगळा प्रकार
आणि वेगळा आकार

बागेतल्या अळूची पाने थोडी लहान होती
मग अशा प्रकारे वडी केली
वेगळा प्रकार वेगळा आकार
🟢साहित्य
अळूची सात आठ लहान पाने
डाळीचे पीठ एक वाटी
पाव वाटी तांदूळ पिठी
हळद, काळा मसाला, गुळ, मीठ
चवीनुसार
एक लिंबा एवढी चिबच भिजवून तिचा कोळ
🟢कृती
वरील सर्व साहित्य घालून डाळीचे पीठ सरसरीत भिजवावे
अळूची पाने धुवून घ्यावी
प्रथम थाळीला तेल लावुन तिळ पसरून घ्यावेत
वरुन डाळीचे पीठ लावावे
नंतर एका वेळी दोन तीन पाने थाळीत रचावी.
वरुन डाळीचे पीठ लावावे
परत पाने वर परत पीठ असे दोन तीन थर द्यावे
सर्वात वर पिठाच्या थरावर तिळ पसरावेत
हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्यावे
गार झाल्यावर आवडीच्या आकारात वड्या पाडाव्या
तव्यात तेल घालून तळून घ्याव्या

Read More
epost thumb

संवादिनी ...

कुठे होतास दोन दिवस .. फोन का ..उचलत नव्हतास
हा हा हा ..
हसु नकोस विचारते त्याचे ऊत्तर दे
डॉक्टर कडे गेलो होतो ..ठेवून घेतले त्यांनी
काय ??कशासाठी गेला होतास ..
दुखत होते छातीत ..
अरे कशाने दुखत होते ते तरी सांग ..
ते विचारायलाच तर गेलो होतो ना
काय म्हणले मग ते ?
तुमच्या हृदयाची जागा एका सुंदरीने काबीज केलीय ...म्हणून दुखतेय
इथे मला काळजी वाटतेय आणी तुला चेष्टा सुचतेय
काळजी वाटून प्रश्न सुटत नसतो ग ..प्रिये
प्लीज ..बी सिरीयस ..
सिरीयस च आहे ग सगळे
सांग ना लवकर ..
ऐकायची तयारी आहे ?
प्राण कंठाशी आले आहेत अगदी ..बोल लवकर
माझे पण “प्राण थोडेच दिवस या कुडीत आहेत असे म्हणत होते डॉक्टर ..
काय बोलतोस हे
हो ब्लड .केन्सेर .आहे मला ...त्यामुळे ..
अरे देवा ..
एक हुंदका ..!!

--वृषाली .

Read More

🪴कोथिंबीर वडी

🪴हिरवीगार तजेलदार कोथिंबीर बाजारात येऊ लागली की लगेच कोथिंबीर वडी करावीशी वाटते
पावसाळ्याच्या दिवसात कोथिंबीर मुबलक आणि स्वस्त मिळते
या काळात पाच रुपयाला सुध्दा भली मोठी पेंडी मिळते

🪴साहित्य

अर्धी जुडी कोथिंबीर बारीक चिरून
एक वाटी डाळीचे पीठ
पाव वाटी तांदूळ पीठी
तिखट, हळद, ओवा, बडीशेप, जिरे, तीळ
मीठ चवीनुसार

🪴कृती

कोथिंबीर बारीक चिरुन त्यात तिखट मीठ हळद ओवा , जिरे बडिशेप हे सगळे छान मिसळून घ्यावे
त्यात वाटीभर डाळीचे पीठ आणि पाव वाटी तांदूळ पीठी घालून थोडे थोडे पाणी घालत अलगद गोळा करून घ्यावा
गोळा थोडा घट्ट असावा
फार पाणी वापरू नये
एका थाळीला तेल लावून हा गोळा त्यात थापून घ्यावा
त्यावर तीळ लावुन घ्यावे
थाळी ठोकून सारखी करावी

🪴दहा ते पंधरा मिनीटे कुकरची शिट्टी काढून वाफवून घ्याव्यात

🪴गार झाल्यावर आवडीनुसार वड्या कापाव्या
तव्यावर तेल सोडून दोन्हीकडून खरपुस भाजुन घ्याव्या
🪴मस्त कुरकुरीत वड्या होतात.🪴

