Quotes by Shital Pawar in Bitesapp read free

Shital Pawar

Shital Pawar

@shitalpawar524065


शापित वाडा 👻😨😨😨

गावच्या टोकाला एक जुना वाडा होता. लोकं म्हणायची, त्या वाड्यात गेलं की कोणी परत येत नाही.दिवसाढवळ्या तो वाडा शांत दिसायचा, पण रात्री तिथं विचित्र आवाज यायचे – दरवाजे आपोआप आपटणे, पावलांचे आवाज, बाईच्या हसण्याचा आवाज...🌑अभिजीत, रुचा आणि मयूर हे तिघे मित्र शहरातून गावात आले होते. गावकऱ्यांकडून वाड्याच्या गोष्टी ऐकून ते म्हणाले –"आपण तिथं जाऊन खरंच काय आहे ते बघायचं."गावकऱ्यांनी खूप समजावलं, पण ते हटले.🌑 वाड्यात प्रवेशरात्री १२ वाजता ते तिघं टॉर्च घेऊन वाड्यात शिरले.आत हवा जड होती, जणू कोणीतरी त्यांच्या श्वासावरचं नियंत्रण घेत होतं. भिंतींवर जुन्या चित्रांमध्ये माणसांचे डोळे हलतायत असं वाटत होतं.अचानक मागून दार आपटला. ते तिघे घाबरले.मयूरने हसत म्हटलं – "गावकऱ्यांनी आपल्याला घाबरवायला दार लावलंय."पण दारावर कुणाचाही हात नव्हता. 😨🌑 आरशाचं रहस्य वाड्यात -आत गेल्यावर त्यांना एक मोठा आरसा दिसला.त्या आरशात त्यांचं प्रतिबिंब दिसत होतं… पण एक माणूस जास्त होता! तो चेहरा हसत होता, पण त्याची डोळे रक्ताने लाल होते.रुचाच्या अंगावर काटा आला. तिने आरशावर दगड मारला, पण आरसा फुटला नाही. उलट त्यातलं "चौथं प्रतिबिंब" जवळ यायला लागलं. 🌑किंकाळ्याते तिघं धावत सुटले. अचानक मयूर थांबला. त्याचा चेहरा पांढरट झाला होता.मयूरच्या डोळ्यांतून रक्त येऊ लागलं… आणि तो मोठ्याने किंचाळला.क्षणात तो गायब झाला.आता अभिजीत आणि रुचा घाबरून रडत होते. दार कुठेच सापडत नव्हतं. जणू वाड्यानेच त्यांना आत कैद केलं होतं.रुचाने हिम्मत करून वाड्याच्या मध्यभागी असलेल्या खोलीत पाऊल टाकलं. तिथं तिने एक जुनी वही पाहिली.त्यात लिहिलं होतं –"हा वाडा माझ्या आत्म्याचा आहे. जो इथे येईल, त्याला मी आपला करीन."वही वाचताच मागून एक बाईचा हसण्याचा आवाज आला.अभिजीत वळून बघतो तर त्याच्या मागे ती "आरशातली चौथी आकृती" उभी होती.आणि…त्या रात्रीनंतर गावात कुणीही त्या तिघांना कधी पाहिलं नाही.वाडा मात्र आजही तसाच आहे.रात्री १२ वाजता तिथं गेलं की तीन आवाज एकत्र ऐकू येतात – किंकाळी, रडणं आणि हसणं…....

तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का ???

Read More

🌙✨ शुभ रात्री ✨🌙

आजचा दिवस कसा गेला? 🤔
👉 काही जणांचा भन्नाट गेला असेल
👉 काही जणांचा थोडा टेन्शनमध्ये गेला असेल
👉 तर काही जण आज खूप हसले असतील 😊

पण आता सगळं विसरा…
डोळे मिटा 😴
स्वप्नात स्वतःची छोटीशी दुनिया उभी करा 💭🌌

⭐️ माझं स्वप्नं – उद्या आणखी चांगलं घडावं!
तुमचं स्वप्न काय आहे? Comment मध्ये लिहा👇

🌙😇 शुभ रात्री!! 💖

Read More

🌸 संसार 🌸

संसार म्हणजे फक्त चार भिंती 🏠 नाहीत,
तो म्हणजे दोन मनांचा गोड संवाद ❤️ आहे...

