Vayangibhoot - 1 in Marathi Moral Stories by Prof Shriram V Kale books and stories PDF | वायंगीभूत - भाग 1

Featured Books
  • THE TALE OF LOVE - 13

    Catagory-(Romantic+Thriller️+Psycho+Toxic+Crime‍️+Foreign pl...

  • মহাভারতের কাহিনি – পর্ব 119

    মহাভারতের কাহিনি – পর্ব-১১৯ নবম দিনের যুদ্ধের শেষে রাত্রে ভী...

  • জঙ্গলের প্রহরী - 4

    জঙ্গলের প্রহরীপর্ব - ৪অস্বস্তিকর পরিস্থিতি কাটাতে ঋষি তাড়াত...

  • ঝরাপাতা - 1

    ///ঝরাপাতাপর্ব - ১সন্ধ্যা নামার ঠিক আগের এই সময়টা খুব প্রিয়...

  • Ms Dhoni

    রাঁচির ছোট্ট শহর। স্টেশন রোডের পাশে এক সরকারি কোয়ার্টারে থা...

Categories
Share

वायंगीभूत - भाग 1


       पहिला कोंबडा झाला नी घरण उठली. काल रात्रीच्या रांधपाला नाचण्याचं पीठ संपलं होतं. आज काहीही करून दोन पायलीचं दळण करणंच भाग होतं. जावाना हाकारून तिने चुलीतला शेणगोळा बाहेर ओढला. अर्धी थापटी(गोलाकार शेणी) मोडून घेवून त्यावर चुलीतला शेणगोळा ठेवून तो फुंकणीने फोडून त्यावर   रान शेणीचा  कुस्कर टाकून फुंकर घालू लागली. थोड्याच वेळात चांगला जाळ धरल्यावर कोपऱ्यातल्या पिचुर्ड्या अलगद ठेवून त्या पेटायला लागल्यावर साण्यातल्या  चिमूटभर तंबाखु घेवून तो भाजून त्याची  मशेरी लावीत बायजा मागिलदारी  गेली.  दोणीजवळची पितळी  दीडशेरी   घेवून ती  खोरणात (बहिर्दिशेला) निघाली. ती परत येवून हातपाय धुवून  घरात येईपर्यंत जावा उठून दळणाच्या तयारीला लागलेल्या होत्या. 

        पंचवीसेक भाकऱ्यांच पीठ जमल्यावर बायजा भाकऱ्या  करायला बसली."भाकरे वांगडा भाजी कसली करूया आज?"  जावेने विचारल्यावर बायजा  म्हणाली, " सुक्या खोबऱ्याची चटणी वाट. चार घुडघुडे, वंजळभर लसणी आनी  सुक्यो मिर्च्यो घी." चटणी वाटून होईस्तो दुसरा कोंबडा झाला नी बापू दणदणा उठला. चुलीतले दोन जळते ढलपे घेवून त्याने पडवीतल्या थाळीत  घातले नी  विस्तव पेटवला. मग चंचीतला चिमटीभर तंबाखु भाजून त्याची मशेरी लावून खसाखसा दात घासले. दोणीवर जावून  खळखळावून चुळा भरून खांद्यावरच्या पंच्याने तोंड पुशीत तो ओटीवर गेला.झोपाळ्यावर बसून हलके झोके घेता घेता पान खाल्ले. रोज तीन चार वेळा पानातून काजऱ्याची पाव बी 

तो पचवीत असे. सुरुवातीला अर्धा पाऊण महिना अगदी मोहरी एवढा तुकडा मग हळू हळू प्रमाण वाढवीत दोन वर्षात तो पाव बी वर पोचला. काजऱ्याच्या च्या विषामुळे त्याचे ओठ काळे झाले आणि आवाजही फाटला.देवस्की करणाऱ्या माकु धनगराच्या नादाने असले काय काय तोडगे करायचा त्याला नाद होता. पान खाल्ल्यावर फानस घेवून तो डुऱ्यावर शिपणं करायला गेला. 

       अख्ख्या  बागमळ्यात  कुठेही दीड दोन पुरुष डबरा मारला की मुबलक पाणी लागत असे. म्हणून आगरा डोगरात माड पोफळींच शिंपण करण्यासाठी लोक  सोई नुसार कुठेही डबरे खणून पाण्याची सोय करीत. असल्या डबऱ्याना ‘डुरा’ किंवा ‘डुरे बाव’  म्हणत असत. डुऱ्याच्या कडेला चार साडेचार हाती मांडी एवढा जाड  खैराची किंवा आईन किंदळीची  दुडेळकी मेढ पुरीत. मेढीच्या दोन डेळक्याना भोक पाडून त्यात आडवी पहार बसवीत. आठहाती वाशाला मध्यभागी भोक पाडून त्यात पहार  आरपार  घालून तो मेढीच्या डेळक्यात खेळती  ठेवीत. वाशाच्या बुडाला जडशीळ दगड मजबूत जखडून बांधलेला असे. तर  वाशाच्या विरुद्ध टोकाला दोरीचा फासरा घालून पाच हाती मजबूत काठी टांगती बांधलेली असे. काठीच्या तळी पत्र्याची बादली किंवा  पाच घागरी पाणी राहील एवढे  मोठे  कडीवाले पत्र्याचे आयदण - घंगाळ - अडकवीत त्याला ‘कोळंबे’  म्हणत . पाणी काढणारा काठी  जोराने खाली खाली दाबीत  टोकाला बसवलेले कोळंबे पाण्याने भरले की काठीवरचा दाब कमी करी. त्यासरशी वाशाच्या टोकाला असलेल्या दगडाच्या वजनामुळे पाण्याने भरलेले कोळंबे- बादली विनासायास वर येई. त्यातले पाणी कडेच्या पाटात ओतीत. काठी नीट धरून खाली दाबताना जरा ताकद लागे. पण  बायका-  नी  जाणती पोरे सुद्धा सहजपणे लाट चालवू शकत.   