Read More

कविता

epost thumb

कविता

epost thumb

#श्रावण
#गव्हले आणि गव्हल्याची खीर
गव्हल्याची खीर मला अतिशय आवडते
पूर्वी गव्हले , शेवया , पापड, सांडगे वैगेरे जिन्नस घरीच केले जात असत
शुभकार्यासाठी जेवणात गव्हल्याची खीर लागायची
मोठ्या मंगल कार्यात पाच सवाष्णीना मानाने बोलावून त्यांचे पूजन करून त्यांच्या शुभहस्ते गव्हले नखुल्या बोटवे मालत्या फेनूल्या असे प्रकार केले जात केले जात
धार्मिक कार्यक्रमात पानात वाढलेली ही थोडीशी खीर खाऊनच जेवायला सुरुवात केली जायची
लहानपणी घरी कोणताही कार्यक्रम असला की सर्वांच्या पानात वाढून झाल्यावर ही उरलेली खीर मी गट्टम् करीत असे 😀
आई कित्येक वेळा फक्त माझ्यासाठी वाटीभर खीर मुद्दाम करीत असे
आई नोकरी वाली जरी असली तरी इतर बायकाप्रमाणे वेळात वेळ काढून गव्हले घरीच करीत असे
माझ्या आजीची तर त्यात "मास्टरी"होती..
सुबक देखणे आणि पांढरे शुभ्र गव्हले असत तिचे ❤️
मी पण त्यावेळी गव्हले करायच्या या कामात आईं आजी सोबत लुडबुड करीत असे 🙂
माझ्या लग्नानंतर आई माझ्यासाठी पण थोडे गव्हले करून देत असे
शिवाय या ना त्या कारणाने घरी जेवायला बोलावलं की गव्हल्याची खीर असेच..🙂
आईच्या मृत्यूनंतर माझी वहिनी
" ताई तुम्हाला नोकरीतून कुठे वेळ आहे मी करणार आहे माझे त्यातले तुम्हाला पण देते "
असे म्हणून
मला गव्हले करून देत असे
ती पण माझ्या आईकडून शिकून हळुहळू तयार झाली होती
कालांतराने तिच्या कुटुंबाचा पसारा वाढला तिने पण गव्हले करायचे बंद केले
मग कित्येक वर्षे असेच मावशा, आत्या , आईच्या मैत्रीणी यांच्याकडून प्रेमाने आठवण ठेवून असे थोडे थोडे गव्हले घरी येत राहिले
काळाच्या ओघात त्याही सर्व प्रेमळ गृहिणी देवाघरी गेल्या
या मे महिन्यात मी ठरवले चला आपणच घरी गव्हले करू बघू जमतात का ते ..
पूर्वीपासून आई आजीने केलेले पाहिले होतेच
एका भांड्यात समप्रमाणात रवा आणि मैदा एकत्र करून थोडे तूप घातले पीठ मळण्यासाठी आवश्यक तेवढेच दूध घालून दोन तास झाकून तास ठेवले
दोन तासानंतर गव्हले वळून पंख्याखाली सुकवले
माझे गव्हले फार ठेंगणे ठुसके व सुबक नाहीं झाले (आई आजी सारखे सारखे तर नाहीच जमले)
पण प्रथमच केले त्या मानाने ठीक झाले
श्रावण महिन्यात नेवेद्यासाठी चांगली तयारी झाली होती
त्यावेळेस गव्हले वाळल्यावर पहिल्यांदा एक वाटीभर खीर करून देवाला नेवेद्य दाखवला होता
खीरी साठी प्रथम दोन मोठे चमचे गव्हले तुपात मंद आचेवर भाजून घेतले
त्यात एक वाटीभर पाणी घालून चांगले शिजवले व गॅस बंद करून झाकणं ठेवले
पाच दहा मिनिटांनी गव्हले चांगले शिजून फुगून आले होते
परत गॅस चालू करून त्यात दोन वाटया दुध, अर्धी वाटी साखर घालून खीर चांगली उकळून घेतली
खीर तयार झाल्यावर कोमट असताना त्यात थोडी वेलदोडे पावडर घातली
या खीरीला केशर ड्राय फ्रूट याची गरज लागत नाही
अत्यंत साधी सोपी तरीहि चविष्ट अशी खीर तयार होते
माझ्याकडे या वेळेस आणखी एक शुभ शकुन घडायचा होता
पहिल्या सोमवारी संध्याकाळी मैत्रिणीचा फोन आला तिच्या मुलीची मंगळागौर होती
तिच्या लग्नाला पाच वर्षे झाल्याने या वेळेस उद्यापन पण ठेवले होतें
मला जेवायला आमंत्रण द्यायला तिने फोन केला होता
मी सहज विचारले...
काय ग तयारी झाली का सगळी
हो तयारी तशी झालीय ग पण बघ ना नेमके उद्यापनाच्या वेळेसच शुभ शकुनाची खीर करायला गव्हले कुठेच नाही मिळाले
त्यात पावसाने हवा अशी कुंद...
(या आठवड्यात त्या काळात इकडे धो धो पाऊस होता )
कुणाला करायला सांगावे तर वाळणार तरी कधी
शेवटी शेवयाची खीर करणार झालं...
मी म्हणले अग इतकेच ना .
माझ्याकडे आहेत गव्हले मी केले होते मे महिन्यात..

अग पण तू तुझ्या घरच्या पुरते केले असशील मला वाटीभर तरी लागतील
मंगळागौरी च्या मुली धरून पंचवीस तीस पान आहे माझ्याकडे
मग काय शिल्लक राहणार तुझ्याकडे..?
सगळेच संपुन जातील तू केलेले गव्हले
तिचे बोलणे ऐकून मी म्हणले
हे बघ एक वाटी गव्हले दिले तर काहीं फरक नाही पडणार मला
माझ्याकडे शास्त्रा पुरते गव्हले उरतील. खुप झाले
हे ऐकून मैत्रीण एवढी खुश झाली...
आणि म्हणाली ठिक आहेपाठवते कुणाला तरी गव्हले न्यायला
त्यावर मी म्हणाले
अग कशाला कुणाला पाठवते .
मीच येते सकाळी दस्तुरखुद्द खीर घेउन...
हे ऐकल्यावर ती आणखीनच खुश .
वाहवा... मग तर उत्तमच...
अशा प्रकारे मी एक वाटीभर गव्हल्याची खीर तयार करून सोबत घेउन गेले
एक छोटे पातेले भर खीर झाली
थोडी चारोळी होती घरी ती सुध्दा त्यात घातली
जेवणाचा कार्यक्रम उत्तम पार पडला
सर्वांना खीर पुरली आणि आवडली सुध्दा
काहींनी परत मागून घेतली
शिवाय घरच्या पाहुण्या समोर माझ्या गव्हल्याचे कौतुक झाले ते वेगळेच..❤️
असा घडला माझ्या गव्हल्याचा शुभ शकुन.

Read More

दूर रहकर न करो बात

epost thumb