संसार म्हणजे सकाळचा चहा ☕ एकत्र घेणं,
आणि रात्री झोपण्याआधी छोट्या गोष्टींवर हसणं 😊...

संसार म्हणजे कधी राग 😠, कधी हट्ट,
तर कधी न बोलता केलेलं समजून घेणं 🤝...

संसार म्हणजे मुलांच्या हसण्यातलं जग 👶,
आणि आई-वडिलांच्या आशिर्वादातलं सुख 🙏...

संसार म्हणजे फक्त पैशांचं गणित 💰 नाही,
तो आहे भावनांचं नातं 💞, विश्वासाचा पूल 🌈...

संसार सुंदर होतो जेव्हा,
'मी'पेक्षा 'आपण' शब्द जास्त वापरला जातो 💕...

Read More

डोळ्यातले अश्रू नेहमी शब्द होतात,
पण मनातील वेदना कुणाला दिसत नाहीत...
हसतमुखाने जगणारे लोकही,
रात्री उशाला मिठी मारून रडतात.

कोणी विचारत नाही, "तू खरंच आनंदी आहेस ना?"
कारण जगाला फक्त हसरे चेहरे हवे असतात...
दुःखाचं ओझं मनात ठेवूनही,
आपण नकळत इतरांसाठी आधार बनतो.

आईच्या आठवणी येतात तेव्हा,
हृदय आपसूकच ओलावतं...
"माझ्यासाठी थोडं जग" म्हणणारा आवाज,
आज फक्त स्मृतीतच दरवळतं.

कधी कधी वाटतं,
अश्रूंना शब्द दिले तर,
कविता जन्म घेते...
आणि त्या कवितेत लपलेली वेदना,
वाचकाच्या हृदयाला भिडून रडवून जाते.

like, share, comment 👍

Read More

थकलेल्या बापाची कहाणी - शितल पवार

घरासाठी जन्मभर धावला,
पण स्वतःसाठी क्षणभरही न थांबला...
थकलेले पाय, थकलेले खांदे,
आयुष्यभर ओझं वाहून नेणारे रांधे.

सकाळच्या सुर्याबरोबर उठतो,
आणि रात्रीपर्यंत कष्टच करतो...
पण घरातल्या मुलांच्या हास्यात,
तो प्रत्येक थकवा विसरतो.

शर्टाला घामाचे डाग,
पण चेहऱ्यावर समाधानाची झलक...
"बाबा" या एका शब्दाने,
त्याच्या आयुष्याला लागतो रंग.

स्वप्नं नेहमी आपल्या नसतात,
पण बाप नेहमी मुलांसाठी जगतो...
थकलेला असला तरी,
त्याच्या डोळ्यात कधीही हार दिसत नाही.

आजही अंगावर वेदना दाटतात,
तरीही हात काम थांबवत नाहीत...
कारण त्याला माहित आहे –
घर चालतंय त्याच्या थकव्यामुळेच.

अशा या थकलेल्या बापाची कहाणी,
सोन्याहून जास्त किमतीची आहे...
त्याच्या कष्टांच्या सावलीत,
आपली प्रत्येक स्वप्नं पूर्ण होत आहेत.

Read More

कविता : "मुलीचा संघर्ष" - शितल पवार

पायातलं घुंगरू कधी दडपलं,
तर कधी स्वप्नांचं पुस्तक उघडलं.
तिला फक्त नाचायचं होतं,
पण समाजानं तिला रोखलं.

"मुलगी आहेस, घरी बस,
तुझं काम फक्त स्वयंपाक!"
हे ऐकत ऐकतही तिनं
उभारलं स्वतःचं साम्राज्य भक्कम.

तिनं शिकून घडवलं करिअर,
अडथळ्यांना दिला झुंजार उत्तर.
आई–बाबांच्या आशा जपल्या,
तर स्वतःची स्वप्नंही जिंकल्या.

आज ती डोकं उंच करून उभी आहे,
तिच्या धैर्यानं जग थक्क झालंय.
मुलगी म्हणजे फक्त सावली नाही,
ती तर लढणारा सूर्य आहे! ☀️

"तुमच्या मते मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा संघर्ष कोणता असतो? कमेंटमध्ये लिहा… ✍️"

Read More