              डुऱ्यावर जावून बापू  लाट काढायला लागला. त्याचे शिंपण्याचे पद्धतशीर गणित जुळवलेले होते. आगरात  एका सरीत ओळीने  बारा माड नी  त्यांच्या मध्ये दोन पोफळी लावलेल्या असत. त्यांच्या आळ्यातून पाणी  पुढे  जाई.माडा पोफळीची  एक  सरी भरायला  चोवीस कोळंबी मारावी लागत. मग लाट थांबवून तो  दुसऱ्या सरीत पाणी  परतून  येई. अशा चार सऱ्या भरेपर्यंत उजाडे  नी  शिंपणे बंद करून तो न्हेरी करायला घर गाठी. आठवड्यातले सहा दिवस  त्याचा हा नेम चुकत नसे . फक्त भेस्तरवारी कामाचा खाडा असे. त्या दिवशी बाजार करून तो देवस्कीसाठी कुठची कुठची थळे शोधीत  गावंदी मारीत असे. शिपणे पुरे करून तो घरी गेला तेंव्हा भावजयीने ओसरीवर  पाट मांडून केळीच्या पानावर चार भाकऱ्या, शहाळ्याची  चटणी, अच्छेऱ्या मातीच्या रुंदुल्यातूनअदमुरं दही नी बचकाभर खाराची मिरची वाढून टोपल्याखाली झाकून  बाजुला पाण्याचा तांब्या भरून  ठेवलेला होता. कधी दह्या ऐवजी भला खासा लोण्याचा गोळा, मिरची ऐवजी आवळा, अंबाडा, लिंबू किंवा आंब्याचे  लोणचे असा सीझन प्रमाणे बदल असे. कधी भाकरी ऐवजी आंबोळ्या किंवा घावने किंवा गऱ्याच्या पिठाच्या दशम्या असत.  

         खाकी चोळणा पाटलोण , खाकी दोन खिशांचा सदरा,  डोक्यावर  मिलिट्रीवाल्या मित्राने दिलेली लालगोंड्याची काळपट हिरवी कॅप असा सरंजाम केल्यावर  पानाचा बटवा कमरेच्या  पट्ट्यात  अडकवून तो बाहेर पडला. पावळीत उभा केलेला चार हाती  जाडजूड  चिव्याचा दांडा  घेवून नाल मारलेल्या  चामड्याच्या वहाणा घालून बाबू  वाटेला लागला. झपाझप चालताना  व्हाणांचा कर्रर्र  कर्रर्र  असा लयीत आवाज व्हायचा. अधून मधून  हातातला दांडा  दाण्णऽकन्  आपटायची त्याची लकब होती. दांड्याला बुडाशी मुसळासारखी  लोखंडी वसवी बसवलेली असल्यामुळे दण्ण दण्ण आवाज लांबूनही ऐकायला यायचा.पाचेक वर्षामागे  गावदेवाच्या उत्सवात कीर्तन  सुरू झाल्यावर बुवांचे मङ्गलाचरण संपता संपता   बाबू  देवळाच्या ओवरीत शिरला. त्याच्या दांड्याचे  आवाज ऐकल्यावर कामतेकरबुवा मिस्किलपणे म्हणाले, " बाबुराव दणदणे  आले वाटतं....वळवाचा पाऊस नी दणदणे  यांचं आगमन  अगदी धूमधडाक्यात  होणार " त्यावर हशा पिकला.  त्यावेळेपासून  त्याचे  बाबू दणदणे  हे नाव रूढ झाले.  

          मणच्यात  मुसलमान वाड्यामध्ये  कोणी म्हमद  कासकर आहे त्याला कर्णपिशाच्च वश आहे. तो वदतो ते खरं होतं असा त्याचा लौकिक दणदण्याच्या कानी आलेला. म्हणून आज त्याला भेटायला बाबु  मणच्याला निघाला. बंदरावर जावून  थोडा वेळ वाट बघितल्यावर  विजयदुर्गातून  खारेपाटणपर्यंत जाणाऱ्या होड्या आल्यावर त्या एक आणा भाड्यात  पोंभुर्ल्यापर्यंत उतारू न्हेत. मणच्यात बंदराजवळच  कासकर रहायचा. बाबुला बघितल्यावर,  "येवा म्हाजनानुं, " म्हणत म्हमदचा भाऊ जिक्रिया पुढे आला. "आज ह्येवनी कशे काय इलाव म्हाजनानु? " त्यावर चंची खोलून पान नी ओली सुपारी देत बाबु सांगु लागला. (क्रमश: )